Skip to main content

मिसळपाव - नवी रचना

लेखक सरपंच यांनी बुधवार, 19/09/2012 14:41 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आताच मिसळपावचे उर्ध्वश्रेणीकरण पुर्ण केले आहे. महत्वाचे तेवढे काम करून मिपा वापरास सुरू केले आहे. या धाग्यावर तुम्हाला येणार्‍या अडचणी लिहीता येतील म्हणजे त्या ताबडतोब सोडवता येतील. राहीलेली कामे. - १ ) सध्या खरडवहीमध्ये नवीन खरडीची सुचना येत नाही. - नीलकांत

वाचने 48907
प्रतिक्रिया 216

प्रतिक्रिया

In reply to by इरसाल

मिपावर येणार्‍या विविध अडचणींवर काम चालु आहे. नीलकांत, प्रशांत, काम करतच आहेत. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मला वाटलेच होते पण तरीही म्हटल ज्या अडचणी येत आहेत त्या लिहाव्यात. म्हणुन हा प्रपंच

री-लॉंचनंतर मला व्यनि, तसेच खरडवह्यांत देवनागरीतून लिहीता येत नाही. आय. ई. ९ तसेच फायरफॉक्स १२.० ह्या दोन्हीतून मला हाच अनुभव येत आहे. (व्यनिचा विषय मात्र देवनागरीतून लिहीता येतो!)

मिसळीचा फोटो पाहून आनंद झाला. लेखक/प्रेषक नाव परत आलं, धन्यवाद! रंगसंगती एकदम पूर्वीसारखी नसली तरी थोडी गर्लिश(पिंकीश) वाटते...

प्रसन्न दिसते आहे. तसेच व्यनि, खरडवही येथे आता देवनागरीतून लिहीताही येते आहे. धन्यवाद.

सही बदलता येत नाहिय्ये... :-( खात्यावर एडिट ऑप्शनला गेल्यावर ,साइन बदलायच्या इथे कर्सर नेल्यावर हे नुस्तं''''''''''''' Signature This field has been disabled because you do not have sufficient permissions to edit it. Your signature will be publicly displayed at the end of your comments. '''''''''''''''असं येतय :-(

नमस्कार, या धाग्यावरील सर्व अडचणींची दखल घेतली आहे. लवकरच त्या सर्व दूर करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे आणि काही असेल तर या धाग्यावर लिहू शकता. - नीलकांत

निलकांत, नव्या रंगसंगतीच्या उर्ध्वश्रेणीकरणाच्या प्रक्रियेत 'व्हेज कडाई' चे छायाचित्र आणि ह्या प्रतिसादाचे अंग (बॉडी) गायब झाली आहे. परत आणता येईल का?

मधुनच काही प्रतिसाद दिसत नाहीत, फक्त शिर्षक, व कोणाचा प्रतिसाद इतकेच दिसते. प्रतिसाद दिसत नाही. फायरफॉक्स, आयई, मोबाईल सगळीकडे. error

फोटू टाकले आणि रेसिझे नसले तर जरा गडबड होते बघा... खालील धागा बघा उदाहरण म्हणून... http://www.misalpav.com/node/22887

हे ही जबरी आहे. आवडले नीलकांता,प्रशांता.......धन्यवाद.

छान दिसते आहे नवीन रुपडे. पण अजुनी वाचणखुणा असेच दिसते आहे :(

भटकंती मधले जुने लेख दिसत नाहीयेत :( नुसते प्रतिसाद आहेत ..धागा गायब

In reply to by अभि

त्यावर काम चालु आहे. सध्या एखादा धागा अर्जंट बघायचा असेल आणि दिसत नसेल तर कृपया व्यनी वा खरड करा संपादकांना.

ही नवीन रचना आवडली... मध्यन्तरी मिपा'ऐवजी कुठल्यातरी अन्धारलेल्या सन्स्थळावर आल्यासारखे वाटत होते.. आता जुन्या मिपाशी पुन्हा नाळ जोडल्यासारखे वाट्टेय!!.. :) धन्यवाद!

कित्येक प्रतिसाद गायबलेत. नुसते शीर्षकच दिसते आहे. आणि ते व्हेज कडाईचे छायाचित्र अजून दिसत नाहिए. तशी घाई नाही मला पण जरा लक्षात असू द्या.

कित्येक प्रतिसाद गायबलेत. नुसते शीर्षकच दिसते आहे. आणि ते व्हेज कडाईचे छायाचित्र अजून दिसत नाहिए. तशी घाई नाही मला पण जरा लक्षात असू द्या.

