✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

नृत्य

K
Kavita Mahajan यांनी
Tue, 09/25/2012 - 12:33  ·  लेख
लेख
प्रेमात असलं की आपल्यासोबत आपल्या पावलांखालचा निर्जीव पाचोळादेखील नाचायला लागतो आणि आभाळातला चंद्र जणू फक्त आपल्यासाठीच प्रकाशतो आहे, असं वाटतं. (माझे काळ्या कॅनव्हासवर केलेले तैलरंगातील नृत्यमग्न बगळ्याचे एक चित्र ) .
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला

प्रतिक्रिया द्या
37264 वाचन

💬 प्रतिसाद (103)

प्रतिक्रिया

सहमत/ असहमत

प्रदीप
Fri, 09/28/2012 - 11:10 नवीन
"<<कलेपेक्षा कलाकाराकडे पाहून प्रतिसाद दिले जातायत. पुन्हा सहमत!!" मीही सहमत. ">>मिपाकरांकडून अशी अपेक्षा नव्हती. आता मात्र असहमत!!!" मीही असहमत. पण ह्यामागे कारण काय आहे, ह्याचाही विचार केलेला बरा. समस्त मिपापरिवार म्हणजे एक अज्ञानाच्या, अंधाराच्या खातेर्‍यात तळमळत पडलेला अजाण समुदाय आहे, आणि त्याचा उद्धार करावयास आपण इथे आलेलो आहोत, असा अभिनिवेश घेऊन कुणी सभासद वावरत असले, तर हेच होणार. आणि हे इथेच नाही, इतरस्त्र कुठेही असेच व्हावे? ह्या अ‍ॅटिट्यूडला मराठीत नक्की काय म्हणतात माहिती नाही, इंग्लिशमधे ह्याला patronising, condescending आणि pontificating attitude असे संबोधले जाते.
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

कारण

श्रावण मोडक
Fri, 09/28/2012 - 12:46 नवीन
>>समस्त मिपापरिवार म्हणजे एक अज्ञानाच्या, अंधाराच्या खातेर्‍यात तळमळत पडलेला अजाण समुदाय आहे, आणि त्याचा उद्धार करावयास आपण इथे आलेलो आहोत, असा अभिनिवेश घेऊन कुणी सभासद वावरत असले, तर हेच होणार. आणि हे इथेच नाही, इतरस्त्र कुठेही असेच व्हावे? ह्या अ‍ॅटिट्यूडला मराठीत नक्की काय म्हणतात माहिती नाही, इंग्लिशमधे ह्याला patronising, condescending आणि pontificating attitude असे संबोधले जाते. जर-तरशी सहमत. प्रस्तुत विषयातले माझे निरिक्षण थोडे वेगळे आहे. कविता महाजन यांच्यावर पहिल्याच धडाक्यात असहमतीचा सूर लावणारा मीही होतो. तो विषय गुवाहाटीचा होता. नंतर महाजनांवर अकारणही बोचरी, कुत्सीत, उपरोधक टीका झाली आहे, असे माझे निरक्षणाअंती मत झाले ("हे सापेक्ष आहे, त्यामुळे ते चूक आहे", असे म्हणता येतेच). त्याला उत्तर देताना महाजनांचा अॅटिट्यूडही तुम्ही म्हणता तसा patronising, condescending आणि pontificating झाला आहे (माझे हे मत मी त्यांच्याशी संबंध असलेल्या दोन व्यक्तींकडे याआधीच एकदा सांगितले आहे). त्यानंतर टीकाकार आणखी सुटले (काही जणांनी केलेली टीका ही अजेंडाओरिएंटेड आहे असे मत एखाद्या तटस्थाचे सहज होऊ शकते असा हा व्यवहार झालेला आहे). हा एकूण प्रकार 'जशास तसे' असा झाला आहे. हे काही शोभिवंत नाही. या धाग्यावरच ज्या स्तरापर्यंत टीका उतरली आहे, ते पाहिले की कळते आपला (यात मीही आलोच) स्तर काय आहे. त्या चित्राची खिल्ली उडवणं मी समजू शकतो. ती उडवली गेली आहेही. रास्त आणि वाजवी खिल्लीला माझी हरकत नाहीच. पण येथील तिचा स्केल पाहता, त्या पॅट्रनाईज करतात तर आम्ही त्यांना गुंडाळून फाट्यावर फेकून देतो, असा झाला आहे. हे असे होऊ नये, असे मला वाटते. ज्या सुरात 'अंधारातील पाय' वगैरे प्रश्न केले गेले आहेत ते पाहता एकूण यामागच्या 'दिव्यदृष्टी'ची कल्पना येते (आता 'आम्हाला खरंच पाय दिसत नसल्याने बगळा नाचला कसा, हा प्रश्न पडला आहे आणि तो विचारला' असा पवित्रा घेतला जाईलही. त्यात मला पडायचे नाही). टीका वेगळी, खिल्ली वेगळी... दोन्ही होऊ शकते, झाले पाहिजे. दोन्हीच्या चौकटी आहेत. त्यापलीकडे त्या गेल्या की मग पॅट्रनायजिंगला (किंवा तत्सम गोष्टी) उत्तर म्हणून त्या केल्या जाताहेत हेही स्वीकारार्ह रहात नाही.
↩ प्रतिसाद: प्रदीप

