खूप जवळच्या आणि मला अति अति प्रिय अशा २ व्यक्तींच्या कुंडलीमध्ये कर्केचा राहू (अर्थात मकरेचा केतू) सापडला. त्यामुळे माझ्या स्वभावानुसार पाठपुरावा करुन, मी या कुंडलीवैशिष्ठ्याचे स्पष्टीकरण शोधून काढले. अत्यंत रोचक असे मला तरी ते वाटले. तेव्हा जी काही माहीती मिळाली ती जालसंदर्भासहीत आपल्यापुढे मांडण्याकरता हा लेखप्रपंच. ज्या लोकांना "ज्योतिष" विषयात गम्य नसेल त्यांनी नाही वाचले तरी चालेल : ).
केतू (South Node / Dragon's tail) हा छायबिंदू कुंडलीमध्ये ज्या घरात किंवा राशीत पडतो त्या राशीचा स्वभाव आणि घराची वैशिष्ठ्ये/कारकत्व हे पूर्वजन्मेतिहास सांगतात.
याउलट राहू (North Node / Dragon's Head) हा छायबिंदू कुंडलीमध्ये ज्या घरात किंवा राशीत पडतो त्या राशीचा स्वभाव आणि घराची वैशिष्ठ्ये/कारकत्व हे या जन्मी ची जातकाच्या आत्म्याची ओढ/दिशा सांगतात.
तसे पाहता प्रत्येकाच्या कोणत्या ना कोणत्या घरात/राशीत राहू आणि विरुद्ध घर/राशीत केतू पडलेला असतो. आणि केतूचे गुणधर्म टाकून राहूचे अंगीकारणे कोणाही करता सोपे नसते कारन दोन्ही बिंदू बरोबर १८० अंश विरुद्ध असतात.
मकरेचा केतू हे दर्शवितो की पूर्वजन्मी आपण अत्यंत उच्च्पदस्थ व्यक्ती होतात. बिझनेस टायकून/ राजा/ एखाद्या संस्थेचे संस्थापक काहीही असू शकेल. अत्यंत श्रमपूर्वक आपण एखादी संस्था उभारून नावारुपाला आणलेली असू शकते. पूर्वीचा अनुभवामुळे व्यवस्थापन कौशल्य, नेतृत्वगुण हे आपल्यामध्ये या जन्मी उपजतच आहेत. किंबहुना स्वतःच्या आवडीनिवडींना तिलांजली देऊन, एक प्रकारचे "स्टिफ अपर लिप" ठेवणे हे आपल्या अंगवळणीच पडले आहे. इतके की काही जातकांना हे वळत नाही की या जन्मी , लोक आपल्याला ज्याची सवय आहे तो सन्मान का देत नाहीत? पूर्वसुकृतानुसार आपण स्पर्धेच्या जगात चटकन "अॅडजस्ट" (मराठी शब्द? :( ) होता. भावना लपवून ठेवता.
पण राहू कर्केचा असल्याने, पूर्वजन्मीच्या यशाचे नेणिवेच्या पातळीवरील अवजड ओझे झुगारून , कर्क राशीचे गुणधर्म विकसित करणे हे आपल्या आत्म्याचे ध्येय आहे. कर्क ही अतिशय कुटंबवत्सल, प्रेमळ, भावनाप्रधान रास असल्याकरणाने, कुटुंबात रमणे, अन्य लोकांच्या भावना जाणून घेऊन तदानुषंगीक मृदू व्यवहार करणे, स्वतःच्या भावना प्रकट करण्यास न कचरणे, बाहेरील यश कितीही खुणावत असले तरी कौटुंबिक जाबाबदार्या पार पाडण्यात समाधान मानणे आदि गोष्टी आपल्या आत्मोन्नत्तीस पोषक आहेत. आई-वडीलांनी दिलेला संस्कारांचा वारसा, बालपणीचे अनुभव यांचे मूल्य जाणून भले-बुरे सर्व स्वीकारणे, सकारात्मक संस्कारांचा, अनुभवांचा सन्मान करणे आदि गोष्टी आपणांस पोषक आहेत. आपल्यात वसलेल्या, आंतरीक लहान मूलाचा विकास करणे, अविश्वासाकडून विश्वासाकडे जाणे या आपल्याला अवघड वाटणार्या गोष्टी, या जन्मी साध्य करायच्या आहेत. पूर्वजन्मी स्पर्धा आणि भावनाशून्य अशा वातावरणात आपण लढलात पण आता तसे नाही. आता घर, कुटंब आपली वाट पाहताहेत जेथे मायेचा आत्यंतिक ओलावा आहे. तेव्हा आपला फोकस (मराठी शब्द?) बाह्यजगाकडून स्वतःकडे वळविण्याची ही वेळ आहे.
