दर्पणाने सांगावे, काय बदल झाले गं
रोजची मी आहे जरी, दुनिया का बदलते गं......... । धृ ।
रोजचाच रस्ता हा, बगीचा गं भासतो
ताटवे हे फुलांचे गं, सांग कसा आखतो
उंबराच्या शाखेवर, मोगरा हा डूलतो
मोकळ्या या केसांशी, वारा बघ खेळतो
एकटीने हरवावे, हाय असे वाटे गं
रोजची मी आहे जरी.....................................| १ |
उन्हामधे सावल्यांचा, खेळ जसा चालतो
मनामधे आठवांचा, मेळ कसा दाटतो
आरशांत पाहतांना, कोण हा खुणावतो
स्वत:लाच बघतांना, जीव का खुळावतो
सखयांना सांगावे, गूढ हे मनीचे गं
रोजची मी आहे जरी.....................................| २ |
गूलाबाच्या रंगात जाईजूई रंगते
केवड्याच्या गंधात, रातराणि गंधते
चांदणीच्या पावलांनी, रात्र का गं हासते
पहाटल्या स्वप्नांनी, जागेपणी लाजते
छेडतात सख्या मला, बदनाम झाले गं
रोजची मी आहे जरी, दुनिया का बदलते गं.............| ३ |
संध्याकाव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3071
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
सतत होणारा बदल हाच शाश्वत
कविता छानच झालै.!
In reply to सतत होणारा बदल हाच शाश्वत by ज्ञानोबाचे पैजार
व्वा...! एक अल्लड आणी मनोहर
मेहेंदी भरले हात तुझे अन्
In reply to व्वा...! एक अल्लड आणी मनोहर by अत्रुप्त आत्मा
यहीच बोलताय... यकदम झक्कास..
In reply to मेहेंदी भरले हात तुझे अन् by शुचि
कविता आवडली.
कविता आवडली !
छान कविता. आवडली.
अप्रतिम
छान!
आवडली कविता.
मस्त!
सर्वांचे मनापासून आभार.
इथली कविता कुठे गेली ?