In reply to by प्रभाकर पेठकर

'व्हेज कडाई' छायाचित्रं पुन्हा स्थानापन्न झाले आहे. धन्यवाद संपादक मंडळ. (त्यांनीच हे सत्कर्म केले आहे असा आपला माझा अंदाज). त्याच बरोबर, अनेक प्रतिसाद गायबलेले आहेत. त्यावर काम चालू असेलच. संपादक मंडळास आणि निलकांत-प्रशांत जोडगोळीला लवकरच त्यातही यश येईल अशा शुभेच्छा.

खव उचकपाचक करता येत नाही राव गतीमानतेने. दुसऱ्याच्या खवतून तिसऱ्याच्या खवत जायचा रस्ता आखून द्या की... ;-)

बऱ्याच ठिकाणी फक्त नावेच दिसत आहेत मजकूर ( लेख / प्रतिक्रिया ) गायब झाला आहे .. पहिले मला वाटले कि मनोगत प्रमाणे क्लिक केले की दिसेल पण तसे नाहीये .. विषय रकान्यात काही लिहिले की स्थळ (opera) अडकत (hang) आहे ..

एखादा जुना धागा उघडला.. . कि मुख्य पोस्ट न दिसता.. फक्त खालचे कमेंट्स दिस्तेत .. मी काही गोंधळ करतोय .. कि आणखी काही.. पूर्वी जुने धागे नीट ओपन होत होते

वाचनखूण म्हणुन साठवलेल्या पाककृती व काही कला विभागातल्या नोंदी दिसत नाहित. फक्त प्रतिक्रीयाच दिसतात. ते दुरुस्त करता आले तर बघा.

अमेरिकेतील निवडणुका आता लवकरच होतील. दोन तीन वर्षांपूर्वी अमेरिकेतील राज्यपध्दती हा क्लिंतन यांचा लेख मिसळपाववर आला होता. पण तो लेख आणि प्रतिसाद वाचता येत नाहीत. इतर लेखांच्या लिंकांमध्ये लवकरच सुधारणा केली जाईल याची खात्री आहे पण अमेरिकेतील निवडणुकांच्या पार्श्व्हभूमीवर वाचकांना चांगली माहिती मिळावी म्हणून या लेखाच्या लिंकेत लवकरात लवकर सुधारणा केली जावी अशी विनंती संपादकांना करत आहे. आपलेच, पुण्याचे वटवाघूळ

मी अनुभवत असलेली एक अड्चण - लिंक वर क्लिक केल्यानंतर, आर्टिकल वर न जाता, ते प्रतिक्रिया पेज वर जात आहे. आर्टिकल्स वाचता येत नाहीयेत.

बहुतेक जुने लेख दिसत नाही . अस होउ शकत नाही का की जुने रुप आणि नविन रुप दोन्ही एकत्र पाहता यावे ( मागे मिमरठी वर असे अनुभवले आहे )

एखाद्या धाग्याला खूप सारे प्रतिसाद आले की ते पुढच्या पानावर जातात. त्यानंतर जर काही नविन प्रतिसाद आले की 'नविन लेखन' पानावर 'क्ष नविन' असा दुवा दिसतो. ज्यांना फक्त नविन प्रतिसाद वाचायचे असतील ते ह्या दुव्यावरून नविन प्रतिसाद वाचू शकत होते. पण उपडेट नंतर, ह्या दुव्यावर टिचकी मारली असता नविन प्रतिसादांवर न नेता मूळ लेखावरच घेऊन जात आहे. हा प्रॉब्लेम फक्त त्याच लेखांबाबत होतो आहे ज्यांचे प्रतिसाद एकापेक्षा जास्त पानांवर गेले आहेत. उदा. हाच धाग्यावर नविन प्रतिसाद काय आहेत हे बघण्यासाठी जेव्हा 'क्ष नविन' वर टिचकी मारली तेव्हा मूळ लेखावरच घेऊन गेला, नविन प्रतिसादांवर नाही.

बरेचसे प्रतिसाद दिसतच नाहीत. म्हणजे प्रतिसाद दिसतात, प्रेषक दिसतो, पण आत काय लिवले आहे ते गुलदस्त्यात. होईल, होईल म्हणून वाट पाहिली, पण ते काही होत नाही.

प्रेशका चे जुने लेख आणि सर्व लेखन काहि दिसत नाहि बघा.... आम्हा नव्या सदस्यांना मोठा कामाचा आहे बघा तो दुवा.....

लिखाणाच्या बॉक्सची (Comment Box) रुंदी वाढवावी अशी विनंती,प्रतिसाद टंकताना त्याची मदत होईल. सध्या दिलेले प्रतिसाद गायबण्याची गम्मत पहायला मिळत आहे,त्यावर लवकर उपाय योजल्यास अती उत्तम ! खरडवहीत फोटो / व्हिडीयो अजुनही लावता येत नाही.

http://www.misalpav.com/comment/437841#comment-437841 "....भारतीय मानसिकतेला चमत्कारांच मोठं आकर्षण आहे. त्याच्या लेखनावरून जवळच्या लोकांचा त्याला सपोर्ट दिसत होता. त्याच्या इथल्या शेवटच्या पोस्टवर (सगळा धोका पत्करून) साधनामार्ग चुकीचा आहे असं सांगीतलं होतं. या अपग्रेडेशनमुळे जुन्या पोस्टस, प्रतिसाद, व्य. नि. काही म्हणता नीट दिसत नाही. ..." मिपाचे उन्नतीकरण केल्यामुळे जुन्या धाग्यातील प्रतिसाद खरोखर दिसत नाहीये. ही बग काढण्याचे प्रयत्न करायला हवेत. जुन्या धाग्यांत व प्रतिसादात मौलिक माहीती दडलेली असू शकते.

In reply to by जयवी

फोटो कॉम्प्रेस करुन घ्या म्हणजे त्याचा आकार कमी होइल,Width x Height व्यवस्थीत द्या

In reply to by श्री गावसेना प्रमुख

साईझ चा प्रॉब्लेम नाहीये. काहीतरी वेगळाच आहे मेसेज.

-हजर सभासद कोणकोण आहेत तेदेखील दिसत नाही. -उपप्रतिसाद आला नसतानादेखील स्वतःचा प्रतिसाद संपादित करता येत नाही.

In reply to by बॅटमॅन

त्यांच्या म्हणन्या नुसार हा अधिकार काढुन टाकण्यात आला आहे

In reply to by श्री गावसेना प्रमुख

माझ्या म्हन्न्याचा कैबी अर्थ नका काढू. प्रतिसादाला उपप्रतिसादाचा बूच नसला तर पूर्वी प्रतिसाद संपादित करता येत होता. (आता तसं करता येत नाही, बहुतेक उर्ध्वश्रेणीचा म्हणजेच ड्रुपल७चा हाही एक बग असावा.) नितीन थत्ते यांच्या प्रतिसामुळेच ते कळले. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कुठ कैबी म्हणलो हो मी हे तुम्ही म्हणाले ना अंहं. लेखन संपादनाचा अधिकार सर्वांना होता. पुढे तो अधिकार काढुन टाकण्यात आला. म्हणुन मी तसे लिहीले

In reply to by श्री गावसेना प्रमुख

लेखन संपादनाचा अधिकार सर्वांना होता.

लेखन आणि प्रतिसाद यात गल्लत होतेय सेनाप्रमुख.

In reply to by गणपा

साहेब डॉ.साहेबांच्या ज्या प्रतीसादाला बॅटमन साहेबांनी उपप्रतीसाद दिला त्यावर डॉ.साहेबांनी कसाब असे दुरुस्त करत होतो तर प्रतिसाद टाकलाच का ! विशेषाधिकारात दुरुस्ती केली आहेअसे उत्तर दिले म्हणुन मीही म्हटले की माझाही प्रतिसाद उडवा, मला माहीत नव्हते हा सॉरी, मला वाटले की त्यांनी त्यांचा प्रतीसादच संपादीत केला काय्,कारण त्यांचा प्रतीसाद हा मध्यांतराला आला होता कोणी तेव्हा शिर्षक संपादित तर नाही ना करणार(आणी तो लेख चिंतामणी यांचा होता वाटते)

मला काही केल्या चित्र चढवता येत नाहीये. प्रत्येक वेळी असा मेसेज येतोय. Error messageEntityMalformedException: Missing bundle property on entity of type taxonomy_term. in entity_extract_ids() (line 7562 of /home/misavcom/public_html/includes/common.inc). Error The website encountered an unexpected error. Please try again later.

In reply to by जयवी

फ्लिकर किंवा पिकासावर फोटो अपलोड करुन त्याचे एचटीमएल कोड लेखात पेष्ट करणे हा सर्वात सोपा मार्ग. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जयवीताई तेच करत असाव्यात. पण हा एरर फक्त कलादालनातल्या धाग्यांनाच येतो आहे.

In reply to by प्रचेतस

हो ना........ मी तेच करतेय पण तरीसुद्धा एरर येतोच आहे. मी असंख्य प्रयत्न केलेत.

In reply to by जयवी

वल्लीदादा ला सहमत मी पण सुरुवातीलाच वैतागून आता चित्रे तिथे टाकायचा विचारच सोडलाय. :(