Skip to main content

कर्केचा राहू

लेखक शुचि यांनी शुक्रवार, 26/10/2012 19:07 या दिवशी प्रकाशित केले.
खूप जवळच्या आणि मला अति अति प्रिय अशा २ व्यक्तींच्या कुंडलीमध्ये कर्केचा राहू (अर्थात मकरेचा केतू) सापडला. त्यामुळे माझ्या स्वभावानुसार पाठपुरावा करुन, मी या कुंडलीवैशिष्ठ्याचे स्पष्टीकरण शोधून काढले. अत्यंत रोचक असे मला तरी ते वाटले. तेव्हा जी काही माहीती मिळाली ती जालसंदर्भासहीत आपल्यापुढे मांडण्याकरता हा लेखप्रपंच. ज्या लोकांना "ज्योतिष" विषयात गम्य नसेल त्यांनी नाही वाचले तरी चालेल : ). केतू (South Node / Dragon's tail) हा छायबिंदू कुंडलीमध्ये ज्या घरात किंवा राशीत पडतो त्या राशीचा स्वभाव आणि घराची वैशिष्ठ्ये/कारकत्व हे पूर्वजन्मेतिहास सांगतात. याउलट राहू (North Node / Dragon's Head) हा छायबिंदू कुंडलीमध्ये ज्या घरात किंवा राशीत पडतो त्या राशीचा स्वभाव आणि घराची वैशिष्ठ्ये/कारकत्व हे या जन्मी ची जातकाच्या आत्म्याची ओढ/दिशा सांगतात. तसे पाहता प्रत्येकाच्या कोणत्या ना कोणत्या घरात/राशीत राहू आणि विरुद्ध घर/राशीत केतू पडलेला असतो. आणि केतूचे गुणधर्म टाकून राहूचे अंगीकारणे कोणाही करता सोपे नसते कारन दोन्ही बिंदू बरोबर १८० अंश विरुद्ध असतात. मकरेचा केतू हे दर्शवितो की पूर्वजन्मी आपण अत्यंत उच्च्पदस्थ व्यक्ती होतात. बिझनेस टायकून/ राजा/ एखाद्या संस्थेचे संस्थापक काहीही असू शकेल. अत्यंत श्रमपूर्वक आपण एखादी संस्था उभारून नावारुपाला आणलेली असू शकते. पूर्वीचा अनुभवामुळे व्यवस्थापन कौशल्य, नेतृत्वगुण हे आपल्यामध्ये या जन्मी उपजतच आहेत. किंबहुना स्वतःच्या आवडीनिवडींना तिलांजली देऊन, एक प्रकारचे "स्टिफ अपर लिप" ठेवणे हे आपल्या अंगवळणीच पडले आहे. इतके की काही जातकांना हे वळत नाही की या जन्मी , लोक आपल्याला ज्याची सवय आहे तो सन्मान का देत नाहीत? पूर्वसुकृतानुसार आपण स्पर्धेच्या जगात चटकन "अ‍ॅडजस्ट" (मराठी शब्द? :( ) होता. भावना लपवून ठेवता. पण राहू कर्केचा असल्याने, पूर्वजन्मीच्या यशाचे नेणिवेच्या पातळीवरील अवजड ओझे झुगारून , कर्क राशीचे गुणधर्म विकसित करणे हे आपल्या आत्म्याचे ध्येय आहे. कर्क ही अतिशय कुटंबवत्सल, प्रेमळ, भावनाप्रधान रास असल्याकरणाने, कुटुंबात रमणे, अन्य लोकांच्या भावना जाणून घेऊन तदानुषंगीक मृदू व्यवहार करणे, स्वतःच्या भावना प्रकट करण्यास न कचरणे, बाहेरील यश कितीही खुणावत असले तरी कौटुंबिक जाबाबदार्‍या पार पाडण्यात समाधान मानणे आदि गोष्टी आपल्या आत्मोन्नत्तीस पोषक आहेत. आई-वडीलांनी दिलेला संस्कारांचा वारसा, बालपणीचे अनुभव यांचे मूल्य जाणून भले-बुरे सर्व स्वीकारणे, सकारात्मक संस्कारांचा, अनुभवांचा सन्मान करणे आदि गोष्टी आपणांस पोषक आहेत. आपल्यात वसलेल्या, आंतरीक लहान मूलाचा विकास करणे, अविश्वासाकडून विश्वासाकडे जाणे या आपल्याला अवघड वाटणार्‍या गोष्टी, या जन्मी साध्य करायच्या आहेत. पूर्वजन्मी स्पर्धा आणि भावनाशून्य अशा वातावरणात आपण लढलात पण आता तसे नाही. आता घर, कुटंब आपली वाट पाहताहेत जेथे मायेचा आत्यंतिक ओलावा आहे. तेव्हा आपला फोकस (मराठी शब्द?) बाह्यजगाकडून स्वतःकडे वळविण्याची ही वेळ आहे. संदर्भ - दुवा १ दुवा २ दुवा ३ दुवा ४ दुवा ५
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 27980
प्रतिक्रिया 95

