सौ बरस गुज़रे रात हुए !
सौ बरस गुज़रे दिन हुए !.
परवा मी रात्री टी.व्ही बघत होते... हॉरर पिक्चर लागला होता...
तेव्हा मला सहजच भूत या विषयावर लिहावास वाटल ...
पांढरी साडी , प्रमाणाबाहेर लांबसडक मोकळे केस सोडलेले ( कोणते तेल वापरत होते काय माहित ??? :D ) ,
फारसा मेकअप नसलेला (दिसायला सुंदर पण मेकअप बिघडलेला :P )
हातात मेणबत्ती घेऊन जाणारी (कुठे जाते ती कुणास ठाऊक ??) ,
मग तिच्या गाण्याच्या आवाजाच्या दिशेने जाणारा नायक अस काहीस तर काही तंत्रमंत्राचा वापर करून घालवण्याचा प्रयत्न (आता बघा हं! जातात कि नाही कुणाला माहित नाही पण मांत्रिक आपला उगाचच प्रयत्न करतो. आणि उगाच TP करतो ;) :D )
पण काळापूर्वीची भूत अन आत्ताच्या काळाची भूत यात जनरेशन ग्याप आहे बर का :p ...
आता आपण काळापूर्वीची भूत कशी होती अगदी थोडक्यात पहिले ...
गेली ती भूत राहिल्या त्या फक्त खुणा ... आता आपण सध्याच्या काळातील पिक्चर बघू ....
आपण जेव्हा पिक्चर बघतो तेव्हा ठरलेले सीन असतात म्हणजे बघा .. एक सुनसान रस्त्यावर,
मोठा एकुलता एक बंगला .....
बरीच वर्षे कोणी राहत नसलेला....
जळमट लागलेली... आसपास दाट झाडी....
(लोकांना लोकांपासून लांब राहायला का आवडते कोण जाणे ???)
नायकाची गाडी अचानक बंद पडते.. अन तेही जवळच असलेल्या बंगल्यापाशी....
मग तो देखभाल करणारा वॉचमन येतो.....
तिथे असलेल्या वॉचमनला नायक सांगतो की, माझी गाडी बंद पडली आहे अन मला आजच्या रात्रीसाठी इथे थांबण भाग आहे .
अन त्यावर वॉचमन तिथे येणाऱ्याला सांगतो की
" साहेब इथे राहू नका .. हा भूत बंगला आहे , इथे आलेला कोणी जिवंत राहिला नाही अस काहीस सांगणार"
( पण स्वतः वॉचमन तिथे का राहतो ते कळत नाही अन तेही जिवंत कसा ....की भूतालाही वॉचमन लागतो हे आत्ताच कळल हाहाहा )...
अन त्या मध्ये असलेला नायक Crazy ..... हे ऐकून त्याला अजूनच उत्सुकता वाढत.... पण मला एक काळात नाही की तो वॉचमन एवढे सांगत असताना झक मारून त्याने विषाची परीक्षा का घ्यावी ?? असो त्याची मर्जी आता आपण काय बोलणार...... वॉचमनच न ऐकता ... शेवटी आत शिरतो ... बंगल्याला लावलेलं मोठ कुलूप काढून तो वॉचमन निघून जातो... मग तो पुरानी हवेलीत फिरून येतो. तिथे असलेले फोटो पाहतो ... ते सगळ झाल्यावर किचन मध्ये थोडी साफ सफाई करतो ... मग कॉफी बनवून निवांत बसतो ...... तोच त्याला कोणीतरी ओरडल्याचा आवाज येतो ... इकडे तिकडे पाहतो पण कोणीच दिसत नाही... अस साधारण पिक्चर मध्ये असत ... कधी कधी पिक्चर पाहताना त्या खुनाचा संशय तिथल्या प्रत्येक कॅराक्टर येतो ... जस की तिथे असलेला वॉचमनवर शक येतो ... कारण त्याच्या चेहऱ्यावरच भाव ही तसच असतात ... ते पाहून बघणारा म्हणलाच पाहिजे .... की बहुतेक हे घडण्याच्या पाठीमागे वॉचमनच जवाबदार असावा पण तो नसतोच..... ( एवढ पाहिल्यानंतर आपणच मूर्ख ....की उगाचच त्याच्यावर शक घेतला .... ) .... आता हे झाले आसपासच वर्णन पण आपल्या विषयातला भूताच काय ???
अहो विसरले नाही काय .... आता खरा पुढचा भाग गमतीशीर आहे तो वाचा .... सगळ्यात महत्वाच कॅराक्टर "भूत "... आता पाहू भूताची एन्ट्री..........
वारा येतो,
खिडक्या एकमेकांवर आदळतात,
झाडांच्या पानाची सळसळ
कीर्र्रर्र्र्रर्र असा आवाज कानी येण,
एकदम ७/८ वटवाघळ फडफडून जातात ,..
कुत्री भुंकतात,
फोटो जरासा हलतो / पडतो,
यात नायकच लक्ष असतानाच जोरात किंचाळल्याचा आवाज येत .. ज्या दिशेने आवाज येतो तो त्या दिशेने पळत जातो ... पण ५/१० मिनिट हे चालू असत .. मग अचानक हे सगळ शांत होत ... ( अरे आता हे काय चालू आहे सगळी फुकटची त्याची धावपळ.. तर कधी दिशाभूल करण... ). मला तर कधी कधी वाटत की भूतसुद्धा कहाणी सांगण्यासाठी योग्य माणूस निवडत असावा .(हाहाहा....) जेव्हा भुताला खात्री पटते तेव्हा त्याला अख्खी स्टोरी नायकाला सांगते....मग तर काय ते भूत अन तो नायकाची अगदी गट्टीच जमते ..मात्र त्याची धावपळ अन दिशाभूल करण हे सगळ थांबत ( हे भूत पण खूप डांबिस असतात :P) मग हे भूत नायकाच्या सहाय्याने खुनाचा बदला घेतात ... तेव्हा भुतांच्या आत्म्याला शांती मिळते ... यामध्ये नायक एका दिवसासाठी नुसत म्हणायला जातो पण भुताचा रिसर्च करूनच बाहेर पडतो.... :D अन भकास वाटणार घर जिवंतपणा असल्यासारखा वाटतो .. पण काय आहे न पिक्चर म्हणाले की काही चालत हो ...त्यात सगळ्यात Intresting म्हणजे गाणी... त्या गाण्याच्या आवाजात तर यामध्ये भूतांचे वर्चस्व दिसत.. त्यांची गाणी म्हणजे अगदी Silent Musicवर , अगदी दबक्या आवाजात , तर कधी ओरडल्यासारखे असते .. त्यात भूत कस असाव याचा अंदाज येत .. जर ते Silent Music असेल तर Innocent भूत असेल अन ओरडणाऱ्या किंवा कर्कश आवाजात गाणे असेल तर Agressive भूत ओर Possesive भूत(हे भूत म्हणजे बदला घेणारच या अविर्भावात हाहाहा ) असाव असा अंदाज हा एक गमतीशीर भाग आहे ...बरेच दिवस हे चालू असत......पण आजकालची भूत म्हणजे विचारू नका काळ बदलला भूतही बदलले .. काळापूर्वी साडी मेणबत्ती घेऊन फिरणारी भूत राहिले नाहीत ही भूत म्हणजे मानगुटीवर बसणारी , कधी कुणाच्या गाडीसमोर येतील .... तर कधी गाडी चालवणाऱ्याच्या मागे दिसतील ...
भुतांच्या गोष्टी या सिनेमात अथवा कथेत वाचायला बऱ्या असतात ... ही स्टोरी ...विनोदी ढंगाने लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. कदाचित तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा आहे ........
वाचन संख्या
4929
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
बरं ठीक आहे
हम्मम्म... !
अपेक्शाभंग....
In reply to हम्मम्म... ! by अत्रुप्त आत्मा
भक्तीभाव ( छे भूतभाव ! )
?
विषया इतकाच फनी लेख
स्वतःच्या लेखातल्या स्वतःच्या
In reply to विषया इतकाच फनी लेख by आदिजोशी
म्याडम.. हल्लीच्या भूतांचे
In reply to स्वतःच्या लेखातल्या स्वतःच्या by स्पा
हम्म्म
In reply to विषया इतकाच फनी लेख by आदिजोशी
एखादा 'हल्लीच्या भुतांचा
असो
कडवट पण सत्य आहे.
प्रतिक्रिया दिल्यावर वाचला
In reply to कडवट पण सत्य आहे. by वेताळ
महत्वाचे कॅरेक्टर
मला वाटले हल्लीच्या नविन