सहमत.

गणपा
Fri, 09/28/2012 - 13:06 नवीन
सहमत. जेव्हा एखादी कलाकृती आवडली नाही तर तश्या टिप्पण्या करतोच ना तसच जर एखादी कलाकृती खरच चांगली असेल तर तिचं कौतुक करण्यात कमीपणा कसला? की फक्त कलागुण न पहाता धागाकर्त्याच/कर्तीच नाव पाहुनच तुटुन पडायच? एकवेळ कौतुक नसेल जमत तर शांत तरी बसाव, धाग्याकडे दुर्लक्ष करावं. या धग्यावर जुने स्कोर सेटल करणार्‍यांचा पुरुषार्थ आवडला नाही.
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

ऑ ?

परिकथेतील राजकुमार
Fri, 09/28/2012 - 15:16 नवीन
>>या धग्यावर जुने स्कोर सेटल करणार्‍यांचा पुरुषार्थ आवडला नाही. फक्त पुरुष सदस्यांनीच ह्या धाग्यावरती स्कोर सेटल करण्याचा प्रयत्न केला आहे का ? वरच्या वाक्यातून असेच जाणवत आहे. :)
↩ प्रतिसाद: गणपा

सुरूवात व त्यापुढे

प्रदीप
Fri, 09/28/2012 - 16:48 नवीन
गुवाहातीच्या धाग्यावरील कविता महाजन ह्यांचा प्रतिसाद अत्यंत पॅट्रनाईझिंग होता. तेव्हा आमच्यासारख्या अनेकांनी 'हा कोण आला सांप्रति नवा अवतार' असे (मनातल्या मनातच) म्हटले. त्यानंतरही त्यांचा येथला वावर तसाच राहिला आहे, ह्याविषयी दुमत नसावे. आपणास हवे ते लिहून त्यापुढे टीकेला-- ती कितीही विषयास धरून असली, त्यात कुठलाही वैयक्तिक विखार नसला, तरीही-- संपूर्णा दुर्लक्ष करायचे, असे होत राहिले. प्रत्येक संस्थळाचा बाज विभीन्न असतो. इतर काही संस्थळावर गांभीर्याने चर्चा करणारे बहुसंख्य सभासद आहेत, इथले टार्गेट थोडे वेगळे असल्याने, गांभीर्याने चर्चा करणारे सभासद आहेत तसेच बर्‍याच हलक्याफुलक्याच बाबींत रमणारेही अनेकजण आहेत. ते सर्वच मला वैयक्तिकरीत्या पटते असे नव्हे. पण माझ्या आजवरच्या (बर्‍याचश्या 'गंभीर' म्हटले जावे अशा) वावरात माझी कुणीही खिल्ली उडवलेली नाही. माझ्या धाग्यांत अजिबात रस नसलेले बहुसंख्य सभासद त्यांपासून दूरच राहिले. मला वाटते ह्याचे साधे कारण, मी इथे इथल्या समूहाचा 'मसीहा' बनून आलेलो नाही. मी येथला एक बनून आलेलो आहे, हे आहे. तुमचा स्वतःचा येथील अनुभव असाच आहे, ह्याविषयी मला संदेह नाही. इतरांचा आपण मान राखला नाही, तर आपला मानही इतर राखणार नाहीत, हे सरळच आहे. आणि एकदा असे व्हावयास लागले, की त्याला आवर घालणे कठीणच जाते. थोड्याफार फरकाने हे सर्वत्रच घडतांना दिसते, हे काही अगदी खास 'मिपा' वैषिष्ट्य (अथवा वैगुण्य) आहे, असे मलातरी प्रामाणिकपणे वाटत नाही. दुर्दैव असे की, ह्यामुळे कविता महाजन ह्यांनी अनुवादित केलेल्या चांगल्या कवितांनाही (उदा. फौझिया अबू खा़लिद ह्यांच्या कवितांचे अनुवाद) चांगला प्रतिसाद लाभला नाही. अजून एक--- आपण येथे रहावे की जावे, हे ज्याचे त्याने ठरवावे, व मुकाटपणे त्याची अंमलबजावणी करावी. 'मी आता येथून जात आहे' असल्या वक्तव्याला कसलीही शोभा नाही, वास्तविक तो पराजयाचा फडकवलेला झेंडा आहे. अर्थात ह्या खातेर्‍यात लोळणार्‍या आम्हाला त्याची संवय झालेली आहे, व आम्ही त्याबाबतीत अगदी निर्ढावलेलो आहोत.
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

