Skip to main content

दु:खाचे निखारे

लेखक गणेशा
गुरुवार, 23/08/2012 या दिवशी प्रकाशित केले.
भिजल्या डोळ्यासही ना काही वाटले गालावर अमुर्त दु:ख ओघळले कोवळे ना दिशा, ना आकार ना झंकार माहित ओठांत अव्यक्त शब्द अडकले सगळे सोनेरी दर्प घेवून अवतरली किरणे मायेचा अर्क दवबिदुंत पाझरे आसवांच्या मोत्यांची मजजवळ तोरणे हलकाच स्पर्श ओलसर, दु:खाचे निखारे कोमेजलेला गंध, झिजलेला वृ़क्ष ओघळणारे मेघतांडव नेत्रात लुप्त ना दिशा, ना आकार ना झंकार माहित भिजल्या डोळ्यासही ना काही वाटले ------ शब्दमेघ
लेखनविषय:

वाचने 1831
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

छान लिहिलंस!