Skip to main content

पीस

Published on शुक्रवार, 07/09/2012
मी प्रवाह कागडिया... सध्या मी एम. एल. ए असल्या मुळे तुम्हाला माझं बोलणं खरं वाटणार नाही. पण काही माणसाचं अजब असतात, जीवनात असल्या व्यक्तीं पेक्षा कितीही जास्त यश प्राप्त केलं, तरी तुम्हाला तुमच सर्व यश बेकार वाटतं आणि त्या व्यक्ति प्रती तुमच आकर्षण किवां कदाचित इर्षा वाढतच असते. माझं बोलणं नाहीना कळाल? जो पर्यंत तुम्ही माझ्या मित्र सुज्ञाला नाही भेटणार, तुम्हाला माझी गोष्ट नाही कळणार... ... आज चौकातून जात असताना, मी माझी 'एस्टीम' गाडी सूज्ञाचा चाळी समोर थांबवली.. तेव्हा उन्हाळ्याचे दिवस, दुपारी चारचा सुमार होता. हा सुज्ञ, मी वरती सांगितलं तसं एक अजब माणूस, या चाळीच्या छोट्या दोन खोल्यांच्या रूम सोडून बाहेर पडायला तयारच नाही. याच चाळी मधे सूज्ञाचा शेजारी छोट्या दोन खोल्यांच्या रूम मधे मी पण राहायचो. शिक्षकाच्या नोकरी बरोबर कट-पीस कापडांचा छोटासा धंदा मी जेव्हा चालू केला तेव्हा पहिली ऑफर मी सुज्ञालाच केलेली. मी आणि सुज्ञ तेव्हा एकाच शाळेत शिक्षक होतो, पण तो नावाचाच सुज्ञ!! "नाही प्रवाह! शिक्षकच जर व्यापारी बनला तर सगळया शाळा दुकान बनून जातील आणि त्या शाळेतून दोन नम्बरचे धंदे करणारे व्यापारीच बाहेर पडतील. मला मुलांना शिकविण्यात, त्यांच्या समोर कविता म्हणण्यात, त्यांना गोष्टी सांगण्यात, त्यांचा बरोबर खेळण्यात जास्त आनंद येतो. पैश्यासाठी मला त्या आनंदाची हत्या नाही करायची.. आणि तसं पण तू प्रख्यात मिलांचे बनावटी शीक्के लावून जे खराब कापड विकण्याची गोष्ट करतोय, ती बेईमानी माझ्या कडून नाही होणार... प्रवाह! सॉरी!! ..आणि कापडाच्या दोन नंबरी धंद्यानी मला प्रगतिची दिशा उघडून दिलेली. पागडी वर कापड बाजारात मी एक छोटीसं दुकान घेतल. शिक्षकची नोकरी सोडून दिली आणि मणिनगर मधे नवीन फ्ल्याट घेतला, नवीन मोपेड घेतली. तेव्हा ही चाळी सोडण्याच्या दिवशीपण मी सुज्ञाला बोललेलो, "ह्या गोंगाट वाल्या, गलिच्छ चाळी मधे तुला कस काय जमतंय? अजूनही सांगतो माझ्या धंद्यात सामील हो! लोक चंद्रा वर जाऊन पोचले आणि तु अजूनही ह्या गलिच्छ चाळीच्या बाहेर पडून एका शांत जागेत राहायला जाऊ शकत नाहीस." आणि त्यावर मोहक हसून सुज्ञ बोललेला.. "जांच कर चांदकी मिट्टी को भला क्या हासील? अपनी मिट्टी को तो इन्सानने परखा ही नही!!" ..आणि जसा माझा व्यवसाय मोठा झाला, सेटेलाईट भागात नवीन रो हाउस घेतलं होतं. नव्या चकचकीत कायनेटिक होंडा वर होतो तेव्हा... पत्नी नुकतीच पारेख'स मधून शॉपिंग करून स्कूटर वर बसायला जात होती आणि इतक्यात खांध्यावर झोळी अडकवून शेंगदाणे खात चाललेल्या सुज्ञाची पाठी वर थाप पडली.. मी चमकलो.. "अरे वा रे प्रवाह बच्चू! क्या बात हे ? तू तर केस पण सगळे काळे करून टाकलेस! काय दिसत नाहीस हल्ली?" ..