संदर्भ -
दुवा १
दुवा २
दुवा ३
दुवा ४
दुवा ५
वाचने
27980
प्रतिक्रिया
95
मिसळपाव
प्रतिक्रिया
लेख आवडला.
तर्री धन्यवाद. दिलेले दुवे
In reply to लेख आवडला. by तर्री
अॅडजस्ट = जुळवून घेणे.
रोचक माहिती!!
धन्यवाद श्रीरंग. धन्यवाद सूड.
शुचिक्का
लील्स
In reply to शुचिक्का by लीलाधर
शुचिताई... उत्तम माहिती व
In reply to लील्स by शुचि
धन्यवाद मृगा. अगं माझा एवढा
In reply to शुचिताई... उत्तम माहिती व by मृगनयनी
वा वा द्वितीयेतला राहू
In reply to धन्यवाद मृगा. अगं माझा एवढा by शुचि
चंद्र आणि राहू कर्केचा
In reply to वा वा द्वितीयेतला राहू by शुचि
वा वा
In reply to चंद्र आणि राहू कर्केचा by मृगनयनी
गुरु ११व्यात आहे. मेषेचा.
खरय!!
In reply to गुरु ११व्यात आहे. मेषेचा. by मृगनयनी
अरेरे
In reply to गुरु ११व्यात आहे. मेषेचा. by मृगनयनी
जाणत्या
In reply to अरेरे by अनघा आपटे
म्हणायला पर्सनल आहे पण अनघा,
In reply to अरेरे by अनघा आपटे
नाउअ द बॅग हॅज कम आउट ऑफ दी कॅट
In reply to म्हणायला पर्सनल आहे पण अनघा, by शुचि
..... अजून "संशोधन" मोड
In reply to नाउअ द बॅग हॅज कम आउट ऑफ दी कॅट by दादा कोंडके
??
In reply to नाउअ द बॅग हॅज कम आउट ऑफ दी कॅट by दादा कोंडके
टिप
In reply to ?? by प्रभाकर पेठकर
शुची आणि मृगनयनी,
In reply to गुरु ११व्यात आहे. मेषेचा. by मृगनयनी
पुष्करिणी ताई... म्हणजे..
In reply to शुची आणि मृगनयनी, by पुष्करिणी
भावंड सध्या तरी ऐकतय जे
In reply to पुष्करिणी ताई... म्हणजे.. by मृगनयनी
?
In reply to पुष्करिणी ताई... म्हणजे.. by मृगनयनी
हो!.. 'सिंह' ही गुरुची उच्च
In reply to ? by प्रकाश घाटपांडे
गुरुची उच्च रास कर्क
In reply to हो!.. 'सिंह' ही गुरुची उच्च by मृगनयनी
बरोबर आहे.. कर्क ही देखील
In reply to गुरुची उच्च रास कर्क by प्रकाश घाटपांडे
ह्म्म्म
सोकाजीनाना जन्मगाव-वेळ-दिवस
In reply to ह्म्म्म by सोत्रि
माझी पण काढना ग पत्रिका शुचि
In reply to सोकाजीनाना जन्मगाव-वेळ-दिवस by शुचि
जन्मवेळ : पहाटे ७: ३५ एम
In reply to माझी पण काढना ग पत्रिका शुचि by जेनी...
?
