✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पाठशिवण!

स
स्पंदना यांनी
Wed, 10/31/2012 - 11:32  ·  लेख
लेख
सांजेला तसा वेळ होता. अजुन शिवारात लगबग जाणवत होती. आताशा पाहुणा म्हणुन आलेल्या मला, माझ नेहमीच ठिकाण......मोटवन खुणावत होती. तस तिच माझ नात फार वर्षांच. आजोळी आईचा पदर धरुन येउ लागल्यापासुनच माझ्या आजोबांनीच पहिला हिची ओळख करुन दिली होती अन, शाळा कॉलेज संपवुन आलेल्या माझ्या गद्धेपंचवीशीला निवांतपणासाठी हिची ओढ होती. नेहमीसारख मी मोटवनीवरुन विहिरीत डोकावुन पाहिल. काळशाऽऽर पाणी खोलवर डुचमळत होत. क्षणभर भारल्यासारख झाल..... आजुबाजुचे आवाज विरले..... "थंड आहे पाणी ते!", मी दचकलो. मला माहितही नाही आणि माझ्याशेजारी एक निटस नवयौवना उभी! नाही म्हंटल तरी जरा मोहरलो... "खाली जाउन आला वाटत?" मी जरा मस्तवालपणा केला. तीने नुसत्याच रिकाम्या नजरेन माझ्याकडे पाहिल जणु आरपार... आता मी तिला निरखल व्यवस्थीत साडी, छोटासा बॉब! फक्त या सगळ्याला विसंगत थंड नजर......! "कुठल्या तुम्ही? या गावच्या?", मी विचारल लहाणपणच्या प्रत्येक सुट्टीत मी आजोळीच असे. अन गावातला प्रत्येकजण तसा माहीतीतला होता. पण्....ही नव्हती! "नाही." तिने जवळच्या एका छोट्या शहराच नाव सांगितल "इथे काय करताय?" या वयात समवयीन भिन्नलिंगी व्यक्तीशी बोलायची भारी हौस नाही? "नारायणला भेटायला आले." आता मी उडालो "नार्‍या? सुताराचा?" "हो. आडनाव सुतारच आहे." मी तिला आणखी निरखल. शांत सेन्सीटीव्ह नार्‍यान चांगली पोरगी पटकावली होती. "मग? गावात नाही भेटला?" परत्..समवयीन्..भिन्नलिंगी....!!! आता तिच्याकडे पहाताना वाटल ती कुठेतरी दुऽऽर उभी आहे. "मी गावाकडे येताना, गावाबाहेर भेटला. त्यानच इथे पाठवल." "अच्छा! तर तुम्ही त्याची वाट पहाताय!" माझ मन हळहळल. शहरात राहुन जे मला जमल नाही, ते या खेडगावच्या नार्‍यान जमवल होत. "हो." ती थंड. का कुणास ठाउक, पण मला तेथुन हलवेना. नाही..हा धबधबा जरी माझ्यावर कोसळणार नसला, तरी निदान दोनचार शिंतोड्यांची आशा होती. काही नाही तरी , निदान गेला बाजार "ये तेरी भाभी" अशी नार्‍या फिल्मी ओळख करुन देइल अशी अपेक्षा होती. असाच थोडा वेळ गेला... अचानक ती चुळबुळली. "नाही यायचा तो! मला पाहुन दचकला. नाही यायचा तो!" "एव्हढ अर्जंट आहे भेटण?" मी विचारल. "उद्या भेटेल, परवा भेटेल." "नाही, नाही, आत्ताच ! आत्ताच!. मला काही समजत नाही. मी कुठे जाऊ? कशी जाऊ? " बाजुला काजळणार्‍या दिशा आता माझ्या ध्यानात आल्या. अचानक हुंदका देत ती उठली, अन काय कळायच्या आत मोटवनीवरुन विहिरीत झेपावली. "अहो? काय करताय?" मी झटकन पुढे झालो पण ती कधीच आत झेपावली होती. मी आत वाकुन पाहिल...काहीच नाही. आतल पाणी तसच काळशार हळुवार डुचमळत होत. आत्ता झेपावली? अन गेली कुठे? माझ मलाच समजेना. मी सरळ उभा राहीलो. मदतीसाठी कुणालातरी बोलवाव म्हणुन वळलो... माग सुताराचा नार्‍या....! "अरे तूझी मैत्रीण! " मला वाचा फुटली "नाही थांबली ना? थोडी तरी वाट पहायची." तो दु:खी स्वरात उद्गारला. "अरे आत्ताच तर आत उडी मारली तीने. चल आपण वर काढु." "आत्ताच? नाही. नाही. आठवडा झाला त्याला." नार्‍या दु:खात नुसता बुडाला होता. "अरे! मी आत्ताच पाहिली तीला." " नाही रे! आता ही पाठशिवण अशीच सुरु रहाणार" "नार्‍या! अरे शुंभा! चल आपण शोधु तिला" "तशी शांत होती रे! खुप प्रेम करायची. एका दुपारी वहावलो बघ. तशी खुप शांत्र होती रे. संयमी! पोटातल्या चाहुलीन सैरभैर झाली बघ! आता अशीच पाठशिवण!" नार्‍याच बोलण मला कळत नव्हत. अन.. नार्‍या पटकन पुढ झाला. काय कळायच्या आत, तोही आत झेपावला. मी सुन्न... पुन्हा आत पाहिल पाणी शांऽऽऽत! अख्खी विहीर माझ्यापुढे गरगरली. कुणीतरी मला माग ओढल "पाव्हणे घाबरले वाटत?" माझ्या बंद डोळ्यासमोर माणसांच्या आवाजाची चित्र फिरु लागली "नार्‍या दिसला वाटत्...लई येळ झाला इकड येउन्....मी पाहिल शेतातुन." "नार्‍या एकटाच की ती अश्राप पोरगी पण?" "आठवड्याभरातच तिच्यापाठोपाठ त्यान पण...." इतक्या माणसांच्या असण्यानही माझी हुडहुडी हटत नव्हती. तशी आयुश्यातल्या अनोळखी धक्क्याची ही पहिलीच वेळ होती. __/\__ अपर्णा
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
7608 वाचन

