तू एखादा पाशवी धागा सुरू कर ग! मग बघ, आम्ही तुझ्या पाठीमागून आहोतच!
बाकी पाहुणे नी सगळ्या बायकांची व्यथा मांडली आहेच. त्याच्या विरुद्ध कोण काय लिहितो की काय तेवढं बघूयात!
पैसाताई, धन्यवाद!
तुम्ही ज्या पाशवी उत्साहाने माझ्यापाठी उभ्या राहता ते पाहून डोळे पाणावले.;)
चला येता का झाडावर? तुमच्यासाठी एका फांदीवर जागा व पॉपकॉर्न फ्री!
वनं नाहीशी झाली आहेत म्हणून वानप्रस्थाश्रम विसरला जातो. कुठे जाणार म्हातारे आई-बाप? तुम्ही त्याच्या वयाचे व्हाल तेव्हा कळेल.
बाकी प्रश्न उत्तम. मस्तानीशी सहमत.
मुलगा ऑफिस मधुन दमुन येतो. पण सुनेने रात्रिचा स्वयंपाक तरी घरी बनवायलाच हवा?
सुन जर घरीच टाईमपास करत असेल तर घरीच बनवावा..नाहीतर मुलगा ऑफिसमधून येईपर्यंत वाट पहावी आणि मुलगा आला की त्यालाच स्वयंपाक बनवायला सांगावे..नाहीतर त्याच्या आईवडीलांनी त्याला काहीच शिकवलेले नाही असे म्हणून त्याच्या समस्त कुळाचा उद्धार करावा.
बाकी तुमचे प्रश्न वाचाल्यावर एवढेच जाणवले की तुम्हाला सासरी खुप जाच झालेला दिसतोय..
बाकी तुमचे प्रश्न वाचाल्यावर एवढेच जाणवले की तुम्हाला सासरी खुप जाच झालेला दिसतोय..
तो जाच कमी करण्यासाठी त्याना अग्निहोत्र ही टीव्ही सिरीयल दाखवा म्हणजे सासूसासरे सूकत जाणार नाहीत
रुढी/परंपरा पुरुषांना सोयिस्कर आहेत म्हणुन अजुनही पाळल्या जाव्यात का?
>>> नाही
१. मुलीने लग्न झाल्यावर मुलाच्या घरी/सासरी रहायला जाणे
जर मुलगी (एकुलती एक असेल/फक्त बहिणी असतील तरीही) आपले घर सोडून येते तर मुलानेही त्याचे घर सोडले आणि दोघानी नविन संसार मांडाला तर एवढा गहजब का माजवला जातो. मी ऐकलेल्या काही प्रतिक्रिया "मुलीने घर तोडल", "मुलगा म्हातारया आई वडिला ना सोडुन गेला बायकोच्या मागे, आता ते बिचारे एकटेच राहतात", "या वयात किती हाल बिचारयांचे"
हेच विचार मुलीच्या आई वडिला ना लागू होत नाहीत का?
>> होतात लागू, परंतु बर्याचदा मुलीच्या घरचेच मुलीला सासरी राहण्यास सांगतात . माझ्या पाहण्यात तर एकही घर नाही तेथे घरजावइ आहे. सगळे सिनेमात्च पाहिले आहे. आणि घर जावइ असला कोणी तर उलट प्रश्न पण समाज विचारलेच
बायकोच्या मागे जाउन वेगळे राहणे (वेगळा संसार मांडने) .. आणि मुलगी सासरी जाणे ह्या वेगळ्या गोश्टी आहेत.
२. मुलगा म्हातारया आई वडिला सोबत रहतो तर तो कर्तव्यदक्ष, पण मुलगी तिच्या आई वडिला कडे लक्ष देत असेल तर "तीला अजुनही माहेरचेच कौतुक आता सासरी लक्ष द्यावे की थोडे"
>>> सासरी लक्ष न देता असे होत असेन तर माहेरचे कौतुक आहे असे बरोबर आहे.
