Skip to main content

कानसेन कोण? २०१२ स्पर्धेचा निकाल.

लेखक रेवती
Published on शुक्रवार, 28/09/2012
मित्रमैत्रिणींनो, "कानसेन कोण?: २०१२" स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. अनेक मिपाकरांनी उत्साहाने भाग घेऊन ती यशस्वी केली याबद्दल सर्वांचे आभार. 'कानसेनच्या' निमित्ताने बर्‍याचजणांना आपापल्या आठवणीतील गाणी पुन्हा भेटली, आनंद देऊन गेली. सुरावट ओळखणे, चुकणे यांची धमाल अनुभवायला मिळाली. स्पर्धेत होणारी लुटुपुटीचे भांडणे, तात्पुरता जय, पराजय अनुभवताना पुन्हा लहान झाल्यासारखे वाटले. ही गाणी ओळखण्याचा खेळ खेळतांना बरेच जणांनी आपापल्या परिवार सद्स्यांना सामील करून घेतलं, तेंव्हा आजच्या घाई-गर्दीच्या आयुष्यात चार घटका का होईना, या कार्यक्रमाने घरांमध्ये लहान-थोर सर्वांना एकत्र आणलं असावं याचा आम्हाला आनंद वाटतो. या कार्यक्रमाची मूळ कल्पना मिपा सदस्य बहुगुणी यांची असून मागील स्पर्धेपासून सदस्या मस्त कलंदर यांनी आणि प्रभो, गणपा व मेघवेडा यांनी मदत केली होती. काही सेकंदात ओळखू आलेल्या सुरावटीचे तुकडे निवडताना खरे किती काम करावे लागते हे या सगळ्यांनी मला अनुभवायला दिल्याबद्दल त्यांचे आभार मानते. आता जाणून घेऊया यावर्षीच्या 'कानसेन कोण? २०१२' स्पर्धेचे विजेते! नाव- अन्या दातार अभिनंदन! पारितोषिकः बिनाका गीतमालेतील या स्पर्धेत वापरल्या गेलेल्या सर्व १४८ गीतांच्या एम पी ३ फाईल्सची गीतमालिका ('प्ले-लिस्ट') येत्या दोन आठवड्यांत विजेते अन्या दातार यांना व्यक्तिगत निरोपाने पाठविण्यात येईल.
स्पर्धक ओळखलेली गाणी
अन्या दातार २४
सानिकास्वप्निल २२
मस्त कलंदर २०
मराठे १८
स्नेहांकिता १७
चिंतामणी १६
पैसा ११
निखिल देशपांडे
प्रा. डॉ. बिरुटे,संजय क्षीरसागर
नंदन
चतुरंग, मैत्र
सहज, प्रभाकर पेठकर
रेवती,ज्ञानोबाचे पैजार, नितीन थत्ते
जानकी, मोबाइल, मेघवेडा, गणपा, मधुमती,भारद्वाज

 

धन्यवाद. रेवती
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 6559
प्रतिक्रिया 55

प्रतिक्रिया

In reply to by बिपिन कार्यकर्ते

यहीच्च बोल्ता है ! अभिनंदन सर्व विजेत्यांचे, स्पर्धकांचे आणि आयोजकांचे - (प्रेक्षक) छोटा डॉन

अन्य दातार यांचे अभिनंदन. सर्व आयोजकांना धन्यवाद! मजा आली.

In reply to by अत्रुप्त आत्मा

मी पण...

In reply to by स्पा

त्याचा चेपुवरचा फटु नाही का बघीतला? त्यासाठी दोन आणि यासाठी एक अश्या तीन पार्ट्या लागू आहेत. कमीत कमी.

खेळताना खूप मजा आली. कधी एके काळी कॉलेजातल्या स्पर्धेत अश्याच स्पर्धेत भाग घेतला होता तेव्हाच्या आठवणी जागा झाल्या. आयोजकांचे, मिपा टेक्निकल टीमचे, सगळ्या स्पर्धकांचे आणि अन्याचे अभिनंदन!

In reply to by रेवती

अभिनंदन अन्या दातारचे तसेच ज्यांनी संकलन केले, पाठपुरावा करून पूर्ण केले त्यांचे देखील! :-)

In reply to by विकास

अभिनंदन अन्या दातारचे तसेच ज्यांनी संकलन केले, पाठपुरावा करून पूर्ण केले त्यांचे देखील!

अभिनंदन! ओळखलेली गाणी की विजेतपदांची संख्या? कारण एक गाणं मीही ओळखल्याचं मला आठवतंय... ;-)

अन्या दातार, अभिनंदन... या स्पर्धेची आयडिया फारच भन्नाट होती. मिसळपाव खर्‍या अर्थाने लाईव्ह झालं होतं.. खूप काळाने (बुद्धिबळ आणि क्रिकेट सामन्यांच्या नंतर) पुन्हा इतकी चहलपहल आणि स्नेहसंमेलन झालं... जगभरातले आपण मित्र एकत्र येतो आणि अशा स्पर्धेच्या निमित्ताने गप्पा मारतो हे विलक्षण आहे. सर्व आयोजकांचे धन्यवाद.

अन्या दातार यांचे अभिनंदन........ स्पर्धांना खूप मजा आली. कुणीतरी तक्रार केली आहे त्यानुसार पुढील वेळी नवीन गाणीही घ्यावीत.

अन्या दातार यांचे अभिनंदन. सानिका स्वप्निल आणि मस्त कलंदरही जवळच आहेत. त्यांचेही अभिनंदन.

विजेत्यांचं अभिनंदन आणि बहुगुणींना हा अभिनव प्रकल्प मिपावर रुजू केल्याबद्दल थ्री चीयर्स. हिप हिप हुर्रे! :)

सर्व भाग घेणार्‍यांचे अभिनंदन आणि स्पर्धा आयोजित करणार्‍या बहुगुणी, रेवती, मक, प्रभो, गणपा सर्वांना खूप धन्यवाद! अन्याला दुसर्‍या दिवशी भाग घ्यायला मनाई केली होती बहुतेक! ;) मी दोन्ही दिवस गैरहजर होते, फक्त शेवटच्या २ फेर्‍यांत भाग घेता आला. पुढच्या वेळी पूर्ण फेर्‍यात भाग घेऊन अन्याला टफ फाईट देण्यात येईल! प्रॉमिस!!

स्पर्धा चांगली झाली. स्पर्धेसाठी एखादे चॅट मोड्यूल नाही का? ते असेल तर अधिक 'लाईव्ह' मजा येईल.

दोन आठवडे अखंड मेहेनत घेऊन, आणि आयत्या वेळी आलेल्या काही तांत्रिक अडचणींनाही तोंड देऊन गणपा, रेवती, मस्त कलंदर आणि प्रभो या माझ्या सहकार्‍यांनी 'कानसेन कोण? - २०१२' स्पर्धा यशस्वीपणे संपन्न केली याचा मला अभिमान आहे. आणि या यशात अर्थात् महत्वाचा वाटा आहे तो त्या स्पर्धेसाठी जगभरातून अटीतटीने, पण खेळीमेळीने, सहभाग घेणार्‍या अगणित प्रतिसादकांचा, तेंव्हा त्यांचेही मनःपूर्वक आभार! प्रथम क्रमांकाचे विजेते श्री. अन्या दातार यांचे अभिनंदन, तसेच त्यांना 'कांटे की टक्कर' देणार्‍या पुढच्या ५-६ स्पर्धकांचंही अभिनंदन. (अन्या भाऊंनी आणखी एखाद-दोन कॉफी-ब्रेक घेतले असते तर त्यांचं काही खरं नव्हतं!) आम्ही जवळ-जवळ ३०० गाण्यांची तयारी ठेवली होती, पण वेळेअभावी निम्मीच देऊ शकलो. शक्य असेल तर, स्पर्धेत भाग घेणार्‍या सर्वच स्पर्धकांना उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून ही उर्वरित गाणी दुव्यांच्या स्वरूपात उपलब्ध करून द्यायचा विचार आहे. कधी ते याच धाग्यावर सांगेन. यापुढील स्पर्धा दिवाळीत घेऊया, आणि त्या वेळी १९८२-२०१२ असा ३० वर्षांचा 'नवा' कालखंड हे लक्ष्य ठेवू. चित्रपट्संगीताच्या so-called सुवर्णकालानंतरची सगळीच गाणी काही टाकावू नव्हती, खूपशी श्रवणीय गाणी याही कालात आली, त्यांचीही नोंद घेऊयात. तेंव्हा, त्या स्पर्धेच्या आयोजनासाठी 'कानसेन टींम' मध्ये 'सळसळत्या रक्ताच्या, तरूण मनाच्या' सहकार्‍यांची भरती लवकरच चालू होईल! इच्छुकांनी नावनोंदणी करावी! पुन्हा एकदा सहभागाबद्दल, आणि आमचं कौतुक करून मनोधैर्य वाढवल्याबद्दल सर्वांचे आभार, आणि ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी दिलेल्या तांत्रिक आणि इतर मदतीबद्दल नीलकांत आणि प्रशांत यांचं, तसंच संपादक मंडळाचे आभार!

In reply to by बहुगुणी

ही स्पर्धा चालू ठेवावी. आठवड्यात एकदा ठेवावी. पण वेळ बदलावी. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ५ ते ९ ही वेळ अनेकांची काम संपवुन घरी जाण्याची असते. तेंव्हा ही वेळ रात्री ९ पासुन पुढे असावी आणि विक डेजवर असावी.

आज सकाळी कालचे सर्व भाग बघितले/वाचले. बरीच सोपी होती, पण काल अनेक सभासदांच्या इष्छेला मान देत नेट गंडलेच ;-) तरीही विजेता ठरलो याचा आनंद आहेच! :-) जोरदार टक्कर देणार्या निदे, मक, चिंतामणी काका, सानिकाताई, नंदोबा यांच्यामुळेही मस्त रंगत आली. ही स्पर्धा घेणार्या टीमचेही खूप खूप आभार.

एका सुरेल अन सुरेख संगीतयात्रेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल संयोजकांचे आभार ! सर्व विजेत्यांचे अभिनंदन ! संयोजकांना काही सूचना. १ एका धाग्यामध्ये १० पेक्षा जास्त गाणी झाल्यानंतर पेज लवकर लोड होत नव्हते. याची व्यवस्था पुढच्या स्पर्धेत पहावी. २. एका वेळी एकपेक्षा जास्त गाणी टाकू नयेत यामुळे स्पर्धकांना समान संधी मिळत नाही. बाकी मजा आली !

अन्या दातारचे व कानसेन विजेत्यांचे अभिनंदन खूप मजा आली ह्या स्पर्धेमुळे जुन्या गीतांचा आस्वाद घेता आला व काही जुन्या आठवणींना उजाळा मिळाला :) सर्व आयोजकांचे अभिनंदन व मनःपूर्वक आभार

अभिनंदन सर्व विजेत्यांचे, स्पर्धकांचे आणि आयोजकांचे

In reply to by सस्नेह

>>>> माझा क्रमांक ६ वा आहे की ५ वा कुणी सांगू शकेल काय ? मला वाटतं आपला क्रमांक १ ला आहे. कारण माझ्या संगणकाच्या मॉनिटरवर सर्वच सहभागी स्पर्धकांचे २४ गुण दिसत आहेत. ;) -दिलीप बिरुटे

पाचवा हवा..कारण गुण १७ आहेत....

अन्या दातारांचे अभिनंदन.........!!! बहुगुणी, गणपा, रेवती, मस्त कलंदर आणि प्रभो आपलं खरेच आभार. आपण घेतलेली मेहनत. दिलेला वेळ याचे मोजमाप करण्यासाठी माझ्याकडे कोणताही तराजू नाही. दोन क्षण मजेत गेले. खूप मजा आली. खूप गाणी ऐकतो पण हे गाणं कुणाचं, गीतकार कोण, आणि चित्रपट कोणता असावा, यासाठी शागीर्द माणूस लागतो. आम्ही आपले ' मुझीक वाजलं की अर्रर्रे हे तर हे गाणं आहे'' असं वाटायचं. टायपेर्यंत उत्तर आलेली असायची. आमच्याकडे तर अहो, लवकर टायपा लवकर टायपा असा धोशाही झाला. असो, एकंदर मजा आली. बाकी, मिपा सर्व्हरचेही आमच्या गणेश मंडळाच्या वतीने आभार त्या मानाने त्यांनी कमी व्यत्यय आणला. धन्यवाद. असाच लोभ ठेवावा. ;) सरतेशेवटी संकेतस्थळाचे मालक नीलकातं आणि प्रशांत यांचेही आभार. मिपाकरांच्या हौशीसाठी मूबलक जागा देतात, हौस पुरवतात. आपलेही आभार. कोणाचा नामोल्लेख चुकुन राहीला असेल तर दिलगिरी व्यक्त करुन कार्यक्रमाची सांगता झाली असे परस्पर जाहीर करतो. धन्यवाद. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>कोणाचा नामोल्लेख चुकुन राहीला असेल तर दिलगिरी व्यक्त करुन कार्यक्रमाची सांगता झाली असे परस्पर जाहीर करतो. धन्यवाद. :) संपादक मंडळ????

पण मजा आली. जो आनंद मिळाला त्याबद्दल संयोजकांचे आणि मिपाचे मनःपूर्वक आभार

हार्दिक अभिनंदन!

अन्या दातार, सानिकास्वप्निल आणि मस्त कलंदर ह्यांचे हार्दीक अभिनंदन. माझ्यासह, बाकी सर्व सहभागी सदस्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा..!

काही गाण्यांची सुरुवात (उदाहरणार्थ http://www.misalpav.com/comment/429042#comment-429042 ) सारेगामाने नव्याने रीव्हॅम्प करून काढलेल्या सीडीतून घेतली आहेत. त्यामुळे मूळ गाण्यात नसलेले वाढीव पीस असण्याची शक्यता आहे. ती गाणी ओळखायला अवघड होते (चकवा आहे असं मस्त कलंदर यांनी म्हटलंच आहे) . या उदाहरणाच्या गाण्यात ३० सेकंदाची क्लिप असली तरी पहिला बराच काळ २०-२२ सेकंद वाढीव पीस आहे. अश्या क्लिप्स देणे टाळावे.

अभिनंदन ... विजेते आणी स्पर्धक दोघांचेही.

विजेत्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि आयोजकांना धन्यवाद. मज्जा आली भाग घ्यायला. पुढच्या स्पर्धेची वाट बघत आहे, आणि जरा नवीन गाणी असतील म्हणजे थोडी जिंकायची संधी मिळेल अस वाटतंय.. :)

विजेते अन्या दातार आणि इतर मातब्बर व्यासंगी मंडळी - मस्त कलंदर, निदे, चिंतामणीकाका, नंतर बाजी मारणार्‍या सानिका, स्नेहांकिता यांचे जोरदार अभिनंदन! मजा आली.. बर्‍याच जुन्या गाण्यांची उजळणी झाली. तूनळी वर इथे असलेल्या अनंत जाहिरातींमुळे बरेचदा वेळ गेला तोवर ज्यांना उत्तम माहिती होती आणी कळफलकावर सराईत आहेत अशांनी विजेतेपदं मिळवली. संयोजन करून खो देणार्‍या सर्वांचे आभार... याच दोन दिवसात महत्त्वाची कामं आल्याने जास्त भाग घेता आला नाही तरी नंतर जुने धागे पाहून गाणी ओळखायचा प्रयत्न केला. बरीच जमली.. त्यातही मजा आली.. पाच खंडात मिपा एका वेळी एकत्र आल्यासारखं वाटलं. पुढच्या स्पर्धेची वाट पाहतो !!

स्पर्धेत भाग घेतलेल्या स्पर्धकांचे आणि आयोजकांचे, सर्वांचेच अभिनंदन. आता वेळ मिळतोय ते ट्रॅक्स ऐकायला.... च्यायला, एकही गाणे ओळखता येत नाहीय.. :(