✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

उपवासाला कुठले पदार्थ चालतात?

प
प्रकाश घाटपांडे यांनी
Sat, 10/20/2012 - 11:14  ·  लेख
लेख
बटाटा, रताळे, केळे, वरई, साबुदाणा, शेंगदाणे हे माहित असलेले काही पदार्थ आहेत, मला एक प्रश्न पडतो कि उपवासाला अमुक एक पदार्थ चालतो किंवा चालत नाही हे ठरवण्याचे काय निकष आहेत. कुठल्या धर्मग्रंथात असे लिहिले आहे काय? तसेच कर्नाटकात चालणारा पदार्थ महाराष्ट्रात चालत नाही असे काही प्रांतिक भाग पण त्यात आहे म्हणे? मला शेंगदाण्याची गंमत वाटते कि शेंगदाणा चालतो पण शेंगदाण्याचे तेल चालत नाही. एखाद्याने ठरवले की मी उपवासाला हलका पदार्थ म्हणुन फक्त भातच खाईन पण ते चालत नाही.उपवास हा श्रद्धेचा भाग आहे हे मान्य. मला कधी कधी याविषयी देखील शंका येते कि उपवास करणारे खरेच श्रद्धेने करतात कि गतानुगतिकतेचा भाग म्हणुन करतात. म्हणजे असे कि घरात सगळे करतात म्हणुन मी करतो या पेक्षा वेगळा विचार नाही. घरात सगळे करत आलेले आहेत मग आपण ती परंपरा कशाला मोडा हा त्यामागे असलेला विचार. उपवास मोडल्याने पाप लागते असे ते मानीत नसावे पण मोडला तर मनाला बोचणी लागते. उपवासा विषयी इतरांची मते जाणुन घ्यायला आवडेल?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
241372 वाचन

💬 प्रतिसाद (70)

प्रतिक्रिया

काय हे घाटपांडे काका? तुम्ही

मृत्युन्जय
Sat, 10/20/2012 - 11:30 नवीन
काय हे घाटपांडे काका? तुम्ही पण शिळ्या कढीला उत आणायला लागलात? असो. उपासाला अमुक एक पदार्थच चालतो यामागे काहितरी शास्त्र जरुर असावे. काय ते मला माहिती नाही. मी उपास करतो ते फक्त स्वतःवरचे नियंत्रण तपासण्यासाठी. आणि मी उपासादरम्यान फक्त दुध आणि फळेच खातो त्यामुळे इतर पदार्थांबद्दल माझा पास. नवरात्रीच्या ९ दिवसात फक्त दूध आणि फळे खाउन राहिले आणि पुरेशी झोप घेतली तर फारच छान आणि हलके हलके वाटते हे मात्र खरे.
  • Log in or register to post comments

उपवास

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 10/20/2012 - 11:37 नवीन
>>> मला एक प्रश्न पडतो कि उपवासाला अमुक एक पदार्थ चालतो किंवा चालत नाही हे ठरवण्याचे काय निकष आहेत. निकष बिकष काही नसावेत. >>> कुठल्या धर्मग्रंथात असे लिहिले आहे काय ? जाणकारांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत. >>> एखाद्याने ठरवले की मी उपवासाला हलका पदार्थ म्हणुन फक्त भातच खाईन पण ते चालत नाही. असं कै नै, वरण-भात कोणत्या तरी भागात उपवासाला चालतो असं कुठेतरी मागे कोणी तरी म्हटल्याचे आठवते. >>> उपवास करणारे खरेच श्रद्धेने करतात कि गतानुगतिकतेचा भाग म्हणुन करतात. आड्मुठी (अंध) श्रद्धा आणि गतानुगतिकता. >>>>उपवास मोडल्याने पाप लागते असे ते मानीत नसावे पण मोडला तर मनाला बोचणी लागते. पापाबिपाचं कै नै पण बोचणी लागते.च्यायला, चतुर्थी धरायचो तेव्हा अनेकदा चॉकलेट बिकलेट आणि तत्त्सम पदार्थ माझ्या उपवासाला आडवे आले आहेत. पण मी कोणाला त्याबद्दल बोलायचो नाही पण, बोचणी लागल्याचे आठवते. बियर फियर उपवासाला चालते असंही ऐकलं आहे. पण ही बोचणी लय अवघड असते. उपवास बिपवास पोटाला विश्रांती म्हणुन बरं आहे. पण दिवसभर सटर-फटर खाणार असाल तर उपवासात कै मजा नै. उपास तापास बंद केले पाहिजे,उपवास म्हणजे 'जवळ राहणे'कोणाच्या जवळ राह्यचं आहे, तर देवाच्या. देवासारखी वृत्ती यायची असेल तर त्याला उपवासाची गरज नाही, ती बिनउपवासाचीही येऊ शकते असे वाटते. अवांतर : ओ माय गॉडची सिडी है का रे कोणाकडं ? मला जरा मेल करा ना राव. :) धन्यवाद. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

अवांतर : ओ माय गॉडची सिडी है

सुर
Sat, 10/20/2012 - 11:55 नवीन
अवांतर : ओ माय गॉडची सिडी है का रे कोणाकडं ? मला जरा मेल करा ना राव. आहे ना काका, पण जवळ जवळ ६९४ MB आहे. मेल वर कशी चढवु तेच कळत नाही. मद्त करा आता पाठवते.
  • Log in or register to post comments

