✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

यांच्या चष्म्यातून - भाग ४ (अ) - काँग्रेसची फाळणी - हिंदूंवर उपकार

र
राजघराणं यांनी
Wed, 09/05/2012 - 18:28  ·  लेख
लेख
त्यांच्या चष्म्यातून - भाग १. - कुरुंदकरांचा अकबर - http://www.misalpav.com/node/21602 त्यांच्या चष्म्यातून - भाग २. - मोरेंचा जिहाद - http://www.misalpav.com/node/21729 त्यांच्या चष्म्यातून - भाग ३ - जनतेचा प्यारा अश्फाक - http://www.misalpav.com/node/21758 ******************************************************************************************************* पूर्वपिठीका - अश्फाक उल्ला खान : मात्रुभूमीच्या चरणांवर रक्त सांडून हसत फाशी जाणारा पहिला मुसलमान त्याला हुसेन नावच्या ब्रिटिशांच्या नोकर पोलिसाने एक मिलियन डॉलर क्वेश्चन विचारला होता. एक डाव रडीचा. धर्माच्या सौदेबाजीचा. हुसेन म्हणाला - " अश्फाक नीट विचार कर. तू एक मुसलमान आहेस. या देशात ७ करोड मुसलमान रहातात आणी २२ करोड हिंदू. गांधी लोकशाहीच्या बाता मारतो. या कफिर हिंदूंच्या नादी लागून तू ब्रिटिशांविरूद्ध लढतोयस. ...इंडीयातून ब्रिटीश निघून गेले तर ? २२ कोटी हिंदू लोकशाही मार्गानी हिंदू इंडीया बनवतील...." अश्फाकने हुसेनच्या धार्मिक आवाहनाला भीक घातली नाही. पण ब्रिटिश इंडियातल्या मुस्लिमांपुढे तो मिलियन डॉलर क्वेश्चन आ वासून उभा होता. इंडीयातून ब्रिटीश निघून गेले तर ? २२ कोटी हिंदू लोकशाही मार्गानी हिंदू इंडीया बनवतील...." ******************************************************************************************************* यांच्या चष्म्यातून - भाग ४ - काँग्रेसची फाळणी - हिंदूंवर उपकार (संदर्भ : काँग्रेस आणी गांधीजींनी अखंड भारत का नाकारला ? प्रा शेषराव मोरे , राजहंस प्रकाशन.) ******************************************************************************************************* १५ ऑगस्ट १९४७ ला झालेल्या फाळणीला जवाबदार कोण ? हा प्रश्न गेली गेली ६५ वर्षे हिंदुस्थानी विचारवंतांना छळतो आहे. हिंदुत्ववादी अखंड हिंदुस्थानचा जप करत यासाठी गांधींच्या अहिंसक स्वभावाला जवाबदार ठरवतात. तर सेक्यूलर विचारवंत फाळणीसाठी संघाचा आक्रमक हिंदुत्ववाद आणी सावरकरांनी द्वीराष्ट्रवादाला दिलेली मान्यता या गोष्टी दोषपूर्ण मानतात. प्रा शेषराव मोरेंनी त्यांच्या वास्तववादी चष्म्यातून तब्बल ३२० ग्रंथांचे पुरावे देत - फाळणीचे श्रेय कुणाला द्यायचे ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. सर सय्यदांनी प्रथम १८८७ साली द्विराष्ट्रवादाची तुतारी फुंकली होती त्यावेळी गांधिजी शाळकरी वयाचे होते आणी चार वर्षाचे सावरकर नुकतेच बोलायला शिकले होते. द्विराष्ट्रवादाच्या मागणीसाठी या दोन्ही लहानग्यांना जवाबदार ठरवणे हे बालिशपणाचेच ठरेल. त्याआधी फाळणी आणी द्विराष्ट्रवाद या एकमेकांच्या संपूर्ण विरोधी मागण्या आहेत हे वास्तव समजवून घेतले पाहिजे. फाळणी हे हिंदूच्या इतिहासातले एक सोनेरी पान होते आणी द्विराष्ट्रवाद हे हिंदूच्या गुलामिचे बायबल होते हेही समजून घ्यावे लागेल. ज्यांना वाढ्त्या मुस्लिम लोकसंखेची चिंता आहे. बांग्लादेशींच्या घुसखोरी मुळे जे अस्वस्थ आहेत असे हिंदुत्ववादी..... अखंड भारतवादीही असतात... हा एक विनोदच आहे. अखंड भारतात बांग्लादेश तर येतोच पण पाकिस्तान सकट ची सर्व मुस्लिम लोकसंख्या ही येते. अखंड भारतातली मुस्लिम लोकसंख्या ४०% च्या आसपास जाते. आज १२% मुस्लिमांसमोर हतबल झालेले राजकीय हिंदू नेत्रुत्व अखंड भारतात शिल्लक तरी राहिल का? सावरकर स्वतः पोथीवादी न्हवते. त्यांच्या अखंड भारताच्या पोथीला देव्हार्‍यात ठेवून पूजा करणारे कधी हिंदूच्या वास्तव परिस्थितीकडे डोळे उघडून बघतील काय ? फाळणीमुळे अखंड भारताच्या धोक्यापासून हिंदूंचे रक्षण झाले. हे वास्तव समजून घेतले पाहिजे. द्विराष्ट्रवादाची मागणी फाळणीसाठी न्हवतीच ती अखंड भारतासाठी होती. सर सय्यदांची द्विराष्ट्रवादी भुमिका एकदा समजली की फाळणीची अपरिहार्यता चटकन लक्षात यील. मुस्लिम अल्पसंख्य आहेत. पण ती एक राज्यकर्ती जमात आहे. भारत स्वतंत्र झाला की लोकशाही आलीच. संख्येच्या बळावर हिंदू ही राज्यकर्ती जमात बनेल. डोक्याचे वजन न मोजता डोक्यांची फक्त संख्या मोजणारी भुक्कड लोकशाही सय्यद अहमदांना मान्य न्हवती. हिंदू आणी मुसलमान हे भारत नावाच्या वधूचे दोन सुंदर डोळे आहेत म्हणून राजकीय सत्तेचे वाटप दोन्ही डोळ्यांना समान झाले पाहिजे. आणी म्हणूनच सर्व सत्ताकेंद्रात (लोकसभा ते ग्रामपंचायत) ५० % राखीव जागा मुस्लिमांसाठी असल्या पाहिजेत असे सय्यदांचे म्हणणे होते. ३०% मुस्लिमांसाठी ५०% जागा आणी हिंदूच्या भावनेसाठी अखंड भारत. असा द्विराष्ट्रवादाच्या मागणीचा आशय आहे. मोहनदास गांधी नावाच्या बनेल म्हातार्‍याने. द्विराष्ट्रवाद कधीच मान्य केला नाही. फाळणी मात्र देउन टाकली ! सर्वनाशे समुत्पन्ने अर्धं त्यजति पंडित:! (अर्थः सगळ्याचा नाश होण्याची वेळ आली तर शहाणा माणूस अर्ध्याचा त्याग करतो आणी उरलेल्या अर्ध्या चा स्वीकार करतो ! ) हिंदू लोक शेतकरी. जमिनीला माता मानणारे. भूगोलावर त्यांचे लैच प्रेम. त्यांचा मनात अखंड भारतमाता घर करून बसली आहे. पण अखंड भारत म्हण़जे केवळ भुगोलांची बेरीज न्हवे. त्यात लोकसंख्येची बेरीज आहे. इतिहासाची वजाबाकी आहे आणी धर्माचा भागाकार आहे. गंम्मत म्हणजे अखंड भारतवादी असलेले सावरकर बोलण्याच्या ओघात; हिंदू महासभेच्या अध्यक्षपदावरून म्हणाले होते - हिंदू आणी मुसलमान ही दोन वेगळी राष्ट्रे आहेत. परस्पर बंधुभाव आणी परराष्ट्राविषयी राग हे जर राष्ट्राचे प्रमुख गुणधर्म मानले तर राष्ट्र कोण आहेत ? हिंदू की मुसलमान ? खरे पाहता हिंदू समाजात आणी धर्मात तुलनेने राष्ट्रवादी गोष्टी कमी आहेत. हिंदूधर्माची मूलभूत शिकवण - परधर्म सहिष्णुता विरुद्ध इस्लामी जिहाद आणी उम्मत( कुराणसिद्ध मुस्लिम बंधुभाव) विरुद्ध हिंदू ची जातिव्यवस्था. ही लढाईच विषम आहे. हिंदुंकडची एकमेव जमेची बाजू म्हणजे त्यांची लोकसंख्या. अखंड भारतात त्या एकमेव जमेच्या बाजूचे महत्व झपाट्याने कमी होणार होते. फाळणी केवळ भूभागांची झाली नाही. फाळणी मुस्लिम लोकसंख्येची झाली. अन भारतातल्या मुस्लिमांचे सांख्यीकी महत्व झटकन उतरले. पुढे सावरकरांनी एक व्यक्ती एक मत अशा खर्‍या लोकशाहीचा वारंवार पुरस्कार केला. मुस्लिमांची ५० % ची मागणी धुडकावून लावली. पण लोकसंख्येच्या प्रमाणात मुस्लिमांना राखिव मतदारसंघ देण्याची सावरकरांची तयारी होती. जर भारत अखंड राहिला असता तर...... आज मुस्लिमांना त्यांच्या आजच्या लोकसंख्येच्या प्रमाणात किती टक्के राखिव मतदारसंघ (सावरकरांच्याच मते) द्यावे लागणार असते ? जवळ जवळ ४० %. इतर अल्पसंख्य आणी हिंदूतले फुटीर गट यांच्या सहाय्याने भारतात लोकशाही मार्गाने इस्लामी राजवट आली असती. आज जर पुन्हा अखंड भारत बनवला तर ते जगातले सर्वात मोठे मुस्लिम राष्ट्र बनेल. गांधींनी हे ओळखले होते. मुस्लिमांचे पायचाटे म्हणून गांधींना अहोरात्र शिव्या देणारे हिंदुत्ववादी लोकमान्य टिळकांना मात्र पूजतात. पण टिळकांचा लखनौ करार मात्र विसरतात. काय होता लखनौ करार ? काँग्रेसच्या मुस्लिम लांगूलचालनाचा पाया टिळकांनी घातला आहे. तो म्हणजे लखनौ करार (वास्तविक परिस्थिती अशी होती की तत्कालीन हिंदू समाजात लोकमान्य किंवा महात्मा व्हायचे असेल तर वाढीव परधर्म सहिष्णूपणा दाखवणे आवश्यकच होते. अन फाळणीही तत्कालीन राजकीय परिस्थित अपरिहार्य होती कशी ? सावरकरांनी लटका विरोध केला. डॉ. अंबेडकरांनी फाळणीचे उघड समर्थन केले. गांधींनी ती देउन टाकली. का ? ते पुढील भागात) १) अलिगडचा लखनौ करार आणी देवबंदची सश्स्त्र क्रांती. क्रमशः आगामी : यांच्या चष्म्यातून - भाग ४ (ब) - काँग्रेसची फाळणी - हिंदूंवर उपकार