💬 प्रतिसाद (33)

प्रतिक्रिया

सुप्पर्ब अप्पु ...

जेनी...
Wed, 10/31/2012 - 11:44 नवीन
सुप्पर्ब अप्पु ... एकेक ओळ वाचताना पूढच्या ओळीत काय असेल ...इतकी आतुरता एकदम मस्त सांभाळलिय .. मनाला एकदम चटक लावुन गेलं ..हे जे काय लिहिलयस ते !
  • Log in or register to post comments

बेस्ट

प्रशांत
Wed, 10/31/2012 - 12:01 नवीन
बेस्ट..!
  • Log in or register to post comments

भूऽऽऽऽऽऽऽऽत!!

कवितानागेश
Wed, 10/31/2012 - 12:40 नवीन
भूऽऽऽऽऽऽऽऽत!!
  • Log in or register to post comments

सुंदरच, एकंदरीत फारच आवडले

ज्ञानोबाचे पैजार
Wed, 10/31/2012 - 12:57 नवीन
सुंदरच, एकंदरीत फारच आवडले पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

काटा आला! मस्त लिहिलं आहेस..

इनिगोय
Wed, 10/31/2012 - 13:06 नवीन
काटा आला! मस्त लिहिलं आहेस.. ... पुन्हा आत पाहिलं.. पाणी शांऽऽऽत! खासच.
  • Log in or register to post comments

झक्कास भूत-कथा.

सस्नेह
Wed, 10/31/2012 - 13:06 नवीन
आता नार्‍या सुताराची पण गोष्ट येऊदे..
  • Log in or register to post comments

हेलोवीन च्या शुभ मुहूर्तावर

निनाद मुक्काम …
Wed, 10/31/2012 - 13:50 नवीन
हेलोवीन च्या शुभ मुहूर्तावर मस्त गूढ ,अर्थपूर्ण शैलीतील लेखनप्रकार वाचावयास मिळाला. मजा आली.
  • Log in or register to post comments

निनाद , हेप्पि हेलोविन डे

जेनी...
Wed, 10/31/2012 - 17:23 नवीन
निनाद , हेप्पि हेलोविन डे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

ईंट्रेस्टिंग!!

बॅटमॅन
Wed, 10/31/2012 - 13:53 नवीन
ईंट्रेस्टिंग!!
  • Log in or register to post comments

बाप रे..

चिगो
Wed, 10/31/2012 - 13:54 नवीन
भू ऽ ऽ ऽ त.. हे असं काही होऊ नये म्हणून "संरक्षण" वापरावे, लोक्सहो. पंधरा-वीस रुपये वाचवण्यापाई दोन जीव गेले फुकाच.. ;-) ताई, भूतकथा भारी हां..
  • Log in or register to post comments

झकास...

छोटा डॉन
Wed, 10/31/2012 - 13:56 नवीन
छान आणि नेमके लिखाण. आवडले. - छोटा डॉन
  • Log in or register to post comments

वा! जमलीये....

बिपिन कार्यकर्ते
Wed, 10/31/2012 - 14:00 नवीन
वा! जमलीये.... आम्हाला आमचीच 'या!!!' आठवली! :)
  • Log in or register to post comments

मस्तच....