आणि मी सुज्ञाला माझी रो हाउस पर्यंतची प्रगति सांगितली... "दूर रो हाउसच्या पीसफुल एरीया मधे राहयला गेलो म्हणून त्या बाजूला यायला नाही जमत. फ्ल्याट मधे तर मी कंटाळलेलो, वरच्या मजल्यावला ठोकायचा आणि खालचा रोकायचा. आजीबात शांती नव्हती. पण आता रो हाउस मधे बंर आहे. " "छान छान! पण आता पोटाला तुझ्या प्रगतीच्या गति ने वाढून देऊ नकोस, नाहीतर घराची दार अजून रुंद करावी लागतील आणि सुलू वहिनी पण काही तुझ्या पेक्षा प्रगति करण्यात पाठी नाही राहिल्या." सुज्ञानी आम्हाला दोघांना मस्करीच्या सुरात सांगितल आणि मी स्कूटर चालू केली.... ... त्या दिवशी सुज्ञ मला थलतेज टी.वी. स्टेशना कडे अचानक दिसला, तेव्हा तर मी एम. एल. ए होतो. अनेक धंद्यांचा आणि ड्राइव-इन रोड वरचा स्वतःच्या स्वतंत्र बंगल्याचा आणि या 'एस्टीम' गाडीचा मालक. एस्टीम एकदम त्याच्या बाजूला जाऊन उभी केल्यावर तो जरासा (चमकून ) थांबला आणि मग 'रे-ब्यान' गोगल्स घातलेल्या रुंदावलेला गळा आणि गोलमटोल झालेल्या मला पाहून हसत हसत बोलला.. "अरे वाह प्रवाह! राजकारणाच्या चिखला मधे पडल्या नंतर तुझ्या प्रगतिचा प्रवाह तर विद्युतवेगी आहे. पुन्हा भेटू तेव्हा माझ्याशी बोलायला कदाचीत तुला तुझं प्लेन किंवा हेलीकॉप्टर खाली उतरवावं लागेल. पण त्याचा पेक्षा 'वरती' जाऊ नकोस नाही तर मी तिथे येइल तेव्हा आपण दोघे परत बरोबर होऊन जाऊ. तुझ्या रो हाउस ची हाल हवा कशी आहे?" "अरे! एम. एल. ए कधी रो हाउस मधे राहू शकतोस काय? आता तर स्वतंत्र बंगलाच घेतला आहे. हजार वाराच्या प्लॉट मध्ये चारशे वारच बांधकाम वाला. आजूबाजूला कोणत्याच शेजार्यांचा कलकलाट नाही. एकदम 'पीसफुल' ! चल येतोस का घरी ?" मी रुबाबात बोललो. "नाही मित्रा! आताच टी. वी. स्टेशन वर मुलांचा कार्यक्रम करवून निघालो आणि आता परत आपली चाळीतली मुल गोष्टी ऐकायला माझी वाट पाहत बसले असतील. ही माझी बस पण आली!" असे बोलत बोलत, झब्बा घातलेला किरकोळ शरीरयष्टीचा सुज्ञ, लगबगीने पळत बस स्टौप वर आलेल्या बस मध्ये चढला. त्या नंतर... ... त्या नंतर आजच मी आमच्या जुन्या चाळी मधे पाय ठेवला. मला बघून आश्चर्याने आनंदित झालेली, पंचेचाळीशीच्या वयामधे पण पंचविशीची नाजूकता असलेली सुज्ञाची पत्नी, सौम्या मला चाळीच्या दुसर्या टोकाला असलेल्या छोटा मैदाना मधल्या कडूलिम्बाच्या झाडा खाली खाट टाकून मंद मंद हवेत दुपारची झोप काढणार्या सुज्ञाकडे घेऊन गेली, तिने सुज्ञाला उठवल. "अरे अरे प्रवाह! आज उल्टा वाहून चाळीच्या अंधारात कसा काय आलास?" डोळे चोळत उठलेल्या सुज्ञाने मला प्रेमाने खाटे वर बसवल आणि आमच्या दोघांसाठी चहा-नाशता बनवायला जाणार्या सौम्याला थांबवून बोलला "चहाच्या आधी प्रवाहचा तोंड गोड कर सुमी! " आणि मग माझ्या कडे बघून बोलला "आज चांगल्या दिवशी तू आला आहेस प्रवाह! सकाळीच माझ्या लहान मुलाचा एम. बी. बी. एस चा रिझल्ट आलाय. तो फर्स्ट क्लास मधे पास होऊन डॉक्टर झालाय. मोठा तर केमिकल इंजीनियर आहे बडोदा मधे, ते तुला माहित आहेच! बोल, कसा काय आज ह्या बाजूला? तुझ्या सारख्या बिझी राजकारणी व बिझिनेसमेनला अशीच फुरसत तर मिळणार नाही ह्या बाजुला यायची? " "खरं सांगतोय सुज्ञ ! मी 'बिझी' नाही पण 'ओवर बिझी' आहे. गुंडागर्दी आणि चुकीच्या लाईन वर गेलेली माझी दोन्ही मुलं कॉलेजच्या मौजमजेतून बाहेर नाही येत आणि राजकारणाच डावपेच व धंद्याचा भार एकटा खेचून दमलो आहे रे मित्रा! अनिद्रेचा पण रोग झाला