धन्स.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 10/23/2012 - 00:40 नवीन
आहे ना काका, पण जवळ जवळ ६९४ MB आहे. मेल वर कशी चढवु तेच कळत नाही. मद्त करा आता पाठवते. मेलने एवढा पसारा येऊ शकतो का हे मलाच माहिती नाही. पण तात्त्काळ प्रतिसाद दिल्याबद्दल आभारी. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुर

बर्याच दिवसांपासून मलाही

किसन शिंदे
Sat, 10/20/2012 - 12:06 नवीन
बर्याच दिवसांपासून मलाही पडलेला प्रश्न आहे हा. सरांचा आणि मृत्युंजयाचा प्रतिसाद तर वाचला पण आणखी काही प्रतिसादांच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments

माफ करा, पण मी आजवर

सुहास..
Sat, 10/20/2012 - 12:09 नवीन
माफ करा, पण मी आजवर पदार्थांना चालताना पाहिले नाही ;)
  • Log in or register to post comments

ज्याला पाय असतील ते तर

जोशी 'ले'
Sat, 10/20/2012 - 22:11 नवीन
ज्याला पाय असतील ते तर उपवासाला चालतच नाहि ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

कोणत्या उपवासाबद्दल बोलताय?

विसुनाना
Sat, 10/20/2012 - 12:33 नवीन
कोणत्या 'उपवासा'बद्दल बोलताय? म्हणजे गैरसमज नको म्हणून विचारतो आहे- नेहमीचे गुरु -शनिवार की संकष्टी की एकादशी की अंगारकी की शिवरात्र की आषाढी- कार्तिकी की रोजे ? प्रत्येक उपवासाप्रमाणे पदार्थ बदलतात असा माझा समज आहे. (हा प्रतिसाद केवळ निखळ दृष्टीने वाचावा.)
  • Log in or register to post comments

हिंदू मुसलमानांना आपलेसं

गणपा
Sat, 10/20/2012 - 14:54 नवीन
हिंदू मुसलमानांना आपलेसं मानलत, किरिस्तावांनीच काय घोडं मारल? ;) त्यांना ही आपलं म्ह्णा तेही उपवास(लेंट) धरतात. ;) अवांतर : जे तब्येतीला झेपेल ते उपवासाला 'चालेल'. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना

ब्वॉर

विसुनाना
Sat, 10/20/2012 - 15:47 नवीन
सगळ्याच धर्मांचे उपवास घ्या : http://en.wikipedia.org/wiki/Fasting वोक्के?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

बिरूटे सर!

संजय क्षीरसागर
Sat, 10/20/2012 - 12:37 नवीन
उपास तापास बंद केले पाहिजे,उपवास म्हणजे 'जवळ राहणे'कोणाच्या जवळ राह्यचं आहे, तर देवाच्या.
कुठे असतो हा देव? भक्तीमार्गीयांचा असा गोंधळ होतो! उपवास म्हणजे स्वतःशी एकरूप होणं, टू बी कनेक्टेड टू वनसेल्फ. शरीराची सर्वात जास्त उर्जा अन्नपचनात व्यतित होते. जर उपाशी राहिलं तर (असेल ती उर्जा) स्वतःप्रत यायला मदत करते. पचनसंस्थेला विश्रांती हा अनुषंगिक फायदा आहे.
  • Log in or register to post comments

वैद्यकीय मत

प्रकाश घाटपांडे
Sat, 10/20/2012 - 13:38 नवीन
शरीराची सर्वात जास्त उर्जा अन्नपचनात व्यतित होते. जर उपाशी राहिलं तर (असेल ती उर्जा) स्वतःप्रत यायला मदत करते.
याविषयी वैद्यकीय मत जाणून घ्यायला आवडेल. आपण शरीराच्या गरजेपेक्षा जास्त खात असतो. तेवढे जरी बंद केले तरी शरीराचे चयापचय संस्था चांगली काम करेल व चरबी पण कमी होईल असे काहींचे म्हणणे आहे. मला त्यात तथ्य वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

आपण शरीराच्या गरजेपेक्षा जास्त खात असतो..

संजय क्षीरसागर
Sat, 10/20/2012 - 16:13 नवीन
तेवढे जरी बंद केले तरी शरीराचे चयापचय संस्था चांगली काम करेल व चरबी पण कमी होईल असे काहींचे म्हणणे आहे. मला त्यात तथ्य वाटते
ते सरळच आहे हो पण आपण भूकेप्रमाणे खात नाही, वेळेप्रमाणे खातो त्यामुळे गरज किती आहे त्याचा पत्ता लागणं शक्य नाही. तुमचा प्रश्न
उपवासाला कुठले पदार्थ चालतात आणि ते कुठल्या धर्मग्रंथात लिहिले आहे काय?
असाय. पुढे तर फारच भानगड आहे
उपवास हा श्रद्धेचा भाग आहे हे मान्य. मला कधी कधी याविषयी देखील शंका येते कि उपवास करणारे खरेच श्रद्धेने करतात कि गतानुगतिकतेचा भाग म्हणुन करतात. म्हणजे असे कि घरात सगळे करतात म्हणुन मी करतो या पेक्षा वेगळा विचार नाही. घरात सगळे करत आलेले आहेत मग आपण ती परंपरा कशाला मोडा हा त्यामागे असलेला विचार. उपवास मोडल्याने पाप लागते असे ते मानीत नसावे पण मोडला तर मनाला बोचणी लागते
यामुळे पुन्हा श्रद्धा, पाप-पुण्य मग त्या बरोबर देव असे अनेक प्रश्न निर्माण होतात. वास्तविकात असं काही नाही पण हे समजेल तर ना! भक्तीमार्गीयांनी उपवास हा श्रद्धेचा आणि पाप पुण्याचा विषय केलाय. भक्तीमार्गाचा पुरस्कार करणारे आणि बिंडबनाच्या मर्कटलीला करणारे, ज्यांची सगळी जालीय हयात केवळ बद्धतेवर विनोद करण्यात गेलीये (जे मनात तेच लेखनात!) असे लोक दिशाभूल करतात आणि एखादी साधी गोष्ट समजणं अवघड होतं. असो, उपवासाचा अर्थ आणि उपयोग पहिल्या प्रतिसादात दिला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

उपासाला काय चालतं?