दोन्हीकडे लक्ष देवून संसार चालला असेन तर उलट संसाराच्या कसरती मध्ये ही आइ वडिलांना न विसरणारी सुन आहे ... आणि म्हणुन आम्हाला ही काही काळजी नाही असेच वाटले पाहिजे सासुअ- सासर्यांना.
(मात्र माहेरी भाउ असेल तर त्याने लक्ष दिले की काम होते असे वाटते)
३. सासू-सासरे, मुलगा-सुन ला काहि सल्ला दिला तर "ते आपल्या अनुभवाचे फायदे देतात/ त्या घरातले संस्कार्/रुढी सांगतात." पण तेच मुली च्या आई वडिलानी काही सांगितले तर "ते यांच्या संसारात लुडबुड करतात"
>> संस्कारांची शिदोरी मोठ्यांकडुन घेत जावेच. आणि कुठली गोष्ट केंव्हा आणि कसी सांगावी हे ही कळाले की ती लुडबुड न होता मदत ठरते.
४. वानप्रस्थाश्र्म सोयिस्कर रित्या विसरला का जातो?
>> वानप्र्स्थास्रम म्हनजे काय हे खरेच माहित नाही.
५. मुलगा जन्माला आला म्हणजे "चला आता तुमच्या म्हातारपणा ची काठी झाली". मुल future investment म्हणुन जन्माला घालता का? की तुम्हाला पालकत्वा चा आनंद घ्यायचा आहे म्हणुन?
>> माझ्या पाहणीतील जवळ जवळ सगळे जण मुलगी पाहिजे म्हणुन हट्ट धरताना पाहिले आहे. आणि माझे सुद्धा तसेच असेन असे वाटते. आणि सुशिक्षित घरी मुली- मुले असा फरक आता होत नाही. त्यामुले काठी वगैरे काही माणत नाही कोणी आता. आणि आजकालच्या बर्याच काठ्या परदेशात जातात म्हन्जे सासरीच गेलेत मुले असे समजावे त्यांनी ही.
६. लग्न केवळ एक परंपरा आहे म्हणुन चेकलिस्ट बनवून मुलगा/मुलगी शोधावी का? कि तुम्हाला कोणी आवडते आणि तुम्हाला त्या माणसा सोबत आयुष्य घालवायला आवडेल म्हणून?
>> ज्यांना चेकलिस्ट बनवुन लग्न करायचे असते ती मुले तुमच्या सातव्या प्रश्नासाठी तसे करतात. आणि त्या मुली विजु भावुंनी जे उत्तर दिले त्या साठी करतात
७. housewife = free of cost (maid+prostitute+surrogate mother)?
>>> चेकलिस्ट बनवणार्यांची हीच अपेक्षा असते. त्यामुळे आपण कोणाच्या चेकलिस्ट साठी बनलो नाही जे जानुन आपल्या स्वखुशीने .. पाहिजेन तसा योग्य जोडीदार निवडावा म, हे प्रश्न पडणार नाहीत
८ . मुली financially independant झाल्याने आजकाल प्रोब्लेम्स खुप वाढले? की आता पर्यन्त मुली ना समाज फुकट राबवून घेत होता?
>>> समाज मुलींना खुप राबवुन घेत होता अआणि आहे. प्रत्येक घराचे कर्तव्य आहे आपल्या बायकोला/सुनेला व्यवस्थीत समान वागनुक द्य्वावी. मग ती नोकरी करणारी असो वा नसो.
9. जावई मुलिला घरकामात मदत करतो तर तो चांगला. पण मुलाने सुनेला मदत केली तर तो "बायकोचा गुलाम्/हातातले बाहुले"?
