Skip to main content

संपादक मंडळ आणि व्यवस्थापकीय संरचना - २

लेखक नीलकांत यांनी गुरुवार, 20/09/2012 07:37 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मिसळपाव .कॉम ला पाच वर्षे पुर्ण झाली आहेत. व्यवस्थापनाचा वाढता व्याप बघता मिसळपावच्या संपादक मंडळात पाच नवीन संपादकांची घोषणा करण्यात येत आहे. त्यांची नावे खालील प्रमाणे १) गवि २) वल्ली ३) किसन शिंदे ४) लीमाऊजेट ५) aparna akshay सदर संपादक सहा महिण्यांसाठी किंवा पुढील घोषणेपर्यंत कार्यरत राहील. सदर संपादकांना मिपावर प्रकाशित होणारे सर्व साहित्य व प्रतिक्रिया संपादन करण्याचे अधिकार आहेत. केलेल्या संपादनासाठी त्यांनी कुठेही खुलासा देणे अपेक्षीत नाही. तसेच या यादीमध्ये येत्या काही दिवसांमध्ये काही नावे येऊ शकतात. तशी घोषणा त्यावेळी केली जाईल. तसेच आज पासून मिसळपावचे दोन संपादक थांबताहेत. त्यांची नावे पुढील प्रमाणे. १) छोटा डॉन २) निखील देशपांडे आता पर्यंत या आणि अन्य अनेक संपादकांनी मिसळपाव येथपर्यंत घेऊन येण्यात आपले सहकार्य दिले त्यासाठी त्यासर्वांचा मी आभारी आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा यापुढेही मिसळपाव आणि मला होत राहील अशी अपेक्षा आहे. धन्यवाद.

वाचने 37811
प्रतिक्रिया 70

प्रतिक्रिया

ग्रेट न्यूज सर्व नवीन संपादकांचे अभिनंदन डॉन आणि निदे ला हा व्याप इतकी वर्षे सांभाळल्याबद्दल धन्यवाद :)

नवीन संपादकांचे अभिनंदन ! चोता दोन रावजी आता पुन्हा एकदा बंदूक घेऊन आपल्या लायनीत परत गेले आहेत असे कळते.

In reply to by सहज

खरे आहे. साली दंबूक चालवण्याची मजा औरच आहे, बिलिव्ह मी. ;) - छोटा डॉन

In reply to by सहज

दुरुस्ती. चोता दोन रावजी आता पुन्हा एकदा बंदूक "उसात" आहेत.

कधी काळी पार्टी देतील अशी अपेक्षा. वर उल्लेखलेल्या दोन माजी संपादकांव्यतिरिक्त बाकीचे मान्यवर संपादक अजुनही सरकारात असतील.कृपया खुलासा करावा.

१) गवि >>> अशी व्यक्ति संपादक म्हणूनच हवी ;) २) वल्ली>>> ह्हा ह्हा ह्हा... अगोबा,आपण संपादक झाल्यामुळे,अता आमचा छळ करू शकणार नाही... ३) किसन शिंदे>>> हे संपादक ''झाले'' (?) म्हणजे काय ते कळ्ळं नाही... ;) ४) लीमाऊजेट >>> व्वा,,,व्वा,,,ही निवड अवडली आपल्याला ५) aparna akshay >>> नो कॉमेंन्टस ;)

In reply to by नाखु

@ईडंबन आता सुटणार नाहीत "शेन्सार" मधून..>>> :-D अस्सं क्काय...? ;-) बघून घेईन ...! ;-) ===================== दही सामोश्यासाठी :-p >>> गाजर मुळा :-p

अभिनंदन :) अमोल केळकर

In reply to by अमोल केळकर

असच म्हणतो. डॉन आणि देशपांडे यांचं अभिनंदन!

नवीन संपादकांचे अभिनंदन. आता चांगले लेखन करणार्‍या नविन लेखकांचा धोध घेणे आले. भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान झाल्यावर एखाद्या फलंदाजाचा धावांचा ओघ आटतो तसा संपादकांचा धाग्यांचा ओघ आटतो. मग त्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा अगदी मोजुन मापुन सांभाळुन असतात. तसे नविन संपादकांचे होउ नये अशी अपेक्षा. बाकी संपादक वाचकांना उत्तर देण्यासाठी बांधील नाहित हे मी समजू शकतो पण ते किमान एकमेकांना उत्तर देण्यासाठी बांधील असतील अशी अपेक्षा. (हे वाक्य नविन संपादकांना उद्देशून नाही (किंबहुना स्पेसिफिकली कोणालाच उद्देशून नाही) हे कृपया लक्षात घ्यावे) :)

जबरदस्त बातमी :) सर्व नवीन संपादकंच प्रचंड अभिनंदन :) ह्या निवडणुकीत ठाणे जिल्ह्यानी बाजी मारल्याने आनंद झाला बर संपादनचे कठिण काम करताना लेखनकडे दुर्लक्ष्य करून नका कामकाजसाठी खूप खूप शुभेच्छा

In reply to by माझीही शॅम्पेन

>>>>ह्या निवडणुकीत ठाणे जिल्ह्यानी बाजी मारल्याने आनंद झाला. प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा उभा करून निवडणूक प्रक्रियेस बदनाम करू नये, ही विनंती.

