जिनिंग मध्ये कापसाच्या बोंडातील सरकी तंतुंपासून विलग केली जाते. साधारणपणे १०० किलो कपाशी मध्ये ६६ किलो सरकी व ३३ किलो रुई मिळते. १ टक्का घट असते. सरकीचा वापर तेल व पशुखाद्य निर्मितीसाठी होतो.
.
भारतात नाईफ रोलर जीन जास्त प्रचलित आहे. यामध्ये कापसाच्या तंतूंची खराबी ( fibre rupture) कमी होते.
कापसाला घनता कमी असल्याने त्याचे आकारमान जास्त असते. सबब त्याच्या सुलभ वाहतुकी साठी रुईला दाब देवून त्याची गाठ बनविली जाते
(pressing). अशा रितिने बनविलेली एक गाठ/ गासडी/(bale) अंदाजे १६०-१७० किलो भरते.
भारतात अजुनही कापुस बाजारात कापुस खंडीच्या (candy) भावाने विकला जातो.( एक खंडी म्हणजे ३५६ किलो.)
सद्ध्या मध्यम प्रतिचा कापुस ३६ ते ४० हजार रुपये प्रती खंडी आहे.
कपाशीच्या उत्पादनात भारत, पाकिस्तान, तुर्कस्तान, ईजिप्त, सुदान, ऑस्ट्रेलिया, कझाकिस्तान, ब्राझिल, चीन हे देश अग्रेसर आहेत.
भारतातून दरवर्षी ८० लाखावर गासड्यांची निर्यात केली जाते, तसेच सुत, कापड, व तयार कपड्यांचीही निर्यात होते.
वस्त्रोद्योग हा देशातील शेती खालोखाल सर्वात मोठा रोजगार देणारा उद्योग आहे.
यानंतर कापुस कताई मिल मध्ये आणला जातो. सुत गिरण्यांचा कच्चा माल म्हणजे रुई गाठी.
रुई गाठी खरेदी करण्या आधीच कापसाचे प्रयोगशाळेत परीक्षण होते. आज काल अत्याधुनिक हाय व्हॉल्युम इन्स्ट्रुमेंट (HVI) द्वारे कापसाच्या
लांबी, परिपक्वता, तलमता, रंगाची प्रत, बल,Rd ,+b यांचे परीक्षण केवळ १/२ तासात होऊ शकते.
नंतर उत्पादनाच्या गरजेनुसार रुई गाठी खरेदी केल्या जातात.
आता आपण प्रत्यक्ष सुत निर्मितिकडे वळू.
क्रमशः

वाचने
3028
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान माहिती
लेखनातील अडथळे
मला फोटू दिसत नाहियेत
तुमची खरडवही चालू नाहीये.
In reply to मला फोटू दिसत नाहियेत by रेवती
अॅसबेस्टॉसप्रमाणे
अॅसबेस्टॉसप्रमाणे
शक्य झाल्या तेवढ्या फोटोंच्या
मार्गदर्शन
In reply to शक्य झाल्या तेवढ्या फोटोंच्या by गणपा