जुना पुराणा पिंपळ
उभा नदीच्या तीरी ।
आल्या-गेल्या वाटसरूला
देई मायेची सावली ॥
जुना पुराणा पिंपळ
आटवांचा त्याला पार ।
पक्षांची मिरवी घरटी
अन् किडामुंगीचा वावर ॥
जुना पुराणा पिंपळ
त्याची हिरवी-पिवळी पाने ।
नव्या ऋतुंची पालवी
अन् जुन्या ऋतुंचे जाणे ॥
जुना पुराणा पिंपळ
त्याच्या किती कहाण्या ।
छायेत नाचती सजती
आठवणींच्या भिंगोर्या ॥
जुना पुराणा पिंपळ
विस्तारी चहू दिशांना ।
झेपावे उंच आभाळी
रूजवी मातीत मुळांना ॥
जुना पुराणा पिंपळ
सळसळतो पानोपानी
सरत्या किती क्षणांचा
तोच साक्षी मनोमनी ॥
जुना पुराणा पिंपळ
शोधी आसमंती काही ।
ढळता हिरण्यगर्भ तेथे
अन् शुष्क पर्णांच्या राशी॥
जुना पुराणा पिंपळ
खंतावे आज अंतरी ।
पायवाटही दिसेना
चाहूल नाही दूरवरी ॥
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2537
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
खूपच आवडली... कविता.
सोपी
"सोपी रचना करता करता एकदम
In reply to सोपी by श्रावण मोडक
पिंपळ आवडला.
विदारक....
In reply to पिंपळ आवडला. by सुधीर
धन्यवाद! लेख वाचला ..
In reply to पिंपळ आवडला. by सुधीर
कविता आवडली
+/-
आभार !
In reply to +/- by पिवळा डांबिस
सुंदर आशय.. रचना जरा ठाक्ठीक
आवडले!
कवितेचा आशय अतिशय आवडला.
सर्वांचे मनःपूर्वक आभार !
जुना पुराणा पिम्पळ सुन्दर