In reply to by प्रभाकर पेठकर

प्रक्रियेस बदनाम ??? कृपया ह. घ्या हे लिहायला विसरलो काका !!! पण प्रदेशील अस्मिता नाहीए , घरा-जवळचा बोर्डत आला की आपण कौतुकने सांगतो तसच काहीस :)

In reply to by माझीही शॅम्पेन

माझाही नर्म विनोद निर्मितीचा फुटकळ प्रयत्न आहे. लिहीले नाही तरी, हलकेच घेतले आहे.

नविन संपादक मंडळाचे अभिनंदन ! :)

नव्यांचे अभिनंदन ! आणि जुन्यांचे .....असो !! ( च्यायला, आता कोणाला नडायच ;) )

मालक पुर्वी एखाद्या सदस्याच्या नावावर माउस नेला की त्याचा बिल्ला क्रमांक दिसायचा. (त्यावरुन त्याचं संपुर्ण लेखन पहाता यायच.) हल्ली बिल्ला क्रमांका ऐवजी सदस्य नाम दिसते. हे इथे याचसाठी सांगतोय की वर तुम्ही जी नव नियुक्त संपादकांची नाव दिली आहेत त्यावर माउस नेला असता बिल्ला क्रमांक दिसतोय. तेव्हा हीच 'जादु' इतरत्रही करावी ही विनंती. :)

खांदेपालट महत्वाचाच! नव्या दमाच्या नव्या भिडूंचे अभिनंदन. :-) @डान्या, निख्या - आता खुर्ची सोडलीत, तेव्हा येत चला आपल्या रिट्झ थेटरापासल्या बैठकीत :-D

तसेच आज पासून मिसळपावचे दोन संपादक थांबताहेत. त्यांची नावे पुढील प्रमाणे. १) छोटा डॉन २) निखील देशपांडे =========== उत्तम !! आमचे भिकारचोट मित्र आमच्यात परत आले !!

In reply to by परिकथेतील राजकुमार

च्यायला..ह्याच प्रांजळपणाकडे पाहून इथं येण्याचं सार्थक होतं आणि ड्वाळे पाणवतात.

In reply to by परिकथेतील राजकुमार

हा हा हा. पराशी सहमत आहे, आता बोल ..... असो. - छोटा डॉन

सगळ्यांचे अभिनंदन. अगदी निदे आणि डानरावांचेही.......सुटलात रे बाबांनो! ;) नीलकांत, त्या दोघांची तुला बरी दया आली रे? ;)

In reply to by नाना चेंगट

जुने जाऊ द्या मरणा लागुनी... एकदा जुने सदस्य पण असेच डीलिटले की मिपावरती काय बहार येईल. ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

मिसळपावच्या मालकांनी तशी इच्छा व्यक्त करावी. मिसळपाव सन्मानाने सोडून जायला मी एका पायावर तयार आहे.

नव्यांचे अभिनंदन आणि जाणार्‍या जुन्यांना धन्यवाद! आणि सर्वांना गणेशोत्स्वाच्या हार्दीक शुभेच्छा!

नवीन संपादकांचे अभिनंदन आणि जुन्यांचे आभार !!

काटेरी मुकुट धारण करणार्‍यांचे सांत्वन! अन् चोता दोन आणि निदेचे सुरक्षित सुटका झाल्याबद्दल अभिनंदन! ;) (ह घ्यालच)

संपादक मंडळातल्या नव्या शिलेदारांचे अभिनंदन. संपादक मंडळ हे नेहमी रोटेशन पॉलिसीने चालवले जावे आणि काही काळानंतर त्यात बदल करत रहावे असे आमचे पहिल्यापासुन मत आहे, त्यामुळे संपादक मंडळ आणि सदस्य ह्यांच्यात सौर्ह्याद्य वाढण्यास आणि टिकण्यास मदत होते व बर्‍याचदा त्यामुळे संपादनाची गरजच नाहीशी होते. नवनियुक्ती झालेले सर्व सन्माननीय सदस्य अनुभवी आहेतच पण त्यापेक्षा त्यांचा आत्तापर्यंतचा मिपावरचा वावर एक समतोल आणि समजुतदार सदस्य म्हणुन होता ही ओळख जास्त सुखावणारी आहे. सर्व नवनियुक्त संपादकांचे आमच्याकडुन मनापासुन अभिनंदन आणि नव्या कादकिर्दीसाठी ढिगभर शुभेच्छा. संपादनाच्या कार्यातुन आम्हाला मुक्त केल्याबद्दल मिपा व्यवस्थापनाचेही आभार. आता ह्या मोकळ्या वेळातुन आम्ही काही चिल्लर लेख, काही टाईमपास आणि खेळाविषयीचे सदर इत्यादी उपक्रम चालवावे असे म्हणतो आहोत, ही संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल संबंधितांचे पुन्हा एकदा आभार. जाता जाता आपल्या योगदानातुन मिपा सदाबहार आणि लाईव्हली ठेवणार्‍या सर्व ज्ञात-अज्ञात सदस्यांचेही आभार. - ( आभारप्रदर्शक) छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

>>आता ह्या मोकळ्या वेळातुन आम्ही काही चिल्लर लेख, काही टाईमपास आणि खेळाविषयीचे सदर इत्यादी उपक्रम चालवावे असे म्हणतो आहोत, ही संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल संबंधितांचे पुन्हा एकदा आभार. उपक्रम! पद गेलं की माणसाचं मूळ रूप बाहेर येतं म्हणतात ते असं... ;-) चालवा, चालवा...

नविन संपादकांचे अभिनंदन आणि (नव्या व जुन्या / कार्यरत असणार्‍या सर्व) संपादकमंडळींना धन्स...

नव्या संपादक पंचकडीचे अभिनंदन! आता वरच्या वर्गात गेला आहात तर आमच्याबरोबरच्या सौहार्दात बाधा येऊ देऊ नका म्हणजे झालं. बाकी, तुम्ही आधी शिकवलेला मंत्र विसरलेलो नाहीये - संपादक कधीच चुकत नाही (म्हणे) ;-) चोता दोन आणि निखील दोघांनाही आमच्या अखिल मिपा धुडगुस आखाड्याचं हार्दिक निमंत्रण! आमच्यात दाखल होऊन बाकीच्यांना तीर्थ-प्रसादाचा लाभ द्यावा ही विनंती. :-)

अभिनंदन !! खफवरचे स्वताहाचे प्रतिसाद स्वताहा उडवु शकतो अशी व्यवस्था करता येईल का? करा तेवढं ,मझा लै प्रोब्लेम हूतोय :(

लेख तथा प्रतिक्रिया उडवणे हे अपवादानेच असु ध्यावे . आचार्य अत्र्यांनी - ना.सी. फडके यांचे वर केलेली टीका लक्षात घेवून "बेंचमार्क " ठरवल्यास काहीही संपादित होणार नाही. मी.पा. हे एक " माच्योर " संस्थळ आहे . तसेच राहू ध्यावे. शुद्धलेखन जरूर पहावे पण तेवढ्यासाठी धागाकार्त्याची चंपी करू नये. हया काही सूचना !! नव्या चमूचे हार्दिक अभिनंदन ! "थांबल्याचे विशेष आभार !!!

५ वर्षे पुर्ण केल्याबद्दल मिसळपावचे आणि नविन सरपंच दोघांचेही :)

गविसाहेब, वल्लीदादा, किसनसाहेब,लिमाउजेटताई, अपर्णाअक्शयताई या सर्वाचे मनापासुन अभ्बिनन्दन. तसेच या सर्वान्ना पुडील वाटचालीसाठी शुभेच्चा. तसेच दॉन्साहेब आणि देश्पान्दे साहेबानाही पुन्हा सम्दापक होण्यासाथी शुभेच्चा.

सर्वांचे अभिनंदन .... संपादक मंडळातिल मान्यवरानी सभासदाना पार्टी द्यावि अशी एक सुचना .... [मेनु..श्री गणपा यांचे धागे या वेळी कामास येतिल.]

In reply to by निवेदिता-ताई

नीलकांता अरे... मिपाला वाळवी लागली आहे ! मागचे धागे कोरे झाले आहेत. सगळी मिपाकर मंडळी त्यांचा बहुमुल्य वेळ या संकेतस्थळा देउन प्रतिसादांची पेरणी करत आहेत... पण वाळवीची भिती वाढत आहे. आज जे लिहलं ते उद्या दिसेल की नाही याची शाश्वती वाटेनासी झाली आहे तेव्हा सर्व संपादकांनी / मालकांनी जरा लक्ष देउन या वाळवी वरती पेस्ट कंट्रोलचा जालिम उपाय करावा ही नम्र विनंती. ( मला याची जाणिव आहे की तुम्हा सर्वांचा वेळ देखील तितकाच बहुमुल्य आहे.) सर्व नविन संपादकांना हार्दिक शुभेच्छा.