( अति सर्वत्र वर्ज्ययेत....
याबद्दल जे काही विस्कळीत विचार मनात आले. ते मांडण्याचा प्रयत्न केला आहे. चू.भू. द्या. घ्या.)
आपल्या संस्कृत भाषेत फार छान छान कोट्स आणि सुंदर अर्थपूर्ण अशी सुभाषिते आहेत. त्यातलं 'अति सर्वत्र वर्ज्ययेत' हे वाक्य पण फार छान आहे. म्हणजे कोणतीही गोष्ट अति करू नये.
अति राग, अति लोभ, अति काटकसर, अति द्वेष, अति चिंता ..... अशी कोणतीच गोष्ट अति करू नये. एवढचं काय तर अति प्रेम(आंधळं प्रेम), अति काळजीही करू नये.
अति चिंता:
चिंतेबद्दल तर काय सांगावं. असं म्हणतातच ना की चिता मनुष्याला मेल्यानंतर जाळते, तर चिंता जिवंतपणी जाळते. मनुष्य प्राणी सतात कशाना कशाची चिंता करत रहातो. शिक्षण झालं की नोकरी मिळेल का. नोकरी मिळाली की गाडी घ्यायला जमेल का. गाडी घेतली की घर घ्यायचे जमेल का. & सो ऑन....
भविष्याची चिंता करता करता वर्तमान हातून निघून जात असते. आणि कशाचीही चिंता करून समस्या/प्रॉब्लेम तर सूटणार नसतो. याचा अर्थ काहीच करू नये. स्वस्थं बसावं असं मुळीच नाही. तर आपल्या हातात जे जे करणं शक्य आहे ते ते करावं समस्या सोडवण्यासाठी. पण नंतर ईश्वरावर काळजी सोडून द्यावी. (ज्यांचा ईश्वरावर विश्वास नाही त्यांनी नुसतीच काळजी सोडून द्यावी ;-)) ज्या गोष्टींवर आपला कंट्रोल नाही त्याची चिंता करू नये. पण त्याला सामोरे जायची तयारी ठेवावी.
माझी एक मावशी नेहमी म्हणते, कोणताही प्रॉब्लेम आला की त्यातून जास्तीत जास्त (वाईट) काय होईल याचा विचार करावा. कोणी फाशी तर देणार नाही ना, जीव तर जाणार नाही ना. मग झालं तर. मग टेन्शन कशाला घ्यायचे. मला तिचा हा फंडा खूप आवडतो. त्यात काही खूप अवघड, समजायला बोजड असं तत्त्वज्ञान नाही. पण एक दिलासा नक्की आहे. पेपरमध्ये छोट्या छोट्या कारणावरून आत्महत्त्या करणारे लोक पाहिले की अगदी हेच वाटतं की बाबानो आपला जीव सगळ्यात महत्त्वाचा/मोलाचा. त्याउपर काही नाही. त्याहून महत्त्वाचं काही नाही.
अति रागः
राग हा तर सगळ्यात वाईट. रागाच्या भरात केलेलं कोणतही कृत्य अतिशय चुकीचं होतं असत, त्यानं असं कृत्य करणार्याचचं अतोनात नुकसान होतं असतं आणि नंतर पश्चात्ताप होऊन काही उपयोग नसतो, झालेलं नुकसान/हानी बरेच वेळा भरून येणारी नसते. टोकाचा राग आला की पहिली गोष्ट काय होत असेल तर आपली सारासार विचार करण्याची शक्ती संपते. आणि आपण रागाला कंट्रोल करण्याऐवजी तोच आपल्यावर स्वार होतो. आणि मग आपण विचार न करता वागतो आणि स्वतःच स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेतो. नंतर आपल्याला वाटतं रहाते, रूखरूख लागून राहाते की आपणं असं का बरं वागलो.