पैसा
Sat, 10/20/2012 - 14:29 नवीन
काही हिंदू लोक उपासाला शिरा किंवा चपाती किंवा डाळतांदुळाची खिचडी खाल्ली तर चालते असे म्हणणारे भेटले आहेत तर ख्रिश्चन लोक ईस्टरपूर्वी जो ४० दिवस उपास करतात तेव्हा "दारू आणि चिकन उपासाला चालत नाही. मासे पण शिवराक, तेव्हा ते चालतात" असे सांगणारे भेटले आहेत. त्या अर्थी उपासाला काय खाल्ले तर चालते ही फार फ्लेक्झिबल गोष्ट असावी! :D
  • Log in or register to post comments

माझ्या मते ज्यामध्ये

सस्नेह
Sat, 10/20/2012 - 15:14 नवीन
माझ्या मते ज्यामध्ये कार्बोहायड्रेट्स नाहीत असे कोणतेही पदार्थ उपवासाला चालावेत. म्हणजे फळे, कूट न घालता केलेल्या कोशिंबिरी, सॅलड इ. भात पचायला हलका असला तरी कार्बोहायड्रेट्युक्त असल्यामुळे उपवासाला न खाल्ल्यास उत्तम.
  • Log in or register to post comments

असं वाटंत नाही.

प्रभाकर पेठकर
Sun, 10/21/2012 - 01:18 नवीन
दाण्याच्या कुटात कार्बोहायड्रेट्स आहेत? साबुदाणा, रताळी, बटाटे इ.इ. मध्ये भरपूर कार्बोहायड्रेट्स आहेत, ती तर चालतात उपासाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

दाण्याच्या कुटात फॅट्स आहेत

सस्नेह
Sun, 10/21/2012 - 19:56 नवीन
दाण्याच्या कुटात फॅट्स आहेत. साबुदाणा, रताळी, बटाटे इ.इ. मध्ये भरपूर कार्बोहायड्रेट्स आहेत, म्हणून तर मी म्हटलं की हे न खाता फळे, सॅलड्स खावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

?

विनायक प्रभू
Sat, 10/20/2012 - 15:19 नवीन
उपास? कसला?
  • Log in or register to post comments

मास्तर ते खाण्यापिण्याच्या उपासा बद्दल बोलताहेत

वेताळ
Sat, 10/20/2012 - 17:31 नवीन
दुसरा उपास शरिराबरोबर इतरांना देखिल घातक आहे. बाकि मी देखिल नवरात्रीचा उपवास केला आहे. त्यामुळे सर्व सुग्रण्या आनि सुग्रणकर ह्याना विनंती कि उपवासाचे पदार्थाच्या रेशिप्या लिहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

मास्तर, यांचा नव रात्रीचा

शैलेन्द्र
Sat, 10/20/2012 - 23:25 नवीन
मास्तर, यांचा नव रात्रीचा उपवास आहे तेंव्हा उपवास निभावुन नेण्याची रेसीपी सांगा.. :) वेताळराव, ह घ्या बरका..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

साबुदाण्याची खिचडी

पुण्याचे वटवाघूळ
Sat, 10/20/2012 - 15:40 नवीन
बाकी काही चालते की नाही हे माहित नाही पण साबुदाण्याची खिचडी मात्र मला प्रचंड आवडते.माझे सगळे उपास ही खिचडी खाण्यासाठी असतात :)
  • Log in or register to post comments

माझे पन

सुजित पवार
Tue, 10/23/2012 - 14:02 नवीन
माझे पन :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ

लाल भोपळा व भेंडीही चालते

रेवती
Sat, 10/20/2012 - 17:24 नवीन
लाल भोपळा व भेंडीही चालते उपासाला. काहे ठीकाणी मस्तपैकी कढीपत्त्याची फोडणी वगैरे देऊन त्यात तोंडली इ. भाज्या परतून उपासाला चालतात असे म्हटले होते. त्यांच्याकडे चालत असतील. आपल्याकडे जे उपासाला चालतं ते मला तरी फार आवडतं म्हणून खरे तर उपास, बाकी काही नाही. ;)
  • Log in or register to post comments

विषय चांगला आहे..

