पृष्ठप्रांगण अर्थात ब्याकग्रौंड :
शुक्रवारी अर्थात २४ आगष्टास संध्याकाळी ६ वाजता केसरीवाड्यात प्रत्यक्ष लोकमान्य टिळकांचा आवाज असलेली ध्वनिफीत ऐकायला मिळणार आहे अशी बातमी ईईई सकाळात बुधवारी वाचली. मग म्हटले प्रत्यक्ष लोकमान्यांचा आवाज ऐकायला गेलेचि पाहिजे. गेलो मग केसरीवाड्यात.
प्रसंग होता २१ सप्टेंबर १९१५ रोजी केसरीवाड्यातील गणेशोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या एका गायन समारंभाचा. बालगंधर्व, भास्करबुवा बखले आणि मास्तर कृष्णराव असे एकसे एक डॉन डॉन लोक बोलावले होते, लै गर्दी जमली होती. तशी आपल्या इथली लोकं अडगी ती अडगीच-मग काळ कुठलाही असो. उगीच दंगा करू लागली. मग लोकमान्यांनी सर्वांना कडक तंबी दिली आणि शांत बसवले ; शिवाय गायनकलेबद्दल छोटेसे भाष्यदेखील केले. त्या कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग झाले त्यात हे अवघ्या एका मिनिटाचे नाट्यदेखील कॅप्चर झाले.
तर मग डॉट्ट सहा वाजता पोहोचलो. केसरीवाड्यात फुल्टू गर्दी . आयबीएन सेव्हन वैग्रे च्यानेलांचे प्रतिनिधी हजर होते. काही पोलीसपण होते. नंतर कळाले की निखिल वागळ्यांची सुधीर गाडगीळ मुलाखत घेणारेत. आधीच तिथे बसायला जागा नव्हती, म्हटलं आयच्या गावात आता २ तास उभारून पायांचा भुगा झाला की मग शेवटी ऐकवतील, पण सुदैवाने त्या मुलाखतीच्या आधीच ऐकायला मिळाली. शेवटी मग लोकमान्यांचा आवाज ऐकला आणि अंगावर एक शहारा उठला. तोच हा आवाज ज्याने "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच" हा नारा देऊन इंग्रजांना कळायचं बंद करून सोडलं होतं. निव्वळ योगायोगाने आणि सेठ नारंग यांच्या गायनप्रियतेमुळे आज हा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला.एकदम ती मधली ९७ वर्षे जणू गायब झाली आणि मी २१ सप्टेंबर १९१५ ला केसरीवाड्यात पोहोचलो.
" आजचा कार्यक्रम गणपतिउत्सवाचा आहे. ठरल्याप्रमाणं गायनाचार्य बखलेबुवा यांचं .... गायन सुद्धा लोकांनी शांतपणे ऐकावं, अशी माझी इच्छा आहे. कुणी गडबड केली, तर मी ऐकून घेणार नाही. लोकांनी बाहेर जावं.पण ठरलेला कार्यक्रम झालाच पाहिजे अशी माझी इच्छा आहे. भास्करबुवांच्या गाण्याबद्दल, मला काही जे वाटतं, ते वाटतं म्हणजे असं, की माझ्या मते तथापी ही कला मोठी आहे, .........अन् ते काही खोटं नाही. तेव्हा त्याच्याबद्दल मला अभिमान आहे की मी जरी मी गाणं शिकलो नाही, तथापी त्या ......बद्दल विचार करावा असं मला वाटतं आणि म्हणून भास्करबुवांसारख्यांना मी इथे ... दिली आणि बुवा जर इथे आले , अन कार्यक्रम .......झालेला आहे .....उत्तम प्रकारे काम केलेलं आहे, तेव्हा सर्वांतर्फे मी त्यांचे आभार मानतो, आणि गणपतीनं प्रत्यक्ष..... चा अर्थ लावून गावं असं मला वाटतं, इतकं बोलून मी आपली सर्वांची रजा घेतो."
(एकदा ऐकल्यावर परत वन्स मोर च्या गजरात ध्वनिफीत पुन्हा एकदा चालवली गेली. पुन्हा एकदा ऐकल्यावर मग सटकलो तिथून. तसेही एकदा लोकमान्यांचा आवाज ऐकल्यावर वागळे आणि गाडगीळ काय दिवे लावणारेत हे ऐकायची बिल्कुल इच्छा नव्हती.)
ध्वनिफीत इथेच संपली, पण मन अजूनही भूतकाळातच वावरत होते. रत्नागिरी, पुणे, मग पितृनिधन, केसरीची स्थापना, मंडाले, जहाल-मवाळ दरी, होमरूल चळवळ, या सार्या घटना क्षणार्धात डोळ्यांपुढे तरळून गेल्या आणि दिसले ते अडिग, अविचल असे लोकमान्य.ध्वनिफितीसारख्या या छोट्याछोट्या गोष्टीदेखील, भूतकाळ आणि वर्तमानकाळ या संज्ञा भास आहेत हे जणू सिद्ध करतात. एक ऑडिओ लोकमान्यांपर्यंत नेतो; एखादे चिटोरे डायरेक्ट छत्रपतींपर्यंत नेते. मधला एवढा मोठा काळ जणू विरुनच जातो आणि ती काळाच्या पडद्याआडची माणसे जिवंत होऊन समोर दिसू लागतात - अगदी हरितात्यांना जसे छत्रपती दिसत तसेच. आणि मग हरितात्यांच्या वागण्यातले मर्म कळते.
कैकवेळेस इष्टमित्र विचारतात, काहीजण खिल्लीदेखील उडवितात. या जुनाट गोष्टींमध्ये काय गाठोडे ठेवले आहे ते त्यांना उमजत नाही आणि त्यांना का उमजत नाही ते मला समजत नाही. पण ती अर्धवट नष्ट झालेली पत्रे , ते देवळाबाहेरचे एकाकी वीरगळ, किल्ल्याचे बुलंद बुरुज, म्हणजे टाईम मशीनची पोर्टल्सच जणू. त्यांच्याशी बोलावे तितके कमीच हे त्या वर्तमानातदेखील पुरतेपणी न रमणार्यांना कसे कळणार? एका पत्राआडून छत्रपती आम्हां रयतांची काळजी घेताहेत, तर दुसर्या पत्रातून सखारामबापू २२ मोगली सुभ्यांचा हिशेब सांगून मराठ्यांचे सामर्थ्य अधोरेखित करताहेत, तर एखाद्या जीर्ण दासबोधाच्या पोथीआडून सस्मित वदनाने समर्थ "गोष्टी युक्तिच्या चार" सांगताहेत. आता इतके लोक संवादोत्सुक असताना इथे रमू नाहीतर कुठे? हेच आमचं फेसबुक आणि हेच आमचं ट्विटर.
असो. अजून विस्कळीत होण्याआधी थांबतो.
वाचने
6347
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
लेख आवडला..
ओह सॉरी ते लिहायचे विसरलो
In reply to लेख आवडला.. by अनिता
अप्रतिम लेख!
+१
In reply to अप्रतिम लेख! by दिपोटी
जमलंय हो हरितात्या,
+१. मस्त लिहीले आहेस रे.
In reply to जमलंय हो हरितात्या, by इनिगोय
काल कधी नव्हे ते झी २४ तास
मस्त रे
लोकमान्य...
टु गुड
In reply to लोकमान्य... by मन१
ही ही ही ही लै भारी!
In reply to टु गुड by अमोल खरे
आवडलं...
१+
In reply to आवडलं... by नीलकांत
+२
In reply to आवडलं... by नीलकांत
असंच काहीसं पहिल्यांद्या
In reply to आवडलं... by नीलकांत
तूनळीवरती हे रेकॉर्डिंग
धन्यवाद
पुन्हा एकदा इतिहास
अप्रतिम!
सहीच लिहिलस
In reply to अप्रतिम! by पैसा
भाग्यवान आहात.
+१ असेच म्हणते यूट्यूबचा दुवा
In reply to भाग्यवान आहात. by प्रभाकर पेठकर
लेख , दुवा आणि आभार !
कॉलींग थत्ते चाचा, कॉलींग
In reply to लेख , दुवा आणि आभार ! by तर्री
सकाळच्या बातमीत लिहिले आहे की
लेख आवडला..
ग्रेट!!!
अप्रतीम लिहिलं आहेस, मित्रा!
भावना सुंदररित्या मांडल्या
मस्त
जाउ द्या हो त्यांना.............
खुपच छान मांडलेल्या भावना.
बातमी
रोचक आहे. धनंजय यांनी माझ्या
In reply to बातमी by नितिन थत्ते
+१