श्रावणाच्या चिंब धारा
एका गाण्याची पहिली ओळ सकाळी गुणगुणली आणि आता कामात असताना कविता स्फुरली. इथे द्यायचा मोह आवरता आला नाही. श्रेय त्या ओळीला ( मिपाकर लगेच ओळखतील :) )
श्रावणाच्या चिंब धारा
अवचिता भेटीत या तू,
चांदण्यांचे गीत गावे
आणि गाताना हळूसे,
ऐकू माझे नांव यावे
मन्मनींच्या उंच लाटा
वादळाने वादळाव्या
सागरा रे चंद्रवेड्या
तू मला लिपटून घ्यावे
श्रावणाच्या चिंब धारा
आठवांशी दंग व्हावे
त्या खुणांनी, ओळखीच्या
अंग अंगी मोहरावे
धुंद वारा, बोचरासा
चेतवावा, देह सारा
झिलमिल्या या पावसाने
तव मिठीशी, चिंबवावे
बावरूनी सांज यावी
तू जरासे बावरावे
रात्र गेली रे सरूनी
हे तिला ना आठवावे
- संध्या
छान जमलीये,,,पण अजुन थोडं
मस्तच आहे... खुप आवड्ले....
छान कविता. मन्मनींच्या उंच
मला पुष्कळशी आवडली कविता !
आभार सर्वांचे