प्रेरणा पित्रे
Sat, 10/20/2012 - 17:36 नवीन
मी पण बर्याच दिवसांपासुन हा विचार करत होते... उपासाचे जवळजवळ सर्वच पदार्थ अतिशय पित्तकारक असतात.. उपासामुळे डोकेदुखी व तत्सम त्रास झाले तरी लोक भरमसाठ औषधे घेउन उपास सुरु ठेवतात.. तेव्हा त्यांना उपासाला औषधे सुद्धा चालतात.. बरेच लोक त्यात स्वताप्रमाणे फेरबदल करुन भाजकं अन्न चालतं म्हणत दशमी, पोहे, उपमा पण खातात.... माझी पित्तप्रक्रुती असल्याने मी कधीच उपास करण्याच्या भानगडीत पडत नाही.. जर उपासामुळे शरिराला त्रास होणार असेल तर त्यातुन मानसिक समाधान कसे मिळणार.? त्यापेक्षा मला साधंवरण भात नेहमीच सात्विक वाटतो.. मी वटपोर्णिमा/ हरितालिकेला यथासांग पुजा होइस्तोवर अन्नाचा कण खात नाही.. नंतर मात्र रोजचे जेवण जेवते.. शेवटी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे... कारण प्रत्येक जण देवाला व श्रद्धेला वेगवेगळ्या प्रकारे इंटरप्रिट करतो..
  • Log in or register to post comments

कै नै हो. उपवासाच्या नावाखाली

बॅटमॅन
Sat, 10/20/2012 - 18:40 नवीन
कै नै हो. उपवासाच्या नावाखाली तडस लागेपर्यंत खाणारे पाहिले आहेत. हिपॉक्रसी आहे सगळी. अर्थात चतुर्वर्गचिंतामणीसारख्या ग्रंथांत काही लिहिले असेल तर माहिती नै. पण साधी गोष्ट बघा, वरणभातागत अस्सल देशी पदार्थ चालत नै आणि पोर्तुगीजांनी आणलेला साबुदाणा चालतो होय?? सगळे एक नंबर ढोंगी आहेत झालं.
  • Log in or register to post comments

बटाटा

प्रकाश घाटपांडे
Sat, 10/20/2012 - 19:07 नवीन
बटाटा देखील दक्षिण अमेरिकेतून आला असे म्हणतात. तो ही पोर्तुगिजांनीच आणला असे ही ऐकून आहे. ज्ञानेश्वरांच्या काळात बटाटा होता का? याविषयी साशंक आहे. भारतात वेगवेगळ्या राज्यात उपवासाला कुठले पदार्थ चालतात हे जाणुन घेणे देखील रोचक ठरावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

बरोबर आहे,पोर्तुगीजांनीच

बॅटमॅन
Sun, 10/21/2012 - 00:37 नवीन
बरोबर आहे,पोर्तुगीजांनीच बटाटा आणला भारतात. ज्ञानेश्वरांच्या काळात आपल्याकडे बटाटा नव्हता. बटाट्याला संस्कृत शब्ददेखील नाही, त्यावरून भारतातील त्याचे अर्वाचीन अस्तित्व सिद्ध होते.
भारतात वेगवेगळ्या राज्यात उपवासाला कुठले पदार्थ चालतात हे जाणुन घेणे देखील रोचक ठरावे.
नक्कीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

उपासतापास, व्रतंवैकल्य वगैरे

प्रभाकर पेठकर
Sun, 10/21/2012 - 01:58 नवीन
उपासतापास, व्रतंवैकल्य वगैरे गोष्टी मनाची ताकद वाढविण्यासाठी आहेत. संयम, मनावरील नियंत्रण ह्याची सातत्याने तपासणी आणि वाढते प्रयत्न ह्या साठी आहेत. ह्याचे दोन फायदे आहेत. एक शारीरिक. लंघनाने पचनशक्तीवरील अतिरिक्त ताण कमी होऊन ती नियंत्रणात राहते आणि दोन, मानसिक. वरती म्हंटल्याप्रमाणे संयम किंवा मनावरील नियंत्रण. 'मन हे ओढाळ गुरुं, परधन पर कामिनीकडे धावे' असे मनाचे वर्णन केले आहे. बहिणा बाईंनीही मनाला नाठाळ जनावराची उपमा दिली आहे. कितिही हाकललं तरी पिकात तोंड घालतं. अशा अनियंत्रीत मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याला संयमाची, नियंत्रणाची स्वतःला सवय लावून घ्यावी लागते. त्याच्या अनेक पद्धती आहेत. उपासतापास, व्रतवैकल्य हा त्यापैकीच एक भाग. पाप-पुण्याची संकल्पना, देवाचे अस्तित्व, देवाची भिती इ.इ.गोष्टींमुळे माणसाची वर्तणूक एका मार्गावर (सन्मार्गावर) राहण्यासाठी मदत होते ज्या योगे सर्व समाज नैतिकतेच्या नियंत्रणाखाली राहतो आणि गुन्हेगारी, अनाचार ह्याला आपसुक चाप बसतो. परंतू, पूर्वीच्या काळी (आणि कांही अंशी आजही) ह्या संयमाला, नियंत्रणाला कार्यांन्वित करण्यासाठी मनुष्यप्राण्याला देवाची, पापपुण्याची, स्वर्ग-नरकाची भिती घालावी लागते. त्यातून देवांच्या दिवशी उपास करणे, व्रतवैकल्य करणे वगैरे प्रथा सुरू झाल्या. मनुष्य स्वभावानुसार त्या चांगल्या गोष्टींनाही फाटे फोडण्याचे काम अनेकांनी केले. आणि पापभिरू माणसांनी त्या फाटे फुटलेल्या अनिष्ट, अतार्कीक प्रथांनाही आपलेसे केले, पुढच्या पिढ्यांकडे सुपूर्त केले आणि इष्ट्-अनिष्ट, तार्किक्-अतार्किक पद्धती आजच्या जगात आपण पाहतो अनुभवतो. ह्या शिवाय वेगवेगळे नवस बोलणे ह्यानेही प्रथा (त्या-त्या कुटुंबापुरत्या)बदलल्या. उदा. देवाला साकडे घातले जायचे 'देवा माझ्या मुलाचा/नवर्‍याचा आजार बरा होऊ दे. मी उपवासाला हिरवी मिरची खाणार नाही.' किंवा 'मी संकष्टी निर्जळा करेन.' इ.इ. त्यांची मनोकामना (योगायोगाने) पुरी झाली आणि त्यांनी नवस बोलल्या प्रमाणे प्रथा सुरू केली. पुढे काही पिढ्यांनंतर बाकीचे तपशिल विस्मृतीत जाऊन 'आपल्यात उपासाला हिरवी मिरची खात नाहीत' एवढाच संदेश उरला. असं का? हे कोणीच जाणत नाही. जाणून घेऊ इच्छित नाही, बदलू इच्छित नाही. नको उगीच, देवाचा कोप वगैरे झाला तर? ही काही उदाहरणे झाली. अशा अनेक घटना, विचारधारांमधून उपासाला हे चालतं ते चालत नाही. अमुक एक व्रतासाठी तमूक एक साधना करावी लागते असे 'उपचार' जन्मास आले. उपासा मागे लंघन आणि मनावरील नियंत्रण ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या. आहार पचावयास हलका असावा जेणेकरून पचनसंस्थेला आराम मिळेल आणि ती सतत कार्यक्षम राहील. इथे-तिथे धावणार्‍या मनाला वेसण घातली जाऊन रोजच्या जीवनात सद्वर्तनाची आस मनास कायम राहील, असे पाहिले पाहिजे. देवळात जाणे हेही भिरभिरणार्‍या मनाला शांतता प्रदान करण्यसाठी उपयोगी ठरते. मंदिरातील वातावरण, घंटानाद, उदबत्यांचा वास, निरांजनाची ज्योत आणि कोणीतरी आपला आधार आहे अशी देवाची आश्वासक मूर्ती, मनावर, दु:खावर, वैफल्यावर मात करण्यासाठी मदतगार ठरू शकते.
  • Log in or register to post comments

