Skip to main content

नृत्य

लेखक Kavita Mahajan यांनी मंगळवार, 25/09/2012 12:33 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेमात असलं की आपल्यासोबत आपल्या पावलांखालचा निर्जीव पाचोळादेखील नाचायला लागतो आणि आभाळातला चंद्र जणू फक्त आपल्यासाठीच प्रकाशतो आहे, असं वाटतं. (माझे काळ्या कॅनव्हासवर केलेले तैलरंगातील नृत्यमग्न बगळ्याचे एक चित्र ) .
लेखनविषय:

वाचने 37463
प्रतिक्रिया 103

प्रतिक्रिया

In reply to by प्रभाकर पेठकर

ह्म्म्म पेठकरकाका... पण ""मी तैलरंगात, काळ्या कॅनव्हासवर रेखाटलेले, नृत्यमग्न बगळ्याचे एक चित्र." या वाक्यात "मी तैलरन्गात" डुम्बता डुम्बता बगळासदृश पक्षी काढलेला आहे.... असाही आभास होतो!!! .. जो की कदाचित वास्तवदर्शी लेखिकेसाठी अशक्य असू शकतो!!!! तसेच इतके होऊनही त्या पृथ्वीसदृश चन्द्राचा मात्र कुठेच नामोल्लेख दिसत नाही.. हे पाहून वैषम्य वाटले!!! ...

In reply to by मृगनयनी

>>त्या पृथ्वीसदृश चन्द्राचा मात्र कुठेच नामोल्लेख दिसत नाही.. मला वाटते की अशा कलेचा चंद्र अंतरिक्षात जाऊन सॅटेलाईट मधून पाहिल्यास दिसू शकेल. यावरून चित्रकाराच्या प्रतिभेची उत्तुंग भरारी दृश्यमान होते.

In reply to by प्रभाकर पेठकर

>>मी तैलरंगात, काळ्या कॅनव्हासवर रेखाटलेले, नृत्यमग्न बगळ्याचे एक चित्र. यावरून 'मी तैलरंगात (बसून) , काळ्या कॅनव्हासवर रेखाटलेले...' असाही अर्थ होऊ शकतो. 'मी, काळ्या कॅनव्हासवर तैलरंगाने रेखाटलेले, नृत्यमग्न बगळ्याचे एक चित्र ' हे कसे वाटते ?

In reply to by सूड

..बंदूक घेऊन पळणार्‍या सशाचा पाठलाग करत असताना.. ..माझ्या तेलात चकल्या विरघळतात.. .. मी दारु पिऊन तुम्ही बरळता आहात असं कधीही म्हटलं नव्हतं.. वगैरे..अशांपैकी ना? :) मूळ लेखाशी जरा अवांतर झाले.. पण प्रतिसादांशी नव्हे.. ;)

यंदाच्या दिवाळीत एखादी "भावानुवाद आणि रसग्रहण स्पर्धा" आयोजित करावी का बरं!! :)

बगळ्याची पीसे झडल्याचे सगळ्यांना जाणवले. पण, बगळ्याची पाऊलेही गायब आहेत. हा बगळा चिखलात, पाऊले बाहेर न काढता, नाचत आहे का?

In reply to by प्रभाकर पेठकर

कुणी सांगावे जसा बर्‍याच जणांना जसा तो बगळा बॅलरिना पोझ मधला वाटतोय,चित्रकाराच्या मनातही तेच असेल.

In reply to by गणपा

हो!.. पण "बॅलरिना"मध्ये पाय जमिनीवरच असतात.. आणि दृश्य स्वरुपात असल्यामुळे आपल्याला दिसू शकतात... पण इथे बगळा पायविरहित वाटतो... तसेच त्याचे पंखही झडलेले वाटतात... त्यामुळे तो आजारी किन्वा अपन्ग असल्यासारखे वाटते... पृथ्वीसदृश चन्द्राचा प्रकाश त्याच्यावर पडल्यामुळे कदाचित त्याच्या आजाराचे गाम्भीर्य फारसे कुणाच्या लक्षात आलेले नसावे!!!

In reply to by प्रभाकर पेठकर

नाही हो काका, काल होती पावलं आज दिसत नाहीयेत. कालच स्क्रिनशॉट घेउन ठेवायला हवा होता. म्हणजे याचा अर्थ तो कावळा हळू हळू दलदलीत फसत चालला आहे, म्हणजे प्रत्येकानं आपल्याकडे उपलब्ध साधनसामुग्रीकडे लक्ष न देता उगाच फार उंचावरच्या ध्येयांकडे लक्ष देउन जगायला सुरुवात केली की आपलेच पाय आपल्या भोवतालच्या दलदलीत रुतत जातात असा संदेश मिळतो आहे.

In reply to by ५० फक्त

>>म्हणजे याचा अर्थ तो कावळा हळू हळू दलदलीत फसत चालला आहे, कावळा ??? आणि त्याला कोण फसवत आहे ? हल्ली लोक कुणालाही गंडवतात म्हणा ;-) असो, बाकी सगळे सोडा, पण कावळा,????

नवनवोन्मेषशालिनी प्रतिभा :काल चित्र वेगळे भासले - आज वेगळे आहे ! बाजूला बगळी नाही तरीही बगळ्याचे पाउल वाकडे पडते आहे. बगळा चंद्राला टोच मारू पाहतो आहे पण अएन्गल बसत नाहीये. बगळ्याची थोडी लांब झाली आहे तसेच मान फुगीर दिसते आहे - ग्वायटर झालं की काय ?

>>>>बगळ्याची थोडी लांब झाली आहे >>>>. नक्की काय म्हणायचे आहे?

"प्रेमाला साद घालताना" मोराप्रमाणे पिसारा फुलतो व चित्रात दाखवल्याप्रमाणे पंखही असतात. फक्त रात्री जमीनीवर, बिनतळपायानी नाचणे, अन्य प्राण्यांचे भक्ष्य व्हावे अशी रिस्क घेणे ही महान कला असावी. शतकी धाग्याकरता शुभेच्छा!

In reply to by सहज

फोटोतला बगळा, चित्रातला बगळा एकदम भारी पुरावा. त्यात परत तो बगळा प्रेममग्न आहे >>>>>>फक्त रात्री जमीनीवर, बिनतळपायानी नाचणे, अन्य प्राण्यांचे भक्ष्य व्हावे अशी रिस्क घेणे ही महान कला असावी. प्रेम म्हणजे हेच हो.

आता ह्या फोटों मुळे ज्यांच्या ज्यांच्या तोंडात मारली गेली त्यांची तोंडं ह्या पिसांप्रमाणे झाली असावीत.

आजचा चंद्रही चित्रातल्या चंद्रासारखाच आहे. खात्री करून घ्या.

In reply to by प्रभाकर पेठकर

>>>आजचा चंद्रही चित्रातल्या चंद्रासारखाच आहे. खात्री करून घ्या. आज अंदाज आला होताच कोणीतरी हे टाकणार म्हणून. ;)

चित्रातील चंद्राचं माहीत नाही पण पक्षी तांत्रिकदृष्ट्या योग्य आहे. बगळ्यांच्या ब्रीडिंग प्लुमेजच्या वेळी बगळे असे दिसतात. वर सहज यांनी दिलेल्याप्रमाणे अन्य प्रतिमा "egret breeding plumage" अशी कीवर्ड सर्च गूगलला दिल्यावर मिळतील. egret breeding plumage येण्याच्या काळात वर मान करुन आकाशाकडे बघण्याची स्टाईलही प्रणयनृत्यात दिसते. Pl Second

गुगल मिपा नजर ठेवून आहे ही आनंदाची गोष्ट !

कविताताईंवरच्या आणि त्यांच्या कलाकृतींवर होणार्‍या टीकेने व्यथित होऊन त्यांच्या बाजूने लिहिणार्‍यांना वा त्यांची भलामण करणार्‍यांना माझा एक प्रश्न आहे की मिपावरच्या लोकांना कविताताईंच्या बोचर्‍या, कुत्सित आणि उपरोधी उत्तरांचा प्रसाद मिळत होता, किंवा इतरही काही लेखन आहे, जेथे इतरांवर राळ उडवलेली आहे, तेह्वा सोयीस्कररीत्या ह्या सर्व लेखण्या का म्यान होत्या? किंवा खरेच मला हा प्रश्न पडला आहे. की समोर कोण आहे हे पाहून त्याप्रमाणे सारेच बदलते की काय? आश्चर्य मात्र वाटले नाही. खरे तर हा प्रश्न विचारण्यातही फारसा अर्थ नाही म्हणा.. तरीही. असो.

In reply to by यशोधरा

बाकी जुने स्कोर सेटल करण्या वरून इथे हताश होणारी मंडळी पाहून तर अजूनच आश्चर्य वाटले हा तर मिपाचा USP आहे .., जुन्या जाणत्या व्याक्तीन्कादुनच ते बाळकडू नवीन मिपाकरांना मिळाले आहे ते काही आत्ताच सुरु झालेलं नाही

In reply to by स्पा

ते स्कोर सेटलींग वगैरे प्रकारांशी मला मतलब नाही. तसल्या तद्दन फालतूपणाकडे लक्ष द्यायची गरजही नाही पण इतकंच मनापासून जाणून घ्यायचं आहे की हे असे सोयीस्कर प्रतिसाद देऊन तेढ सांधली जाते की अजून वाढते? अशाने नक्की काय साध्य करावयाचे असते? जर योग्य/ अयोग्य सांगावयाचे तर ते नि:पक्षपातीपणे सांगावे, प्रत्येक वेळेसच. प्रत्येक वेळेस हे महत्वाचे. नाहीतर त्या सोयीस्कर संभावितपणाला अर्थ नाही.

In reply to by यशोधरा

तुमच्या मुद्द्यात रस वाटला म्हणून लिहीतो: एखाद्याने "आत्ता" या चालू विषयावर /चर्चेत काय म्हटलं आहे ते आत्ताच्याच चालू संदर्भात पाहणं फार उत्तम असतं. पण प्रत्यक्षात मनुष्यस्वभावामुळे तसं होणं अवघड असल्याने यापूर्वी भूतकाळात याच व्यक्तीने काय काय म्हटलं /केलं होतं हे आपण पाहतो. हेही ठीकच.. अशा वेळी आपल्याला असं दिसलं की याच व्यक्तीने यापूर्वी अशाच बाबतीत आत्ताच्या नेमकं उलट मत दिलं होतं तर मग तेव्हा विरोधाभास होतो. व्यक्तीच्या मतातली इंटेग्रिटी जाते. (मतं बदलू शकतात हा विचार इथे बाजूला ठेवला आहे. सदैव न बदलता राहू शकणारी एक हटवादी विचारधारा सर्वांकडे आहे असं धरुन..) पण यापूर्वी हीच व्यक्ती अशाच प्रसंगी "काहीच बोलली नाही" / "काहीच मत दिलं नाही" यावरुन आत्ताच्या त्याच्या मताबद्दल निष्कर्ष काढणं अपुरं होईल. कारण "काहीच मत न देणं" हा एक वेगळाच भाग आहे. पॉझिटिव्ह दिसलं तर कौतुक करावं आणि आवडलं नसेल तर टीकेच्या ऐवजी मौन बाळगावं असा एक रास्त विचार काहीजणांचा असू शकतो. तलवारी, म्यान वगैरे भाषा बर्‍याचदा वापरली जाते, पण सर्वचजण काही लढाऊ सैनिक नसतात. दाद देण्याच्या वेळी दाद द्यावी. आवडलं नाही तर पुढे चालू पडावं, संघर्ष /वाद करत बसण्यात रस नाही असं मानणारेही बरेच असतात. त्यातही काही लोकांना प्रत्येक वेळी आवर्जून मत देणं जमेलच असं नाही. ही काही निवडणूक नव्हे की प्रत्येक मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे. आणखीही बरीच कारणं असतात ज्यामुळे "मत न देण्याला" थेट "मूक संमती"च मानणं गैर ठरावं. ... आत्ता म्हटलंय त्याविषयी फक्त विचार करुन मुद्दा योग्य की अयोग्य ते पाहणं ब्येष्ट..

In reply to by गवि

गवि, मिपावरच्या सर्वसाधारण जनतेबद्दल हे तुम्ही म्हणालात तर मी बहुतांशी मान्य करेन. मुद्दा असा आहे, की एखाद्याला मसीहावतार धारण करायचा असल्यास, ठराविक लोकांचा मसीहा बनून राहता येत नाही. तसे वागले तर सुरुवातीला ते खपूनही जाते पण एका पॉइंटनंतर तो दुट्टपीपणा प्रत्येकाला समजतो, जरी कोणी फारसे बोलून दाखवत नसले तरीही. दुसरे असे की अशा लोकांसाठी ही एक पळवाट होते. दर वेळी हवं तसं वागून, बोलून, पुन्हा चांगुलपणा घेऊन (!) नामानिराळे राहणे ही एक वहिवाट बनून जाते. ते चूक आहे. काळ सोकावत राहतो, ते व्हायला नको. तात्विक भूमिका ही व्यक्तीसापेक्ष बदलू नये इतकंच.

In reply to by गवि

पूर्वीच्या मिपावर मला फोनवरून लिहिताच यायचं नाहीमग बर्याचदा वाचून परत जायला लागायचं. कधी काँपवर लॉग ऑन झालेच तर वाईट प्रतिसाद देण्यात काय वेळ दवडायचा म्हणून आवडलेल्या एक दोन धाग्याना मस्त, वा वा करून जायचे. हल्ली फारसं यायला ही मिळत नव्हतं. नव्या मिपावर माझ्या फोनवरून लिहिता येतंय. प्रस्तुत चित्रकर्तीबद्दल तर तिने कुणाला काय लिहिलंय हे माहित नाही. ता.क. या त्याच सुप्रसिद्ध लेखिका आहेत हे कळल्यावर काल कौतुकाने राजाला हे चित्र दाखवलं तर तो म्हणाला ' बापरे , ब्र सारखी भयाण कादंबरी लिहिणारी इतकं छान चित्र काढू शकेल यावर विश्वासच बसत नाही.' ;) बाकी ती कादंबरी मला फारच आवडली होती आणि मी ती विकत घेतलीय माझ्या संग्रहात आहे आणि अधून मधून वाचत असते.

In reply to by साती

आता माझ्या त्या असहमतीशी सहमती दर्शवणार का? मघाशीच हा प्रश्न विचारणार होतो, पण राहून गेलं. ;-)

In reply to by यशोधरा

काय म्हणले आहे त्या पेक्षा कोणि म्हणले आहे हे महत्वाचे कसें ;-) अवांतरः एकानी गाय मारली म्हणुन दुसर्‍याने वासरु मारु नये ;-(

वरील प्रतिसाद पाहून कुणालाही कुठलेही चित्र इथे मिपावर टाकायची हिंम्म्त होइल का? विशेषतः स्वतः चे !! बाकी चित्र १००री गाठण्याच्या दर्जाचे आहे हे दिसलेच.

In reply to by मीनल

असे नाही हा! मला आठवतेय की एकसे एक कलाकार आपली कला दाखवू लागल्याने मिपाकरांनी आग्रह करुन कलादालन नावाचा विभाग उघडायला लावला. त्यामुळे आरोप अमान्य. धाग्यात १०० प्रतिसाद यावे म्हणुन मिपाकरही हिरीरीने साथही देतात :-)