एखाद्या गोष्टीचा प्रचंड राग आला असता पहिलं काय करावं तर शक्य असेल तर त्वरित त्या वातावरणापासून दूर जावं. दुसरं म्हणजे कोणतेही टोकाचे विचार मनात आणू नयेत किंवा आलेच तरी त्या विचारांची निदान अंमलबजावणी करू नये. हे बोलायला खूप सोपं आहे आणि करायला तितकचं जास्त अवघडं आहे. खूप अवघडं आहे. राग जाण्यासाठी काही वेळ जाऊ देणं आवश्यक आहे. 'काळ' हा खरचं बर्याच समस्यांवर इलाज आहे. मन थोडं शांत झालं की ज्यामुळे आपल्याला इतका राग आला त्या परिस्थितीचा शांतपणे विचार करावा. आणि नीट विचार करून ठरवावं की ही परिस्थिती कशी हँडल करावी. शांत झाल्यावर आपल्याला नीट सुचतं की काय करावं आणि मग आपण ती परिस्थिती जास्त चांगल्या प्रकारे हाताळू शकतो.
अति लोभ/हावः
माणसाच्या जीवनात गोल्स नक्कीच महत्त्वाचे आहेत. पण त्याबरोबरच समाधानही तितकेच महत्त्वाचं आहे. या दोहोंचा नीट ताळेबंद ठेवता आला पाहिजे. म्हणजे महत्त्वाकांक्षा असणं चांगलं पण अति महत्त्वाकांक्षा नको. म्हणजे अभिमान आणि गर्व यातला जो सूक्ष्म फरक आहे तोच फरक या दोहोंत आहे. जीवनात गोल्स/एम्स असावेत आणि त्यासाठी भरपूर प्रयत्न, कष्ट करत राहिले पाहिजेच. पण जे आतापर्यंत मिळालं आहे त्याचीही किंमत असली पाहिजे आणि त्याबद्दल समाधानही वाटले पाहिजे. ज्या गोष्टी आपल्याला मिळाल्या आहेत, त्या गृहित धरता कामा नये. त्याची कदर असली पाहिजे. म्हणजे अर्धा भरलेला ग्लासही पाहिला पाहिजे. थोडक्यात सकारात्मक दृष्टीकोन (पॉसिटीव्ह अॅटिट्यूड) पाहिजे. मधे एक खूप छान कोट वाचनात आली. Being happy does not mean you have it all... It means being thankful to the lord for all you have
आणि जीवनात जे मिळवायच आहे ते स्वत:च्या बळावर मिळवावं. त्यासाठी कष्टाला, प्रयत्नांना पर्याय नाही. आणि असं स्वकष्टार्जित काही जेव्हा मिळतं, आपल्या कष्टाचं फळ मिळत, त्याची गोडी काही औरच असते.
(जर हे लिहिलेलं आवडण्यात आलं तर टी.बी.सी. ;-))
वाचने
8919
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवडण्यात आलं.
असहमती
आवडलं
टी.बी.सी. म्हणजे काय ? रागावर
To Be Continued...
In reply to टी.बी.सी. म्हणजे काय ? रागावर by सस्नेह
लेखन आवडले.
छानच लिहलंय. याच्यापुढचंही
मग राखी मिळते (आता बांधायची
In reply to छानच लिहलंय. याच्यापुढचंही by किसन शिंदे
अति सर्वत्र
अति शहाणा त्याचा बैल रिकामा
In reply to अति सर्वत्र by मनीषा
अति शहाणा त्याचा बैल रिकामा
In reply to अति शहाणा त्याचा बैल रिकामा by पुण्याचे वटवाघूळ
योग
+१
In reply to योग by विकास
(No subject)
अति सर्वत्र आचरेत्....
सतराव्या शतकात ...(-१)
In reply to अति सर्वत्र आचरेत्.... by मन१
?
In reply to सतराव्या शतकात ...(-१) by विटेकर
-
विचार आवडले
अति छान!
एकदम मान्य
आवडले.
धन्यवाद. प्रतिक्रियांबद्दल
अति तेथे
<<अति झाले हे सापेक्ष
रजनीश म्हणतात्. एखादी गोष्ट