Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by सांजसंध्या on Fri, 08/10/2012 - 19:06
एका गाण्याची पहिली ओळ सकाळी गुणगुणली आणि आता कामात असताना कविता स्फुरली. इथे द्यायचा मोह आवरता आला नाही. श्रेय त्या ओळीला ( मिपाकर लगेच ओळखतील :) ) श्रावणाच्या चिंब धारा अवचिता भेटीत या तू, चांदण्यांचे गीत गावे आणि गाताना हळूसे, ऐकू माझे नांव यावे मन्मनींच्या उंच लाटा वादळाने वादळाव्या सागरा रे चंद्रवेड्या तू मला लिपटून घ्यावे श्रावणाच्या चिंब धारा आठवांशी दंग व्हावे त्या खुणांनी, ओळखीच्या अंग अंगी मोहरावे धुंद वारा, बोचरासा चेतवावा, देह सारा झिलमिल्या या पावसाने तव मिठीशी, चिंबवावे बावरूनी सांज यावी तू जरासे बावरावे रात्र गेली रे सरूनी हे तिला ना आठवावे - संध्या

Submitted by अत्रुप्त आत्मा on Fri, 08/10/2012 - 22:57

Permalink

छान जमलीये,,,पण अजुन थोडं

छान जमलीये,,,पण अजुन थोडं फिनिशिंग हवं आहे.म्हणजे त्यातली गेयता पण उत्तम प्रकट होइल. @एका गाण्याची पहिली ओळ सकाळी गुणगुणली >>> या काव्याचे/गीताचे मूळ अंतरंग- मलमली तारुण्य माझे.... हेच ना ?
  • Log in or register to post comments

Submitted by पक पक पक on Fri, 08/10/2012 - 23:01

Permalink

मस्तच आहे... खुप आवड्ले....

मस्तच आहे... :) खुप आवड्ले....
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Sat, 08/11/2012 - 08:57

Permalink

छान कविता. मन्मनींच्या उंच

छान कविता.
मन्मनींच्या उंच लाटा वादळाने वादळाव्या
इथे 'आदळाव्या' असं हवंय का?
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Sat, 08/11/2012 - 14:13

Permalink

मला पुष्कळशी आवडली कविता !

कवितेत योग्य शब्दांची योजना आता होत चालली आहेसे दिसतेय ! तरीही वल्ल्ली शी सहमत ! श्रावणाच्या चिंब धारा यात धारेचे विशेषण चिंब हे अर्थवाही वाटले नाही. धारा ज्याला ओले करते तो चिंब . उदा परिसर चिंब परिसर. जसे आर्द्र पाणी असे कसे म्हणता येईल ? आर्द्र घन असे म्हणता येईल. बाकी कविता फार नेटकी व मस्त ! सर्वात आवडलेली ओळ अवचिता भेटीत या तू, चांदण्यांचे गीत गावे आणि गाताना हळूसे, ऐकू माझे नांव यावे
  • Log in or register to post comments

Submitted by सांजसंध्या on Sun, 08/12/2012 - 21:23

Permalink

आभार सर्वांचे

आभार सर्वांचे :)
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 2069 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com