उत्तम प्रतिसाद

प्रकाश घाटपांडे
Sun, 10/21/2012 - 08:22 नवीन
उपवासा बाबत चा हा विचार इतर कर्मकांडांना देखील लावता येईल. मनाचे अगम्य स्वरुप हेच त्यामागे मोठे कारण आहे. काळाच्या ओघात कालबाह्य ठरणार्‍या गोष्टी हळू हळू मागे पडत जातात हे आपण पाहातोच आहोत. कालसुसंगत चिकित्सा होणे देखील गरजेचे आहेच. पुर्वी हॉटेल मधील साबुदाणा खिचडी ही उपासाला ग्राह्य धरली जात नसे. हळूहळू त्याला मान्यता मिळू लागली कारण त्याची व्यावहारिक गरज.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

उपवासाचा गोडवा वाढविणारा प्रतिसाद.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 10/21/2012 - 10:15 नवीन
>>> उपासतापास, व्रतंवैकल्य वगैरे गोष्टी मनाची ताकद वाढविण्यासाठी आहेत. पेठकर साहेब, मनाची ताकद वाढते याला काही विदा आहे काय ? असा काही विदा उपलब्ध नसणारच आहे. मला असं वाटतं उपवासानं मनाची ताकद वाढते, यावर तर माझा काही विश्वास नाही. उपवास आणि व्रत व्रतवैकल्य करणा-यांमधे महिलांचा अधिक भरणा आहे. पुरुषांचे उपवास तसे कमीच आणि जे कोणी पुरुष उपवास करत असतील त्या मागे कोणीतरी सांगितलं आहे म्हणुन उपवास. विशेषत: महिलांच्या रेट्यामुळे पुरुष नाविलाजाने उपवास करतात असा माझा एक समज आहे. अर्थात अशा समजाला काही आधार नाही. आणि पुरुषांच्या मनाची ताकद उपवासाने वाढते किंवा महिलांच्या मनाची ताकद उपवासाने वाढते हाही एक भ्रम असावा. उलट उपवास करणा-या महिला उपवासाच्या काळात अधिक तणावात दिसतात. अर्थात अशा निष्कर्षालाही काही आधार नाही, पण इतर दिवशीच्या तुलनेत उपवासाच्या दिवशी महिला नॉर्मल वर्तनात दिसत नाही. अगदी कडक पथ्य पाळुन केलेल्या उपवासानं गळुन गेल्या असतील किंवा अन्य कारणं असतील पण त्या दिवशीच्या स्त्रियांच्या वर्तनाचा अभ्यास केला पाहिजे, नक्कीच काहीतरी नवी माहिती बाहेर येईल असे वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

मोह आवरणे...

