Skip to main content

हल्लीच्या भूतांचे हॉरर पिक्चर .......

लेखक कुलमयु
Published on शुक्रवार, 17/08/2012
सौ बरस गुज़रे रात हुए ! सौ बरस गुज़रे दिन हुए !. परवा मी रात्री टी.व्ही बघत होते... हॉरर पिक्चर लागला होता... तेव्हा मला सहजच भूत या विषयावर लिहावास वाटल ... पांढरी साडी , प्रमाणाबाहेर लांबसडक मोकळे केस सोडलेले ( कोणते तेल वापरत होते काय माहित ??? :D ) , फारसा मेकअप नसलेला (दिसायला सुंदर पण मेकअप बिघडलेला :P ) हातात मेणबत्ती घेऊन जाणारी (कुठे जाते ती कुणास ठाऊक ??) , मग तिच्या गाण्याच्या आवाजाच्या दिशेने जाणारा नायक अस काहीस तर काही तंत्रमंत्राचा वापर करून घालवण्याचा प्रयत्न (आता बघा हं! जातात कि नाही कुणाला माहित नाही पण मांत्रिक आपला उगाचच प्रयत्न करतो. आणि उगाच TP करतो ;) :D ) पण काळापूर्वीची भूत अन आत्ताच्या काळाची भूत यात जनरेशन ग्याप आहे बर का :p ... आता आपण काळापूर्वीची भूत कशी होती अगदी थोडक्यात पहिले ... गेली ती भूत राहिल्या त्या फक्त खुणा ... आता आपण सध्याच्या काळातील पिक्चर बघू .... आपण जेव्हा पिक्चर बघतो तेव्हा ठरलेले सीन असतात म्हणजे बघा .. एक सुनसान रस्त्यावर, मोठा एकुलता एक बंगला ..... बरीच वर्षे कोणी राहत नसलेला.... जळमट लागलेली... आसपास दाट झाडी.... (लोकांना लोकांपासून लांब राहायला का आवडते कोण जाणे ???) नायकाची गाडी अचानक बंद पडते.. अन तेही जवळच असलेल्या बंगल्यापाशी.... मग तो देखभाल करणारा वॉचमन येतो..... तिथे असलेल्या वॉचमनला नायक सांगतो की, माझी गाडी बंद पडली आहे अन मला आजच्या रात्रीसाठी इथे थांबण भाग आहे . अन त्यावर वॉचमन तिथे येणाऱ्याला सांगतो की " साहेब इथे राहू नका .. हा भूत बंगला आहे , इथे आलेला कोणी जिवंत राहिला नाही अस काहीस सांगणार" ( पण स्वतः वॉचमन तिथे का राहतो ते कळत नाही अन तेही जिवंत कसा ....की भूतालाही वॉचमन लागतो हे आत्ताच कळल हाहाहा )... अन त्या मध्ये असलेला नायक Crazy ..... हे ऐकून त्याला अजूनच उत्सुकता वाढत.... पण मला एक काळात नाही की तो वॉचमन एवढे सांगत असताना झक मारून त्याने विषाची परीक्षा का घ्यावी ?? असो त्याची मर्जी आता आपण काय बोलणार...... वॉचमनच न ऐकता ... शेवटी आत शिरतो ... बंगल्याला लावलेलं मोठ कुलूप काढून तो वॉचमन निघून जातो... मग तो पुरानी हवेलीत फिरून येतो. तिथे असलेले फोटो पाहतो ... ते सगळ झाल्यावर किचन मध्ये थोडी साफ सफाई करतो ... मग कॉफी बनवून निवांत बसतो ...... तोच त्याला कोणीतरी ओरडल्याचा आवाज येतो ... इकडे तिकडे पाहतो पण कोणीच दिसत नाही... अस साधारण पिक्चर मध्ये असत ... कधी कधी पिक्चर पाहताना त्या खुनाचा संशय तिथल्या प्रत्येक कॅराक्टर येतो ... जस की तिथे असलेला वॉचमनवर शक येतो ... कारण त्याच्या चेहऱ्यावरच भाव ही तसच असतात ... ते पाहून बघणारा म्हणलाच पाहिजे .... की बहुतेक हे घडण्याच्या पाठीमागे वॉचमनच जवाबदार असावा पण तो नसतोच..... ( एवढ पाहिल्यानंतर आपणच मूर्ख ....की उगाचच त्याच्यावर शक घेतला .... ) .... आता हे झाले आसपासच वर्णन पण आपल्या विषयातला भूताच काय ??? अहो विसरले नाही काय .... आता खरा पुढचा भाग गमतीशीर आहे तो वाचा .... सगळ्यात महत्वाच कॅराक्टर "भूत "... आता पाहू भूताची एन्ट्री.......... वारा येतो, खिडक्या एकमेकांवर आदळतात, झाडांच्या पानाची सळसळ कीर्र्रर्र्र्रर्र असा आवाज कानी येण, एकदम ७/८ वटवाघळ फडफडून जातात ,.. कुत्री भुंकतात, फोटो जरासा हलतो / पडतो, यात नायकच लक्ष असतानाच जोरात किंचाळल्याचा आवाज येत .. ज्या दिशेने आवाज येतो तो त्या दिशेने पळत जातो ... पण ५/१० मिनिट हे चालू असत .. मग अचानक हे सगळ शांत होत ... ( अरे आता हे काय चालू आहे सगळी फुकटची त्याची धावपळ.. तर कधी दिशाभूल करण... ). मला तर कधी कधी वाटत की भूतसुद्धा कहाणी सांगण्यासाठी योग्य माणूस निवडत असावा .(हाहाहा....) जेव्हा भुताला खात्री पटते तेव्हा त्याला अख्खी स्टोरी नायकाला सांगते....मग तर काय ते भूत अन तो नायकाची अगदी गट्टीच जमते ..मात्र त्याची धावपळ अन दिशाभूल करण हे सगळ थांबत ( हे भूत पण खूप डांबिस असतात :P) मग हे भूत नायकाच्या सहाय्याने खुनाचा बदला घेतात ... तेव्हा भुतांच्या आत्म्याला शांती मिळते ... यामध्ये नायक एका दिवसासाठी नुसत म्हणायला जातो पण भुताचा रिसर्च करूनच बाहेर पडतो.... :D अन भकास वाटणार घर जिवंतपणा असल्यासारखा वाटतो .. पण काय आहे न पिक्चर म्हणाले की काही चालत हो ...त्यात सगळ्यात Intresting म्हणजे गाणी... त्या गाण्याच्या आवाजात तर यामध्ये भूतांचे वर्चस्व दिसत.. त्यांची गाणी म्हणजे अगदी Silent Musicवर , अगदी दबक्या आवाजात , तर कधी ओरडल्यासारखे असते .. त्यात भूत कस असाव याचा अंदाज येत .. जर ते Silent Music असेल तर Innocent भूत असेल अन ओरडणाऱ्या किंवा कर्कश आवाजात गाणे असेल तर Agressive भूत ओर Possesive भूत(हे भूत म्हणजे बदला घेणारच या अविर्भावात हाहाहा ) असाव असा अंदाज हा एक गमतीशीर भाग आहे ...बरेच दिवस हे चालू असत......पण आजकालची भूत म्हणजे विचारू नका काळ बदलला भूतही बदलले .. काळापूर्वी साडी मेणबत्ती घेऊन फिरणारी भूत राहिले नाहीत ही भूत म्हणजे मानगुटीवर बसणारी , कधी कुणाच्या गाडीसमोर येतील .... तर कधी गाडी चालवणाऱ्याच्या मागे दिसतील ... भुतांच्या गोष्टी या सिनेमात अथवा कथेत वाचायला बऱ्या असतात ... ही स्टोरी ...विनोदी ढंगाने लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. कदाचित तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा आहे ........
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचन संख्या 4929
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

