Skip to main content

ऑलिंपिक - २०१२

लेखक ऑलिंपिक २०१२ यांनी बुधवार, 01/08/2012 23:19 या दिवशी प्रकाशित केले.
आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक खेळांची सुरूवात प्रथम १८९६ मधे अथेन्स येथे झाली तिथपासुनचा प्रवास २०१२ ला लंडन पर्यंत येऊन ठेपला आहे. आत्तापर्यंतच्या सर्व ऑलिंपिक स्पर्धेत एकुण भारताच्या वाट्याला नऊ सुवर्ण पदकं आली आहेत. हॉकीत आठ आणि मागील वर्षी अभिनव बिंद्राला मिळालेले एक पदक अशी आपली वाटचाल आहे. आता २०१२ च्या ऑलिंपिक स्पर्धेत भारत पुन्हा एकदा दमदारपणे उतरला आहे. भारतासहित विविध देशाचे स्पर्धक विविध खेळांमधे आपले कसब दाखवणार आहेत. स्पर्धेचं उद्घाटन सोहळा सानिका स्वप्नील यांनी अविस्मरणीय अनुभवातून दाखवलं आणि तो सोहळा अनेकांनी अनुभवला. ऑलिंपिक २०१२ च्या उद्घाटनाची आणखी काही छायाचित्र आपल्याला इथे ही पाहता येतील. भारत या स्पर्धेत किती पदकं मिळवेल ? कोणत्या स्पर्धेत कोणत्या स्पर्धकाकडुन पदकांची अपेक्षा आहे ? कोणत्या सांघिक क्रिडा प्रकारात यश मिळु शकते ? विजयी स्पर्धकांच्या अभिनंदनाबरोबर देश-विदेशातील विविध खेळांच्या आणि खेळाडुंच्या वैशिष्ट्यांसह आपण अधिक माहिती इथे टाकाल अशी अपेक्षा. हॉकीतलं आपलं आव्हान संपल्यातच जमा आहे. सुशीलकुमारकडुन कुस्ती , कश्यप तसेच सायना नेहवाल कडुन बॅडमिंटन, बॉक्सींगमधे देवोंद्रो कडुन पदकांची अपेक्षा आहे. आपलं काय मत आहे ?

वाचने 17147
प्रतिक्रिया 92

प्रतिक्रिया

मेरी कॉम विजयी. सेमीफायनल मध्ये दाखल.

मेरी कोम सेमीफायनल मध्ये जाऊनही १ पदक निश्चित केले असे म्हणतात....हा फंडा कोणी समजावून सांगेल काय?

In reply to by अप्रतिम

सेम टु सेम प्रश्न मलाही पडला होता. वाहिन्यांवर महिला बॉक्सिंगचे पदक निश्चित, बॉक्सिंगचे पदक निश्चित, असं सांगत होते. अजून सेमी फायनल व्हायची आहे, आणि हे पदक निश्चित कसे म्हणत आहेत, कै भानगडच कळेना. असो, धन्स टू पैसा. च्यायला, अजबच नियम आहेत बॉक्सिंगचे. -दिलीप बिरुटे

ब्रिटीश बॉक्सर निकोलोचे ठोसे बसल्यामुळे मेरी कोम तिसर्‍या फेरीअखेर मागे आहे. शेवटच्या फेरीत मेरी कोमचे ठोसे निकॉलसला बसले तरच सुवर्णपदकाचे स्वप्न पाहता येईल.

In reply to by ऑलिंपिक २०१२

६/११ असा मेरीचा कोमचा पराभव. मेरी कोमपेक्षा ब्रिटनच्या निकोला अ‍ॅडम्सचे ठोसे अगदी अचुक होते. तुलनेत मेरीकोम निकोलाला डोक्याच्या मागील बाजुस ठोसे मारतांना दिसत होती. महिला बॉक्सिंगमधे एकुणच कास्य पदक का होईना भारता मिळणार आहे. धन्यवाद.

भारताचा चॅम्पियन कुस्तीपटू योगेश्वर दत्तने लंडन ऑलिम्पिकमध्ये 60 किलो फ्रीस्टाइलमध्ये कांस्य पदक प्राप्त केले आहे. लंडन ऑलिम्पिकचे भारताचे हे पाचवे पदक आहे.