प्रभाकर पेठकर
Sun, 10/21/2012 - 11:03 नवीन
मनाची ताकद वाढते म्हणजे माणूस मोह आवरायला शिकतो. जसे, एखाद्या दिवशी बिर्याणी खायचा मोह होतो आहे पण आज संकष्टी आहे त्यामुळे आज बिर्याणीचा मोह टाळून साबुदाणा खिचडी किंवा तत्सम पदार्थावर संतोष मानायला शिकायचं. हे एक उदाहरण आहे. ह्याची सवय झाली की इतर बाबतीतही, जसे पैसे कमी असताना चैनीच्या वस्तूंची खरेदी टाळणं, आवश्यक बाबींवर खर्च करता यावा म्हणून अनावश्यक बाबींवरील खर्च टाळणं इ.इ. मोहावर अंशतः विजय मिळविणे शक्य होते, निदान सुसह्य तरी होते.
उपवास आणि व्रत व्रतवैकल्य करणा-यांमधे महिलांचा अधिक भरणा आहे. पुरुषांचे उपवास तसे कमीच आणि जे कोणी पुरुष उपवास करत असतील त्या मागे कोणीतरी सांगितलं आहे म्हणुन उपवास. विशेषत: महिलांच्या रेट्यामुळे पुरुष नाविलाजाने उपवास करतात असा माझा एक समज आहे.
महिलांचा भरणा अधिक असतो ह्याचं कारण महिलांचा घाबरट स्वभाव. त्यामानाने पुरुष जास्त बिन्धास्त असतात. पण पुरुष अगदी महिलांच्या रेट्यामुळे, नाईलाजाने उपवास करतात असे नाही. (तसेही, बरेच असतात ह्याच्याशी सहमत आहेच) तर, स्वामी समर्थ, अनिरुद्ध बापू इ.इ. चे अनुयायी, ज्योतिषाने सांगितले म्हणून 'कडक' उपास करणारे अनेक पुरुष माझ्या व्यवसायाच्या निमित्ताने पाहिले आहेत.
अगदी कडक पथ्य पाळुन केलेल्या उपवासानं गळुन गेल्या असतील किंवा अन्य कारणं असतील पण त्या दिवशीच्या स्त्रियांच्या वर्तनाचा अभ्यास केला पाहिजे,
ह्यातुनच शारीरिक क्लेश सहन करायची मनाची ताकद वाढते. शिवाय आपले ध्येय साध्य करण्यासाठी (उपास यशस्वी करण्यासाठी) मनाचा निग्रह वाढीस लागतो. असो. मनाची ताकद वाढविण्याच्या अनेक मार्गांपैकी हा एक मार्ग आहे हे मी माझ्या मुळ प्रतिसादात म्हंटले आहेच. त्यामुळे नुसते उपास केल्याने मनाची ताकद वाढते असा 'एकास एक' असा गणिती हिशोब इथे अभिप्रेत नाही. तसेच, हा भावनेचा प्रश्न असल्याने सर्व ठिकाणी एकच परिणाम साध्य होईल असेही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आत्मिक बळ

प्रकाश घाटपांडे
Sun, 10/21/2012 - 12:09 नवीन
मला असं वाटतं उपवासानं मनाची ताकद वाढते, यावर तर माझा काही विश्वास नाही.
उपवास ही श्रद्धा आहे. श्रद्धा ही आत्मिक बळ देते. श्रद्धेच्या जागी अंधश्रद्धा हा शब्द घातलात तरी युक्तिवादात फरक पडत नाही. अंधश्रद्धा हे शॉक अ‍ॅबसॉर्बर सारखे काम करतात. खरतर श्रद्धा ही अंधश्रद्धाच असते. सोयी साठी सकारात्मक श्रद्धा या उपयुक्त व नकारात्मक श्रद्धा या उपद्रवी वा अंधश्रद्धा अशी विभागणी करतात. असो. कुणाला आत्मिक बळ कशातून मिळेल हे सांगता येत नाही.इश्वर,व्यक्ती विचार या वरील श्रद्धा या समाजात दिसून येतात. अंनिसवाल्यांची अंधश्रद्धा निर्मूलनावर श्रद्धा आहे असा युक्तिवाद केला जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डोळस आणि आंधळा विश्वास.

प्रभाकर पेठकर
Sun, 10/21/2012 - 14:03 नवीन
खरतर श्रद्धा ही अंधश्रद्धाच असते.
पटंत नाही. श्रद्धा हा 'डोळस' विश्वास आहे तर अंधश्रद्धा हा 'आंधळा' विश्वास आहे. जसे, माझ्याकडे चार्टर्ड अकाउंटंट्ची पदवी आहे त्यामुळे आज न उद्या मला योग्य ती नोकरी मिळेल. मला वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज करीत राहून मुलाखती दिल्या पाहिजेत. ही श्रद्धा झाली. एक 'डोळस', 'तार्किक' विश्वास. पण, मी चार्टर्ड अकाऊंटंट आहे आणि दर मंगळवारी सिद्धी विनायकाच्या दर्शनाला गेल्याने मला योग्य ती नोकरी मिळेल ही अंधश्रद्दा झाली. अर्ज न करता, मुलाखती न देता 'विनायक' कितीही 'सिद्ध' असला तरी तुमच्या पदरात नोकरी टाकणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

काहीतरी घोळ होतोय की काय?

कवितानागेश
Mon, 10/22/2012 - 13:32 नवीन
"उपवास ही श्रद्धा आहे." आणि "श्रद्धा ही आत्मिक बळ देते." ही २ वाक्य एकमेकांच्या विरुद्ध आहेत. ( असे मला आपले उगीचच वाटतंय! :) ) (तथाकथित)उपवास हा नियमांनी बांधलेला आहे. श्रद्धेला नियम नसतात. श्रद्धा बिन्धास्त असते! :) श्रद्धा असेल तर नियमांची गरज नाही, जे काय करायचे ते सगळेच एकतर 'श्रीक्रुष्णार्पणमस्तु' किंवा 'यद्यद कर्म करोमि तद्तद अखिलं, शंभो तवाराधनम्'... किंवा अजून असेच काहीबाही..... उपवास करण्यासाठे नियम आले, तिथे नखरे आले, कुठल्या पदार्थांनी चालायचे, कुठल्यांनी लटकायचे वगरै बंधने आली. तिथे श्रद्धा नसवी.... शिवाय आत्मिक बळ तर जगताना प्रत्येक ठिकाणी लागते, ते जगण्यावरच्या प्रेमातूनच मिळत असते, बाकी सगळ्या गोष्टी निमित्तमात्र. ...बाकी उपास करण्याची, मोडण्याची, जोडण्याची 'फॅशन' अजूनही चालू आहे का जगात? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