आहे, इंसोमेनिया! मी रात्री पण झोपू नाही शकत. माझ्या बंगल्याच नाव ' पीस पेलेस' आहे पण माझ्या मनाला आजीबात शांती नाही. तुला भर दुपारी ह्या कडूलिम्बाच्या झाडा खाली एवढ्या आवाजा मध्ये पण गाढ झोपताना बघून मला तुझं हेवा वाटतोय, सुज्ञ. मी तर 'पीस पेलेस' च्या आलिशान AC रूम मधे पण पूर्ण रात्र झोपू नाही शकत. एका तांत्रिक ज्योतिषांनी मला सांगितला कि तो कोणती विधी करून देयील आणि मी अंबाजीला ८ पौर्णिमा जाऊन आलो तर माझा अनिद्रेचा रोग दूर होईल आणि मनाला 'पीस' (शांती) पण मिळेल. म्हणून कंपनी म्हणून तुला अंबाजीला माझ्या बरोबर घेऊन जायला आलो आहे. तू येशील ना माझ्या बरोबर? यु आर अ गुड जोयफुल कंपनी !" "त्याचा तर प्रश्नच नाही प्रवाह! हा फकीर तर आताच खाटे वरून उभा होऊन तुझ्या बरोबर यायला तय्यार आहे. पण तू जर अस समजत असशील की अंबाजीचा नवस करून किंवा तिथे जाऊन तुला 'पीस' मिळणार आणि तुझा अनिद्रेचा रोग दूर होणार, तर ती तुझी चुकी आहे." "तर मग मी काय करू? जर मी झोपू नाही शकलो तर मी वेडा होऊन जायील सुज्ञ !" "अरे वेडा तर तू आहेसच. तुला 'पीस' पाहिजे आणि तू स्वताच एवढ्या पिसेस मध्ये विभागाला गेला आहेस की 'पीस'(शांती) तुझा पर्यंत पोचणार कसी? कारण 'पीस' हे कोणत्या 'पीसफुल' बंगला मधे किंवा अंबाजीच्या द्वारे मिळणारी वस्तू नाही, ते तर मनाच्या आत मधली मिळकत आहे आणि तू नेहमी पिसेस (टुकडयात) राहून बाहेरच पळत राहिला आहेस. चिखली राजकारण, काळे पैसे - खरे पैसे, बंगला, गाडी, दारू, स्त्री, पद-प्रतिष्ठा, हॉटेल्स, क्लब्स ! आत मधून किती तुकड्या मधे वाटला गेला आहेस तू? धावपळीच्या या सगळ्या तुकड्यांना दूर करून, समग्र बनलेल्या या जीवनाच्या प्रवाहात एक स्वच्छंद वाहणारा झरा जो पर्यंत नाही बनणार तो पर्यंत कोणताच 'पीस पेलेस' किंवा कोणत्याच माताजी तुला 'पीस' नाही देऊ शकणार आणि तुझ्या अनिद्रेचा रोग नाही दूर करू शकणार." "मृत्यु, सगळ्यांसाठी जो शेवट आहे तो तुझ्या साठी पण असेल तर हे बाहेरच्या पळापळीचा काही अर्थ आहे का, प्रवाह? आठवतंय, आपण शाळेत मुलांना टोलस्टॉयची गोष्ट सांगायचो 'एका माणसाला किती जागा पाहिजे?' चालणारया किंवा पळणार्या सगळ्यांना जीवन पोचविणार तर एका जागे वरच. तर मग पिसेस मधे वाटून त्रासदायक शर्यतीमधे पळण्या पेक्षा स्वच्छंद पने पीसफुल चाल चालून मुर्त्युच्या महापीसच्या मेहेफील मधे शामिल हो. बाकी तुझी मर्जी, मी तर तुझ्या बरोबर अम्बाजीला यायला तयारच आहे. पण तुझ्या जिंदगीची हि बाजी अम्बाजी नाही तर तुला स्वतःलाच खेळायची आहे. " ... आणि त्याच क्षणी मी विचार केला की मी जत्रेला जाणार पण अंबाजीची नाही. आत मधल्या जत्रेला; जिथे माझ्या अस्तित्वाचे अस्तव्यस्त पसरलेले सगळे पीसेस एक अखंड आनंदपूर्ण पीसफुल पीस बनण्याची वाट पाहत आहेत. ... तर आता तुम्हाला माझ्या मित्र सुज्ञ ह्याचा बद्दल आधी सांगितलेली गोष्ट कळाली ना?? साभार: मुळ लेखक नसीर इसमाइली यांच्या गुजराती कथेचा मराठीत स्वैर अनुवाद
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचन संख्या 2581
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

