यशोमती मैयासे बोले नंदलाला "
श्रीकृष्ण हा जगद्गुरू खरा, त्याने गीतेमधून सर्व उपनिषदांची सार काढले हेही खरे पण भारतातल्या निम्या लोकांना, स्त्रीवर्गाला, त्याचे काही कौतक नाही. त्यांना ते माहितही नसेल. त्याने कंसाला मारले, पांडवांना मदत करून कौरवांना हरवले हे त्यांना माहीत असले तरी "ते देवाचे कामच आहे" अशी संभावना केली जाईल. त्यांच्या दृष्टीने कृष्ण एकच, "बाळकृष्ण". रांगत रांगत येऊन वडीलांच्या ताटातला घास त्यांनाच भरविणारा, मडके फोडून लोणी पळवणारा, गोकुळातील सर्वांचा लाडका, सावळा बाळकृष्ण. आपल्या घरांत रांगणार्या मुलाकडे कौतकाने पाहणार्या आईला तिथे दिसत होता तो बाळ्कृष्णच. शेकडो वर्षे आसेतुहिमाचल भारतातील आयांना ही भुरळ पडलेली आहे. त्यामुळे या बाळकृष्णाच्या गोष्टी सर्वत्र सांगितल्या/ऐकल्या जातात. कवींनीही याच्या लीला मोठ्या प्रेमाने वर्णिल्या. प्रत्येक भाषेत तुम्हाला त्या आढळतील. आता कृष्णासारखाच श्रीरामही विष्णूचा अवतार. मग त्याच्या वाट्याला हे भाग्य कां आले नाही ? असे तर नव्हे ना की कृष्ण खेडेगावात सर्वसामान्य घरांत वाढला व राम राजवाड्यांत म्हणून असे झाले ? बाळकृष्णाच्या अनेक गाण्यांच्या तुलनेत मला बाल रामाचे एकच गाणे आठवते.. "ठुमकी चलत रामचंद्र " (तुलसिदासांचे हे पद आपण बघणार आहोतच, पुढे केंव्हातरी) पण आज एक निनांतसुंदर पद सांगावयाचे आहे " यशोमती मैयासे बोले नंदलाला "
एक दिवस बाहेरून बाळकृष्ण फुणफुणत आला व यशोदेच्या कुशीत शिरून त्याने एकदम प्रश्न विचारला
"यशोमती मैयासे बोले नंदलाला, राधा क्युं गोरी, मै क्युं काला ?"
आईला एकदम हसूच फुटले. पण मामला गरम आहे असे पाहून तिने त्याला कुरवाळत शांत करावयाचा प्रयत्न केला व सांगावयास सुरवात केली
"बोली मुसकाती मैया, ललनको बताया
कारी आंधियारी आधी रातमे तू आया
लाडला कन्हैया मोरा, काली कंबलीवाला,
इस लिये काला."
"अरे, तू आलास तेव्हा काळीकुट्ट अर्धी रात्र झाली होती. आणि हे बघ, लाडोबा, तुझी घोंगडीही काळीच आहे की नाही ? म्हणून तू काळा."
पण एव्हढ्याने काही भागले नाही. याची भुणभुण चालूच "राधा क्युं गोरी, मै क्युं काला ?
आता आईच्या ल्क्षात आले राधेनेच याला भडकावले आहे. आता बाजू पलटावयाची तर राधेला खेचले पाहिजे. ती म्हणाली
"बोली मुसकाती मैया, सुन मेरे प्यारे गोरी गोरी राधाके नैन कजियारे
काळी नैनोवालीने ऐसा जादू डाला, इस लिये तू काला."
अरे लाडक्या, त्या गोर्या गोर्या राधेचे डोळे किती काळेकुट्ट आहेत , पाहिलेस का ? या बाया अश्याच. त्या काळे डोळीवालीने जादू घातली म्हणून तू काळा.
गोर्या राधेच्या काळ्याभोर डोळ्यांचा असा शिताफीने उपयोग करून व काळा रंग व जादूटोणा यांचा संबंध असतो या लोकसमजुतीचा आधार घेत आई
आपल्या सावळ्या बाळाची समजूत घालत आहे !
संपूर्ण भजन (हो, या गोड भावगीताला भजन म्हणावयाची पद्धत आहे) बघा :
यशोमती मैयासे बोले नंदलाला राधा क्युं गोरी, मै क्युं काला !!
बोली मुसकाती मैया ललनको बताया
कारी आंधियारी आधी रातमे तू आया
लाडला कन्हैया मोरा, काली कंबलीवाला
इस लिये काला !!
यशोमति मैयासे बोले नंदलाला, राधा क्युं गोरी, मै क्युं काला !!
बोली मुसकाती मैया, सुन मेरे प्यारे
गोरी गोरी राधिकाके नैन कजरारे
कारी नैनोवालीने ऐसा जादू डाला,
इस लिये काला !!
सत्यं शिवं सुन्दरं या सिनेमात लताने गायलेले हे अप्रतिम गाणे ऐका. एकदा ऐकून समाधान न होणार्या गाण्यांपैकी एक.
गाणे इथे ऐका.http://www.youtube.com/watch?v=jea1dqq3gis
शरद
वाचने
6938
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
वरचा दुवा लागत नाही
लेखन आवडले...
रसग्रहण फारच सुंदर उतरले आहे.
राधा.
In reply to रसग्रहण फारच सुंदर उतरले आहे. by प्रचेतस
ते काय बोलुन राहीले आणि
In reply to राधा. by अर्धवटराव
नेमका कुठे डिस्कनेक्ट जाणवतोय?
In reply to ते काय बोलुन राहीले आणि by विश्वनाथ मेहेंदळे
धन्यवाद ,गाणे ऐकलेले नव्हते ...
सुंदर
तिसरे कडवे
वा वा
In reply to तिसरे कडवे by विकास
धन्यवाद
In reply to वा वा by शरद
आवडले
In reply to वा वा by शरद
वा,,,मस्त लिवलय हो...!
परमानंद !!!
मस्तच....
माझं all time favorite गाणं.
फारच सुंदर आणि सात्विक
सुंदर
रसग्रहण
सुंदर
छान
गाणेच वाचायचे असेल तर हे घ्या
In reply to छान by मीनल
सोपं गीत, साधी चाल, रसाळ गायन
सुंदर परिचय!
वरिल दुवा पुन्हा एकदा
दुवा पुन्हा एकदा
In reply to वरिल दुवा पुन्हा एकदा by रमेश आठवले
हं
In reply to दुवा पुन्हा एकदा by रमेश आठवले
खुप दिवसांनी काही लिहिलत शरद
>>कृष्णाच्या आयुश्यात राधा
In reply to खुप दिवसांनी काही लिहिलत शरद by स्पंदना
मस्त वाटलं वाचुन .
सुंदर
सुन्दर गीत. कधीही ऐकताना
राधेश्याम
सुंदर रसग्रहण