विक्षिप्त ह्यांच्या गजलेचा 'कहर' बघून आसपासच्या आफिसातील काही नमुने डोळ्यांसमोर चमकले! ;)
टंच आहे टंकणारी बांधणीला
ढेर-टकल्या सायबाच्या दावणीला
आडलो नाही तसा मी बोलताना
आडला येऊन हुद्दा ऐरणीला
काय सांगू कहर हा झाला कशाने
का पुढे बसवून गेली ढापणीला?
ओठ मादक, केवढा अन् रंग त्यावर
बोलवी साहेब कसल्या चाचणीला?
ते भले मोठे नको रोखूस डोळे
संभ्रमी बघ कंप सुटतो पैरणीला
खोड 'रंग्याची' जुनी नाठाळ आहे
मार खाण्याची अखेरी वळचणीला
चतुरंग
वाचने
3663
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
क्या बात है !!!!!!
धन्यवाद!
In reply to क्या बात है !!!!!! by धमाल सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
हाहाहा...
आयाययययाआ....
In reply to हाहाहा... by प्राजु
ज ह ब ह रा हा
सुधारणा सुचवल्याबद्दल धन्यवाद बेला!
In reply to ज ह ब ह रा हा by बेसनलाडू
वा!!
अरे वा, गुर्जींकडून आज छड्या नाही खाव्या लागल्या!
In reply to वा!! by केशवसुमार
खी खी खी :)
जबरदस्त
टंच टंकलेखिका आवडल्याचे कळविणार्या