प्रतिक्रिया

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

डीओ लहरी या विद्युतचुंबकीय लहरी असतात, प्रकाशाच्या लहरींची ऊर्जा खूप कमी केल्यावर रेडीओ लहरी बनतील. विद्युतचुंबकीय लहरी 'ऐकू' येत नाहीत, ऐकू येऊ शकत नाहीत. ह्म्म... मान्य ! माझ्या पहिल्या प्रतिसादातला ध्वनी हा शब्दप्रयोग चुकीचा आहे,तरी सुद्धा या ग्रहगोलकांचा प्रभाव पॄथ्वीवर होतो,आणि तो आपल्या शरिरावर / मेंदुवर परिणाम करु शकतो असे जे मला वाटते ते योग्य आहे ना ? जर विद्युतचुंबकीय लहरी मेंदुवर परिणाम करत असतील,तर ज्या मेंदुमुळे आपल्या शरीराचा व्यवहार निरंतर चालु असतो त्यावर परिणाम का होउ शकत नाही ? थोडक्यात या ग्रहांचा आपल्यावर परिणाम होत असावा असा माझा जो विचार आहे तो योग्य आहे,असे समजणे चूक आहे का ?

In reply to by मदनबाण

तरी सुद्धा या ग्रहगोलकांचा प्रभाव पॄथ्वीवर होतो,आणि तो आपल्या शरिरावर / मेंदुवर परिणाम करु शकतो असे जे मला वाटते ते योग्य आहे ना ?
ग्रहगोलांचा परिणाम पृथ्वीवर होतो. तो गुरूत्वाकर्षणाच्या स्वरूपात होतो. किती होतो? सूर्य आणि चंद्राचा पृथ्वीवर जेवढा परिणाम होतो तो एखाद्या काल्पनिक एककात एक लाख एवढा मानला तर गुरूचा साधारण १ एवढा होईल. शनीचा त्याहीपेक्षा कमी. मंगळ आणि इतर टिकलीएवढे ग्रह त्याहीपेक्षा कमी, अंतरं कमी असली तरी त्यांची वस्तूमानंही चिमूटभरच आहेत. पृथ्वीवर परिणाम होतो तो पृथ्वीची कक्षा थोडी पुढे-मागे होण्यात. त्यामुळे एका वर्षाची लांबी कमी-जास्त होऊ शकते, किती, एका नॅनोसेकंदापेक्षाही कमी. हा परिणाम मोजायला किती मोठी दुर्बिण लागते? नारायणगावच्या जीएमआरटीला हा परिणाम दिसायला निदान ३ तास सलग निरीक्षण करावं लागतं. शिवाय पोस्ट-प्रोसेसिंगमधे याने पडणारा फरक लगेच काढून टाकता येतो. गुरूत्वाकर्षण हे दोन वस्तूंच्या वस्तुमानावर अवलंबून असतं. पृथ्वीचं वस्तूमान आहे एकावर २४ शून्य एवढे किलो. मनुष्याचं वस्तूमान त्या तुलनेत अगदी नाही म्हणावं इतपत कमी. मनुष्यांवर याचा किती परिणाम होणार?
जर विद्युतचुंबकीय लहरी मेंदुवर परिणाम करत असतील,तर ज्या मेंदुमुळे आपल्या शरीराचा व्यवहार निरंतर चालु असतो त्यावर परिणाम का होउ शकत नाही ?
विद्युतचुंबकीय लहरींपैकी गॅमा, क्ष-किरण, अल्ट्राव्हायलेट (अतिनील) या किरणांचा मनुष्यावर विपरित परिणाम होतो. पृथ्वीबाहेरच्या स्रोतांमधे निर्माण होणारे हे हानीकारक किरण पृथ्वीचं वातावरण आपल्यापर्यंत पोहोचू देत नाही. हे सगळे किरण वातावरण शोषून घेतं. रेडीओ किरणांचा मनुष्यावर विपरीत परिणाम झाल्याची आत्तापर्यंत नोंद नाही, असा काहीही पुरावा नाही. रेडीओ लहरींच्या काही भागासाठी वातावरण पारदर्शक आहे, जसं दृष्य किरणांसाठी आहे. थोडक्यात दृष्य किरण आणि रेडीओ लहरी वातारवणातून आपल्यापर्यंत पोहोचू शकतात. गुरूत्वाकर्षण आणि विद्युतचुंबकीय लहरी वगळता या वस्तू आपल्या संपर्कात येऊ शकत नाहीत. जेवढा परिणाम होऊ शकतो तो अतिशय नगण्य आहे. हत्तीच्या वजनासमोर मुंगीचं वजन जसं नगण्य असावं तसंच. व्यतिरिक्त अवकाशस्थ वस्तू, त्यांच्यामधून निघणारे किरण यांचा आपल्यावर काही भला-बुरा परिणाम होतो यावर माझा विश्वास नाही. ज्यांना विश्वास ठेवायचा आहे त्यांनी ठेवण्यास माझी ना नाही. हत्ती-मुंगीचे हुशार आणि बिनडोक, दोन्ही प्रकारचे विनोद मला आवडतात.