In reply to जन्मवेळ : पहाटे ७: ३५ एम by मृगनयनी
(No subject)
In reply to ? by श्रीरंग_जोशी
श्रीरंगा र्राईट्ट यू आर.
In reply to ? by श्रीरंग_जोशी
टैम टैम की बांत हैं....
In reply to श्रीरंगा र्राईट्ट यू आर. by अभ्या..
मग भाज्या, वाणसामन खरेदी करून
In reply to ? by श्रीरंग_जोशी
चालतं गं !
In reply to जन्मवेळ : पहाटे ७: ३५ एम by मृगनयनी
जर्र्रा स्वस्तात होत असेल तर
In reply to माझी पण काढना ग पत्रिका शुचि by जेनी...
अरे बाबांनो मला नाही येत
In reply to जर्र्रा स्वस्तात होत असेल तर by अभ्या..
कर्क.
आम्चा बी कर्केचा राहू षष्ठात
माहित नाही म्हणून विचारतो .
आमच्या कुंडलीत काय आहे
हं.
+१
In reply to हं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
च्यामारी ह्या पत्रिकेच्या...
हां रे! पृथ्वी कशी काय आपल्या
In reply to च्यामारी ह्या पत्रिकेच्या... by एस
सापेक्ष
In reply to हां रे! पृथ्वी कशी काय आपल्या by स्पंदना
रोचक
In reply to सापेक्ष by प्रकाश घाटपांडे
बरोबर
In reply to रोचक by श्रीरंग_जोशी
मंगळावरचा संवाद
In reply to रोचक by श्रीरंग_जोशी
:-)
In reply to मंगळावरचा संवाद by चौकटराजा
ब्रेकिंग न्यूज!
In reply to मंगळावरचा संवाद by चौकटराजा
जन्मस्थळ हे केंद्रबिंदू धरुन
In reply to सापेक्ष by प्रकाश घाटपांडे
अस्सं होय?
In reply to जन्मस्थळ हे केंद्रबिंदू धरुन by मृगनयनी
हहहाहा!!!.. कॅमेराचा अॅन्गल
In reply to अस्सं होय? by एस
अॅन्गल व जागा ?
In reply to हहहाहा!!!.. कॅमेराचा अॅन्गल by मृगनयनी
दशा.
वाटच बघतेय. कितीही
In reply to दशा. by तर्री
ज्योतीष व ईतर काही विषय असे
In reply to वाटच बघतेय. कितीही by शुचि
शुचिताई
In reply to वाटच बघतेय. कितीही by शुचि
खर्र खर्र
ह्म्म... परत एकदा वाचीन ! या
लेखात काही संदर्भ आहेत. लेख
In reply to ह्म्म... परत एकदा वाचीन ! या by मदनबाण
"कर्केचा राहू" असं शीर्षक
महत्वाची माहिती
In reply to "कर्केचा राहू" असं शीर्षक by ३_१४ विक्षिप्त अदिती
म्या पन
In reply to महत्वाची माहिती by श्रीरंग_जोशी
पृथ्वीच्या वातावरणाबाहेर
In reply to "कर्केचा राहू" असं शीर्षक by ३_१४ विक्षिप्त अदिती
पृथ्वीच्या वातावरणाबाहेर निर्माण होणार्या ध्वनिलहरी आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. ध्वनीलहरींच्या प्रसारासाठी माध्यमाची आवश्यकता असते. पृथ्वीवर हवा हे माध्यम वापरलं जातं.ह्म्म... ग्रहांचा ध्वनी मी पहिल्यांदा ऐकला होता,तो युट्युबच्या एका व्हिडीयोवर्,गुरु ग्रहा विषयी थोडी शोधा शोध जालावर करताना मला हा व्हिडीयो मिळाला होता.( गुरु विषयी माहिती मिळवण्याच्या मागे माझ्या टाळक्यातील अनेक विचार कारणीभूत होते...उदा."