मला लेख आवडला. त्याचं काय आहे .असे सिनेमे त्या त्या भक्तीभावाने अरे चुकलो भूतभावाने पाहायचे मग भूताला वॉचमनची जरूर असते का असा प्रश्न पडत नाही.

भूत बित काही नसत ह्या जगात. सध्या मानसाला जिवंतपणी सवड नसते ,तेव्हा तो मेल्यावर कशाला रिकामे काम करेल.

स्वतःच्या लेखातल्या स्वतःच्या वाक्यांवरच स्वतः टिप्प्ण्या करू / हसू नये साहेब / मॅडम.

In reply to by आदिजोशी

स्वतःच्या लेखातल्या स्वतःच्या वाक्यांवरच स्वतः टिप्प्ण्या करू / हसू नये साहेब / मॅडम. खिक्क =)) हल्लीच्या भूतांचे हॉरर पिक्चर ....... म्याडम.. हल्लीच्या भूतांचे हॉरर पिक्चर यावर दुसरा भाग येणारे का.. नाय तुम्ही समद जुन्या जमान्यातल्या हरार पिक्चर चा वर्णन करून राहिलात ना, म्हणून इचारल बाकी लेक लैच "फन्नी " ब्वा

In reply to by स्पा

Cooking Up Spell म्याडम.. हल्लीच्या भूतांचे हॉरर पिक्चर यावर दुसरा भाग येणारे का.. नाय तुम्ही समद जुन्या जमान्यातल्या हरार पिक्चर चा वर्णन करून राहिलात ना, म्हणून इचारल त्या नविन रेसिपीच्या तयारीत असाव्यात... :D: :D: :D: Cooking Up Spell

In reply to by आदिजोशी

स्वतःच्या लेखातल्या स्वतःच्या वाक्यांवरच स्वतः टिप्प्ण्या करू / हसू नये साहेब / मॅडम.
नवलेखकांना प्रोत्साहन देत जा रे अ‍ॅड्या. नाहितर शिक्षा म्हणून एखाद्या संस्थळावरती संपादक करून टाकेन तुला. कलमुहा

एखादा 'हल्लीच्या भुतांचा हॉरर' चित्रपट घेऊन त्याचे विनोदी समिक्षण लिहिले असते तर कदाचीत जास्त चांगले लिहु शकला असता असं वाटतं. रेफरंस साठी फारएंड किंवा परांचे टुकार चित्रपटांचे समिक्षणपर लेख एकदा डोळ्यांखालून घाला.

आसाम, विलासराव, पुनर्जन्म, टिनपाट अशा गंभीर विषयांनंतर जरा हलकंफुलकं पाहिजेच ना! तुम्ही लिहीत रहा हो, ८३८ वाचने म्हणजे काय कमी झाली ?