गुवाहाटीपुरते

श्रावण मोडक
Fri, 09/28/2012 - 17:12 नवीन
गुवाहाटीच्या धाग्यावर मी जे लिहिले होते त्याचे दोन दुवे येथे देतो. "माझा स्वतःचा अनुभव", असे तुम्ही जे लिहिले आहे त्याच्याशीच सहमती दर्शवणारे हे दोन प्रतिसाद आहेत. http://www.misalpav.com/comment/413920#comment-413920 http://www.misalpav.com/comment/414069#comment-414069 या दोहोतून माझी भूमिका स्पष्ट व्हावी. अर्थातच, आपण दोघेही एकाच मताचे आहोत, असे दिसते. मांडणीत भिन्नता आहे.
↩ प्रतिसाद: प्रदीप

साती, तुमचा हा प्रतिसाद

यशोधरा
गुरुवार, 09/27/2012 - 15:43 नवीन
साती, तुमचा हा प्रतिसाद वाचून मला हे सुभाषित आठवलं :) हंस: श्वेतो बक: श्वेतो को भेदो बकहंसयो: | नीरक्षीरविवेके तु हंसो हंस: बको बक:|| जौद्या.
↩ प्रतिसाद: साती

हंस: श्वेतो बक: श्वेतो को

सुहास..
गुरुवार, 09/27/2012 - 15:54 नवीन
हंस: श्वेतो बक: श्वेतो को भेदो बकहंसयो: | नीरक्षीरविवेके तु हंसो हंस: बको बक | _/\_ पायाचा फोटु पाठवुन देणे !!
↩ प्रतिसाद: यशोधरा

कळालं तुला सुहाश्या?

यशोधरा
गुरुवार, 09/27/2012 - 15:58 नवीन
कळालं तुला सुहाश्या? ;) चल, तुझे सगळे गुन्हे माफ! नीरक्षीरविवेक सोप्पा नाय. माथी लिहू नकोस म्हणायला काय जाते? नक्की कोणी मा लिख म्हणायला हवे तोही एक प्रश्नच आहे की नाय? मंग? बरं आता मी नाय लिहिणार काहीच हां.
↩ प्रतिसाद: सुहास..

मस्त !

सुहास..
गुरुवार, 09/27/2012 - 16:05 नवीन
सुलभा: पुरूषा: राजन् सततं प्रियवादिन: | अप्रियस्य च सत्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभ: || हे ही लक्षात घेण्यासारखे .. ( मराठीत टायपताना लई त्रास झाला आहे ...तु कसे केलेस ? )
↩ प्रतिसाद: यशोधरा

>> मराठीत टायपताना लई त्रास

यशोधरा
गुरुवार, 09/27/2012 - 16:07 नवीन
>> मराठीत टायपताना लई त्रास झाला आहे ...तु कसे केलेस ? >> सत्य टाइपताना कष्ट घेतले ;)
↩ प्रतिसाद: सुहास..

हाहाहाहा

सुहास..
गुरुवार, 09/27/2012 - 16:12 नवीन
हाहाहाहा गुन्हे माफ केलेस ना नक्की ! लहान आहे मी !! :)
↩ प्रतिसाद: यशोधरा

धन्य!

sagarpdy
गुरुवार, 09/27/2012 - 16:49 नवीन
धन्य!
↩ प्रतिसाद: यशोधरा

'शीरसी मा लिख'

गणपा
गुरुवार, 09/27/2012 - 15:52 नवीन
वाह साती ताय एकीच मार्‍या पण सॉल्लीड मार्‍या. ;)
↩ प्रतिसाद: साती