In reply to by ५० फक्त

अवांतर - हा तुम्हाला स्वताच अवांतर का म्हणावासा वाटला ?
धाग्याच्या नावावर केलेला पाचकळ विनोद वगळता माझ्या प्रतिसादाचा धाग्याशी काहीही संबंध नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

असंय होय, खरंतर तुमचा प्रतिसाद अन त्यावरची चर्चा हाच भाग या धाग्यावर सर्वात जास्त वाचनीय आहे.

In reply to by ५० फक्त

पण तुमचे प्रतिसाद अन त्यावरची चर्चा धागा अन विक्षिप्त काकूंचा प्रतिसाद, दोन्हीला अवांतर आहे, त्याचं काय?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

धूमकेतूंनी विविध प्रकारचे जीवाणू (bacteria) पृथ्वीवर आणून सोडले असं काही शास्त्रज्ञ मानतात. ही पृथ्वीवरच्या जीवसृष्टीची सुरूवात होती किंवा जीवसृष्टी निर्माण होण्यात याची मदत झाली असं काही लोक मानतात. काही लोकांच्या मते पृथ्वीवर एवढ्या प्रमाणात असणारं पाणी धूमकेतू पृथ्वीवर आपटण्यातून आलेलं आहे. यातले पहिले मत कदाचित मान्य करता येऊ शकते. धूमकेतूच्या बर्फाळ शेपटीत जिवाणू सापडण्याची शक्यता आहे. प्रश्न पुन्हा असा पडतो की ते तिथे कुठून गेले. दुसर्‍या मताशी मात्र असहमत आहे. इतक्या प्रचंड प्रमाणावर असणारं पाणी हे निव्वळ धूमकेतू आपटण्यानं निर्माण होणे अवघड वाटते. हायड्रोजनचे विश्वातील प्रचंड प्रमाण लक्षात घेता पाणी पृथ्वीच नव्हे तर इतरत्रही अस्तित्वात असणार याची शक्यता नाकारता येत नाही. पण पृथ्वीवरील पाण्याचा मूळ स्रोत हा येथील हायड्रोजनचे ज्वलन हाच असला पाहिजे. कृपया दुसर्‍या मताच्या पुष्ट्यर्थ काही दुवे देऊ शकाल काय? बाकीचा प्रतिसाद फारच आवडला. माझी निविदा नुकतीच प्रक्षेपित केली आहे. २१ हर्टझ् ला ट्यून करून ती ऐकता येईल. :)

