भिजल्या डोळ्यासही ना काही वाटले
गालावर अमुर्त दु:ख ओघळले कोवळे
ना दिशा, ना आकार ना झंकार माहित
ओठांत अव्यक्त शब्द अडकले सगळे
सोनेरी दर्प घेवून अवतरली किरणे
मायेचा अर्क दवबिदुंत पाझरे
आसवांच्या मोत्यांची मजजवळ तोरणे
हलकाच स्पर्श ओलसर, दु:खाचे निखारे
कोमेजलेला गंध, झिजलेला वृ़क्ष
ओघळणारे मेघतांडव नेत्रात लुप्त
ना दिशा, ना आकार ना झंकार माहित
भिजल्या डोळ्यासही ना काही वाटले
------ शब्दमेघ
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1831
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
बर्याच दिवसांनी लिहिलंस,
+१
In reply to बर्याच दिवसांनी लिहिलंस, by प्रचेतस
+२ असेच म्हणते
In reply to बर्याच दिवसांनी लिहिलंस, by प्रचेतस
छान...
छान!
कविता आवडली.
बर्याच दिवसांनी लिहतोयस.
लय भारी रे...
आवडलं.. "ना दिशा, ना आकार ना
छान लिहीलंय.