<<<<तुम्हाला ते 'शीरसी मा लिख

मृगनयनी
Fri, 09/28/2012 - 18:42 नवीन
<<<<तुम्हाला ते 'शीरसी मा लिख' माहित असेल असे वाटते. वरिल नकारार्थी प्रतिसादांना जास्त महत्त्व देवू नये. कलेपेक्षा कलाकाराकडे पाहून प्रतिसाद दिले जातायत.>>>> मुळात ""शीरसी मा लिख' "" हे वाक्य "शीरसी मा लिख' " असे नसून ""शिरसि मा लिख"" असे आहे. मिपानियमानुसार जरी इथे मराठी भाषेला फाट्यावर मारण्यात येत असले, तरी संस्कृत'च्या बाबतीत मात्र कसेही लिहून चालत नाही.. अन्यथा इतरांसाठी लिहिलेले ते वाक्य स्वतःसाठीच हास्यास्पद ठरू शकते!!!! .. संस्कृत भाषेमध्ये पहिली-दुसरी वेलांटी, पहिला -दुसरा उकार चुकून जरी उलटा लिहिला गेला.. तर त्या शब्दाचा अर्थच बदलून जातो. संस्कृत'मध्ये "शिर" या शब्दाचा अर्थ "मस्तक" असा होतो... "शीर" ह्या शब्दाचा अर्थ "मस्तक" असा होत नाही.. त्यामुळे "शीरसि मा लिख" ह्या वाक्यालाही काही अर्थ उरत नाही... असो!... <<<<मिपाकरांकडून अशी अपेक्षा नव्हती. smiley>>>> ह्म्म्म.... इथे व्यक्ती तितक्या प्रकृती.. काही बगळे तर काही राजहंस!!!! ......
↩ प्रतिसाद: साती

'हौशी चित्रकाराचे चित्र' असे न-वाटण्याइतपत बारकावे

विसुनाना
गुरुवार, 09/27/2012 - 12:25 नवीन
एखादी डौलदार बॅलेरीना आपला फुलारलेला झगा सावरत पायाच्या अंगठ्याच्या टोकावर उभी आहे असा भास झाला. Image removed. चित्रकाराने जे बारकावे रंगवले आहेत त्यावरून तो अप्रशिक्षित-हौशी चित्रकार नसावा.

चित्र छान आहे , कला आहे (

ज्ञानराम
गुरुवार, 09/27/2012 - 12:25 नवीन
चित्र छान आहे , कला आहे ( नाविन्यता आहे) बगळा पांढरा मोर + बगळा याच कोम्बिनेशन वाटतय. पण , चंद्र हा चंद्र वाटत नसून प्रुथ्वी वाटतेय... (माझे काळ्या कॅनव्हासवर केलेले तैलरंगातील नृत्यमग्न बगळ्याचे एक चित्र ) असे लिहीण्यापेक्षा , ( मी रेखाटलेले काळ्या कॅनव्हासवरील तैलरंगातील नृत्यमग्न बगळ्याचे एक चित्र ) अस वाचायला बरं वाटल असत..

>>बगळा पांढरा मोर + बगळा याच

मृगनयनी
गुरुवार, 09/27/2012 - 15:10 नवीन
>>बगळा पांढरा मोर + बगळा याच कोम्बिनेशन वाटतय. >>पण , चंद्र हा चंद्र वाटत नसून प्रुथ्वी वाटतेय... त्रिवार सहमत!! >>(माझे काळ्या कॅनव्हासवर केलेले तैलरंगातील नृत्यमग्न बगळ्याचे एक चित्र ) >>असे लिहीण्यापेक्षा , ( मी रेखाटलेले काळ्या कॅनव्हासवरील तैलरंगातील नृत्यमग्न बगळ्याचे एक चित्र ) अस वाचायला बरं वाटल असत.. ह्म्म.. बर्‍याचदा योग्य शब्द व ते वापरण्याचे वाक्यातील योग्य स्थान न कळल्यामुळे विनोदनिर्मिती होते खरी~~~ :) चालायचंच!!! ........
↩ प्रतिसाद: ज्ञानराम

धागाकार्ती कवियत्री / लेखिका आहे म्हटले !

तर्री
गुरुवार, 09/27/2012 - 15:17 नवीन
>>(माझे काळ्या कॅनव्हासवर केलेले तैलरंगातील नृत्यमग्न बगळ्याचे एक चित्र ) >>असे लिहीण्यापेक्षा , ( मी रेखाटलेले काळ्या कॅनव्हासवरील तैलरंगातील नृत्यमग्न बगळ्याचे एक चित्र ) अस वाचायला बरं वाटल असत..
↩ प्रतिसाद: मृगनयनी

तरीही जमत नाही.

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 09/27/2012 - 15:37 नवीन
>>>>मी रेखाटलेले काळ्या कॅनव्हासवरील तैलरंगातील नृत्यमग्न बगळ्याचे एक चित्र. ह्यात, बगळा, 'तैलरंगात नृत्यमग्न' आहे असा अर्थ निघू शकतो. त्यामुळे, मी तैलरंगात, काळ्या कॅनव्हासवर रेखाटलेले, नृत्यमग्न बगळ्याचे एक चित्र. अशी वाक्य रचना जास्त योग्य वाटते.
↩ प्रतिसाद: मृगनयनी

ह्म्म्म पेठकरकाका... पण "

मृगनयनी
गुरुवार, 09/27/2012 - 15:49 नवीन
ह्म्म्म पेठकरकाका... पण ""मी तैलरंगात, काळ्या कॅनव्हासवर रेखाटलेले, नृत्यमग्न बगळ्याचे एक चित्र." या वाक्यात "मी तैलरन्गात" डुम्बता डुम्बता बगळासदृश पक्षी काढलेला आहे.... असाही आभास होतो!!! .. जो की कदाचित वास्तवदर्शी लेखिकेसाठी अशक्य असू शकतो!!!! तसेच इतके होऊनही त्या पृथ्वीसदृश चन्द्राचा मात्र कुठेच नामोल्लेख दिसत नाही.. हे पाहून वैषम्य वाटले!!! ...
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

>>त्या पृथ्वीसदृश चन्द्राचा

सस्नेह
गुरुवार, 09/27/2012 - 16:03 नवीन
>>त्या पृथ्वीसदृश चन्द्राचा मात्र कुठेच नामोल्लेख दिसत नाही.. << मला वाटते की अशा कलेचा चंद्र अंतरिक्षात जाऊन सॅटेलाईट मधून पाहिल्यास दिसू शकेल. यावरून चित्रकाराच्या प्रतिभेची उत्तुंग भरारी दृश्यमान होते.
↩ प्रतिसाद: मृगनयनी

अं हं, तरीपण नाही जमत.

सस्नेह
गुरुवार, 09/27/2012 - 15:49 नवीन
>>मी तैलरंगात, काळ्या कॅनव्हासवर रेखाटलेले, नृत्यमग्न बगळ्याचे एक चित्र.<< यावरून 'मी तैलरंगात (बसून) , काळ्या कॅनव्हासवर रेखाटलेले...' असाही अर्थ होऊ शकतो. 'मी, काळ्या कॅनव्हासवर तैलरंगाने रेखाटलेले, नृत्यमग्न बगळ्याचे एक चित्र ' हे कसे वाटते ?
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

शुद्ध गायीचे ताजे तूप

सूड
Fri, 09/28/2012 - 17:53 नवीन
सहमत. यावरुन कधीतरी वाचलेली 'आमचे येथे शुद्ध गायीचे ताजे तूप मिळेल' ही पाटी आठवली.
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

सूड...

गवि
Fri, 09/28/2012 - 17:57 नवीन
..बंदूक घेऊन पळणार्‍या सशाचा पाठलाग करत असताना.. ..माझ्या तेलात चकल्या विरघळतात.. .. मी दारु पिऊन तुम्ही बरळता आहात असं कधीही म्हटलं नव्हतं.. वगैरे..अशांपैकी ना? :) मूळ लेखाशी जरा अवांतर झाले.. पण प्रतिसादांशी नव्हे.. ;)
↩ प्रतिसाद: सूड

यंदाच्या दिवाळीत एखादी

कवितानागेश
गुरुवार, 09/27/2012 - 13:44 नवीन
यंदाच्या दिवाळीत एखादी "भावानुवाद आणि रसग्रहण स्पर्धा" आयोजित करावी का बरं!! :)

पाऊले बुडती, चिखलात फार...

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 09/27/2012 - 15:45 नवीन
बगळ्याची पीसे झडल्याचे सगळ्यांना जाणवले. पण, बगळ्याची पाऊलेही गायब आहेत. हा बगळा चिखलात, पाऊले बाहेर न काढता, नाचत आहे का?

कुणी सांगावे जसा बर्‍याच

गणपा
गुरुवार, 09/27/2012 - 15:50 नवीन
कुणी सांगावे जसा बर्‍याच जणांना जसा तो बगळा बॅलरिना पोझ मधला वाटतोय,चित्रकाराच्या मनातही तेच असेल.
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

हो!.. पण "बॅलरिना"मध्ये पाय

मृगनयनी
गुरुवार, 09/27/2012 - 16:04 नवीन
हो!.. पण "बॅलरिना"मध्ये पाय जमिनीवरच असतात.. आणि दृश्य स्वरुपात असल्यामुळे आपल्याला दिसू शकतात... पण इथे बगळा पायविरहित वाटतो... तसेच त्याचे पंखही झडलेले वाटतात... त्यामुळे तो आजारी किन्वा अपन्ग असल्यासारखे वाटते... पृथ्वीसदृश चन्द्राचा प्रकाश त्याच्यावर पडल्यामुळे कदाचित त्याच्या आजाराचे गाम्भीर्य फारसे कुणाच्या लक्षात आलेले नसावे!!!
↩ प्रतिसाद: गणपा

नाही हो काका, काल होती पावलं

५० फक्त
गुरुवार, 09/27/2012 - 16:44 नवीन
नाही हो काका, काल होती पावलं आज दिसत नाहीयेत. कालच स्क्रिनशॉट घेउन ठेवायला हवा होता. म्हणजे याचा अर्थ तो कावळा हळू हळू दलदलीत फसत चालला आहे, म्हणजे प्रत्येकानं आपल्याकडे उपलब्ध साधनसामुग्रीकडे लक्ष न देता उगाच फार उंचावरच्या ध्येयांकडे लक्ष देउन जगायला सुरुवात केली की आपलेच पाय आपल्या भोवतालच्या दलदलीत रुतत जातात असा संदेश मिळतो आहे.
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

>>म्हणजे याचा अर्थ तो कावळा

विश्वनाथ मेहेंदळे
Fri, 09/28/2012 - 00:16 नवीन
>>म्हणजे याचा अर्थ तो कावळा हळू हळू दलदलीत फसत चालला आहे, कावळा ??? आणि त्याला कोण फसवत आहे ? हल्ली लोक कुणालाही गंडवतात म्हणा ;-) असो, बाकी सगळे सोडा, पण कावळा,????
↩ प्रतिसाद: ५० फक्त

माताय शतक गाठतोय जणू हा

किसन शिंदे
गुरुवार, 09/27/2012 - 16:46 नवीन
माताय शतक गाठतोय जणू हा नृत्यात रममाण असलेला बगळा! ;)

नवनवोन्मेषशालिनी प्रतिभा :काल चित्र वेगळे भासले - आज वेगळे आहे !

तर्री
गुरुवार, 09/27/2012 - 17:09 नवीन
नवनवोन्मेषशालिनी प्रतिभा :काल चित्र वेगळे भासले - आज वेगळे आहे ! बाजूला बगळी नाही तरीही बगळ्याचे पाउल वाकडे पडते आहे. बगळा चंद्राला टोच मारू पाहतो आहे पण अएन्गल बसत नाहीये. बगळ्याची थोडी लांब झाली आहे तसेच मान फुगीर दिसते आहे - ग्वायटर झालं की काय ?

नक्की काय??

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 09/27/2012 - 18:04 नवीन
>>>>बगळ्याची थोडी लांब झाली आहे >>>>. नक्की काय म्हणायचे आहे?

चित्र तसे बरोबर आहे

सहज
गुरुवार, 09/27/2012 - 18:21 नवीन
Image removed. "प्रेमाला साद घालताना" मोराप्रमाणे पिसारा फुलतो व चित्रात दाखवल्याप्रमाणे पंखही असतात. Image removed. फक्त रात्री जमीनीवर, बिनतळपायानी नाचणे, अन्य प्राण्यांचे भक्ष्य व्हावे अशी रिस्क घेणे ही महान कला असावी. शतकी धाग्याकरता शुभेच्छा!

फोटोतला बगळा, चित्रातला बगळा

अभ्या..
गुरुवार, 09/27/2012 - 18:32 नवीन
फोटोतला बगळा, चित्रातला बगळा एकदम भारी पुरावा. त्यात परत तो बगळा प्रेममग्न आहे >>>>>>फक्त रात्री जमीनीवर, बिनतळपायानी नाचणे, अन्य प्राण्यांचे भक्ष्य व्हावे अशी रिस्क घेणे ही महान कला असावी. प्रेम म्हणजे हेच हो.
↩ प्रतिसाद: सहज

'सत्य'शोधक सहजरावांचा विजय

गणपा
गुरुवार, 09/27/2012 - 23:14 नवीन
'सत्य'शोधक सहजरावांचा विजय असो. ;)
↩ प्रतिसाद: सहज

पतझड..

प्रभाकर पेठकर
Fri, 09/28/2012 - 01:39 नवीन
बगळ्यांमध्येही 'पतझड' चा मौसम असतो असे दिसते आहे.
↩ प्रतिसाद: सहज

आय्ला

इरसाल
गुरुवार, 09/27/2012 - 22:05 नवीन
आता ह्या फोटों मुळे ज्यांच्या ज्यांच्या तोंडात मारली गेली त्यांची तोंडं ह्या पिसांप्रमाणे झाली असावीत.

आजचा चंद्र..

प्रभाकर पेठकर
Fri, 09/28/2012 - 01:40 नवीन
आजचा चंद्रही चित्रातल्या चंद्रासारखाच आहे. खात्री करून घ्या.

खात्री करून घेतल्या गेली आहे. :D

किसन शिंदे
Fri, 09/28/2012 - 01:45 नवीन
>>>आजचा चंद्रही चित्रातल्या चंद्रासारखाच आहे. खात्री करून घ्या. आज अंदाज आला होताच कोणीतरी हे टाकणार म्हणून. ;)
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

बगळा योग्य..

गवि
Fri, 09/28/2012 - 13:01 नवीन
चित्रातील चंद्राचं माहीत नाही पण पक्षी तांत्रिकदृष्ट्या योग्य आहे. बगळ्यांच्या ब्रीडिंग प्लुमेजच्या वेळी बगळे असे दिसतात. वर सहज यांनी दिलेल्याप्रमाणे अन्य प्रतिमा "egret breeding plumage" अशी कीवर्ड सर्च गूगलला दिल्यावर मिळतील. Image removed. breeding plumage येण्याच्या काळात वर मान करुन आकाशाकडे बघण्याची स्टाईलही प्रणयनृत्यात दिसते. Image removed. Image removed.

वाह !

तर्री
Fri, 09/28/2012 - 13:11 नवीन
गुगल मिपा नजर ठेवून आहे ही आनंदाची गोष्ट !

कविताताईंवरच्या आणि त्यांच्या

यशोधरा
Fri, 09/28/2012 - 14:27 नवीन
कविताताईंवरच्या आणि त्यांच्या कलाकृतींवर होणार्‍या टीकेने व्यथित होऊन त्यांच्या बाजूने लिहिणार्‍यांना वा त्यांची भलामण करणार्‍यांना माझा एक प्रश्न आहे की मिपावरच्या लोकांना कविताताईंच्या बोचर्‍या, कुत्सित आणि उपरोधी उत्तरांचा प्रसाद मिळत होता, किंवा इतरही काही लेखन आहे, जेथे इतरांवर राळ उडवलेली आहे, तेह्वा सोयीस्कररीत्या ह्या सर्व लेखण्या का म्यान होत्या? किंवा खरेच मला हा प्रश्न पडला आहे. की समोर कोण आहे हे पाहून त्याप्रमाणे सारेच बदलते की काय? आश्चर्य मात्र वाटले नाही. खरे तर हा प्रश्न विचारण्यातही फारसा अर्थ नाही म्हणा.. तरीही. असो.

+१

स्पा
Fri, 09/28/2012 - 14:33 नवीन
बाकी जुने स्कोर सेटल करण्या वरून इथे हताश होणारी मंडळी पाहून तर अजूनच आश्चर्य वाटले हा तर मिपाचा USP आहे .., जुन्या जाणत्या व्याक्तीन्कादुनच ते बाळकडू नवीन मिपाकरांना मिळाले आहे ते काही आत्ताच सुरु झालेलं नाही
↩ प्रतिसाद: यशोधरा

ते स्कोर सेटलींग वगैरे

यशोधरा
Fri, 09/28/2012 - 15:01 नवीन
ते स्कोर सेटलींग वगैरे प्रकारांशी मला मतलब नाही. तसल्या तद्दन फालतूपणाकडे लक्ष द्यायची गरजही नाही पण इतकंच मनापासून जाणून घ्यायचं आहे की हे असे सोयीस्कर प्रतिसाद देऊन तेढ सांधली जाते की अजून वाढते? अशाने नक्की काय साध्य करावयाचे असते? जर योग्य/ अयोग्य सांगावयाचे तर ते नि:पक्षपातीपणे सांगावे, प्रत्येक वेळेसच. प्रत्येक वेळेस हे महत्वाचे. नाहीतर त्या सोयीस्कर संभावितपणाला अर्थ नाही.
↩ प्रतिसाद: स्पा

तुमच्या मुद्द्यात रस वाटला

गवि
Fri, 09/28/2012 - 16:19 नवीन
तुमच्या मुद्द्यात रस वाटला म्हणून लिहीतो: एखाद्याने "आत्ता" या चालू विषयावर /चर्चेत काय म्हटलं आहे ते आत्ताच्याच चालू संदर्भात पाहणं फार उत्तम असतं. पण प्रत्यक्षात मनुष्यस्वभावामुळे तसं होणं अवघड असल्याने यापूर्वी भूतकाळात याच व्यक्तीने काय काय म्हटलं /केलं होतं हे आपण पाहतो. हेही ठीकच.. अशा वेळी आपल्याला असं दिसलं की याच व्यक्तीने यापूर्वी अशाच बाबतीत आत्ताच्या नेमकं उलट मत दिलं होतं तर मग तेव्हा विरोधाभास होतो. व्यक्तीच्या मतातली इंटेग्रिटी जाते. (मतं बदलू शकतात हा विचार इथे बाजूला ठेवला आहे. सदैव न बदलता राहू शकणारी एक हटवादी विचारधारा सर्वांकडे आहे असं धरुन..) पण यापूर्वी हीच व्यक्ती अशाच प्रसंगी "काहीच बोलली नाही" / "काहीच मत दिलं नाही" यावरुन आत्ताच्या त्याच्या मताबद्दल निष्कर्ष काढणं अपुरं होईल. कारण "काहीच मत न देणं" हा एक वेगळाच भाग आहे. पॉझिटिव्ह दिसलं तर कौतुक करावं आणि आवडलं नसेल तर टीकेच्या ऐवजी मौन बाळगावं असा एक रास्त विचार काहीजणांचा असू शकतो. तलवारी, म्यान वगैरे भाषा बर्‍याचदा वापरली जाते, पण सर्वचजण काही लढाऊ सैनिक नसतात. दाद देण्याच्या वेळी दाद द्यावी. आवडलं नाही तर पुढे चालू पडावं, संघर्ष /वाद करत बसण्यात रस नाही असं मानणारेही बरेच असतात. त्यातही काही लोकांना प्रत्येक वेळी आवर्जून मत देणं जमेलच असं नाही. ही काही निवडणूक नव्हे की प्रत्येक मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे. आणखीही बरीच कारणं असतात ज्यामुळे "मत न देण्याला" थेट "मूक संमती"च मानणं गैर ठरावं. ... आत्ता म्हटलंय त्याविषयी फक्त विचार करुन मुद्दा योग्य की अयोग्य ते पाहणं ब्येष्ट..
↩ प्रतिसाद: यशोधरा

धन्यवाद.

यशोधरा
Fri, 09/28/2012 - 17:29 नवीन
गवि, मिपावरच्या सर्वसाधारण जनतेबद्दल हे तुम्ही म्हणालात तर मी बहुतांशी मान्य करेन. मुद्दा असा आहे, की एखाद्याला मसीहावतार धारण करायचा असल्यास, ठराविक लोकांचा मसीहा बनून राहता येत नाही. तसे वागले तर सुरुवातीला ते खपूनही जाते पण एका पॉइंटनंतर तो दुट्टपीपणा प्रत्येकाला समजतो, जरी कोणी फारसे बोलून दाखवत नसले तरीही. दुसरे असे की अशा लोकांसाठी ही एक पळवाट होते. दर वेळी हवं तसं वागून, बोलून, पुन्हा चांगुलपणा घेऊन (!) नामानिराळे राहणे ही एक वहिवाट बनून जाते. ते चूक आहे. काळ सोकावत राहतो, ते व्हायला नको. तात्विक भूमिका ही व्यक्तीसापेक्ष बदलू नये इतकंच.
↩ प्रतिसाद: गवि

अगदी.

साती
Fri, 09/28/2012 - 17:34 नवीन
पूर्वीच्या मिपावर मला फोनवरून लिहिताच यायचं नाहीमग बर्याचदा वाचून परत जायला लागायचं. कधी काँपवर लॉग ऑन झालेच तर वाईट प्रतिसाद देण्यात काय वेळ दवडायचा म्हणून आवडलेल्या एक दोन धाग्याना मस्त, वा वा करून जायचे. हल्ली फारसं यायला ही मिळत नव्हतं. नव्या मिपावर माझ्या फोनवरून लिहिता येतंय. प्रस्तुत चित्रकर्तीबद्दल तर तिने कुणाला काय लिहिलंय हे माहित नाही. ता.क. या त्याच सुप्रसिद्ध लेखिका आहेत हे कळल्यावर काल कौतुकाने राजाला हे चित्र दाखवलं तर तो म्हणाला ' बापरे , ब्र सारखी भयाण कादंबरी लिहिणारी इतकं छान चित्र काढू शकेल यावर विश्वासच बसत नाही.' ;) बाकी ती कादंबरी मला फारच आवडली होती आणि मी ती विकत घेतलीय माझ्या संग्रहात आहे आणि अधून मधून वाचत असते.
↩ प्रतिसाद: गवि

आता

श्रावण मोडक
Fri, 09/28/2012 - 17:39 नवीन
आता माझ्या त्या असहमतीशी सहमती दर्शवणार का? मघाशीच हा प्रश्न विचारणार होतो, पण राहून गेलं. ;-)
↩ प्रतिसाद: साती
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा