Skip to main content

दर्पणाने सांगावे

लेखक सांजसंध्या यांनी गुरुवार, 06/09/2012 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
दर्पणाने सांगावे, काय बदल झाले गं रोजची मी आहे जरी, दुनिया का बदलते गं......... । धृ । रोजचाच रस्ता हा, बगीचा गं भासतो ताटवे हे फुलांचे गं, सांग कसा आखतो उंबराच्या शाखेवर, मोगरा हा डूलतो मोकळ्या या केसांशी, वारा बघ खेळतो एकटीने हरवावे, हाय असे वाटे गं रोजची मी आहे जरी.....................................| १ | उन्हामधे सावल्यांचा, खेळ जसा चालतो मनामधे आठवांचा, मेळ कसा दाटतो आरशांत पाहतांना, कोण हा खुणावतो स्वत:लाच बघतांना, जीव का खुळावतो सखयांना सांगावे, गूढ हे मनीचे गं रोजची मी आहे जरी.....................................| २ | गूलाबाच्या रंगात जाईजूई रंगते केवड्याच्या गंधात, रातराणि गंधते चांदणीच्या पावलांनी, रात्र का गं हासते पहाटल्या स्वप्नांनी, जागेपणी लाजते छेडतात सख्या मला, बदनाम झाले गं रोजची मी आहे जरी, दुनिया का बदलते गं.............| ३ | संध्या
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3071
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

सतत होणारा बदल हाच शाश्वत असतो बाकी सगळे खोटे. हम्म... हे ही दिवस जातील आणि मग हातात उरतील दळणाचे डबे आणि भाजीच्या पिशव्या. आणि कडेवर केकाटणारी कार्टी.... बाकी सारे मिथ्या....

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

. हे ही दिवस जातील आणि मग हातात उरतील दळणाचे डबे आणि भाजीच्या पिशव्या. आणि कडेवर केकाटणारी कार्टी.... बाकी सारे मिथ्या....
सहमत हो पैजार बुवा. :D

व्वा...! एक अल्लड आणी मनोहर स्वप्नरंजन ... उन्हामधे सावल्यांचा, खेळ जसा चालतो मनामधे आठवांचा, मेळ कसा दाटतो आरशांत पाहतांना, कोण हा खुणावतो स्वत:लाच बघतांना, जीव का खुळावतो मस्त जमलय. :) या स्वप्नरंजनावरून एक जुनी चारोळी अठवली... मेहेंदी भरले हात तुझे अन् काय तुला मी सांगावे..? ऐलतिराने पैलतिराला मधले अंतर मागावे.

In reply to by अत्रुप्त आत्मा

मेहेंदी भरले हात तुझे अन् काय तुला मी सांगावे..? ऐलतिराने पैलतिराला मधले अंतर मागावे.
खल्लास मारीच डाला!!!

आवडली कविता. फटु तेव्ह्ढा गंडलाय बघा.

गेय कविता!

कविता (की गीत? जे काही आहे ते) आवडले. एक जाणवत असणारी गोष्ट म्हणजे ह्यात उत्तम गेयता आहे. संगीतात गती असणारा कुणी ह्याला खास भारतीय चालीवरचे संगीत नक्कीच देउ शकतो.