
साहित्यः
मटण १/२ किलो
डालडा तुप २ डाव
कांदे ४ नग
टोमॅटो ४ नग
मीठ चवीनुसार
आलं ४ इंच
काळीमिरी ७ ते ८
शाहिजीरं १ लहान चमचा (टी स्पून)
हळद १ लहान चमचा
काश्मिरी मिरची पावडर ३ मोठे चमचे (टे. स्पून)
गरम मसाला १ लहान चमचा
फेटलेले दही १ वाटी
कसूरी मेथी पावडर १ लहान चमचा
कोथिंबीर मुठभर.
तयारी:
कांदे लांब आकारात चिरून घ्या.
टोमॅटो लांब आकारात चिरुन घ्या.
कोथिंबीर बारीक चिरुन घ्या.
आलं काड्यापेटीच्या काडी प्रमाणे चिरुन घ्या.
वरील पैकी अर्धे कांदे (२ नग) सोनेरी रंगावर तळून त्याची थोडेपाणी घालून मिक्सरवर वाटून पेस्ट करून घ्या.
कृती:
एका मोठ्या कढईत मटण, लांब आकारात चिरलेले कांदे, लांब आकारात चिरलेले टोमॅटो, थोडं सजावटीसाठी ठेवून बाकीचं चिरलेलं आलं, आणि १ वाटी पाणी घालून मध्यम आंचेवर, कढईवर झाकण ठेवून शिजावयास ठेवा.
मधे मधे हलवून पाण्याचे प्रमाण तपासत राहा. साधारणपणे अर्धातास ते चाळीस मिनिटांत मटण मऊ शिजेल. आता त्यात मीठ घाला.
एखाद्या चिमट्याने (पापडाचा) किंवा काट्याने मटणाचे तुकडे एखाद्या पातेल्यात काढून बाकी कांदा-टोमॅटोचा चोथा गाळून ते गाळलेले पाणी घ्या. चोथा चांगला दाबून सर्व पाणी/रस काढून घ्या. चोथा फेकून द्या.
कढई धूवून पुन्हा गॅसवर ठेवा. त्यात २ डाव तुप घालून तुप तापले की त्यात काळीमिरी आणि शाहिजीरे घाला. ते तडतडले की, गॅस बारीक करून, त्यात काश्मिरी तिखट, हळद घालून परता.
आता तळलेल्या कांद्याची पेस्ट, फेटलेले दही घालून परता. मसाल्याला तुप सुटायला लागले की मटण आणि मटणाचे पाणी त्यात घाला. आता गॅस मोठा करुन परतत राहा. सजावटीसाठी थोडी कोथिंबीर बाजूला ठेवून बाकी सर्व मटणात घाला. पाणी आटून रस्सा दाट झाला, तुपाचा तवंग वर आला की गरममसाला आणि कसूरी मेथी पावडर घालून मिसळा आणि गॅस बंद करा.
एका बाऊलमध्ये मटन काढून त्यावर कोथिंबीर आणि आल्याच्या काड्या घालून सजवा. कडाई गोश्त तयार आहे. पोळी, परोठा, तंदूर रोटी, नान किंवा वाफाळणार्या भाता बरोबर आस्वाद घ्या.
शुभेच्छा....!
इतका देखणा पदार्थ केला आहे की
In reply to इतका देखणा पदार्थ केला आहे की by रेवती
शाकाहारी..
व्वा!
आहाहाहाहाहाआहाहाहाहा
नक्की करुन बघणार. मटण म्हणजे
In reply to नक्की करुन बघणार. मटण म्हणजे by शिल्पा ब
बकरा / बकरी . शुद्ध अमेरिकन
सुंदर दिसतंय
In reply to सुंदर दिसतंय by पैसा
जास्त चांगलं असं आमचं
In reply to सुंदर दिसतंय by पैसा
हरकत नाही पण ....
In reply to हरकत नाही पण .... by प्रभाकर पेठकर
तुपाची मात्रा कमी करावी लागेल हे मान्य.
In reply to तुपाची मात्रा कमी करावी लागेल हे मान्य. by चिंतामणी
मीही तुपात बनवणे अधिक पसंत
In reply to तुपाची मात्रा कमी करावी लागेल हे मान्य. by चिंतामणी
कडाई गोश्त भन्नाट दिसत आहे
एकच फटू टाकला असला तरी हरकत नाही.
तोंडाला पाणी सुटले आहे.
स्स्स्स्स्
टॉप्स
In reply to टॉप्स by विनायक प्रभू
उत्तर...
झक्कास!!!
किती देखणा आहे फोटो तो!
आवडला.
काका
In reply to काका by jaypal
शेवटी..
चमचमीत , जिभेचे चोचले
मस्त....एकदम झक्क्कास
काक्का....................
एक नं !
In reply to एक नं ! by कपिलमुनी
हो.. शिजते.
एकदम साग्रसंगीत
ती पाहताच पाकृ, कलिजा खलास
झक्कास पाकृ
धन्यवाद.
फारच छान..