पाठशिवण!
सांजेला तसा वेळ होता.
अजुन शिवारात लगबग जाणवत होती.
आताशा पाहुणा म्हणुन आलेल्या मला,
माझ नेहमीच ठिकाण......मोटवन खुणावत होती.
तस तिच माझ नात फार वर्षांच.
आजोळी आईचा पदर धरुन
येउ लागल्यापासुनच
माझ्या आजोबांनीच पहिला हिची ओळख करुन दिली होती
अन,
शाळा कॉलेज संपवुन आलेल्या माझ्या
गद्धेपंचवीशीला निवांतपणासाठी
हिची ओढ होती.
नेहमीसारख मी मोटवनीवरुन
विहिरीत डोकावुन पाहिल.
काळशाऽऽर पाणी खोलवर डुचमळत होत.
क्षणभर भारल्यासारख झाल.....
आजुबाजुचे आवाज विरले.....
"थंड आहे पाणी ते!", मी दचकलो.
मला माहितही नाही आणि माझ्याशेजारी
एक निटस नवयौवना उभी!
नाही म्हंटल तरी जरा मोहरलो...
"खाली जाउन आला वाटत?"
मी जरा मस्तवालपणा केला.
तीने नुसत्याच रिकाम्या नजरेन माझ्याकडे पाहिल
जणु आरपार...
आता मी तिला निरखल
व्यवस्थीत साडी, छोटासा बॉब!
फक्त या सगळ्याला विसंगत
थंड नजर......!
"कुठल्या तुम्ही? या गावच्या?", मी विचारल
लहाणपणच्या प्रत्येक सुट्टीत
मी आजोळीच असे.
अन गावातला प्रत्येकजण तसा माहीतीतला होता.
पण्....ही नव्हती!
"नाही." तिने जवळच्या एका छोट्या शहराच नाव सांगितल
"इथे काय करताय?" या वयात समवयीन भिन्नलिंगी व्यक्तीशी बोलायची
भारी हौस नाही?
"नारायणला भेटायला आले."
आता मी उडालो
"नार्या? सुताराचा?"
"हो. आडनाव सुतारच आहे."
मी तिला आणखी निरखल.
शांत सेन्सीटीव्ह नार्यान चांगली पोरगी पटकावली होती.
"मग? गावात नाही भेटला?" परत्..समवयीन्..भिन्नलिंगी....!!!
आता तिच्याकडे पहाताना वाटल ती कुठेतरी दुऽऽर उभी आहे.
"मी गावाकडे येताना, गावाबाहेर भेटला. त्यानच इथे पाठवल."
"अच्छा! तर तुम्ही त्याची वाट पहाताय!" माझ मन हळहळल.
शहरात राहुन जे मला जमल नाही,
ते या खेडगावच्या नार्यान जमवल होत.
"हो." ती थंड.
का कुणास ठाउक, पण मला तेथुन हलवेना.
नाही..हा धबधबा जरी माझ्यावर कोसळणार नसला,
तरी निदान दोनचार शिंतोड्यांची आशा होती.
काही नाही तरी , निदान गेला बाजार
"ये तेरी भाभी" अशी नार्या फिल्मी ओळख करुन देइल
अशी अपेक्षा होती.
असाच थोडा वेळ गेला...
अचानक ती चुळबुळली.
"नाही यायचा तो! मला पाहुन दचकला. नाही यायचा तो!"
"एव्हढ अर्जंट आहे भेटण?" मी विचारल.
"उद्या भेटेल, परवा भेटेल."
"नाही, नाही, आत्ताच ! आत्ताच!. मला काही समजत नाही. मी कुठे जाऊ? कशी जाऊ? "
बाजुला काजळणार्या दिशा
आता माझ्या ध्यानात आल्या.
अचानक हुंदका देत ती उठली,
अन काय कळायच्या आत
मोटवनीवरुन विहिरीत झेपावली.
"अहो? काय करताय?" मी झटकन पुढे झालो
पण ती कधीच आत झेपावली होती.
मी आत वाकुन पाहिल...काहीच नाही.
आतल पाणी तसच काळशार हळुवार डुचमळत होत.
आत्ता झेपावली? अन गेली कुठे?
माझ मलाच समजेना.
मी सरळ उभा राहीलो.
मदतीसाठी कुणालातरी बोलवाव म्हणुन वळलो...
माग सुताराचा नार्या....!
"अरे तूझी मैत्रीण! " मला वाचा फुटली
"नाही थांबली ना? थोडी तरी वाट पहायची." तो दु:खी स्वरात उद्गारला.
"अरे आत्ताच तर आत उडी मारली तीने. चल आपण वर काढु."
"आत्ताच? नाही. नाही. आठवडा झाला त्याला." नार्या दु:खात नुसता बुडाला होता.
"अरे! मी आत्ताच पाहिली तीला."
" नाही रे! आता ही पाठशिवण अशीच सुरु रहाणार"
"नार्या! अरे शुंभा! चल आपण शोधु तिला"
"तशी शांत होती रे! खुप प्रेम करायची. एका दुपारी वहावलो बघ. तशी खुप शांत्र होती रे. संयमी! पोटातल्या चाहुलीन सैरभैर झाली बघ! आता अशीच पाठशिवण!"
नार्याच बोलण मला कळत नव्हत.
अन..
नार्या पटकन पुढ झाला.
काय कळायच्या आत, तोही आत झेपावला.
मी सुन्न...
पुन्हा आत पाहिल
पाणी शांऽऽऽत!
अख्खी विहीर माझ्यापुढे गरगरली.
कुणीतरी मला माग ओढल
"पाव्हणे घाबरले वाटत?"
माझ्या बंद डोळ्यासमोर माणसांच्या आवाजाची चित्र फिरु लागली
"नार्या दिसला वाटत्...लई येळ झाला इकड येउन्....मी पाहिल शेतातुन."
"नार्या एकटाच की ती अश्राप पोरगी पण?"
"आठवड्याभरातच तिच्यापाठोपाठ त्यान पण...."
इतक्या माणसांच्या असण्यानही माझी हुडहुडी हटत नव्हती.
तशी आयुश्यातल्या अनोळखी धक्क्याची ही पहिलीच वेळ होती.
__/\__
अपर्णा
वर्गीकरण
प्रतिक्रिया
सुप्पर्ब अप्पु ...
बेस्ट
भूऽऽऽऽऽऽऽऽत!!
सुंदरच, एकंदरीत फारच आवडले
काटा आला! मस्त लिहिलं आहेस..
झक्कास भूत-कथा.
हेलोवीन च्या शुभ मुहूर्तावर
निनाद , हेप्पि हेलोविन डे
ईंट्रेस्टिंग!!
बाप रे..
झकास...
वा! जमलीये....
मस्तच....
कथा आवडली.
हॅपी हॅलोवीन!
भारी लिवलयं !
छान लिहिलय
जबराट.....!
दंडवत घ्या हो ताई.
मस्तच!
हॅप्पी हॅलोवीन!
झक्कास.
छान लिहीलय आवडले !!
मस्त!
अगदी सोप्पी भूतकथा आवडली.
बयो!
छान!
सॉल्लिड्ड!
हॅलोविनचा मुहुर्त साधण्यासाठी
अपेक्षित शेवट असूनही
भय ईथले
धन्यवाद मंडळी.
भुतकथा आवडली ...साधी आणि