सुशीलकुमारचा कुस्तीचा सामना सुरु आहे. पहिली फेरीत सुशीलकुमार मागे आहे. http://www.newtvworld.com/India-Live-Tv-Channels/dd-sports-live-streami… (दुव्यावरील जाहीराती क्लोज कराव्यात)

In reply to by ऑलिंपिक २०१२

तुर्कीच्या पहिलवानाला पराभूत करुन सुशीलकुमार उपउपात्यं फेरीत पोहचला. २/१ अशा फरकाने तुर्कीच्या मागील ऑलिंपिक विजेत्या पहिलवानास पराभूत केले. अतिशय रोमहर्षक ही लढत झाली. आजच बाकीच्या लढती होणार आहेत.

आत्ता आज दुसर्‍या सामन्यात सुशीलकुमार उपांत्य फेरीत पोहचला. उझबेकिस्तानच्या नवरुझॉव्हला त्याने उपउपांत्य सामन्यात धुळ चारली. सुशीलकुमारचा प्रवास सुवर्णपदकाच्या दिशेने सुरु झाला आहे. आत्तापर्यंत एकुण पाच पदकं भारताच्या वाट्याला आली आहेत. आपण दोनहजारवीसला पंचवीस पदकं आणु अशी तयारी सुरु झाली . [बातमी]

In reply to by मोदक

कझाकिस्तानच्या पहिलवानास हरवल्यानंतर आता उत्सुकता आहे, सुवर्णपदकाची. अर्थात, जापानी पहिलवानाशी सुशीलकुमारची लढत सोपी असणार नाही. रौप्य पदक तर नक्कीच झाले आहे. आता सुवर्णपदकाची अपेक्षा फक्त सुशीलकुमारकडुनच आहे. सुशीलकुमारला सुवर्णपदकासाठी शुभेच्छा. भारतीय प्रमाण वेळेला आज रविवार सायंकाळी ६:३० वाजता अंतिम सामना होणार आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुशीलकुमार चांगलाच खेळला..कझाकच्या तांतारोवला उचलून सरळ पछाड घातली..उपांत्य ल्ढतीत असे करणे म्हणजे खरेच जबरा..पण या लढतीत त्यानं एक फाऊलही केलेला दिसतोय. तांतारोवच्या उजव्या कानाला तो चावलाय.. असो. आपल्या ध्वजधारकाला सुवर्णासाठी शुभेच्छा! राघव

In reply to by राघव

जापानी पहिलवानानं सुशील कुमारला जिंकण्याची कोणतीही संधी दिली नाही. चपळ अशा जापानी पहिलवानानं सुशीलकुमार आणि आस लावून बसलेल्या भारतीयांच्या सुवर्णपदकाचं स्वप्नं मोडलं. रौप्य पदक मिळाल्याचा आनंद आहेच. सुशीलकुमारचं अभिनंदन. -दिलीप बिरुटे

In reply to by मोदक

जेव्हा जापानी पहिलवानानं दुसर्‍या फेरीत सुशीलकुमारला उचलुन टाकल तेव्हाच सालं सुशीलकुमारचं अवसान गेलं. आणि म्याच न लढता आपण हरलो. असो, एकाच दिवशी उप उपांत्य, उपांत्य, आणि अंतिम फेरीत खेळायचं ही जरा आपल्या सुशीलकुमारच्या मानसिक आणि शारिरिक अशा परिस्थितीची परिक्षाच होती. आणि जापानी पहिलवानाचा उजवा खेळ ही गोष्ट ही तशी नाकारता येत नाही. असो, सालं आपलं नशीबच फुटकं आहे, दोष तरी कोणाल द्यायचा. असो, चालायचंच. -दिलीप बिरुटे (नर्व्हस)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>जापानी पहिलवानाचा उजवा खेळ ही गोष्ट ही तशी नाकारता येत नाही. हो राव... आपलं मिडीया सुशीलकुमारच्या '३ उलट्या' ग्लोरीफाय करत बसलंय. :-D

चार कास्य आणि दोन रौप्य पदकं ही आपली आत्तापर्यंतच्या ऑलिंपिक स्पर्धेतील ऑलिंपिक २०१२ लंडन येथील उत्तम कामगिरी. ब्राझील येथे होणार्‍या स्पर्धेत भारतातील खेळाडु अदिक दैदिप्यमान कामगिरी करतील अशी अपेक्षा. मिपावरील सदस्यांनी आणि वाचकांनी स्पर्धेच्या निमित्ताने ऑलिंपिक २०१२ मधे सहभागी होऊन या स्पर्धेचा आनंद लुटला. आपापली मतं मांडली , आपले सर्वांचे आभार. स्पर्धेतील समारोपाची काही क्षणचित्र. ऑलिंपिक २०१२ [मिपा टीम]