...बाकी उपास करण्याची,

५० फक्त
Mon, 10/22/2012 - 14:53 नवीन
...बाकी उपास करण्याची, मोडण्याची, जोडण्याची 'फॅशन' अजूनही चालू आहे का जगात? - मग मा. माउतै, तुमच्या जगात सध्या कशाची फॅशन आहे याबद्दल मार्गदर्शन कराल का म्या पाम राला. बिनधास्त श्रद्धेच्या फॅशनबद्दल सुद्धा लिहा काहीतरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

तुमच्या जगात सध्या कशाची फॅशन

कवितानागेश
Mon, 10/22/2012 - 17:36 नवीन
तुमच्या जगात सध्या कशाची फॅशन आहे याबद्दल मार्गदर्शन कराल का म्या पाम राला.> दूधभात!! बिनधास्त श्रद्धेच्या फॅशनबद्दल सुद्धा लिहा काहीतरी. ? काहीतरीच!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

भलतेच काहीतरी !!

कपिलमुनी
Mon, 10/22/2012 - 16:37 नवीन
खरतर श्रद्धा ही अंधश्रद्धाच असते.
गोंधळलेला प्रतिसाद !! अजुन तपशिलात गेलात तर आवडेल ज्ञानकण वेचायला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

लेखापेक्षा प्रतिसाद भारी...!

सस्नेह
Sun, 10/21/2012 - 19:58 नवीन
लेखापेक्षा प्रतिसाद भारी...! माफक व सात्विक आहार घेऊन केलेल्या उपासाने मनाची शुद्धी होऊन चित्त निवळते, हा अनुभव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

आमच्या काही परिचितांची अडचण

चौकटराजा
Sun, 10/21/2012 - 09:53 नवीन
एक आहेत त्याना साखर खायची नाही.दुसरे काय चालेल ? एक आहेत त्याना गुटख्याचा उप्वास घडत आहे. एक आहेत त्यांच्या बायको माहेरी गेल्यामुळे " उपवास " घडत आहेत. या सर्व उपवासाच्या उप प्रकाराना काय काय चालेल बॉ ?
  • Log in or register to post comments

उत्तरे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 10/21/2012 - 10:21 नवीन
१) शुगरफ्री विविध खाण्याचे विविध पदार्थ आता बाजारात उपलब्द्ध आहेत. २) गुटख्याने उपवास मोडतो. आणि गुटखा उपवासाच्या दिवशी खाल्ला तर माणुस थेट नर्कात जातो असं एका प्राचीन ग्रथांत लिहिलं आहे, असं त्याच्या मनावर बिंबवत राहा. आणि या प्राचीन ग्रंथाचा लेखक थेट परमेश्वर आहे हे सांगायला विसरु नका :) ३) या उपवासात काही तरी 'वेगळंच ' दडलं आहे. उपवास कडक राहु द्या. उपवासानंतर जेवणाचा आनंद वाढतो, असं सांगा. ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

कारण फार सिंपल आहे.

अर्धवटराव
Sun, 10/21/2012 - 10:47 नवीन
हा सगळा हौसेचा मामला आहे साहेब. काळाच्या कसोटीवर मनाला, त्या अनुषंगाने शरीराला घासत राहणे हि माणसाची गरज आहे.. छंद म्हटलं तरी चालेल. बाकी भक्तीमार्ग वगैरेच्या समर्थनार्थ-विरोधात प्रवचन देणार्‍या आंजा विद्वानंचं फार काहि ऐकु नये... तो एक उपवास केला तरी पुरे. राहिला प्रश्न उपवसाला काय चालते... तर एकच गोष्ट... तोंड. अर्धवटराव
  • Log in or register to post comments

हापिसात कुठले कपडे चालतात?

मूकवाचक
Sun, 10/21/2012 - 17:41 नवीन
शर्ट-ट्राउझर, जीन्स-टीशर्ट, सलवार-कमीज, चोली-घागरा, नेकटाय (कंठलंगोट), स्लीव्हलेस ब्लाउज हे माहित असेलेले काही कपडे आहेत, मला एक प्रश्न पडतो की हापिसात अमुक एक कपडा चालतो किंवा नाही हे ठरवण्याचे काय निकष आहेत. कुठल्या औद्योगिक कायद्यात असे लिहीले आहे काय? तसेच सॉफ्टवेअर प्रॉडक्ट कंपनीत चालणारे कपडे सॉफ्टवेअर सर्व्हिसेस कंपनीत आणि पारंपारिक उद्योगात चालत नाहीत असा काही डावाउजवा भाग पण त्यात आहे म्हणे? मला टीशर्टची गंमत वाटते, की फक्त शुक्रवारी स्मार्ट कॅज्युअलमधे 'इन' केलेला कॉलरवाला टीशर्ट चालतो पण सुटसुटीतपणे लोंबत सोडलेला गोल गळ्याचा टीशर्ट चालत नाही. एखाद्याने ठरवले की मी सोमवारी सोयीचे पडते म्हणून गोल गळ्याचा टीशर्ट आणि कॉड्राय पँट घालून येईन पण ते चालत नाही. ड्रेसकोड हा कॉर्पोरेट कल्चरचा भाग आहे हे मान्य. मला कधी कधी याविषयी देखील शंका येते की ड्रेसकोड लादणारे/ पाळणारे खरेच विचारपूर्वक/ निष्ठेने तो ठरवतात/ पाळतात की गतानुगतिकतेने तसे केले जाते. म्हणजे असे की युरोप, अमेरिकेतल्या सगळ्या कंपन्या तसे करतात म्हणुन आम्हीही करतो या पेक्षा वेगळा विचार नाही. आजवर सगळ्या कंपन्या असेच करत आलेल्या आहेत तेव्हा आपण ती परंपरा कशाला मोडा हा त्यामागे असलेला विचार. ड्रेसकोडचे उल्लंघन केल्याने व्यावसायिक चारित्र्यावर डाग लागतो असे कुणी मानत नसावे पण तो मोडला तर मनाला बोचणी लागते. ड्रेसकोड विषयी इतरांची मते जाणुन घ्यायला आवडेल?
  • Log in or register to post comments

