आज माझ्या वेदनेला
पंख हसरे लाभले
दु:ख झाले पाखरू
अन नाचू गाऊ लागले
भिरभिरीची पाखराच्या
सवय होऊ लागली
वेदनेच्या जाणिवेची
गरज भासू लागली
दूर झाले मग सुखाच्या
पाश सारे तोडले
जीव जडला वेदनेवर
दु:ख मिरवू लागले.
भेटते जेव्हा नव्याने
वेदनेला त्या जुन्या
जाग येते जीवनाच्या
मैफिलीला मग सुन्या
जयश्री
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1962
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
भेटते जेव्हा नव्याने
भेटते जेव्हा नव्याने
वेदनेला त्या जुन्या
जाग येते जीवनाच्या
मैफिलीला मग सुन्या >>> झक्कास :-)
नकळत चाल लागुन गेली. सलाम!
नकळत चाल लागुन गेली.
सलाम!
खरच,,,,
मी सुदधा चालीतच वाचले.छान...
मस्त...भिरभिरीची पाखराच्या
मस्त...
भिरभिरीची पाखराच्या
सवय होऊ लागली
वेदनेच्या जाणिवेची
गरज भासू लागली
वा...
दु:ख
दु:ख हा सर्वात ईमानदार पाळीव प्राणी आहे. एकदा का लळा लागला की कध्धी सोडत नाही आपल्याला. मग बसावं, निवांतपणे त्याला गोंजारत!
कविता आवडली.
वॉव!
वॉव!
जयवी जी, कविता आवडलीं.
जयवी जी, कविता आवडलीं.
मस्त!!
मस्त!!
जीव जडला वेदनेवर
दु:ख मिरवू लागले.
हे आवडलं.
अगदी
In reply to मस्त!! by सूड
हेच म्हणतो!
आवडली
चांगली जमलीए.
तहे दिल से शुक्रिया दोस्तो
तहे दिल से शुक्रिया दोस्तो :)