पत्रिकेत" गुरु ग्रह्,आयुष्यात "आध्यात्मिक उन्नतीत" गुरु चे स्थान, मला माहित असलेल्या माहिती प्रमाणे "गुरु ग्रहाचे" आकारमान इ.इ. आणि अनेक ) नासाच्या Voyager या यानाने टिपलेला हा आवाज होता. गुरु ग्रहाचे फोटो सुद्धा अवकाश यान पॄथ्वीवर पाठवतात तर ते कसे पाठवत असतील ? असाही विचार केला... मग जालावर शोधा शोध केल्यावर उत्तर मिळाले radio transmission असो... ते यान अवकाशात होते,पॄथ्वीवर नव्हे ! मग असा विचार केला की जर आवाजाची फ्रिक्वेन्सी माणसाच्या ऐकु येणाच्या पातळी पेक्षा कमी असेल तर काय ? आणि पॄथ्वीवर ही फ्रिक्वेन्सी ऐकता येईल का ?ध्वनीलहरींच्या प्रसारासाठी माध्यमाची आवश्यकता असते.हे माझ्याही लक्षात होतं,शाळेत असताना काचेच्या हांडीतील घंटा निर्वात केल्यावर आवाज केल्यावर तिचा आवाज ऐकु येत नाही असा प्रयोग केल्याचा किंवा पाहिल्याचे पुसटसे आठवत होते... तरी सुद्धा माझे कुतुहल काही केल्या कमी झाले नाही. मग जालावरचा शोध वाढवला... तेव्हा काही रोचक माहिती मिळाली ती खाली देत आहे. Radio Storms on Jupiter Receivers for Jupiter A PROJECT TO DETECT RADIO EMISSIONS FROM JUPITER असो...त्यामुळे अन्य ग्रहातून येणारा ध्वनी आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. (तसं आपलं वातावरण, म्हणजे हवा, आयनावरण, पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र इ थर आपलं बाहेरच्या बर्याच गोष्टींपासून रक्षण करतात.*)च्यामारी शास्त्रज्ञ उगाच पॄथ्वीवर मोठ्या मोठ्या रेडियो अँटिना लावुन स्वतःचा वेळ आणि पैसे फुकट घालवत आहेत का ? *** जर माझ्या समजण्यात काही चूक होत असेल तर जरुर सांगावे... समजुन घेण्याचा प्रयन करीन. जाता जाता प्रमाणा॑च्या बाहेर अवांतर :--- जेव्हा कंपनीत पहिला प्रोजेक्ट आणला आणि त्याच्यावर काम करत होतो,तेव्हा क्लायंटशी संवाद फोनवरुन व्ह्यायचा, जगातल्या कुठल्याही देशातुन फोन यायचा ! पण कंपनीने दिलेला डेस्कवरचा फोन नल्ला क्वालिटीचा होता,अनेकदा मॅनेजमेंटला सांगितले की समोरचा काय बोलतोय ते नीट कळत नाही तर प्रॉब्लेम ट्रबलशूट कसा करणार ? क्लायंटही बोंबाबोंब करायचा ! कंपनीने फोनचा डब्बा काही बदलला नाही,पण आम्हाला कम्नुनिकेशन स्किलचे ट्रेनिंग मात्र दिले ज्यात लिन्सिंग स्कील सुद्धा होते...त्याचा मात्र मला बरा फायदा झाला ! ;) ( शेवटी क्लायंटने कंटाळुन स्वतःचे पैसे खर्च करुन cisco IP phone माझ्या डेस्कवर बसवुन दिला !) फोनवर बोलताना / ऐकताना समोरच्या माणुस कसा असावा / तो कितपत खरं बोलतोय / त्याचा स्वभाव,वृत्ती याचा अंदाज लावायला मी अनुभवातुन शिकलो ! हल्लीच एक व्हिडीयो देखील पाहिला आहे... आशा आहे तुम्ही सुद्धा तो पहाला आणि त्यावर विचार कराल... Julian Treasure: 5 ways to listen betterव्हॉयेजरने ऐकलेला आवाज हा
In reply to पृथ्वीच्या वातावरणाबाहेर by मदनबाण