मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कताई शास्त्र ४

बापू मामा · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
जिनिंग मध्ये कापसाच्या बोंडातील सरकी तंतुंपासून विलग केली जाते. साधारणपणे १०० किलो कपाशी मध्ये ६६ किलो सरकी व ३३ किलो रुई मिळते. १ टक्का घट असते. सरकीचा वापर तेल व पशुखाद्य निर्मितीसाठी होतो. . भारतात नाईफ रोलर जीन जास्त प्रचलित आहे. यामध्ये कापसाच्या तंतूंची खराबी ( fibre rupture) कमी होते. कापसाला घनता कमी असल्याने त्याचे आकारमान जास्त असते. सबब त्याच्या सुलभ वाहतुकी साठी रुईला दाब देवून त्याची गाठ बनविली जाते (pressing). अशा रितिने बनविलेली एक गाठ/ गासडी/(bale) अंदाजे १६०-१७० किलो भरते. भारतात अजुनही कापुस बाजारात कापुस खंडीच्या (candy) भावाने विकला जातो.( एक खंडी म्हणजे ३५६ किलो.) सद्ध्या मध्यम प्रतिचा कापुस ३६ ते ४० हजार रुपये प्रती खंडी आहे. कपाशीच्या उत्पादनात भारत, पाकिस्तान, तुर्कस्तान, ईजिप्त, सुदान, ऑस्ट्रेलिया, कझाकिस्तान, ब्राझिल, चीन हे देश अग्रेसर आहेत. भारतातून दरवर्षी ८० लाखावर गासड्यांची निर्यात केली जाते, तसेच सुत, कापड, व तयार कपड्यांचीही निर्यात होते. वस्त्रोद्योग हा देशातील शेती खालोखाल सर्वात मोठा रोजगार देणारा उद्योग आहे. यानंतर कापुस कताई मिल मध्ये आणला जातो. सुत गिरण्यांचा कच्चा माल म्हणजे रुई गाठी. रुई गाठी खरेदी करण्या आधीच कापसाचे प्रयोगशाळेत परीक्षण होते. आज काल अत्याधुनिक हाय व्हॉल्युम इन्स्ट्रुमेंट (HVI) द्वारे कापसाच्या लांबी, परिपक्वता, तलमता, रंगाची प्रत, बल,Rd ,+b यांचे परीक्षण केवळ १/२ तासात होऊ शकते. नंतर उत्पादनाच्या गरजेनुसार रुई गाठी खरेदी केल्या जातात. आता आपण प्रत्यक्ष सुत निर्मितिकडे वळू. क्रमशः

वाचने 3027 वाचनखूण प्रतिक्रिया 8

बापू मामा 14/09/2012 - 21:13
कताई शास्त्राचे ३ भाग मनोगत.कॉम वर मी प्रकाशित केले होते,त्यामुळे सलग पणे येथे देता आले. परंतू आता मी एकाच् बैठकीत एखादा दीर्घ भाग लिहू शकत नाही. मिसळपाव वर जेवढे लिहिले तेवढेच प्रकाशित करावे लागते कि दोन तीन बैठकीत लिहिलेले एकदाच प्रकाशित करण्यासाठी सेव्ह करण्याची मनोगत प्रमाणे सोय आहे या बाबत मार्गदर्शन हवे आहे. मी अनेक चित्रांच्या link locations copy/paste केल्या, परंतु केवळ एक फोटो सादर करु शकलो. मदत पानावरिल सर्व प्रात्यक्षिके फोटो देण्यासाठी केली. या बाबत ही मार्गदर्शन हवे आहे. तसेच एखादा लेख प्रकाशित केल्यावर लेखकाला सुधारित करायची ईच्छा झाल्यास काय करावे लागते?

रेवती 14/09/2012 - 22:01
मला फोटू दिसत नाहियेत मामा! माहिती मात्र भलतीच मस्त आहे. कापूस व रुईमधला फरकही जाणून घ्यायचा आहे. तो सांगाल का? तुम्हाला लेखात सुधारणा हवी असल्यास पैसाताई, गणपा, प्रा. डॉ. दिलीप बिरूटे, डॉन, मी यांच्यापैकी कोणालाही खरडीतून किंवा व्य. नि. तून कळवा. गणपा हा फोटू सुधारून देण्यात पटाईत असावा. ;)

बहुगुणी 15/09/2012 - 02:21
'अ‍ॅसबेस्टॉसप्रमाणे कापसाच्या तंतूंमुळे कापूस शेतकर्‍यांना किंवा या उद्योगातल्या कामगारांना श्वसनाचे काही विकार, किंवा malignant mesothelioma प्रमाणे काही कर्करोग होत असतील का' असा विचार डोक्यात आल्याने थोडा शोध घेतल्यावर आंतर्जालावर हा एक चक्क ग्रंथच सापडला! त्यातील माहितीनुसार कापसात धातूंचे प्रमाण अगदी नगण्य असल्याने हा धोका जवळजवळ नाही हे कळून हायसे वाटले! बापूमामा: सांगायचा मुद्दा हा, की तुम्ही ही लेखमाला सुरू केली नसती तर हा प्रश्नही डोक्यात आला नसता आणि त्याचं उत्तर शोधायचाही प्रयत्न केला नसता, तेंव्हा नवीन दृष्टी दिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद! याच पुस्तकात एक तक्ता मिळाला, तुम्ही दिलेल्या माहितीशी सुसंगत आहे म्हणून इथे देतो आहे:

बापू मामा 15/09/2012 - 12:49
आपण दाखविलेली चौकसता केवळ भूतदयेपोटी आहे,त्या मुळे वाखाणण्याजोगी आहे. मी स्वतः गिरणीत शॉप फ्लोअर वर गेली ३० वर्षे काम करतो आहे. परन्तू मला कोणताही श्वसनाचा विकार नाही. फक्त काहीवेळा फिल्टर रुम मधील धुळीमुळे अ‍ॅलर्जिक सर्दी होते ईतकेच. मी दारु पीत नाही. दारु पिल्याने श्वसनाचे रोग होत नाहीत असा गिरणी कामगारांमध्ये गैरसमज आहे त्यामुळे गिरणी कामगारांत दारु पिण्याचे प्रमाण अधिक आहे. रेवतीजी, कापुस हे सर्वसाधारण नाम असून कपाशी हे सरकी युक्त कापसाचे विषेश नाम व रुई हे सरकी काढलेल्या कापसाच्या तंतुंचे विषेश नाम आहे.

In reply to by गणपा

प्रभाकर पेठकर 16/09/2012 - 03:07
नुसत्या लिंका सुधारून चढविण्या ऐवजी, काय चुक झाली होती हे श्री. बापू मामांना समजावुन सांगितले तर पुढच्या वेळी ते चुका टाळू शकतील. अर्थात, आपण ते केले असेलच असा माझा अंदाज आहे. पण चुकुन राहिले असेल तर आता ते त्यांना समजावुन द्यावे, हि विनंती.