ड्रेसकोड

श्रीरंग_जोशी
Sun, 10/21/2012 - 20:29 नवीन
या विषयावर मी पूर्वी इथे काही अनुभव व विचार मांडले होते. ५ वर्षांपूर्वी आमच्या कंपनीला पुण्यातील कार्यालयात शुक्रवारी पण फॉर्मल कपड्यांची सक्ती करावी लागली होती. कारण काही कर्मचार्‍यांकडून शुक्रवारी मिळालेल्या अपवादाचा जबरदस्त गैरवापर होत होता. माझ्या मते आजूबाजूला काम करणार्‍या सहकार्‍यांना संकोचल्यासारखे वाटत असेल तर त्या प्रकारचे कपडे घालून कार्यालयात जाणे संयुक्तिक नाही. ५ वर्षांपूर्वी पुण्यातील कार्यालयात जी उदाहरणे दिसली ती आजवर अमेरिकेत कामाच्या ठिकाणी कधीच दिसली नाहीत. प्रकाशराव - काथ्याकूटाच्या मूळ विषयाखेरीज वेगळ्या विषयावरील प्रतिक्रियेवर प्रतिक्रिया देत असण्याबद्दल क्षमस्व.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मूकवाचक

हापिसाला फारेनचेच कपडे चालतात

कवितानागेश
Mon, 10/22/2012 - 13:18 नवीन
हापिसाला फारेनचेच कपडे चालतात! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मूकवाचक

रताळी

श्रीरंग_जोशी
Sun, 10/21/2012 - 20:16 नवीन
रताळ्यांच्या चकत्या हा माझा आवडता पदार्थ आहे. शिवाय नेहमी नेहमी साबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळा आल्यास भगर पण छानच. मी लहानपणीपासून दोन्ही एकादश्या व महाशिवरात्रीची भक्तिभावाने वाट पाहायचो कारण उपासाचे विविध चवदार पदार्थ खायला मिळायचे जसे साबुदाण्याचे वडे, उपासाची आमटी, जिरे व दही घालून केलेली बटाट्याची भाजी, अधून मधून भूक लागल्यास शेंगदाण्याची चिक्की :-). त्यामुळे ज्यांनी कोणी जेव्हा केव्हा ही परंपरा सुरू केली असेल त्यांना अनेक धन्यवाद. अश्याच चवदार परंपरा अजून सुरू व्हाव्यात. उपासाला (मराठी संस्कृतीत तरी) कोणत्या भाज्या चालतात याबद्दल एक गृहीतक कुणाकडून तरी ऐकले होते. ज्या भाज्या जमिनीच्या खाली वाढतात (जसे बटाटा) त्या उपवासाला चालतात. फळे मात्र अपवाद.
  • Log in or register to post comments

Re: उपवासाला कुठले पदार्थ चालतात?

एस
Sun, 10/21/2012 - 22:42 नवीन
उपवासाला खालील पदार्थ चालतात: गाय कोंबडा होला बकरा मेंढा रेडा हरीण ससा बदक इ. प्रकारचे सर्व पशूपक्षी. (वाघसिंह वगैरे चालत नाहीत पण...) मासे चालतात की नाही हे माहित नाही. कदाचित एके काळी माणूसही चालत असावा असा माझा कयास आहे.
  • Log in or register to post comments

खरंच...

एस
Sun, 10/28/2012 - 23:54 नवीन
वरील पशुपक्षी यज्ञात बळी द्यायला चालतात, म्हणूनच उपवासालाही चालतात. इन फॅक्ट, जे काही यज्ञात बळी म्हणून दिले जाता येतात, तेच फक्त उपवासाला खाण्याची मुभा आहे. वाघसिंहासारखे हिंस्र पशू मात्र चालत नाहीत हेही त्यामुळेच म्हटले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

उपवासाच्या पदार्थांची चर्चा

बटाटा चिवडा
Mon, 10/22/2012 - 09:02 नवीन
उपवासाच्या पदार्थांची चर्चा पाहून मी "चालत" नाही.. पळत आलो प्रतिसाद द्यायला.. :-)
  • Log in or register to post comments

उपासाला फारेनचेच पदार्थ

नितिन थत्ते
Mon, 10/22/2012 - 11:30 नवीन
उपासाला फारेनचेच पदार्थ चालतात.
  • Log in or register to post comments

छ्या !

सुहास..
Mon, 10/22/2012 - 12:28 नवीन
उपासाला फारेनचेच पदार्थ चालतात. >>> हे चुकुन ' उपासाला काँग्रेसचेच पदार्थ चालतात. ' असे वाचले ;)
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा