संपादक मंडळ आणि व्यवस्थापकीय संरचना - २

नीलकांत's picture
नीलकांत in घोषणा
20 Sep 2012 - 7:37 am

नमस्कार,

मिसळपाव .कॉम ला पाच वर्षे पुर्ण झाली आहेत. व्यवस्थापनाचा वाढता व्याप बघता मिसळपावच्या संपादक मंडळात पाच नवीन संपादकांची घोषणा करण्यात येत आहे. त्यांची नावे खालील प्रमाणे

१) गवि
२) वल्ली
३) किसन शिंदे
४) लीमाऊजेट
५) aparna akshay

सदर संपादक सहा महिण्यांसाठी किंवा पुढील घोषणेपर्यंत कार्यरत राहील. सदर संपादकांना मिपावर प्रकाशित होणारे सर्व साहित्य व प्रतिक्रिया संपादन करण्याचे अधिकार आहेत. केलेल्या संपादनासाठी त्यांनी कुठेही खुलासा देणे अपेक्षीत नाही. तसेच या यादीमध्ये येत्या काही दिवसांमध्ये काही नावे येऊ शकतात. तशी घोषणा त्यावेळी केली जाईल.

तसेच आज पासून मिसळपावचे दोन संपादक थांबताहेत. त्यांची नावे पुढील प्रमाणे.

१) छोटा डॉन
२) निखील देशपांडे

आता पर्यंत या आणि अन्य अनेक संपादकांनी मिसळपाव येथपर्यंत घेऊन येण्यात आपले सहकार्य दिले त्यासाठी त्यासर्वांचा मी आभारी आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा यापुढेही मिसळपाव आणि मला होत राहील अशी अपेक्षा आहे.
धन्यवाद.

प्रतिक्रिया

स्पा's picture

20 Sep 2012 - 8:03 am | स्पा

ग्रेट न्यूज
सर्व नवीन संपादकांचे अभिनंदन

डॉन आणि निदे ला हा व्याप इतकी वर्षे सांभाळल्याबद्दल धन्यवाद :)

मी-सौरभ's picture

20 Sep 2012 - 4:50 pm | मी-सौरभ

शुभेच्छा अन धन्याचे वाद्स

सहज's picture

20 Sep 2012 - 8:12 am | सहज

नवीन संपादकांचे अभिनंदन !

चोता दोन रावजी आता पुन्हा एकदा बंदूक घेऊन आपल्या लायनीत परत गेले आहेत असे कळते.

छोटा डॉन's picture

21 Sep 2012 - 12:32 am | छोटा डॉन

खरे आहे.
साली दंबूक चालवण्याची मजा औरच आहे, बिलिव्ह मी. ;)

- छोटा डॉन

चिंतामणी's picture

21 Sep 2012 - 12:51 am | चिंतामणी

दुरुस्ती.

चोता दोन रावजी आता पुन्हा एकदा बंदूक "उसात" आहेत.

चिंतामणी's picture

21 Sep 2012 - 12:53 am | चिंतामणी

चोता दोन रावजी आता बंदूक घेउन "उसात" आहेत.

(च्यायला. हे संपादन पुन्हा कधी चालू होणार)

इरसाल's picture

20 Sep 2012 - 9:27 am | इरसाल

कधी काळी पार्टी देतील अशी अपेक्षा.

वर उल्लेखलेल्या दोन माजी संपादकांव्यतिरिक्त बाकीचे मान्यवर संपादक अजुनही सरकारात असतील.कृपया खुलासा करावा.

चिंतामणी's picture

20 Sep 2012 - 10:29 am | चिंतामणी

कार्यरत असणा-या इतर संपादकांची नावे या धाग्यावर प्रकाशीत करावीत अशी विनंती.

अत्रुप्त आत्मा's picture

20 Sep 2012 - 9:32 am | अत्रुप्त आत्मा

१) गवि >>> अशी व्यक्ति संपादक म्हणूनच हवी ;)
२) वल्ली>>> ह्हा ह्हा ह्हा... अगोबा,आपण संपादक झाल्यामुळे,अता आमचा छळ करू शकणार नाही...
३) किसन शिंदे>>> हे संपादक ''झाले'' (?) म्हणजे काय ते कळ्ळं नाही... ;)
४) लीमाऊजेट >>> व्वा,,,व्वा,,,ही निवड अवडली आपल्याला
५) aparna akshay >>> नो कॉमेंन्टस ;)

नाखु's picture

21 Sep 2012 - 9:04 am | नाखु

आप्लि ईडंबन आता सुटणार नाहीत "शेन्सार" मधून..
आनि गाववाले अभिनंदन...

अत्रुप्त आत्मा's picture

21 Sep 2012 - 10:43 am | अत्रुप्त आत्मा

@ईडंबन आता सुटणार नाहीत "शेन्सार" मधून..>>> :-D अस्सं क्काय...? ;-) बघून घेईन ...! ;-)
=====================
दही सामोश्यासाठी :-p >>> गाजर मुळा :-p

अमोल केळकर's picture

20 Sep 2012 - 10:06 am | अमोल केळकर

अभिनंदन :)

अमोल केळकर

दादा कोंडके's picture

20 Sep 2012 - 4:15 pm | दादा कोंडके

असच म्हणतो. डॉन आणि देशपांडे यांचं अभिनंदन!

चिंतामणी's picture

20 Sep 2012 - 10:12 am | चिंतामणी

आणि वाटचालीस शुभेच्छा.

मृत्युन्जय's picture

20 Sep 2012 - 10:12 am | मृत्युन्जय

नवीन संपादकांचे अभिनंदन.

आता चांगले लेखन करणार्‍या नविन लेखकांचा धोध घेणे आले. भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान झाल्यावर एखाद्या फलंदाजाचा धावांचा ओघ आटतो तसा संपादकांचा धाग्यांचा ओघ आटतो. मग त्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा अगदी मोजुन मापुन सांभाळुन असतात. तसे नविन संपादकांचे होउ नये अशी अपेक्षा.

बाकी संपादक वाचकांना उत्तर देण्यासाठी बांधील नाहित हे मी समजू शकतो पण ते किमान एकमेकांना उत्तर देण्यासाठी बांधील असतील अशी अपेक्षा. (हे वाक्य नविन संपादकांना उद्देशून नाही (किंबहुना स्पेसिफिकली कोणालाच उद्देशून नाही) हे कृपया लक्षात घ्यावे) :)

अभिनंदन, चला कार्यभार वाढला म्हणजे लेखनबहार कमी करु नका म्हणजे झालं,

नविन संपादक मंडळाचे अभिनंदन ! :)

माझीही शॅम्पेन's picture

20 Sep 2012 - 11:45 am | माझीही शॅम्पेन

जबरदस्त बातमी :) सर्व नवीन संपादकंच प्रचंड अभिनंदन :)
ह्या निवडणुकीत ठाणे जिल्ह्यानी बाजी मारल्याने आनंद झाला
बर संपादनचे कठिण काम करताना लेखनकडे दुर्लक्ष्य करून नका
कामकाजसाठी खूप खूप शुभेच्छा

प्रभाकर पेठकर's picture

20 Sep 2012 - 12:18 pm | प्रभाकर पेठकर

>>>>ह्या निवडणुकीत ठाणे जिल्ह्यानी बाजी मारल्याने आनंद झाला.

प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा उभा करून निवडणूक प्रक्रियेस बदनाम करू नये, ही विनंती.

माझीही शॅम्पेन's picture

20 Sep 2012 - 9:34 pm | माझीही शॅम्पेन

प्रक्रियेस बदनाम ???

कृपया ह. घ्या हे लिहायला विसरलो काका !!! पण प्रदेशील अस्मिता नाहीए , घरा-जवळचा बोर्डत आला की आपण कौतुकने सांगतो तसच काहीस :)

प्रभाकर पेठकर's picture

21 Sep 2012 - 10:12 am | प्रभाकर पेठकर

माझाही नर्म विनोद निर्मितीचा फुटकळ प्रयत्न आहे.

लिहीले नाही तरी, हलकेच घेतले आहे.

नवीन संपादक मंडळाचे हार्दिक स्वागत व अभिनंदन !
आणि मिपाचे स्वरूप आणखी बहारदार करण्यासाठी शुभेच्छा !

मूकवाचक's picture

20 Sep 2012 - 12:14 pm | मूकवाचक

नविन संपादक मंडळाचे अभिनंदन ! :)

बिपिन कार्यकर्ते's picture

20 Sep 2012 - 12:21 pm | बिपिन कार्यकर्ते

हॅहॅहॅ! नवीन बकर्‍यांचे स्वागत! ;)

"अब आयेगा मझा"! ;)

नव नियुक्त संपादकांचे अभीनंदन .
:)

सुहास..'s picture

20 Sep 2012 - 12:37 pm | सुहास..

नव्यांचे अभिनंदन ! आणि जुन्यांचे .....असो !!

( च्यायला, आता कोणाला नडायच ;) )

नवीन संपादकांचे अभिनंदन!!

नाना चेंगट's picture

20 Sep 2012 - 12:51 pm | नाना चेंगट

वा ! हे आहेत का नवे ? बर बर !
लक्ष असू द्या आमच्याकडे..... ;)

प्रभो's picture

20 Sep 2012 - 12:59 pm | प्रभो

नान्या ऑल द बेस्ट रे.. ;)

गणपा's picture

20 Sep 2012 - 1:31 pm | गणपा

मालक पुर्वी एखाद्या सदस्याच्या नावावर माउस नेला की त्याचा बिल्ला क्रमांक दिसायचा. (त्यावरुन त्याचं संपुर्ण लेखन पहाता यायच.)
हल्ली बिल्ला क्रमांका ऐवजी सदस्य नाम दिसते.

हे इथे याचसाठी सांगतोय की वर तुम्ही जी नव नियुक्त संपादकांची नाव दिली आहेत त्यावर माउस नेला असता बिल्ला क्रमांक दिसतोय.
तेव्हा हीच 'जादु' इतरत्रही करावी ही विनंती. :)

मोहनराव's picture

20 Sep 2012 - 1:33 pm | मोहनराव

वा वा छान बातमी... पोलीस लोक वाढले..

वपाडाव's picture

20 Sep 2012 - 1:37 pm | वपाडाव

भारीच की...

नवीन संपादकांचे अभिनंदन.
गवि, वल्ली त्यांचे लेखन थांबवणार नाहीत, थांबवू नये ही अपेक्षा.

मन१'s picture

20 Sep 2012 - 6:14 pm | मन१

"गवि, वल्ली ह्यांनी लेखन थांबवू नये "
+१
(स्वगतः- पण यकुनं थांबवलं तर किती बरं तिच्यायला.)

धमाल मुलगा's picture

20 Sep 2012 - 5:27 pm | धमाल मुलगा

खांदेपालट महत्वाचाच! नव्या दमाच्या नव्या भिडूंचे अभिनंदन. :-)

@डान्या, निख्या - आता खुर्ची सोडलीत, तेव्हा येत चला आपल्या रिट्झ थेटरापासल्या बैठकीत :-D

परिकथेतील राजकुमार's picture

20 Sep 2012 - 5:53 pm | परिकथेतील राजकुमार

तसेच आज पासून मिसळपावचे दोन संपादक थांबताहेत. त्यांची नावे पुढील प्रमाणे.

१) छोटा डॉन
२) निखील देशपांडे
===========

उत्तम !!

आमचे भिकारचोट मित्र आमच्यात परत आले !!

तुषार काळभोर's picture

20 Sep 2012 - 7:36 pm | तुषार काळभोर

च्यायला..ह्याच प्रांजळपणाकडे पाहून इथं येण्याचं सार्थक होतं आणि ड्वाळे पाणवतात.

सुविधा बंद असल्याने रुमाल देता येत नाही त्याबद्दल खेद वाटतो. ;-)

सुविधा नाही का म्हणे ? हा घे रुमाल.

छोटा डॉन's picture

20 Sep 2012 - 11:51 pm | छोटा डॉन

हा हा हा.
पराशी सहमत आहे, आता बोल ..... असो.

- छोटा डॉन

रेवती's picture

20 Sep 2012 - 6:11 pm | रेवती

सगळ्यांचे अभिनंदन.
अगदी निदे आणि डानरावांचेही.......सुटलात रे बाबांनो! ;)
नीलकांत, त्या दोघांची तुला बरी दया आली रे? ;)

जुन्या बाकी संपादकांची नावे असलेला पोस्ट डिलीटला.

(त्यात आक्षेपार्ह काय होते ते तेच जाणोत.)

नाना चेंगट's picture

20 Sep 2012 - 6:28 pm | नाना चेंगट

हा हा हा

न रहेगा नाम न रहेगी निशानी... हि हा हा हा हा

परिकथेतील राजकुमार's picture

20 Sep 2012 - 6:54 pm | परिकथेतील राजकुमार

जुने जाऊ द्या मरणा लागुनी...

एकदा जुने सदस्य पण असेच डीलिटले की मिपावरती काय बहार येईल. ;)

प्रभाकर पेठकर's picture

20 Sep 2012 - 8:24 pm | प्रभाकर पेठकर

मिसळपावच्या मालकांनी तशी इच्छा व्यक्त करावी. मिसळपाव सन्मानाने सोडून जायला मी एका पायावर तयार आहे.

रेवती's picture

20 Sep 2012 - 9:38 pm | रेवती

अगदी अगदी. मी पण.

नावातकायआहे's picture

22 Sep 2012 - 10:46 pm | नावातकायआहे

तुमच्या पासुनच सुरुवात करा... ;-)

मुक्त विहारि's picture

20 Sep 2012 - 6:47 pm | मुक्त विहारि

नवीन संपादकांचे अभिनंदन!!

सुनील's picture

20 Sep 2012 - 9:42 pm | सुनील

नव्यांचे अभिनंदन आणि जाणार्‍या जुन्यांना धन्यवाद!

आणि सर्वांना गणेशोत्स्वाच्या हार्दीक शुभेच्छा!

सूड's picture

20 Sep 2012 - 9:50 pm | सूड

नवीन संपादकांचे अभिनंदन आणि जुन्यांचे आभार !!