ज्ञानराम
Wed, 10/31/2012 - 14:06 नवीन
मस्तच.... :)
  • Log in or register to post comments

कथा आवडली.

प्रभाकर पेठकर
Wed, 10/31/2012 - 14:08 नवीन
लेखन पद्धत आवडली. शेवट अपेक्षित होता. किंSSSचित विरस झाला.
  • Log in or register to post comments

हॅपी हॅलोवीन!

सहज
Wed, 10/31/2012 - 14:55 नवीन
कथा आवडली.
  • Log in or register to post comments

भारी लिवलयं !

मदनबाण
Wed, 10/31/2012 - 15:29 नवीन
भारी लिवलयं ! :)
  • Log in or register to post comments

छान लिहिलय

अभिजितमोहोळकर
Wed, 10/31/2012 - 15:31 नवीन
आवडलं.
  • Log in or register to post comments

जबराट.....!

अत्रुप्त आत्मा
Wed, 10/31/2012 - 15:38 नवीन
जबराट.....!
  • Log in or register to post comments

दंडवत घ्या हो ताई.

इष्टुर फाकडा
Wed, 10/31/2012 - 15:48 नवीन
काटा!!!
  • Log in or register to post comments

मस्तच!

मूकवाचक
Wed, 10/31/2012 - 16:06 नवीन
जबराट!!!
  • Log in or register to post comments

हॅप्पी हॅलोवीन!

मी_आहे_ना
Wed, 10/31/2012 - 16:25 नवीन
हॅप्पी हॅलोवीन! ... जबरी प्रकटन/कथा/भयकथा/भय-मुक्तक
  • Log in or register to post comments

झक्कास.

गणपा
Wed, 10/31/2012 - 16:27 नवीन
झक्कास.
  • Log in or register to post comments

छान लिहीलय आवडले !!

अक्षया
Wed, 10/31/2012 - 16:59 नवीन
छान लिहीलय आवडले !! :)
  • Log in or register to post comments

मस्त!

पैसा
Wed, 10/31/2012 - 17:19 नवीन
थोड्या शब्दात मस्त जमलीय कथा!
  • Log in or register to post comments

अगदी सोप्पी भूतकथा आवडली.

रेवती
Wed, 10/31/2012 - 18:44 नवीन
अगदी सोप्पी भूतकथा आवडली. एकानं यायचं बदकन् पाण्यात पडायचं. दुसर्‍यानं यायचं बदकन् पाण्यात पडायचं. ;) सर्वांना ह्याप्पी ह्यालोविन.
  • Log in or register to post comments

बयो!

स्पंदना
गुरुवार, 11/01/2012 - 11:24 नवीन
बयो! अग देव आनि भुत अशी बदकनच दिसतात.तिन तासाचा पिक्चर नसतो तो. सोप्पी तर सोप्पी! भुतकथा हाय कीनी? बास!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

छान!

स्वाती दिनेश
Wed, 10/31/2012 - 23:05 नवीन
भूतकथा आवडली, हॅपी हॅलोविन! स्वाती
  • Log in or register to post comments

सॉल्लिड्ड!

मराठे
गुरुवार, 11/01/2012 - 01:51 नवीन
सॉल्लिड्ड!
  • Log in or register to post comments

हॅलोविनचा मुहुर्त साधण्यासाठी

५० फक्त
गुरुवार, 11/01/2012 - 08:01 नवीन
हॅलोविनचा मुहुर्त साधण्यासाठी योग्य, पण फारच अपेक्षित वाट फक्त वाटेवरच्या पाट्य नविन रंगवलेल्या त्या आवडल्या.
  • Log in or register to post comments

अपेक्षित शेवट असूनही

प्रचेतस
गुरुवार, 11/01/2012 - 08:31 नवीन
अपेक्षित शेवट असूनही संवादांच्या सुयोग्य वापराने प्रभावी ठरलेली भयकथा आवडली.
  • Log in or register to post comments

भय ईथले

लीलाधर
गुरुवार, 11/01/2012 - 08:47 नवीन
ज ह ब रा मस्त आवडेश. भारी लिवलीय कथा :)
  • Log in or register to post comments

धन्यवाद मंडळी.

स्पंदना
गुरुवार, 11/01/2012 - 11:23 नवीन
धन्यवाद मंडळी. खरतर हॅलोवीनसाठी कुणीतरी लिहिल अस फार वाटत होत.पण कुणीच काही तंकल नाही म्हणुन माझ्या कडुन धापैशाच हे लेखन प्रपंचाच धाडस.
  • Log in or register to post comments

भुतकथा आवडली ...साधी आणि

सुहास..
गुरुवार, 11/01/2012 - 12:31 नवीन
भुतकथा आवडली ...साधी आणि सोप्पी !!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा