Skip to main content

खबरदारी -

लेखक विदेश यांनी मंगळवार, 09/10/2012 10:13 या दिवशी प्रकाशित केले.
तुला असे मुळूमुळू रडतांना पाहून, मी थोडातरी विरघळेन, असे वाटले असेल तुला - माझ्या य:कश्चित जिवासाठी तू तुझे हे अनमोल अश्रू ढाळतेस... माझ्या रुक्ष चेहऱ्यावर जाऊ नकोस माझ्या कठोर काळजातही ते अश्रू जपून साठवताना - माझी किती तारांबळ होत आहे हे तुला न दिसण्याची मी खबरदारी घेत आहे ! .
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1962
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

मस्त ... अमोल केळकर

याला कविता का म्हणायचे कळले नाही.. पहा. तुला असे मुळूमुळू रडतांना पाहून मी थोडातरी विरघळेन असे वाटले असेल तुला - माझ्या य:कश्चित जिवासाठी तू तुझे हे अनमोल अश्रू ढाळतेस. माझ्या रुक्ष चेहऱ्यावर जाऊ नकोस. माझ्या कठोर काळजातही ते अश्रू जपून साठवताना माझी किती तारांबळ होत आहे हे तुला न दिसण्याची मी खबरदारी घेत आहे !

In reply to by सस्नेह

याला कविता का म्हणायचे कळले नाही...
ह्याला काव्यात्मक विचार शृंखला किंवा मग एका चांगल्या कवितेचे 'रॉ मटेरियल' म्हणता येईल.

In reply to by प्रभाकर पेठकर

असल्या काव्यप्रकाराबद्दल रमेश तेंडूलकरांनी (तेच ते, सचिन तेंडूलकराचे वडील) यांनी चांगले विवेचन केले आहे. मला नक्की आठवत नाही. पण मी नंतर आठवून सांगण्याचा प्रयत्न करेन.

snehankita kontihi kavita ashi panktit na lihita vakyat lihali tar ti kavita nahich vatayachi..... have tar dusari yekhadi prayatna karun baghaa....