छानच कथा. आवडली. अं......विलासराव देशमुखांची आठवण का यावी मला ?

अनुवादाचा प्रयत्न केलात त्याबद्दल अभिनंदन. मराठीचं वळण काहीकाही ठिकाणी गडबडलं आहे. वाक्यरचना / शब्दरचना अनेक जागी खड्यासारखी दाताखाली येते आहे. (काही माणसाचं अजब असतात, त्या व्यक्ति प्रती तुमच आकर्षण, छोटीसं दुकान, शिक्षकची नोकरी, मी तिथे येइल तेव्हा आणि अनेक) बाकी कथेविषयी बोलायचं तर कथेतली दोन्ही पात्रं एकेका टोकाची आहेत. यातलं मधलं काहीतरी अचिव्ह करणं योग्य असतं असं वाटतं. चाळीतच राहणार्‍या "समाधानी" 'शिक्षक" माणसाच्या दोन्ही पोरांचं "केमिकल इंजिनियर" आणि "डॉक्टर" होणं बरंच काही बोलून जातं. अर्थात कथेतला भाबडेपणा हा मूळ कथालेखकाचा आहे, तुमचा नव्हे. एरवी शक्यतो अशी प्रतिक्रिया देत नाही पण इथे या प्रतिक्रियेने चांगला फरक पडेल असं तुमच्या प्रयत्नावरुन दिसतंय म्हणून..

In reply to by गवि

हेच टंकायला आलो होतो.(लेखातल्या भाषेच्या वळणाबद्दल). बाकी भागाबद्दलही (कथेच्या तात्पर्याबद्दल) हेच वाटत होतं; पण ते मात्र असं नेमकं नसतं सांगता आलं.

पहिला प्रयत्न स्तुत्य. भाषांतर करतान मूळ कथानकाबरोबरच दुसर्‍या भाषेचे शब्दसौंदर्यही सांभाळावे.

पहिला प्रयत्न चांगला आहे. थोड्या प्रयत्नाने तुम्ही नक्कीच स्वतंत्रपणे चांगलं लिहू शकाल! शुभेच्छा!

धन्यवाद मित्रानो ! पुढच्या वेळी लिहिताना मी नक्की भाषेचा सौंदर्य सांभाळायचा प्रयत्‍न करेल..