In reply to by एस

काही प्रमाणात हे सगळे तर्क आहेत. त्यामुळे त्याला ठोस असा पुरावा नाही. (त्यामुळे मलाही या थिअर्‍या फार पटत नाहीत.) काही धूमकेतूंमधे जीवाणू असण्याच्या शंका आहेत म्हणून असं स्पेक्यूलेशन. धूमकेतूंमधे पाणी असतं म्हणून स्पेक्यूलेशन, असं. कारण जर पृथ्वीवर धूमकेतूंनी पाणी आणलं तर इतर ग्रहांवर का नाही? मंगळावर का नाही, मंगळावर बर्फ टिकेल अशी परिस्थिती आहे. मुद्दा एवढाच होता की धूमकेतू हे ही एक कारण असू शकतं आपण इथे असण्याचं, एवढं वाईटसाईट बोलू नका त्यांना. एखाद्या धूमकेतूमुळेही डायनोसॉर नष्ट झालेले असतील, काय सांगता येतं? डायनोसॉरना हटवलं नसतं तर आपण कसे येणार होतो? शिवाय क्वचित येणारे धूमकेतू, ह्याकुताके किंवा हेल-बॉप किती सुंदर दिसतात.

जन्माच्या वेळी भौगोलिक स्थळ काय होते, अवकाशातले ग्रहताऱ्यांची कुठे होते याचा प्रभाव त्या व्यक्तीवर आयुष्यभर पडत राहतो हे जरा अतार्किक वाटते. अन एखादे रत्न अंगावर अंगठी अथवा इतर दागिन्याद्वारे परिधान केल्याने अथवा एखादा विधी केल्याने त्यापैकी एखाद्या वाईट प्रभावाची तीव्रता कशी काय कमी होऊ शकते? यापेक्षा, त्या व्यक्तीच्या जन्माच्या अगोदर पासून असलेली तिच्या कुटुंबीयांची आर्थिक, सामाजिक परिस्थिती व त्यांचे आचार विचार यांचा प्रभाव अनेक वर्षे ती व्यक्ती स्वतंत्र आयुष्य जगेपर्यंत तीव्रतेने होत राहतो. नंतरही कमी तीव्रतेचा असू शकतो. अन केवळ कुटुंबीयच नव्हे तर, शेजारचे, मित्र मंडळी, शाळा, महाविद्यालय यासारखे अनेक घटक त्या व्यक्तीच्या आयुष्यावर प्रभाव टाकत राहतात. अन एखाद्या अपवादात्मक परिस्थितीमुळे एखादी व्यक्ती या प्रभावांमधून बाहेर पडून जगावेगळे काहीतरी करून दाखवते.

In reply to by श्रीरंग_जोशी

अन एखादे रत्न अंगावर अंगठी अथवा इतर दागिन्याद्वारे परिधान केल्याने अथवा एखादा विधी केल्याने त्यापैकी एखाद्या वाईट प्रभावाची तीव्रता कशी काय कमी होऊ शकते?
रत्ने खडे गंडे प्लासिबो आहेत का? मिपावरील या धाग्यात याची चर्चा झालेली आहे

In reply to by प्रकाश घाटपांडे

फारच परिणामकारकपणे विवेचन केले आहे या प्रकारांवर आपण. सवडीने पुन्हा वाचतो प्रतिक्रियांसकट.

माझ्या एका मित्राला कोणा एका जोतिष्याने सांगितलं की त्याचा गुरू लघू आहे म्हणून. बिचारा तेव्हापासून डिप्रेशनमध्ये आहे, काही उपाय आहे काय हो शुचि काकू?

मिपाची पत्रिका तिचा सर्वर जन्माच्या वेळी कुठे होता . त्याचे अक्षाश रखांश काय? मिपाच्या जन्माची कल्पना तात्या व नीलकांत याना कधी झाली.( फर्टीलायझेशन हा खरा " जन्म धरल्यास ) याची माहिती ही लागेल बरें !