>>> अजुन पर्यंत असे जास्त माझ्या पाहण्यात आले नाही. अआणि नवरे बायकोला मदत करु शकतात हे वरील वाक्याने ५० % तरी सिद्ध झाले हेच बरे वाटले. बाकी बाहुले वगैरे काही नसते .. प्रत्येक नवर्याने हातभार लावावा कामाला असे वाटते.
१० मुलगा ऑफिस मधुन दमुन येतो. पण सुनेने रात्रिचा स्वयंपाक तरी घरी बनवायलाच हवा?
मुलगा खाण्यापिण्या चा षौकिन. पण बनवून देणार बायकोच?
>>> स्वयपाकाला लागणारी मदत त्याने केल्यास उत्त्म,
पण सासु ही घरात मोकळॅए असेन तर तीच सुन येइ पर्यंत बरेच काम करते .. त्यामुळॅ सासु नसताना .. नवर्याने स्वयपाक जमला अनही तरी त्या साठीची सगळी मदत बायकोला करावी .
जो तो ज्याचं त्याचं बघुन घेईल. आपण कशाला विचार करायचा त्याचा. आणि विवाह समुपदेशक, वेड्यांची इस्पितळे, पोलिस, न्यायालय आहेतच ना.
(सुधारित व्यावहारिक) इंट्या.
बायको नाही पण सध्या तीन उमेदवार आहेत, त्यापैकी जी योग्य वाटेल तिला बायको या पदावर पदोन्नती देण्यासंबंधी निर्णय घेईन.
क्रमांक एक - इंदिरा गांधी रा. मु. वै.
क्र. दोन - क्लासेस
क्र. तीन - माझी सोसायटी.
अगला सवाल? शिल्पा जी?
क्र. १ - पुढच्या वर्षी कावळ्याबरोबर तुझा फोटु लावावा लागेल.
क्र. २ - तुझे विद्यार्थी पण पाणवठ्यावर जायला लागतील.
क्र. ३ - सोसायटीत एवढी भांडणं असतात, की भीक नको पण कुत्रा आवर म्हणायची वेळ येते.
(क्लासमधे कोण आहे, सोसायटीत कोण आहे, ही अवांतर माहिती दिलीस तर काहीतरी बोलू शकते.)
(ह.घे.)
पाहुणे, तुम्ही टाइम ट्रॅवल करून २०१०-११ मध्ये आलात तर यातील अनेक प्रश्न सुटलेले दिसतील. सुटलेले प्रश्न बाजूला टाकून मग नवीन प्रश्न घालून ही यादी अपडेट करता येईल. मग त्यावर चर्चा करता येईल.
(सुधारक)बेसनलाडू
सध्याच्या यादीतील पाहुण्यांचे काही प्रश्न टाइम ट्रॅवल ने सुटले की मीच नवीन काही प्रश्न सुचवून यादीची सुधारीत आवृत्ती देतो. म्हणजे तर मग झाडावर चढायची शर्यतच लागेल ;)
(वृक्षवल्लीप्रेमी)बेसनलाडू
हे टाइम ट्रॅवल कसे करतात हो? किती तिकिट असेल ?
मला माझ्या काही 'विशिष्ट' नातेवाईकांना पाठवायचे आहे !
त्याना जुना काळ वापरुन वापरुन 'ऑर्थोडोक्सोसिस' हा विकार झाला आहे.
सगळेच प्रश्न विचार करण्यासारखे आहेत पाहुणेताई. त्यातही:
वानप्रस्थाश्र्म सोयिस्कर रित्या विसरला का जातो?
