आज माझ्या वेदनेला
पंख हसरे लाभले
दु:ख झाले पाखरू
अन नाचू गाऊ लागले
भिरभिरीची पाखराच्या
सवय होऊ लागली
वेदनेच्या जाणिवेची
गरज भासू लागली
दूर झाले मग सुखाच्या
पाश सारे तोडले
जीव जडला वेदनेवर
दु:ख मिरवू लागले.
भेटते जेव्हा नव्याने
वेदनेला त्या जुन्या
जाग येते जीवनाच्या
मैफिलीला मग सुन्या
जयश्री
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1939
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
भेटते जेव्हा नव्याने
नकळत चाल लागुन गेली. सलाम!
खरच,,,,
मस्त...भिरभिरीची पाखराच्या
दु:ख
वॉव!
जयवी जी, कविता आवडलीं.
मस्त!!
अगदी
In reply to मस्त!! by सूड
आवडली
तहे दिल से शुक्रिया दोस्तो