Book traversal links for यांच्या चष्म्यातून - भाग ४ (अ) - काँग्रेसची फाळणी - हिंदूंवर उपकार

  • ‹ त्यांच्या चश्म्यातून - भाग ३ - जनतेचा प्यारा अश्फाक
  • Up
  • त्यांच्या चष्म्यातून भाग ५ : हमीदचे मुसलमान . ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
इतिहास
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
38215 वाचन

💬 प्रतिसाद (110)

प्रतिक्रिया

. जर तर च्या गोष्टीतून

अप्पा जोगळेकर
Sat, 09/08/2012 - 13:28 नवीन
. जर तर च्या गोष्टीतून "फाळणीचे " समर्थन करणारे उद्या काश्मीर ही घ्या पण आम्हाला सुखात राहू द्या म्हणतील. मुळात भिकारडे काश्मीर भारतात हवेच कशाला ? गँगरिन झालेला पाय कापून टाकतातच ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्री

. जर तर च्या गोष्टीतून

अप्पा जोगळेकर
Sat, 09/08/2012 - 13:28 नवीन
. जर तर च्या गोष्टीतून "फाळणीचे " समर्थन करणारे उद्या काश्मीर ही घ्या पण आम्हाला सुखात राहू द्या म्हणतील. मुळात भिकारडे काश्मीर भारतात हवेच कशाला ? गँगरिन झालेला पाय कापून टाकतातच ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्री

आज कश्मीर

मन१
Sat, 09/08/2012 - 13:36 नवीन
आज काश्मीर, उद्या खाली सरकत जम्मू. मग केंद्रव्यवस्था दुबळी झाल्यानं स्वतंत्र खलिस्तान. पूर्वेकडून असेच अनेक "गँगरिन " बनत आहेतच. सगळेच कापा. मग बस पुणे नावाच्या देशात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

आक्षेपार्ह प्रतिसाद !

तर्री
Mon, 09/10/2012 - 14:17 नवीन
संपादक मंडल : हा प्रतिसाद माझ्या मते अती आक्षेपार्ह आहे. त्वरित सदस्यास सूचना ध्यावी वा प्रतिसाद काढावा. -हा प्रतिसाद वाचताना अतीव दुःख झाले आहे ! ज्यांनी काश्मीर च्या सीमेवर शून्य अम्शाखाली , कमी ऑक्सिजन मध्ये ,अती प्रतिकूल परिस्थितीत प्राण दिले , त्यांना काय वाटेल ? *गँगरिन झाले का ? का गँगरिन झाले ? ह्याचा विचार नाही . परत होवू नये म्हणून खबरदारी नाही. सरळ कापून टाका ! धन्य ते विचार !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

आक्षेपार्ह वाटला नाही...

मन१
Mon, 09/10/2012 - 18:13 नवीन
मला आक्षेपार्ह वाटला नाही; आणि पटलाही नाही.(म्हणूनच त्याला तिथेच उपप्रतिसाद दिलाय.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्री

उपरोध

विकास
Mon, 09/10/2012 - 18:40 नवीन
मला वाटते आक्षेपार्ह प्रतिसाद आणि उपरोधीक प्रतिसादात फरक असतो. :-) असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्री

मनोबा तुमचा नाही नाही आ.जोंचा !

तर्री
Mon, 09/10/2012 - 21:07 नवीन
प्रतिसाद आक्षेपार्ह !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्री

समजून घ्या हो . (सिरीअस्लीच आहे ते )

तर्री
गुरुवार, 09/06/2012 - 16:05 नवीन
समजून घ्या हो . (सिरीअस्लीच आहे ते )
  • Log in or register to post comments

वाचनीय लेखमाला..

चिगो
गुरुवार, 09/06/2012 - 16:47 नवीन
वाचतोय.. येऊ द्यात..
  • Log in or register to post comments

वाचनीय लेखमाला..

चिगो
गुरुवार, 09/06/2012 - 16:47 नवीन
वाचतोय.. येऊ द्यात..
  • Log in or register to post comments

गांधीजींनी हिंदुस्थानात हिंदू

जयंत कुलकर्णी
गुरुवार, 09/06/2012 - 17:35 नवीन
गांधीजींनी हिंदुस्थानात हिंदू हे बहुसंख्य रहावेत यासाठी फाळणीला मान्यता दिली असे आपल्याला सुचित करायचे आहे काय ? तसे असल्यास, बरेच प्रश्न उपस्थित करता येण्यासारखे आहेत......
  • Log in or register to post comments

तर्क फारसा पटला नाही

ऋषिकेश
गुरुवार, 09/06/2012 - 17:59 नवीन
लेख अपेक्षेपेक्षा वेगळ्या मार्गाने गेला.. तर्क फारसा पटला नाही गांधीजींना फाळणीसाठी जबाबदार धरले जावे (चांगले अथवा वाईट अर्थाने) हेच मुळात दुर्दैवी आहे. त्यामुळे बाकी तर्क गैरलागू वाटतो. बाकी वेगळी बाजु मांडणे हेच मुळात चांगले काम आहे.. ते तुम्ही करताय त्याबद्द्ल कौतूक
  • Log in or register to post comments

फाळणीचा जनमानसावर आघात इतका

हारुन शेख
गुरुवार, 09/06/2012 - 18:51 नवीन
फाळणीचा जनमानसावर आघात इतका जबरदस्त होता की तेंव्हा आणि आजही गांधीना जबाबदार ठरवल्याशिवाय त्या आघातातून बाहेर येणं बर्याच जनांना शक्य होत नाही. जितकं पातक महान तितकं पातक करणारही महान असावा असं काहीसं प्रमेय असावं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

खरं तर गान्धींना फाळणीसाठी

आनन्दा
गुरुवार, 09/06/2012 - 19:24 नवीन
खरं तर गान्धींना फाळणीसाठी जबाबदार ठरवणे योग्य की अयोग्य हे मला माहीत नाही, पण गांधीना दोन गोष्टींचा दोष नक्कीच जातो.. १. ५५ कोटी :) (एव्हढेच बास ) २. निर्वासितांचा प्रश्न नीट न हातळल्याबद्दल. फाळणीची जबाबदारी कोणाचीही असली तरी स्वतंत्र भारताचे सर्वमान्य नेते म्हणून याची जबाबदारी गांधींवरच येते. तोपर्यन्त घटना समिती आणि निवडणूका व्हायच्या होत्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हारुन शेख

एक आक्षेप नेहमीचा मात्र दुसरा.. :(

ऋषिकेश
गुरुवार, 09/06/2012 - 19:51 नवीन
मिसळपाववर ५५ कोटींची चर्चा अत्यंत मुद्देसुदपणे झाली आहे म्हणून खंडन करण्यासाठी द्वीरूक्ती करत नाही.. ती चर्चा इथे वाचता येईल
निर्वासितांचा प्रश्न नीट न हातळल्याबद्दल.
हा आक्षेप गांधींवर का ते कळले नाहीच अणि असा आक्षेप (ज्यांनी दंगलग्रस्त भागंत जाऊन दंगली थांबण्यासाठी सर्वाधिक व कदाचित एकट्याने प्रयत्न केले) त्यांच्यावर घेतल्याबद्दद्ल अतिशय खेद वाटला इतकेच म्हणतो.
फाळणीची जबाबदारी कोणाचीही असली तरी स्वतंत्र भारताचे सर्वमान्य नेते म्हणून याची जबाबदारी गांधींवरच येते.
किमान जबाबदारी ढकलण्याच्या निमित्ताने का होईना गांधींना सर्वमान्य असल्याचे सांगितल्याबद्दल आभार! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

चर्चा !!

अर्धवटराव
गुरुवार, 09/06/2012 - 20:05 नवीन
५५ कोटींवरची एक चर्चा आवडली. धन्यवाद. अशीच एक चर्चा इतरत्र झाली होती (बहुतेक सावरकरांच्या कुठल्यातरी धाग्यावर ). नितीन जी आणि पवार साहेबांनी फार मुद्देसुद प्रतिसाद मांडले होते. त्याचा निश्कर्ष बहुतेक "गांधींनी ५५ कोटी करताच उपोषण केले" असा निघाला होता. असो. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

निष्कर्ष?

सुनील
Fri, 09/07/2012 - 02:08 नवीन
त्याचा निश्कर्ष ....... आंजावरील चर्चा कधीही निष्कर्ष काढून संपत नसतात! त्या कायमच ओपन एन्डेड असतात (म्हणूनच धागे अधून-मधून वर येत असतात). चर्चा ह्या आपापली मते ठसविण्यासाठीच असतात, असा आम्हाला उमगलेला निष्कर्ष ! ;) अर्थात, त्यातून (कधी कधी) उद्बोधक माहितीदेखिल मिळते, हा फायदाच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

थोडं डिप्लोमॅटीक उत्तर...

अर्धवटराव
Fri, 09/07/2012 - 03:59 नवीन
माझ्या प्रतिसादातला "बहुतेक" शब्द निश्कर्षा संबंधीच आहे :P अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

दंगलग्रस्त भागात जाऊन बसणे म्हणजे "प्रश्न हाताळणे नव्हे"

आनन्दा
Fri, 09/07/2012 - 16:43 नवीन
दंगलग्रस्त भागात जाऊन बसणे म्हणजे "प्रश्न हाताळणे नव्हे"... दंगल थांबविण्यासाठी जी ठोस उपाययोजना करायला हवी होती ती करण्यात ते कमी पडले हा आक्षेप आहे.. गांधींनी इच्छा दाखवली असती तर सूत्रे नक्की हलली असती. आणि "सर्वमान्य" बद्दल म्हणाल तर ज्या माणसाच्या एका शब्दावरून १९२१ ची चळवळ मागे घेतली गेली, आणि ज्यानी आपल्या उपोषणावर सगळा देश नाचवला, त्याना सर्वमान्य म्हटलेच पाहिजे, नाही का? प्रश्न सर्वमान्य म्हणण्याचा नाही. त्या सर्वमान्यतेसोबत येणार्‍या जबाबदारीला त्यांनी योग्य न्याय दिला का हा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

गांधीजी आणि ५५ कोटींचे तुणतुणे

क्लिंटन
Fri, 09/07/2012 - 10:33 नवीन
महात्मा गांधी आणि ५५ कोटी हे तुणतुणे परत वाजू लागल्यामुळे त्या तुणतुण्याची तार एकदाची कायमची तोडायला हवी (शब्दप्रयोग श्रेयः थत्तेचाचा) या उद्देशाने पुढील चित्र डकवित आहे. १८ जानेवारी १९४८ रोजीच्या इंडिअन एक्सप्रेस मध्ये भारत सरकारने पाकिस्तानला ५५ कोटी रूपये द्यायची मागणी मान्य केली आणि त्याबद्दल महात्मा गांधींनी समाधान व्यक्त केले असे म्हटले आहे. Image removed.Image removed. तसेच या बातमीत पुढे म्हटले आहे: "Gandhiji added, however, that he did not want anyone to come and tell him that things had been set right while the process was incomplete. He was in no hurry to break the fast as he had no desire to live unless peace reigned in the two Dominions". गांधीजींनी उपोषण सोडल्याची बातमी दुसऱ्या दिवशीच्या म्हणजे १९ जानेवारीच्या वर्तमानपत्रातली आहे. शांतता समितीने गांधीजींच्या ७ मागण्या मान्य केल्यानंतर त्यांनी उपोषण सोडले असे त्या बातमीत स्पष्टपणे म्हटले आहे . पाकिस्तानात हिंदूंच्या कत्तली झाल्या तरी दिल्लीतील मुसलमानांनी त्या केलेल्या नव्हत्या म्हणून पाकिस्तानातल्या कत्तलींची शिक्षा दिल्लीतील मुसलमानांना देऊ नये असा गांधीजींचा उद्देश होता. तेव्हा गांधीजींचे उपोषण हे दंगली संपून शांतता नांदावी म्हणून केले होते. पाकिस्तानला ५५ कोटी द्यावेत असे गांधीजींचे मत असले तरी त्यांच्या उपोषणाचा ५५ कोटीशी काहीही संबंध नाही हे स्पष्ट होते. नाहीतर गांधीजींनी ५५ कोटी दिल्यानंतर लगेच उपोषण सोडले असते. तेव्हा गांधीजींचे उपोषण आणि ५५ कोटींचा प्रश्न या सर्वसाधारणपणे एकाच काळात घडलेल्या घडामोडींची सांगड घालून गांधीजींना बदनाम करायचे गोबेल्सियन प्रचारतंत्र या उजव्या गटाच्या मंडळींनी अगदी प्रभावीपणे पार पाडले. या अपप्रचाराला उत्तर द्यायलाच हवे असे वाटून हा प्रतिसाद लिहिला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

उत्तम !!!

दीपक साळुंके
Fri, 09/07/2012 - 12:02 नवीन
उत्तम !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

क्लिंटनराव! उत्तम काम केले

ऋषिकेश
Fri, 09/07/2012 - 12:14 नवीन
क्लिंटनराव! उत्तम काम केले आहेत! (गेल्या वेळच्या चर्चेतच - दुवा वरच्या प्रतिसादात हा पुरावा आणला असतात तर तिथेच ५५ कोटीचे तुणतुणे थआंबले असते ;) ) असो.. यानंतर माझे बनलेले मत (उपोषण ५५ कोटींसाठी नव्हते) ते अधिकच ठाम झाले आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

अरेरे...

मन१
Fri, 09/07/2012 - 12:30 नवीन
बिरबलची खिचडी अशी एका झटक्यात संपून्/बनून कसं चालेल? शेकडो प्रतिक्रियांचा(त्यातल्या बहुतांशी असंबद्ध) पाउस पडल्याशिवाय मजा काय? आता चावून चोथा करायला विषय दुसरा शोधावा का काय सर्वांनी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

आणखी काही पुरावे

क्लिंटन
Fri, 09/07/2012 - 15:18 नवीन
आणखी काही पुरावे: १७ जानेवारी १९४८ च्या इंडिअन एक्सप्रेस मध्ये दोन महत्वाच्या बातम्या आहेत आणि त्यावरून गांधीजींचे उपोषण आणि ५५ कोटींचा संबंध नव्हता हे सिध्द होईल (मुळातल्या बातम्या इंग्रजी वर्तमानपत्रातील असल्यामुळे भाषांतर न करता त्या जशाच्या तशा इंग्रजीतच देत आहे. इच्छुकांना या बातम्या वर दिलेल्या दुव्यावर त्या दिवशीच्या वर्तमानपत्रात वाचता येतील): १. The Prime Minister, Pandit Jawaharlal Nehru told a "peace rally" today that "the loss of Mahatma Gandhi's life would mean the loss of India's soul because he is the embodiment of India's spiritual power." Pandit Nehru, who was addressing about 10,000 people--Hindus, Muslims and Sikhs--appealed to them to maintain communal harmony and save Mahatma Gandhi's life. २. Sardar Patel, who left for Bhavnagar this morning in a statement said:" I am leaving with a heavy heart at a time when Gandhiji is fasting. I cannot but fulfill my previous commitments and I am sure Gandhiji would like me to do so and therefore I must go. Besides, I know that my physical presence would not be of any help in relieving his agony. The only thing that can hasten the breaking of the fast and relieve Gandhiji of his mental and physical torture is for us all to do all that is possible to create an atmosphere to remove as far as possible distrust and bitterness. May I appeal to the people of Delhi to help the authorities in doing so. Let it not be said that we do not deserve the leadership of the greatest man of the world". म्हणजेच पंडित नेहरू आणि सरदार पटेल या दोघांनीही गांधीजींचे उपोषण संपवायला लोकांनी दंगली थांबवून शांतता पाळावी असेच आवाहन केले आहे.जर ५५ कोटी देऊन उपोषण थांबणाऱ्यातले असते तर ते सरकारने आधीच दिले असते.लोकांना शांततेचे आवाहन करायची गरज का पडली असती? तेव्हा ५५ कोटी आणि गांधीजींचे उपोषण या गोष्टींचे तुणतुणे कायमचे बंद होईल अशी अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

क्लिंटन यांनी तुणतुणे जोडल्यावर आता,

इरसाल
Fri, 09/07/2012 - 16:56 नवीन
पिअर्स वाल्यांनी मद्रासच्या रवि ( द न्यु स्टार अँड कंपनी), ट्रांसपरंट ग्लिसरीन सोपची आयडिया चोरली असे म्हणायला वाव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

माझे मत

हारुन शेख
गुरुवार, 09/06/2012 - 18:33 नवीन
मनुष्यसमूहाला एकत्र बांधून ठेवणारा संस्कृती हा धर्मापेक्षाही प्रभावी घटक आहे. धर्म वैयक्तिक श्रद्धांमधून विकास पावतो. पण 'संस्कृती' ज्या गोष्टीतून विकसित होते त्या अधिक व्यापक प्रभाव पाडतात. क्षेत्रीय भूगोल, निसर्ग, भाषा, मानववंश...इत्यादी. मुस्लीम जेव्हा भारतात आले ते धर्मवेड घेऊन पण त्यांनी एकदा इथे वसल्यावर इथल्या संस्कृतीशी जुळवून घेतलेच. धार्मिक कटकटी, लढाया अगदी सुरवातीपासून झाल्या, होत आहेत पण ह्या प्रासंगिक घटना घडल्यावर पुन्हा एकत्र मिळून राहणेही झाले आहेच. धार्मिक दंगली/ लढाया कधी मुस्लीम राज्यकर्त्यांच्या पाठींब्याने घडल्या कधी हिंदू राज्यकर्त्यांच्या. पण काही काळानंतर हिंदू आणि मुस्लीम ह्यांचे सांस्कृतिक सहजीवन पूर्ववत सुरु झाले. त्यामुळेच धर्माधिष्ठीत फाळणीला होकार देणे माझ्या मते सर्वात मोठी चूक होती. तसे करतांना संस्कृती हा घटक पूर्णपणे दुर्लक्षिला गेला. मुळातच मेकॉलेच्या शिक्षणपद्धतीतून तयार झालेली आणि पुढे इंग्लंडात जाऊन शिकून पूर्णपणे ब्रिटीश दृष्टीकोनातून विचार करणारी हि नेत्यांची पिढी होती. 'महात्मा गांधी' वगळता इतर नेते मंडळींची इथल्या संस्कृतीशी नाळ तुटलेलीच होती. त्यामुळे धर्माधिष्ठीत फाळणीचा विचार अश्या नेत्यांना रुचला. शिवाय काही नेत्यांच्या राजकीय महत्वाकांक्षा या लोकांच्या हितामध्ये निर्णय घेण्याच्या भावनेपेक्षाही प्रबळ होत्या. फाळणी झाली नसती तर हिंदू मुसलमान लोकसंख्येचे प्रमाण ६५-३५ राहिले असते.आणि जशी भीती व्यक्त केली जाते तशा जातीय दंगलीही झाल्या असत्या पण त्यांचे स्वरूप अंतर्गत प्रश्न म्हणून राहिले असते. पुन्हा त्या मिटल्यावर एक राष्ट्र म्हणून एकसंधता अधिक बळकटपणे पुढे आली असतीच. कुणी सांगावे ६५-३५ हे लोकसंख्येचे प्रमाण कदाचित शांती राखण्याच्या दृष्टीने अधिक समतोल दाखवणारे हि ठरले असते. शिवाय ज्या जातीय दंगलींच्या भीतीमुळे फाळणीच्या मागणीला दोन्हीकडच्या नेत्यांनी उचलून धरले त्या तशाही अत्यंत उग्र स्वरुपात घडल्याच. अगदी ज्या दिवशी फाळणी जाहीर झाली त्या दिवसापासून. फाळणीतल्या विस्थापनांमध्ये 20 लाख लोकं मेली त्यात स्त्रिया,लहान मुलेपण होती, १ लाख स्त्रियांची अब्रू लुटली गेली, दीड कोटी लोक बेघर झाले, अगणित लोकं बेपत्ता झाली. या सगळ्याचे दूरगामी परिणाम झालेले आहेत. जनमानसावर कधीही भरून न येणाऱ्या विखारी जखमा , दहशतवाद , अण्वस्त्रधारी शेजारी शत्रूराष्ट्र, असुरक्षित वायव्य सीमा , त्यामुळे होणारा संरक्षणावरचा प्रचंड खर्च ह्या सगळ्या परिणामांचे आकलन त्या काळच्या नेते म्हणवणाऱ्या मंडळींना झाले होते का हि शंका कायम वाटत आलेली आहे. तसाही फाळणीचा तथाकथीत उद्देश साध्य झाला नाहीच. इथल्या १५ कोटी मुस्लिमांनी पाकिस्तानात न जाणेच पसंत केले. मुख्यतः त्यात दक्षिण आणि पश्चिम भारतीय मुस्लीम जास्त होते. पण फाळणीमुळे ते कायमचे बॅकफूटवर गेले. कुठल्याही प्रश्नामध्ये काही बोलण्याचा नैतिक हक्क उरला नाही.त्यांच्याकडे कायम पाकिस्तानचे इथे राहिलेले नागरिक असे बघितले जाऊ लागले. कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणीच्या राजकीय पार्ट्या सत्तेत आल्यानंतर तर सामुहिक कत्तलही घडलीय. पण तरीही भारतीय संविधानाने स्वीकारलेल्या मार्गदर्शक तत्वांमुळे मुस्लिमांची भारतात सुरक्षितता टिकून आहे. त्यांना राष्ट्रीय प्रवाहात सामील करून घेणारं दमदार राजकीय नेतृत्व ज्यावेळी देशाला मिळेल तो सुदिन.
  • Log in or register to post comments

मग काश्मीर मध्ये काय झाले?

तर्री
गुरुवार, 09/06/2012 - 20:52 नवीन
मनुष्यसमूहाला एकत्र बांधून ठेवणारा संस्कृती हा धर्मापेक्षाही प्रभावी घटक आहे. मग काश्मीर मध्ये काय झाले ? तेथे तर संस्कृती सारखी होती. मग काश्मिरी पंडित निर्वासित का झाले ? कुणी सांगावे ६५-३५ हे लोकसंख्येचे प्रमाण कदाचित शांती राखण्याच्या दृष्टीने अधिक समतोल दाखवणारे हि ठरले असते. जेथे ३५ % व ६५ % असे मुस्लीम व हिंदूंचे प्रमाण आहे तेथे (भिवंडी / मालेगाब ) काय परिस्थिती आहे ? आपण म्हणता तो हाच का समतोल ? कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणीच्या राजकीय पार्ट्या सत्तेत आल्यानंतर तर सामुहिक कत्तलही घडलीय. तद्दन खोटारडेपणा. त्यांना राष्ट्रीय प्रवाहात सामील करून घेणारं दमदार राजकीय नेतृत्व ज्यावेळी देशाला मिळेल तो सुदिन. विचार करायला भाग पाडणारे : मुस्लिमांना मुख्य प्रवाहात यायचे आहे का ? की एक गठ्ठा मते हीच त्यांची ओळख ? किती समाज सुधारक भारत्तात झाले आणि त्यामुळे कोणता समाज सुधारला ? हमीद दलवाई चे विचार का नाही प्रसारित होत ? मुस्लीम मुलींचे शिक्षण होणे गरजेचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हारुन शेख

तर्री ...आपले प्रश्न

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 09/06/2012 - 22:42 नवीन
तर्री ...आपले प्रश्न प्रामाणिक आणी खरे असल्यामुळे(च),,, त्याला उत्तरं न देणं ही(पण) आपली संस्कृती आहे... हे आपलं लक्षात ठेवा हो! कारण,उत्तरं दिली तर असं व्हायचं...ना उगाच Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्री

बरोबर ...अगदी बरोबर.

तर्री
Fri, 09/07/2012 - 07:17 नवीन
क्लिंटन यांना वेळ तथा इच्छा नाही. शेख साहेब उत्तर देतील ही अपेक्षा. मी ही माझे पुच्छ म्यान करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

उत्तरं

हारुन शेख
Fri, 09/07/2012 - 10:48 नवीन
मनुष्यसमूहाला एकत्र बांधून ठेवणारा संस्कृती हा धर्मापेक्षाही प्रभावी घटक आहे. मग काश्मीर मध्ये काय झाले ? तेथे तर संस्कृती सारखी होती. मग काश्मिरी पंडित निर्वासित का झाले ? ----- ९० च्या दशकात पाकिस्तानने काश्मीरमधील युवकांना रॅडीकलाइज करून दहशतवादी समूह निर्माण होण्याआधी काश्मीर शांत होतं. पंडितही निर्वासित नव्हते. एकप्रकारे हे फाळणीचेच फलित म्हणता येईल. कुणी सांगावे ६५-३५ हे लोकसंख्येचे प्रमाण कदाचित शांती राखण्याच्या दृष्टीने अधिक समतोल दाखवणारे हि ठरले असते. जेथे ३५ % व ६५ % असे मुस्लीम व हिंदूंचे प्रमाण आहे तेथे (भिवंडी / मालेगाब ) काय परिस्थिती आहे ? आपण म्हणता तो हाच का समतोल ? ---- असे असण्यामागे फाळणीच्या कटू आठवणी आणि इतिहास आहे हे तुम्ही विसरताहात. फाळणीचा क्लेशकारक इतिहास नसता तर कदाचित परिस्थिती अशी राहिली नसती. कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणीच्या राजकीय पार्ट्या सत्तेत आल्यानंतर तर सामुहिक कत्तलही घडलीय. तद्दन खोटारडेपणा. --- काय खोटारडेपणा केला ते सांगाल काय ? गुजरात मध्ये काय झाले ते सगळ्यांना ठाऊक आहेच. फाळणीदरम्यानचा पुरावा हवा असल्यास हा घ्या "In bihar for example after anti - muslim riots broke out in october 1946 the province's hindu premier refused to allow british troops to fire on hindu rioters,ignored congress leader's complicity in the riots, held no official inquiry, and made only a few token arrests of those who had participated in anti muslim pogroms that killed 7000 to 8000 people " संदर्भ हवा असल्यास व्यनि करा. त्यांना राष्ट्रीय प्रवाहात सामील करून घेणारं दमदार राजकीय नेतृत्व ज्यावेळी देशाला मिळेल तो सुदिन. विचार करायला भाग पाडणारे : मुस्लिमांना मुख्य प्रवाहात यायचे आहे का ? ----- नक्कीच की एक गठ्ठा मते हीच त्यांची ओळख ? ----- मुस्लिमांकडे आपल्या राजकीय नेतृत्वाने नेहमीच त्या दृष्टीतून पाहिल्यामुळे ती ओळख तयार झाली आहे. कॉंग्रेसने सोयीस्करपणे आणि भाजपने असूयेने ती ओळख टिकवून ठेवली आहे. किती समाज सुधारक भारत्तात झाले आणि त्यामुळे कोणता समाज सुधारला ? ----- तुम्ही थोडं बघाल तर बरीच सुधारणा झालेली दिसेल. पण कायम हट्टाने समाज सुधारलेला नाहीच अशी भूमिका घ्यायची झाल्यास काय म्हणणार. किती समाज सुधारक झालेय या संख्येवर समाज किती सुधारला हे ठरवणे म्हणजे अतीच. हमीद दलवाई चे विचार का नाही प्रसारित होत ? मुस्लीम मुलींचे शिक्षण होणे गरजेचे आहे. ----- प्रसारित झालेत. मुस्लीम मुलीही शिकताय. पडदा पद्धत फारच कमी मुस्लीम मुली पाळतात, पारंपारिक तलाक ची किती उदाहरणं एवढ्यात तुम्ही ऐकलीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्री

९० च्या दशकात पाकिस्तानने

इष्टुर फाकडा
Fri, 09/07/2012 - 14:35 नवीन
९० च्या दशकात पाकिस्तानने काश्मीरमधील युवकांना रॅडीकलाइज करून दहशतवादी समूह निर्माण होण्याआधी काश्मीर शांत होतं. पंडितही निर्वासित नव्हते. एकप्रकारे हे फाळणीचेच फलित म्हणता येईल. गुजरात मध्ये काय झाले ते सगळ्यांना ठाऊक आहेच. फाळणीदरम्यानचा पुरावा हवा असल्यास हा घ्या "In bihar for example after anti - muslim riots broke out in october 1946 the province's hindu premier refused to allow british troops to fire on hindu rioters,ignored congress leader's complicity in the riots, held no official inquiry, and made only a few token arrests of those who had participated in anti muslim pogroms that killed 7000 to 8000 people " सगळा दोष फाळणीवर टाकला कि सगळ्या प्रश्नांचे समाधान होत नाही. आणि फाळणीचे म्हणाल तर बहुतांश ठिकाणी हिंदूंनी दिलेल्या त्या प्रतिक्रिया होत्या. १६ ओगस्ट १९४६ ला जीनांनी थेट 'कार्यवाही' जाहीर केलेली होती हे ध्यानात घ्यायला हवे. कटू आठवणी दोन्ही बाजूला आहेत. आणि तरी भारतात मुस्लिमांचे प्रमाण वाढले आहे हे लक्षात घ्या याउलट पाक मध्ये २०% वरून हिंदू आता नगण्य उरले आहेत. गोष्टी सोडून देवून पुढे चालण्याला गती बहुतांश मुस्लीम देत नाहीत हे सध्या उजेडात येणाऱ्या घटनांवरून कोणालाही समजण्यास अवघड नाही. सगळे रॅडीकल विचारांचे नाहीत हेहि कोणीही सांगेल. पण रॅडीकलाइज होणारेही कमी नाहीत हे कसे नाकारणार? कसं आहे...रॅडीकलाइज्ड हिंदूंना टप्पू हिंदूच लगावतात, त्यांचे जगणे या देशात सोपे नाही. तशी परिस्थिती मुस्लीम समाजात दिसत नाही. मध्ये एक देवबंद चा इमाम या दिशेने काही बोलला तर त्याची उचलबांगडी झाली. काही गोष्टी मान्य कराना मी म्हणतो...त्याने कमीपणा येणार नाही. जोपर्यंत हे प्रयत्न दिसत नाहीत तोपर्यंत हा वेगळेपणा राहणार त्याला काय पर्याय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हारुन शेख

सत्य आहे...

मन१
Fri, 09/07/2012 - 14:58 नवीन
...रॅडीकलाइज्ड हिंदूंना टप्पू हिंदूच लगावतात, त्यांचे जगणे या देशात सोपे नाही. हे ही खरेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इष्टुर फाकडा

आंगाश्शी!!!!!!!!!! याचा

बॅटमॅन
Fri, 09/07/2012 - 15:05 नवीन
आंगाश्शी!!!!!!!!!! याचा कौंटरपार्ट मुस्लिम समाजात असावा अशी इच्छा व्यक्त केली तर चुकले कुठे? आणि अशी स्थिती सध्याच्या मुस्लिम समाजात नाही हे मान्य करायला आणि मग सुधारायला तरी काय होतं काय माहिती?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

better, a change has to come within

मन१
Fri, 09/07/2012 - 18:30 नवीन
गृहितक :- देशातल्या प्रमुख लोकसंख्येपैकी मुस्लिम हे मागास मनोवृत्तीचे आहेत. मध्ययुगीन मानसिकतेत जगणारा एक अतिप्रचंड समाज त्यात आहे. कित्येक अशिक्षित आहेत. जे शिक्षित आहेत, त्यांचे विचार, राहणी आधुनिक नाहित. शिक्षित असले तरी कित्येकजण तिकडे आक्रमक, धर्मवेडे व स्वतःच्या संकल्पनांना संविधानाच्या वर मानणारे आहेत. . थोडक्यात :- धर्म ही वैयक्तिक वर्तन चौकट न मानता , सामाजिक संघटनेचे रुप घेउन तिकडे येते. असे इतर धर्मियांनी केले तर त्यांना रोखणारे त्यांच्याच धर्मातील इतर घटाक आहेत. . गृहितकात काही दुरुस्ती हवी का अजून? . माझे म्हणणे:- "हिंदुंच्या भल्यासाठी तुम्ही सेक्युलर्/चांगले निदान निरुपद्रवी व्हा. आधुनिक विचारसरणीचा अंगिकार करा." असा जितका बाहेरून दबाव समाजावर येइल; तितकाच हा(किंवा कुठलाही अन्य) समाज "आपण (वैचारिक दृष्ट्या)संपू की काय" ह्या भीतीने जुन्या संकल्पना अधिकच घट्ट पकडून ठेवील. सूर्य आणी वारा ह्यांची एका माण्साचे घोंगडे उडवायची शर्यत सगळ्यांना ठाउक असेलच. वार्‍याने बाहेरून जोर लावल्यानं माणसानं ते ब्लँकेट्/घोंगडी अधिकच घट्ट धरुन ठेवली. . मग काय करता येइल? दुर्दैवाने तत्काळ उपाय असा काहीच नाही. दीर्घकालीन उपाययोजना नक्कीच कायमस्वरुपी उत्तर ठरेल. जेव्हा खास मुस्लिमांत, निदान उपखंडातील/ भारतीय मुस्लिमात प्रबोधन,renaissance घडून यायला सुरुवात होइल तेव्हाच काही आशा आहे. किंवा भारतीय उदाहरणे घेउन बोलायचं तर जेव्हा काही मुस्लिम सुधारक जीवावर उदार होउन सुधारणा घडावतील; जेव्हा त्यांच्यात राममोहन रॉय, आगरकर, रानडे,र धो व धोंडो केशव कर्वे, आंबेडकर, फुले (व अशीच इतर थोर शेकडो मंडळी, जागा कमी आहे भावना लक्षात घ्या) बनतील. त्यांचा पाठिंबा वाढू लागेल; तेव्हाच त्याम्ची स्वतःची प्रगती होइल.एकदा ते घडू लागल्यावर इतरांना त्यांचे व त्यांना इतरांचे वाटणारे भय कमी होइल. अधिक पुढची पायरी म्हणजे "इतर" आणी "ते" असा भेद राहणार नाही. जर प्रबोधन झाले तर...... ..ते एक खड्ड्यात चाल्ले म्हणून आपण सात खड्ड्यात जायचे हा तोगडिया -सिंघल ह्यांचा मार्गच बरोबर आहे, असे वाटत असेल, तर मी उत्तर देण्यास असमर्थ आहे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

१००० % सहमत.

अप्पा जोगळेकर
Sat, 09/08/2012 - 13:57 नवीन
१००० % सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

सगळा दोष फाळणीवर टाकला कि

हारुन शेख
Fri, 09/07/2012 - 18:11 नवीन
सगळा दोष फाळणीवर टाकला कि सगळ्या प्रश्नांचे समाधान होत नाही. ---- मी काश्मीरमध्ये जे होतंय याचा दोष फाळणीवर टाकला याच्यात काही चूक केली असे मला वाटत नाही. फाळणीपूर्वी काश्मीर संस्थानाचा राजा हिंदू होता आणि त्याची प्रजा बहुसंख्य मुस्लीम असूनही हिंदू-मुसलमान तेथे गुण्यागोविंदाने राहत होते. काश्मीर पेटले ते ९० च्या दशकात. खलिस्तान चळवळ (जी पाकिस्तानच्या पाठींब्याने सुरु होती) ती अयशस्वी झाल्यावर. आणि फाळणीचे म्हणाल तर बहुतांश ठिकाणी हिंदूंनी दिलेल्या त्या प्रतिक्रिया होत्या. १६ ओगस्ट १९४६ ला जीनांनी थेट 'कार्यवाही' जाहीर केलेली होती हे ध्यानात घ्यायला हवे. ---- क्रिया म्हणा वा प्रतिक्रिया म्हणा. हिंसा दोन्हीकडून झाली हे मान्य आहे कि नाही ? माझे मूळ म्हणणे तेच होते. वरती 'तर्री' यांनी चक्क खोटारडेपणाचा आरोप केला म्हणून ती उदाहरणं दिली होती. कटू आठवणी दोन्ही बाजूला आहेत. आणि तरी भारतात मुस्लिमांचे प्रमाण वाढले आहे हे लक्षात घ्या याउलट पाक मध्ये २०% वरून हिंदू आता नगण्य उरले आहेत. ---- माझा प्रतिसादात मी कोठेही पाकिस्तानची बाजू मांडली काय? तरी मी पाकिस्तानची बाजू घेऊन बोलतोय असे गृहीत धरून तुम्ही वरचं वाक्य लिहिलंय. प्रवाहात सामील करून घेण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न म्हणायचा का ? ;) गोष्टी सोडून देवून पुढे चालण्याला गती बहुतांश मुस्लीम देत नाहीत हे सध्या उजेडात येणाऱ्या घटनांवरून कोणालाही समजण्यास अवघड नाही. सगळे रॅडीकल विचारांचे नाहीत हेहि कोणीही सांगेल. पण रॅडीकलाइज होणारेही कमी नाहीत हे कसे नाकारणार? ---- आतंकवादी बनवण्यासाठी अथवा रॅडीकलाइज करण्यासाठी फक्त धर्म पुरेसा असत नाही. त्यासाठी विकृतीकरण केलेला इतिहास, सहन केलेल्या जखमांच्या कहाण्या, दुर्लक्षिलेल्या तक्रारी, ज्याच्यासाठी लढणे आणि मरणेही श्रेयस्कर आहे अश्या आदर्श जगाची दाखवलेली स्वप्ने, ज्या कारणासाठी लढायचं आहे त्याच कारणासाठी आधीच्या लोकांनी दिलेल्या बलिदानाच्या प्रेरक कथा. अश्या अगणित गोष्टी वापरल्या जातात. इथे आतंकवाद्यांच उदात्तीकरण करत नसून फक्त 'धर्माच्याच संदर्भात' आतंकवादाचा विचार करणाऱ्या दृष्टिकोनाबद्दल बोलायचे आहे.. कसं आहे...रॅडीकलाइज्ड हिंदूंना टप्पू हिंदूच लगावतात, त्यांचे जगणे या देशात सोपे नाही. तशी परिस्थिती मुस्लीम समाजात दिसत नाही. ---- त्याचं कारण असुरक्षिततेची भावना आहे. असुरक्षित वाटत असेल तर बर्याच वेळेस सारासार विचार नीट होऊ शकत नाही. निर्णय चुकतात. विचार भरकटतात. शिवाय बहुसंख्य शिक्षित नसल्यामुळेही तसे होते. मध्ये एक देवबंद चा इमाम या दिशेने काही बोलला तर त्याची उचलबांगडी झाली. ---- मोदींवर स्तुतिसुमने उधळल्यामुळे ती उचलबांगडी झाली. काही गोष्टी मान्य कराना मी म्हणतो...त्याने कमीपणा येणार नाही. जोपर्यंत हे प्रयत्न दिसत नाहीत तोपर्यंत हा वेगळेपणा राहणार त्याला काय पर्याय. ---- जे चूक ते चूक असे मान्य करण्यात निदान मी तरी कमीपणा मानत नाहीच. पण असे असतांनाही मी खूप वेळेस वेगळेपणाची वागणूक अनुभवली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इष्टुर फाकडा

@ हारुन शेख : Kudos !!

वाहीदा
Fri, 09/07/2012 - 19:41 नवीन
बट वन फाईन डे आय एम शुअर ईवन यु विल डिसाईड टु लीव धिस फोरम . एनीवेज गुडवन बडी :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हारुन शेख

मी काश्मीरमध्ये जे होतंय याचा

इष्टुर फाकडा
Fri, 09/07/2012 - 19:58 नवीन
मी काश्मीरमध्ये जे होतंय याचा दोष फाळणीवर टाकला याच्यात काही चूक केली असे मला वाटत नाही. फाळणीपूर्वी काश्मीर संस्थानाचा राजा हिंदू होता आणि त्याची प्रजा बहुसंख्य मुस्लीम असूनही हिंदू-मुसलमान तेथे गुण्यागोविंदाने राहत होते. काश्मीर पेटले ते ९० च्या दशकात. खलिस्तान चळवळ (जी पाकिस्तानच्या पाठींब्याने सुरु होती) ती अयशस्वी झाल्यावर. तुम्ही मालेगाव आणि भिवंडी साठीही फाळणीचे सांगितलेत फक्त काश्मीरसाठी नाही. आणि अगदी खोटारडेपणा नाही पण भडक विधान केलेत न ! गुजरात मध्येसुद्धा डबा जळाला (तुमच्यानुसार 'कट्टर हिंदुत्ववादी' सरकार असताना !) त्यानंतर सगळ्यांना ठावूक आहेच. क्रिया आणि प्रतिक्रिया जर सारखी आहे असे म्हणत असलात तर न्यूटन वरून तुमच्या डोक्यावर सफरचंद मारल्याशिवाय राहणार नाही :) माझा प्रतिसादात मी कोठेही पाकिस्तानची बाजू मांडली काय? तरी मी पाकिस्तानची बाजू घेऊन बोलतोय असे गृहीत धरून तुम्ही वरचं वाक्य लिहिलंय. प्रवाहात सामील करून घेण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न म्हणायचा का ? काका मी तुम्हाला पाकिस्तानचा समर्थक मानतोय हा ग्रह तुमचा ! मी तुम्हाला हिंदुबहुलतेमुळे मुस्लिमांना समस्या येत नाहीत पण याउलट परिस्थितीमध्ये असेच होताना दिसत नाही कारण आजचा पाकिस्तानी मुसलमान काही वर्षांपूर्वी हिंदुस्थानीच होता हे सांगायचा प्रयत्न करत होतो. आणि प्रवाहात सामील करण्याबाबत सांगतो, माझे दोन सहकारी पाकिस्तानी आहेत, एक विद्यार्थी पाकिस्तानी आहे :) आतंकवादी बनवण्यासाठी अथवा रॅडीकलाइज करण्यासाठी फक्त धर्म पुरेसा असत नाही. त्यासाठी विकृतीकरण केलेला इतिहास, सहन केलेल्या जखमांच्या कहाण्या, दुर्लक्षिलेल्या तक्रारी, ज्याच्यासाठी लढणे आणि मरणेही श्रेयस्कर आहे अश्या आदर्श जगाची दाखवलेली स्वप्ने, ज्या कारणासाठी लढायचं आहे त्याच कारणासाठी आधीच्या लोकांनी दिलेल्या बलिदानाच्या प्रेरक कथा. अश्या अगणित गोष्टी वापरल्या जातात. इथे आतंकवाद्यांच उदात्तीकरण करत नसून फक्त 'धर्माच्याच संदर्भात' आतंकवादाचा विचार करणाऱ्या दृष्टिकोनाबद्दल बोलायचे आहे.. गम्मत अशी आहे हरुनसाहेब भडकावू मटेरियल आणि माणसे दोन्हीकडे आहेतच. मग एकाच बाजुकडची इतक्या संख्येने कशी बळी पडतात असा प्रश्न माझ्यासारख्या सामान्यांना पडतो ज्याचं उत्तर देणं सोडा, हे मान्य करणारेही कोणी नाहीत हि माझीतरी व्यथा आहे. आणि या संख्येमुळे आतंकवादाचा विचार 'धर्माच्याच संदर्भात' झाला तर त्यासाठी तुम्ही तसा विचार करणाऱ्यांची डोकी धरणार आहात का? तसा होणे हे जरी चुकीचे असले तरी ! मोदींवर स्तुतिसुमने उधळल्यामुळे ती उचलबांगडी झाली. मलातरी त्याचे म्हणणे पटते...गुजरात मधील प्रगतीचा फायदा धर्माधिष्ठित नाही. असो माणसाला वैयक्तिक मते असायला तरी हरकत नसावी. जे चूक ते चूक असे मान्य करण्यात निदान मी तरी कमीपणा मानत नाहीच. पण असे असतांनाही मी खूप वेळेस वेगळेपणाची वागणूक अनुभवली आहे. तुमच्या प्रतिसादांमधून तसे दिसले नाही म्हणून लिहू धजावलो :) उदाहरणार्थ हा प्रतिसाद - पण फाळणीमुळे ते कायमचे बॅकफूटवर गेले. कुठल्याही प्रश्नामध्ये काही बोलण्याचा नैतिक हक्क उरला नाही.त्यांच्याकडे कायम पाकिस्तानचे इथे राहिलेले नागरिक असे बघितले जाऊ लागले. कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणीच्या राजकीय पार्ट्या सत्तेत आल्यानंतर तर सामुहिक कत्तलही घडलीय. पण तरीही भारतीय संविधानाने स्वीकारलेल्या मार्गदर्शक तत्वांमुळे मुस्लिमांची भारतात सुरक्षितता टिकून आहे. आणि ते वाक्य तुमच्या एकट्यासाठी न्हवते हो...एकटे अब्दुल कलाम मलाही वंदनीय आहेतच कि :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हारुन शेख

भावना पोचल्या.

हारुन शेख
Fri, 09/07/2012 - 20:29 नवीन
भावना पोचल्या. पण तरी धाग्यावर अवांतर होतेय म्हणून प्रतिवाद करत नाही. वाटल्यास खरडवहीत बोलू. मुद्दे संपलेले नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इष्टुर फाकडा

गुजरात मध्ये काय झाले ते सगळ्यांना ठाऊक आहेच.

अर्धवटराव
Fri, 09/07/2012 - 21:18 नवीन
बिलकुल नाहि. गुजरात मध्ये कत्तली झाल्या नाहित तर दंगे झाले. त्यांची तत्कालीन सुरुवात मुस्लीमांनीच केली. हिंदुंची प्रतिक्रीया फार तीव्र होती हे खरय... पण अन्यथा मुस्लीम क्रियी तेव्हढीच तीव असती हे ही वास्तव आहे. मूळात गुजरात सारख्या शांत प्रदेशात अशा दंगली का व्ह्याव्या याचे उत्तर मी शोधायचा प्रयत्न केला. तेंव्हा असं कळलं कि या पुर्वीही गुजतार मध्ये लहान मोठ्या झटापटी झाल्यात आणि प्रत्येक वेळी हिंदुंनी भरपूर मार खाल्ला. शेवटच्या दंगलीत सरकारने हिंदुंचा कैवार घेतला आणि "सौ सोनार कि एक लोहार कि" म्हणत हिंदुंनी तिखट वार केले. इतर कुठल्याही राज्यापेक्षा गुजरातमध्ये दंगलींच्या जखमा भरायची स्पीड जास्त आहे... कारण तेथील माणुस स्वभावत: रक्तपात वगैरे भानगडीत पडणारा नाहि.. त्याला पैसा अधीक महत्वाचा. गुजराती माणुस, हिंदु आणि मुस्लीम दोघेही, आपापल्यापरीने स्थिरस्थावर होण्याचा, प्रगतीचा प्रयत्न करताहेत. पण हे गुजरात कांडाचे भूत उर्वरीत भारताच्या आणि जगाच्या मानगुटीवरुन सहजासहजी उतरणार नाहि हे ही खरेच. इट हॅज ह्युज न्युसेन्स पोटेन्शीअल. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हारुन शेख

अजून

विकास
Fri, 09/07/2012 - 22:05 नवीन
प्रत्येक वेळी हिंदुंनी भरपूर मार खाल्ला. शेवटच्या दंगलीत सरकारने हिंदुंचा कैवार घेतला अजून असा आरोप आहे. हे प्रकरण न्यायालयीन आहे आणि व्यक्ती व्यक्तींवरील आरोप सिद्ध झाले असले (आणि अजूनही होत राहीले) तरी, हे सरकारने ठरवून केले हे सिद्ध झालेले नाही असे मला वाटते. अजून एक गोष्ट म्हणजे: महाराष्ट्रात पाच वर्षे युतीचे सरकार होते ज्यात हिंदूत्ववादी मंडळी होती, कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश, दिल्ली, पंजाबमधे अकालीदलाबरोबर युती तर बिहार मधे देखील युतीतील धाकटा पण प्रमुख पक्ष म्हणून भाजपा सत्तेवर राहीली आहे. येथे अशा दंगली झाल्याचे दिसलेले नसताना, केवळ गुजरातच्या दंगलीचा संदर्भ देत, "कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणीच्या राजकीय पार्ट्या सत्तेत आल्यानंतर तर सामुहिक कत्तलही घडलीय," असे जनरलायझेशन करणे म्हणजे एखाद्या व्यक्तीने, "एखाद्या धर्मात त्या धर्माच्या नावावर दहशतवादी निर्माण झाले म्हणून त्या धर्मालाच दहशतवादी म्हणण्यातला प्रकार आहे", जे माझ्या दृष्टीने अयोग्य आहे. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

सरकारने ठरवून नाहि केले...

अर्धवटराव
Sun, 09/09/2012 - 03:36 नवीन
सरकारच्या अजेण्ड्यावर दंगल कधीच नसणार. पण सरकारातल्या बर्‍याच जणांना दंगेखोरांबद्दल सक्रीय सहानुभूती असेलच. शिवाय या दंगलीचा आनंद विरोधकांनी साजरा केलाच केला... सिंपल कारण... अयोध्येसारखा एक आजन्म टिकणारा मुद्दा मिळाला.पण या दंग्याची सुरुवात मुस्लीमांनी केली हे निश्चित. एव्हढी भीषण रिअ‍ॅक्शनची अपेक्षा असती तर एव्हढी हिम्मत ते करते ना. बाकी हिंदु कट्टरवादाबद्दल शिकल्या सवरल्या मुस्लीमांचे एव्हढे विचार वाचुन हसु येतं. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

बाकी विषयांवर इतर लोक बोलतीलच

अन्या दातार
गुरुवार, 09/06/2012 - 22:42 नवीन
त्यांना राष्ट्रीय प्रवाहात सामील करून घेणारं दमदार राजकीय नेतृत्व ज्यावेळी देशाला मिळेल तो सुदिन.
याचा अर्थ नक्की काय घ्यायचा? ६५ वर्षांचा काळ जाऊनही मुस्लिम राष्ट्रीय प्रवाहात आलेले नाहीत हा कुणाचा दोष? पहिली ३० वर्षे जाऊद्यात. उरलेल्या ३५ वर्षातही मुस्लिमांना राष्ट्रीय प्रवाहात यावेसेच वाटले नाही का? का सामील करुन घेणारं म्हणजे मुस्लिम म्हणतील त्याला हो हो करणारं? तसं जरी मानले तरी या ३५ वर्षांच्या काळात फारफार तर ६ वर्षांचाच काळ (भाजपाप्रणित सरकारचा) बाजूला काढावा लागेल. राहिली २९ वर्षे! शेवटी तात्पर्य एकचः घोड्याला पाण्यापर्यंत आणता येते, पाणी घोड्यानेच प्यायचे असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हारुन शेख

समजते आहे...

मन१
गुरुवार, 09/06/2012 - 22:49 नवीन
हारुन शेख, शेवटच्या प्रतिसादात काय म्हणताय ते समजते आहे.पण ते विचित्रचक्र बनले आहे. सध्या failure of state इतके झालेले आहे, की इथून पुढे काहीही चांगले होणे अशक्य वाटावे. "ह्यांनी" "त्यांना" हाणलं तरी न्यायव्यवस्था काय, पोलिस काय, कुठूनच न्याय मिळत नाही. मग "त्यांना" सतत मार खात असल्याची भावना येते. मग म्हणून "त्यांनी" "ह्यांना" झुंडिनं उलट मारणं समर्थनीय मानलं जाउ लागतं. शासन व्यवस्था इथेही कुठेच प्रभावी अस्तित्व दाखवत नाही. चक्र सुरुच राहतं. कायद्यानं जे करायला हवं; ते केलं जात नाही, म्हणून झुंडी आपले कायदे बनवू पाहतात्,कायदे हातात घेतात. . मुळात विचार "हे " आणि "ते" असा केला जातो, हे दुर्दैव. अंधार...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हारुन शेख

माझे मत,

भंकस बाबा
Tue, 02/02/2016 - 21:04 नवीन
अगदी बालबोध विचार आहेत हे! मुस्लिमबहुत भागात राहणाऱ्या इतर धर्मियाना काय त्रास होतो हे त्यांना जाऊन विचारा. खर म्हणजे मुसलमान हां धर्म नसून एक राष्ट्र आहे असे म्हणायला फार वाव आहे. त्यांचे कायदे वेगळे असतात. त्यांना धर्माच्या विरोधात कोणी बोलले की बिथरायला होते. इस्लाम खतरें में आरोळी दिली की मग शिया सुन्नी वैर विसरले जाते. मी स्वतः मुस्लिम भागात राहतो. मशिद आणि मदरसे याना इथे बेफाम महत्व दिले जाते. मशीदिवरुन बांगच नाही तर गीत म्हटली जातात. यंदाच् नवरात्रि व् मोहरम एकाच वेळी होते. गरबा १०च्या ठोक्याला बंद करणारे आपले मायबाप सरकार तेराशे वर्षापुर्वी मारल्या गेलेल्या इमाम हुसेन च्या नावाने गळे काढण्यात धन्य मानणाऱ्या मौलविकडे दुर्लक्ष करत होते. ते सुद्धा प्रत्येक गल्लीचा वेगळा प्रोग्राम, म्हणजे एक ना धड़ भाराभार.... आज जगात जिथे जिथे मुस्लिम आहेत तिथे समस्या आहेत. असे हिन्दू, जैन, शिख , ज्यू यांच्या बाबतीत का होत नाही? एक किस्सा खरडतो, इम्रान खानने आपल्या आईच्या स्मरणार्थ बांधण्यात येणाऱ्या हॉस्पिटलला निधि पाहिजे म्हणुन भारत पाकिस्तान क्रिकेट सामने इग्लेण्ड मधे आयोजित केला होता. हे मैत्रीपूर्ण सामना होते. ९५/९६साल असावे ते, भारतातील दिग्दज खेळाडू या सामन्यात खेलले होते. आता सामन्याचा तपशील आठवत नाही पण तो २०/२० सामना होता. भारतीय आघाडीचे खेळाडू स्वस्तात बाद झाले होते. ५बाद ३५/३६ धावा असा काहीतरी धावफलक होता. जिंकण्यासाठी चार ते पाच षटकात ७०/७२ धावा आवश्यक होत्या . त्यावेळी अचानक समीर दिघे या फलन्दाजाच्या अंगात रिचर्ड्स घुसला व् त्याने धावांचा पाऊस पाडला. शेवटी दोन चेंडूत चार धावा असे काहीसे समीकरण होते. पण हे पाकिस्तानी प्रेक्षकाना रुचले नाही त्यांनी मैदानावर धाव घेऊन सामना उधळला. समीर दिघे ला देखिल फटके बसले. तेव्हा इम्रान खानने वैतागुंन उदगार काढले होते की हे पाकिस्तानी कुठेच् रहायच्या लायकीचे नाही, आणि आता हाच पाकिस्तानचा मार्गदर्शक बनायला बघत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हारुन शेख

वेगळा विचार

हारुन शेख
गुरुवार, 09/06/2012 - 18:38 नवीन
एक वेगळा विचार म्हणून लेख रोचक आहे. बरेचसे नाही पटले.
  • Log in or register to post comments

प्रा. मोरेंचा लोकसत्तामधला

अप्पा जोगळेकर
गुरुवार, 09/06/2012 - 22:20 नवीन
प्रा. मोरेंचा लोकसत्तामधला लेख वाचला होताच. या धाग्याच्या निमित्ताने त्याचे स्मरण झाले. राजघराणं यांचे लेख अतिशय अभ्यासपूर्ण असतात. मागे एकदा 'मन' शी बोलताना फाळणी झाली यात वाईट काय झाले असा प्रश्न मी विचारला होता ? त्या प्रश्नामागचा युक्तिवाद जोरकसपणे मांडण्यासाठी बळ मिळाले. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

भौगोलिक राष्ट्र म्हणून

अवतार
गुरुवार, 09/06/2012 - 22:35 नवीन
पाकिस्तान हे मुस्लिम लीगच्या आधुनिक उच्चविद्याविभूषित नेतृत्वाने नाईलाज म्हणून स्वीकारलेले वास्तव आहे. १९२९ ची नेहरू घटना मुस्लिम लीग म्हणजेच जिन्ना यांनी नाकारली याचे मुख्य कारण म्हणजे त्यात १९१५ च्या लखनौ कराराद्वारे देण्यात आलेले स्वतंत्र मुस्लिम मतदार संघ रद्द करण्यात आले होते. स्वतंत्र मतदार संघांच्या बदल्यात संयुक्त मतदार संघात मुस्लिम लीगला अधिक जागा मिळणार होत्या. तरीही जिन्ना यांनी ही घटना नाकारली याचे एकमेव कारण म्हणजे कोणत्याही परिस्थितीत स्वतंत्र मतदार संघ रद्द होणे हे मुस्लिम लीगला परवडण्यासारखे नव्हते. म्हणजे या वेळेपर्यंत तडजोडीने प्रश्न सुटू शकतो अशी काँग्रेसमधील नेत्यांची धारणा असावी. पण त्यानंतर मात्र काँग्रेसने स्वतंत्र मतदार संघ स्वीकारतही नाही आणि नाकारतही नाही अशी भूमिका घेतली. तडजोड केली तर ती मुस्लिम लीगच्या अटींवर करावी लागणार, जे शक्य नव्हते. आणि उघड युद्ध करण्यासाठी हाती सत्ता नाही अशी परिस्थिती असतांना काँग्रेसच्या नेतृत्वाला दुसरे काहीच करता येणे शक्य नव्हते. केंद्रीय सत्ता दुबळी ठेवणे आणि शक्तिशाली प्रांतिक सरकारे स्थापन करून त्यातील जास्तीत जास्त ठिकाणी मुस्लिम लीगचे सरकार आणणे हा मुस्लिम लीगच्या राजकारणाचा गाभा होता. हे मान्य केल्याशिवाय पूर्व आणि पश्चिम अशा दोन तुकड्यांत विभागलेले इस्लामी राष्ट्र लीगने का स्वीकारावे ह्याचा उलगडा होत नाही. ह्याउलट लीग ज्या प्रांतांत बलवान आहे ते प्रांत वगळून उर्वरित ठिकाणी एका केंद्रीय सत्तेखाली भारत एक राष्ट्र म्हणून निर्माण करावे ही साधारणत: १९३० आणि १९४० च्या दशकात काँग्रेसच्या राजकारणाची मुख्य दिशा होती. म्हणूनच याच काळात काँग्रेस नेतृत्वाच्या भूमिका जास्त संदिग्ध झालेल्या दिसून येतात. दुसरीकडे सत्तांतराच्या वेळी सत्तेत जास्तीत जास्त वाटेकरी निर्माण करून भारतात एक शक्तिशाली केंद्रीय सत्ता निर्माण होऊ न देणे हे ब्रिटीशांचे उद्देश्य होते. पहिल्या महायुद्धानंतर ऑटोमन साम्राज्याची जी अवस्था त्यांनी केली तीच भारताची करावी हे त्यांचे लक्ष्य होते. पण लीगला केंद्रीय सत्ता दुबळी ठेवण्यात इतका रस का होता हे जाणणे महत्वाचे आहे. कारण स्वतंत्र भारतात हिंदूंची बहुसंख्या असल्याने केंद्रीय सत्तेत त्यांचेच वर्चस्व राहणार हे लीगला कळून चुकले होते. 'आम्ही या देशावर हजार वर्षे राज्य केले आहे' ही ज्यांची प्रामाणिक भावना आहे तो समाज हजार वर्षे पराजित असलेल्या समाजाबरोबर केंद्रीय सत्तेत वाटेकरी म्हणून राहणे मान्यच करणार नाही. लीगला मुंबई, मद्रास, बिहार इत्यादी प्रांतांतून भरघोस मते मिळणे ह्याचा दुसरा अर्थ लावता येत नाही. संपूर्ण भारत लीगच्या वर्चस्वाखाली आणणे शक्य नाही हे वास्तव धर्मांध मुस्लिम मौलवी जरी मान्य करत नसले तरी लीगच्या नेत्यांनी मान्य केले होते. त्याऐवजी राजकीय तडजोड म्हणून दोन तुकड्यांत विभागलेले पाकिस्तान त्यांनी स्वीकारले. खरी लढाई लाहोरची नव्हती, ढाक्याची नव्हती. खरी लढाई दिल्लीसाठी आहे आणि ती होणारच आहे. त्यासाठीच ह्या शांततेच्या काळात कधी ह्याच्या अंगणात तर कधी त्याच्या अंगणात असे करत स्वत:चे सामर्थ्य वाढवणे हाच पर्याय भारतापुढे शिल्लक आहे. राजकारणात माज दाखवण्यापेक्षा शांतपणे स्वत:ची शक्ती वाढवत राहणे महत्वाचे असते. शक्तिशाली राष्ट्रांना वेगळा माज दाखवावा लागत नाही.
  • Log in or register to post comments

खरी लढाई...

अर्धवटराव
गुरुवार, 09/06/2012 - 22:52 नवीन
>>खरी लढाई लाहोरची नव्हती, ढाक्याची नव्हती. खरी लढाई दिल्लीसाठी आहे आणि ती होणारच आहे. -- कटु , पण वास्तव विचार. काश्मीर, पुर्वोत्तर राज्ये धगधगते ठेऊन पाकिस्तानने यात अगोदरच आघाडी घेतली आहे. पण त्यांच्याही बुडाखाली बलुच वगैरे प्रश्न जळताहेत (किंवा भारत त्यात तेल ओततोय), शिवाय अत्यंत अस्ताव्यस्त राजकीय व्यवस्था... पण "खरी लढाई" सुरु झाली आहे. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवतार

+१

मन१
गुरुवार, 09/06/2012 - 22:55 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा