Skip to main content

जसपाल भट्टीना भावपूर्ण श्रद्धांजली.

जसपाल भट्टीना भावपूर्ण श्रद्धांजली.

Published on 25/10/2012 - 12:55 प्रकाशित मुखपृष्ठ
f सामान्य माणसाना अवघड आणि चिड आणणारा विषय विनोदी अंगाने सांगणारा महान परफोर्मर. विनम्र श्रद्धांजली.
लेखनप्रकार

याद्या 4314
प्रतिक्रिया 25

वाईट झाले. श्रध्दांजली !!

'उलटा-पुलटा'सारख्या अदाकारीने सामान्य माणसांच्या हृदयाचा ठाव घेणार्‍या अवलियाला भावपूर्ण श्रध्दांजली.

फार वाईट वाटले. विनोदाद्वारे समाज प्रबोधन करणारा हा कलावंत इतक्या लवकर काळाच्या पडद्याआड जाईल असे वाटले नव्हते ! :( उलटा-पुलटा ,फ्लॉप शो हे कार्यक्रम निखळ आनंद देणारे होते. जसपाल भट्टींना भावपूर्ण श्रध्दांजली !

जसपाल भट्टींना भावपूर्ण श्रद्धांजली. -दिलीप बिरुटे

जसपाल भट्टी यांच्या तिरकस विनोदाची भट्टी अस्सल असे. " साहेबांचे कुत्रे हरवते " मिटींगचा अजेंडा" जनरल इन्सुरन्स " हे भाग तर केवळ अविस्मरणीय ! हिदीत विनोदाची, व्यंगाची महान परंपरा आहे. जसपाल त्यातील एक तारा होते. सलाम पूर्वक श्रद्धांजली !

In reply to by चौकटराजा

त्याकाळात तुटपुंज्या पैश्यात मोजकेच कलाकार घेउन केलेला फ्लॉप शो अक्षरशः अमर आहे. प्रत्येक भागाच्या शेवटी विडंबन गीत तर खूपच श्रवणीय असे. प्रत्यक्षात सुद्धा पेट्रोलचे भाव वाढल्यावर घोड्यावरून ऑफीसला जाणे यासारख्या गमतीदार गोष्टी त्यांनी केल्या होत्या. भावपूर्ण श्रद्धांजली.

In reply to by चौकटराजा

फ्लॉप शो मध्ये प्रबंध लिहिणारा विद्यार्थी गाईडला उद्देशून गाणे म्हणतो ते अजून आठवतेय. 'जो तुमको हो पसंद वही बात कहेंगे. बीकर को अगर जार कहो जार कहेंगे.' खरोखर अविस्मरणीय. जसपाल भट्टींना भावपूर्ण श्रध्दांजली

जसपाल भट्टी माझेही खूप आवडते कलाकार होते. फ्लॉप शो तर अल्टिमेटच! इतकी लवकर एक्झिट घेतील असे वाटले नव्हते..ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो..

भट्टी असे अचानक आपल्यातून गेले हे ऐकून असे वाटले की सामान्य माणसाचा बिकट परिस्थिती विरुद्ध हसत हसत लढायचा चाललेला प्रयत्न देखील देवाला पटलेला दिसत नाही..............बहुत काय बोलणे ........श्रद्धांजली ...........

श्रीकांत जिचकार, भक्ती बर्वे, संस्कृत कवी वर्णेकर, जसपाल भट्टी असे लोक इतक्या स्वस्तात रस्ते अपघातात प्राण गमावतात. याचा गंभीरपणे विचार करायला हवा

अपघात कोणालाही होऊ शकतो पण अशी अचानक बातमी वाचून धक्का बसला. फ्लॉप शो हा विलक्षण कार्यक्रम होता. कांद्याच्या भावावरून त्यांनी केलेली अभिनव विनोदी आंदोलने कायम लक्षात राहतील. ओढून ताणून आणलेल्या पाचकळ विनोदांवर आणि भंकस शारिरिक विनोदावर पोट फुटेस्तोवर हसण्याच्या हास्य सम्राट, लाफ्टर चॅलेंज च्या समोर भट्टींचे अतिशय ओरिजिनल, Satire पद्धतीचे विनोद आणि किस्से प्रचंड वेगळ्या दर्जाचे अजूनही जाणवतात. विनम्र श्रद्धांजली..

In reply to by मैत्र

जसपाल भट्टींना श्रद्धांजली.. उत्कृष्ट दर्ज्याचा विनोदी कलाकार आपल्यातून गेला..