हा प्रश्न मला विशेष आवडला. "आपल्या" भारतीय संस्कृतीप्रमाणे मुलगा लग्न करून संसाराला लागला की पालकांनी वानप्रस्थाश्रमात जायचे असते. म्हणजे इतके वर्ष घरच्या जबाबदारीमुळे स्वतःच्या आवडीनिवडीच्या गोष्टी करता आल्या नसतील त्याकडे लक्ष देणे, घरातील प्रत्येक गोष्टीत स्वतःचे नाक न खुपसता विचारल्यासच सल्ला देणे इत्यादी गोष्टींचा समावेश होता. पण अनेकदा आपली इतक्या वर्षांपासूनची सत्ता जाईल या भितीने असे पालक मुलाचे लग्न झाले की अजूनच स्वतःचाच हेका लावतात. एकदा मुलाचे लग्न झाल्यानंतर तो मुलगा आणि घरचे स्वयंपाकघर या दोन्हींवर त्या मुलाच्या नव्या बायकोचाही हक्क असतो ही गोष्ट आया जितक्या लवकर समजतील तितके चांगले.
महिन्याचा पगार झाल्यानंतर तो माझ्या हातात द्यायला हवा ही पालकांची अपेक्षा असणे हा प्रकार फार जुना नाही (ही अपेक्षा माझ्याबद्दलही होती. पण आता सॅलरी अकाऊंटमध्ये पगार डायरेक्ट जमा होतो त्यामुळे हा प्रकार करता यायची शक्यता कमी झाली आहे) . म्हणजे काय की आपल्याला सोयीस्कर असेल तिथे भारतीय संस्कृतीचा उदो-उदो करायचा आणि अंगाशी आले की वानप्रस्थाश्रमासारख्या कल्पनांना पायदळी तुडवायचे आणि "आम्ही तुझ्या हितासाठी सांगत आहोत" चे प्रोटेक्शन कायम आहेच!!
वानप्रस्थाश्रम सोयीस्करपणे का विसरला जातो हा प्रश्न मलाही अनेकदा पडतो.
हम्म... प्रश्न अजुनही अनुत्तरीतच आहेत...
भारतात लग्न सुरत, सीरत, दौलत, ताकत (power/position) पाहुन केले जाते. सेक्स, मुलं, आईवडीलांची सेवा, घरकाम इ उद्देश त्यामागे असतात. आणि पैसा, शारिरिक, मानसिक, सामाजिक गरज म्हणुन टिकवले जाते.
बिझनेस डिल प्रमाणेच असते ते पण उगाच परंपरा संस्कृती असा मुलामा चढवला जातो.
सध्यातरी त्यातल्यात्यात फक्त TomKat marriage contract रोचक वाटतेय.
करुणा गोखलेँचा एक लेख सापडला
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=59344:2010-04-02-05-29-40&Itemid=1
बाकी मुलगा/मुलगी कोणालाही future investment समजु नयेच आणि त्यांनीही पालकांकडुन मालमत्ता मिळण्याची अपेक्षा ठेउ नये...
प्रतिक्रिया
समाधानकारक उत्तर मिळतच नाही
तू एखादा पाशवी धागा सुरू कर ग!
पैसाताई, धन्यवाद! तुम्ही ज्या
आण कुठे ते!
मी पण आले. रेवतीताई, हूल नको
ए मी पण मी पण मी पण मी पण मी
ये ये ये
एकाच
बेष्ट!!! कोला आणते मी!
हॅ हॅ हॅ ... "पाशवी"
सामोरा
पॉइंट ४
जाच?
बाकी तुमचे प्रश्न वाचाल्यावर
रुढी/परंपरा पुरुषांना
<<<पण सासु ही घरात मोकळॅए
जो तो ज्याचं त्याचं बघुन
तुला किती बायका रे एकुण?
बायको नाही पण सध्या तीन
३ पर्याय
टाइम ट्रॅवल
छ्या! बेलाजींनी आमचं गुपित
यादीत बदल
सुधारीत यादी
टाइम ट्रॅवल
बेलाशेट, नक्की कुठले प्रश्न
माझ्या मते सगळेच प्रश्न सुटलेत
हे प्रश्न
विचार करण्यासारखे प्रश्न
पाशवी धागे नेमके वर आणले की
हम्म... प्रश्न अजुनही