✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

यांच्या चष्म्यातून - भाग ४ (अ) - काँग्रेसची फाळणी - हिंदूंवर उपकार

र
राजघराणं यांनी
Wed, 09/05/2012 - 18:28  ·  लेख
लेख
त्यांच्या चष्म्यातून - भाग १. - कुरुंदकरांचा अकबर - http://www.misalpav.com/node/21602 त्यांच्या चष्म्यातून - भाग २. - मोरेंचा जिहाद - http://www.misalpav.com/node/21729 त्यांच्या चष्म्यातून - भाग ३ - जनतेचा प्यारा अश्फाक - http://www.misalpav.com/node/21758 ******************************************************************************************************* पूर्वपिठीका - अश्फाक उल्ला खान : मात्रुभूमीच्या चरणांवर रक्त सांडून हसत फाशी जाणारा पहिला मुसलमान त्याला हुसेन नावच्या ब्रिटिशांच्या नोकर पोलिसाने एक मिलियन डॉलर क्वेश्चन विचारला होता. एक डाव रडीचा. धर्माच्या सौदेबाजीचा. हुसेन म्हणाला - " अश्फाक नीट विचार कर. तू एक मुसलमान आहेस. या देशात ७ करोड मुसलमान रहातात आणी २२ करोड हिंदू. गांधी लोकशाहीच्या बाता मारतो. या कफिर हिंदूंच्या नादी लागून तू ब्रिटिशांविरूद्ध लढतोयस. ...इंडीयातून ब्रिटीश निघून गेले तर ? २२ कोटी हिंदू लोकशाही मार्गानी हिंदू इंडीया बनवतील...." अश्फाकने हुसेनच्या धार्मिक आवाहनाला भीक घातली नाही. पण ब्रिटिश इंडियातल्या मुस्लिमांपुढे तो मिलियन डॉलर क्वेश्चन आ वासून उभा होता. इंडीयातून ब्रिटीश निघून गेले तर ? २२ कोटी हिंदू लोकशाही मार्गानी हिंदू इंडीया बनवतील...." ******************************************************************************************************* यांच्या चष्म्यातून - भाग ४ - काँग्रेसची फाळणी - हिंदूंवर उपकार (संदर्भ : काँग्रेस आणी गांधीजींनी अखंड भारत का नाकारला ? प्रा शेषराव मोरे , राजहंस प्रकाशन.) ******************************************************************************************************* १५ ऑगस्ट १९४७ ला झालेल्या फाळणीला जवाबदार कोण ? हा प्रश्न गेली गेली ६५ वर्षे हिंदुस्थानी विचारवंतांना छळतो आहे. हिंदुत्ववादी अखंड हिंदुस्थानचा जप करत यासाठी गांधींच्या अहिंसक स्वभावाला जवाबदार ठरवतात. तर सेक्यूलर विचारवंत फाळणीसाठी संघाचा आक्रमक हिंदुत्ववाद आणी सावरकरांनी द्वीराष्ट्रवादाला दिलेली मान्यता या गोष्टी दोषपूर्ण मानतात. प्रा शेषराव मोरेंनी त्यांच्या वास्तववादी चष्म्यातून तब्बल ३२० ग्रंथांचे पुरावे देत - फाळणीचे श्रेय कुणाला द्यायचे ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. सर सय्यदांनी प्रथम १८८७ साली द्विराष्ट्रवादाची तुतारी फुंकली होती त्यावेळी गांधिजी शाळकरी वयाचे होते आणी चार वर्षाचे सावरकर नुकतेच बोलायला शिकले होते. द्विराष्ट्रवादाच्या मागणीसाठी या दोन्ही लहानग्यांना जवाबदार ठरवणे हे बालिशपणाचेच ठरेल. त्याआधी फाळणी आणी द्विराष्ट्रवाद या एकमेकांच्या संपूर्ण विरोधी मागण्या आहेत हे वास्तव समजवून घेतले पाहिजे. फाळणी हे हिंदूच्या इतिहासातले एक सोनेरी पान होते आणी द्विराष्ट्रवाद हे हिंदूच्या गुलामिचे बायबल होते हेही समजून घ्यावे लागेल. ज्यांना वाढ्त्या मुस्लिम लोकसंखेची चिंता आहे. बांग्लादेशींच्या घुसखोरी मुळे जे अस्वस्थ आहेत असे हिंदुत्ववादी..... अखंड भारतवादीही असतात... हा एक विनोदच आहे. अखंड भारतात बांग्लादेश तर येतोच पण पाकिस्तान सकट ची सर्व मुस्लिम लोकसंख्या ही येते. अखंड भारतातली मुस्लिम लोकसंख्या ४०% च्या आसपास जाते. आज १२% मुस्लिमांसमोर हतबल झालेले राजकीय हिंदू नेत्रुत्व अखंड भारतात शिल्लक तरी राहिल का? सावरकर स्वतः पोथीवादी न्हवते. त्यांच्या अखंड भारताच्या पोथीला देव्हार्‍यात ठेवून पूजा करणारे कधी हिंदूच्या वास्तव परिस्थितीकडे डोळे उघडून बघतील काय ? फाळणीमुळे अखंड भारताच्या धोक्यापासून हिंदूंचे रक्षण झाले. हे वास्तव समजून घेतले पाहिजे. द्विराष्ट्रवादाची मागणी फाळणीसाठी न्हवतीच ती अखंड भारतासाठी होती. सर सय्यदांची द्विराष्ट्रवादी भुमिका एकदा समजली की फाळणीची अपरिहार्यता चटकन लक्षात यील. मुस्लिम अल्पसंख्य आहेत. पण ती एक राज्यकर्ती जमात आहे. भारत स्वतंत्र झाला की लोकशाही आलीच. संख्येच्या बळावर हिंदू ही राज्यकर्ती जमात बनेल. डोक्याचे वजन न मोजता डोक्यांची फक्त संख्या मोजणारी भुक्कड लोकशाही सय्यद अहमदांना मान्य न्हवती. हिंदू आणी मुसलमान हे भारत नावाच्या वधूचे दोन सुंदर डोळे आहेत म्हणून राजकीय सत्तेचे वाटप दोन्ही डोळ्यांना समान झाले पाहिजे. आणी म्हणूनच सर्व सत्ताकेंद्रात (लोकसभा ते ग्रामपंचायत) ५० % राखीव जागा मुस्लिमांसाठी असल्या पाहिजेत असे सय्यदांचे म्हणणे होते. ३०% मुस्लिमांसाठी ५०% जागा आणी हिंदूच्या भावनेसाठी अखंड भारत. असा द्विराष्ट्रवादाच्या मागणीचा आशय आहे. मोहनदास गांधी नावाच्या बनेल म्हातार्‍याने. द्विराष्ट्रवाद कधीच मान्य केला नाही. फाळणी मात्र देउन टाकली ! सर्वनाशे समुत्पन्ने अर्धं त्यजति पंडित:! (अर्थः सगळ्याचा नाश होण्याची वेळ आली तर शहाणा माणूस अर्ध्याचा त्याग करतो आणी उरलेल्या अर्ध्या चा स्वीकार करतो ! ) हिंदू लोक शेतकरी. जमिनीला माता मानणारे. भूगोलावर त्यांचे लैच प्रेम. त्यांचा मनात अखंड भारतमाता घर करून बसली आहे. पण अखंड भारत म्हण़जे केवळ भुगोलांची बेरीज न्हवे. त्यात लोकसंख्येची बेरीज आहे. इतिहासाची वजाबाकी आहे आणी धर्माचा भागाकार आहे. गंम्मत म्हणजे अखंड भारतवादी असलेले सावरकर बोलण्याच्या ओघात; हिंदू महासभेच्या अध्यक्षपदावरून म्हणाले होते - हिंदू आणी मुसलमान ही दोन वेगळी राष्ट्रे आहेत. परस्पर बंधुभाव आणी परराष्ट्राविषयी राग हे जर राष्ट्राचे प्रमुख गुणधर्म मानले तर राष्ट्र कोण आहेत ? हिंदू की मुसलमान ? खरे पाहता हिंदू समाजात आणी धर्मात तुलनेने राष्ट्रवादी गोष्टी कमी आहेत. हिंदूधर्माची मूलभूत शिकवण - परधर्म सहिष्णुता विरुद्ध इस्लामी जिहाद आणी उम्मत( कुराणसिद्ध मुस्लिम बंधुभाव) विरुद्ध हिंदू ची जातिव्यवस्था. ही लढाईच विषम आहे. हिंदुंकडची एकमेव जमेची बाजू म्हणजे त्यांची लोकसंख्या. अखंड भारतात त्या एकमेव जमेच्या बाजूचे महत्व झपाट्याने कमी होणार होते. फाळणी केवळ भूभागांची झाली नाही. फाळणी मुस्लिम लोकसंख्येची झाली. अन भारतातल्या मुस्लिमांचे सांख्यीकी महत्व झटकन उतरले. पुढे सावरकरांनी एक व्यक्ती एक मत अशा खर्‍या लोकशाहीचा वारंवार पुरस्कार केला. मुस्लिमांची ५० % ची मागणी धुडकावून लावली. पण लोकसंख्येच्या प्रमाणात मुस्लिमांना राखिव मतदारसंघ देण्याची सावरकरांची तयारी होती. जर भारत अखंड राहिला असता तर...... आज मुस्लिमांना त्यांच्या आजच्या लोकसंख्येच्या प्रमाणात किती टक्के राखिव मतदारसंघ (सावरकरांच्याच मते) द्यावे लागणार असते ? जवळ जवळ ४० %. इतर अल्पसंख्य आणी हिंदूतले फुटीर गट यांच्या सहाय्याने भारतात लोकशाही मार्गाने इस्लामी राजवट आली असती. आज जर पुन्हा अखंड भारत बनवला तर ते जगातले सर्वात मोठे मुस्लिम राष्ट्र बनेल. गांधींनी हे ओळखले होते. मुस्लिमांचे पायचाटे म्हणून गांधींना अहोरात्र शिव्या देणारे हिंदुत्ववादी लोकमान्य टिळकांना मात्र पूजतात. पण टिळकांचा लखनौ करार मात्र विसरतात. काय होता लखनौ करार ? काँग्रेसच्या मुस्लिम लांगूलचालनाचा पाया टिळकांनी घातला आहे. तो म्हणजे लखनौ करार (वास्तविक परिस्थिती अशी होती की तत्कालीन हिंदू समाजात लोकमान्य किंवा महात्मा व्हायचे असेल तर वाढीव परधर्म सहिष्णूपणा दाखवणे आवश्यकच होते. अन फाळणीही तत्कालीन राजकीय परिस्थित अपरिहार्य होती कशी ? सावरकरांनी लटका विरोध केला. डॉ. अंबेडकरांनी फाळणीचे उघड समर्थन केले. गांधींनी ती देउन टाकली. का ? ते पुढील भागात) १) अलिगडचा लखनौ करार आणी देवबंदची सश्स्त्र क्रांती. क्रमशः आगामी : यांच्या चष्म्यातून - भाग ४ (ब) - काँग्रेसची फाळणी - हिंदूंवर उपकार

Book traversal links for यांच्या चष्म्यातून - भाग ४ (अ) - काँग्रेसची फाळणी - हिंदूंवर उपकार

  • ‹ त्यांच्या चश्म्यातून - भाग ३ - जनतेचा प्यारा अश्फाक
  • Up
  • त्यांच्या चष्म्यातून भाग ५ : हमीदचे मुसलमान . ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
इतिहास
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
38215 वाचन

💬 प्रतिसाद (110)

प्रतिक्रिया

कदाचीत

विकास
गुरुवार, 09/06/2012 - 23:07 नवीन
काश्मीर, पुर्वोत्तर राज्ये धगधगते ठेऊन पाकिस्तानने यात अगोदरच आघाडी घेतली आहे. कोण जाणे?... कदाचीत त्यात देखील काहीतरी आत्ताच्या सरकारची नवीन फाळणी करून हिंदूंवर नवीन उपकार करायची स्ट्रॅटेजी असेल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

+१

विकास
गुरुवार, 09/06/2012 - 23:02 नवीन
प्रतिसाद आवडला. खरी लढाई लाहोरची नव्हती, ढाक्याची नव्हती. खरी लढाई दिल्लीसाठी आहे आणि ती होणारच आहे. त्यासाठीच ह्या शांततेच्या काळात कधी ह्याच्या अंगणात तर कधी त्याच्या अंगणात असे करत स्वत:चे सामर्थ्य वाढवणे हाच पर्याय भारतापुढे शिल्लक आहे. राजकारणात माज दाखवण्यापेक्षा शांतपणे स्वत:ची शक्ती वाढवत राहणे महत्वाचे असते. शक्तिशाली राष्ट्रांना वेगळा माज दाखवावा लागत नाही. ह्या सारांशाशी सहमत! याउलट लीग ज्या प्रांतांत बलवान आहे ते प्रांत वगळून उर्वरित ठिकाणी एका केंद्रीय सत्तेखाली भारत एक राष्ट्र म्हणून निर्माण करावे ही साधारणत: १९३० आणि १९४० च्या दशकात काँग्रेसच्या राजकारणाची मुख्य दिशा होती. सहमतच. पुढे असे वाटते, की या सत्ताकेंद्रीकरणाचा अतिरेक तेंव्हापासून कायमच चालत आला. त्याचाच परीणाम म्हणून आधी भाषावार प्रांतरचनेस विरोध केला गेला आणि आजतागायत दिल्लीश्वरांच्या परवानगीशिवाय शिंकता पण येणार नाही असली राज्यांसाठीची राज्यपद्धती तयार केली... असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवतार

खरी लढाई लाहोरची नव्हती,

llपुण्याचे पेशवेll
Fri, 09/07/2012 - 12:25 नवीन
खरी लढाई लाहोरची नव्हती, ढाक्याची नव्हती. खरी लढाई दिल्लीसाठी आहे आणि ती होणारच आहे. त्यासाठीच ह्या शांततेच्या काळात कधी ह्याच्या अंगणात तर कधी त्याच्या अंगणात असे करत स्वत:चे सामर्थ्य वाढवणे हाच पर्याय भारतापुढे शिल्लक आहे. राजकारणात माज दाखवण्यापेक्षा शांतपणे स्वत:ची शक्ती वाढवत राहणे महत्वाचे असते. शक्तिशाली राष्ट्रांना वेगळा माज दाखवावा लागत नाही. सहमत. आणि त्यात भारतीय मुसलमान, बांग्लादेशी, पाकीस्तानी असा फरक नाही. यात मला लोकसत्ता दिवाळी अंकातल्या (मुख्यमंत्री विशेष) बॅ अंतुले यांवर केलेले एक वक्तव्य आठवले. त्याचा आशय थोडासा असा होता की प्रत्येक मुस्लिम नेत्याला असे वाटते की "भारत, पाकीस्तान, बांग्लादेश असे एक संयुक्त मुस्लिम राष्ट्र असावे आणि मी त्याचा एकमेव नेता म्हणून असावं" नेमके वाक्य आता आठवत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

धन्यवाद

अवतार
Fri, 09/07/2012 - 20:20 नवीन
प्रतिक्रियांबद्दल सर्वांचे आभार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

एक शंका

सुनील
Fri, 09/07/2012 - 02:12 नवीन
फाळणीच्या पर्यायाचा विचार करताना, सामुहीक स्थलांतराच्या शक्यतेचा विचार झाला होता काय?
  • Log in or register to post comments

जर

विकास
Fri, 09/07/2012 - 05:26 नवीन
जर सामुहीक स्थलांतर म्हणजे आपल्याला धर्माधारीत पूर्ण स्थलांतर असा अर्थ असेल (पाकीस्तानातील सर्व हिंदू हिंदूस्थानात आणि भारतातील सर्व मुस्लीम पाकीस्तानात) तर ते केवळ आंबेडकरांनी म्हणले होते असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

आंबेड्कर का ग्रेट होते हे

शैलेन्द्र
Sat, 09/08/2012 - 09:21 नवीन
आंबेड्कर का ग्रेट होते हे समजण्यासाठी इतकंही पुरेसं आहे. काही गोष्टी या जगाची तमा न बाळगता वेळच्या वेळी करायच्या असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

यादवी युद्ध करुन फाळणी टळली असती?

दीपक साळुंके
Fri, 09/07/2012 - 12:10 नवीन
काही दिवसांपूर्वी मटा मध्ये शेषराव मोरेंच्या ह्या पुस्तकाच्या समारोपातील काही अंश प्रकाशित करण्यात आला होता. तो इथे वाचता येईल.
  • Log in or register to post comments

चर्चा आणि लेख दोन्ही

गणपा
Fri, 09/07/2012 - 16:36 नवीन
चर्चा आणि लेख दोन्ही इंटरेस्टिंग आहे.
  • Log in or register to post comments

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Sat, 09/08/2012 - 23:36 नवीन
Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा