सलाम कवितेला आणि स्वातंत्र्य मिळवून ते टिकवून ठेवणार्यांना...
हजारे आमटे मेधा आणि कलाम... या सगळ्या अनागोंदी आणि चिड आणणार्या परिस्थितीत असे लोक आपलं काम नेटाने करत आहेत. हा विचार न करता की यातून काही घडेल किंवा नाही... सर्व भ्रष्टाचार गुंडगिरी फुटीर वृत्ती ला नजरेआड करून आपलं काम करत राहतात.. या कवितेत सगळ्या निराश करणार्या गोष्टींबरोबर हे उत्तमही तुम्ही दाखवलं आहे... धन्यवाद...
जय हिंद...
कवितेत आशय एवढा ठासून भरलेला आहे, की ओळीओळीतून अक्षरश: ठिणग्या पडतायत.
तुमच्यासारखीच आशा मीही करतो - ही कविता लवकरात लवकर शिळी होवो.
(एक शंका होती - नरोटी म्हणजे काय? झोळी का?)
-अजिंक्य
www.ajinkyagole1986.blogspot.com.
नरोटी म्हणजे नारळाची करवंटी... खोबरे काढून घेतल्यावर राहते ते नारळाचे कवच... स्वातंत्र्याचे खोबरे नेते मंडळींनी खाल्ल्यावर सामान्यांच्या हातात जे उरते ते..
हो तुम्हा कवी लोकांना ? आपल्याला तर बुवा नाही जमत.
असो... जब्राट कविता !! धगधगती मशाल आहे.
सत्तेला झोंबते। आधाशांची टोळी
महात्म्याच्या डोळी। पाणी दाटे
हे खासच.
(मिपा वरील कविता वाचून अचंबीत होणारा )....बबलु-अमेरिकन
जबरा कविता आहे, नुसत्या ठिणग्या पडत आहेत शब्दामधुन.
आम्ही आता असा मनाला त्रास करुन घ्यायचे सोडुन दिले आहे. काही फायदा होत नाही.
सखाराम गटणे
हल्ली मी गंभीर झालोय, वात्रट लिखाण पण गंभीरपणे करतो.
मनापासुन केलेले लिखाण!!
स्वगत : अमंळ लिखाणे बहुत जाहली, क्रीयेची आस उरी दाटली
आम्ही आता असा मनाला त्रास करुन घ्यायचे सोडुन दिले आहे. काही फायदा होत नाही.
ही मानसिकता बदलणे ही काळाची नितांत गरज.
शिवाजी स्वतःच्या घरी जन्माला घालणे गरजेचे
एकदम जळ्जळीत कविता....
अगदी मनापासुन लिहीलेली...
आणी मनापासुन आवडली....
हजारे, आमटे। मेधा नि कलाम
घ्यावा जी सलाम। सज्जनांचा
आमचाही सलाम घ्यावा....
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
फारच सुंदर...
पुढार्यांच्या खाती। लाख आणि कोटी
रिकामी नरोटी। पामराची
अगदी खरं आहे..
भारतातील राजकारणी पैसे खाऊन खाऊन माजलेत साले ..
आणि सामान्य जनतेच्या हाती मात्र करवंटीच येते !!
"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
अप्रतिम
ह्म्म!!
बापरे..
वास्तववादी रचना
कविता छान, पण चित्र विदारक!
नरोटी म्हणजे...
फारच भेदक ओव्या!
कस सुचतं
लै भारी
जबरा कविता
सुंदर आणि समर्पक अभंग
एकदम
फारच