✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ऑलिंपिक - २०१२

ऑ
ऑलिंपिक २०१२ यांनी
Wed, 08/01/2012 - 23:19  ·  लेख
लेख
आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक खेळांची सुरूवात प्रथम १८९६ मधे अथेन्स येथे झाली तिथपासुनचा प्रवास २०१२ ला लंडन पर्यंत येऊन ठेपला आहे. आत्तापर्यंतच्या सर्व ऑलिंपिक स्पर्धेत एकुण भारताच्या वाट्याला नऊ सुवर्ण पदकं आली आहेत. हॉकीत आठ आणि मागील वर्षी अभिनव बिंद्राला मिळालेले एक पदक अशी आपली वाटचाल आहे. आता २०१२ च्या ऑलिंपिक स्पर्धेत भारत पुन्हा एकदा दमदारपणे उतरला आहे. भारतासहित विविध देशाचे स्पर्धक विविध खेळांमधे आपले कसब दाखवणार आहेत. स्पर्धेचं उद्घाटन सोहळा सानिका स्वप्नील यांनी अविस्मरणीय अनुभवातून दाखवलं आणि तो सोहळा अनेकांनी अनुभवला. ऑलिंपिक २०१२ च्या उद्घाटनाची आणखी काही छायाचित्र आपल्याला इथे ही पाहता येतील. भारत या स्पर्धेत किती पदकं मिळवेल ? कोणत्या स्पर्धेत कोणत्या स्पर्धकाकडुन पदकांची अपेक्षा आहे ? कोणत्या सांघिक क्रिडा प्रकारात यश मिळु शकते ? विजयी स्पर्धकांच्या अभिनंदनाबरोबर देश-विदेशातील विविध खेळांच्या आणि खेळाडुंच्या वैशिष्ट्यांसह आपण अधिक माहिती इथे टाकाल अशी अपेक्षा. हॉकीतलं आपलं आव्हान संपल्यातच जमा आहे. सुशीलकुमारकडुन कुस्ती , कश्यप तसेच सायना नेहवाल कडुन बॅडमिंटन, बॉक्सींगमधे देवोंद्रो कडुन पदकांची अपेक्षा आहे. आपलं काय मत आहे ?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
17088 वाचन

💬 प्रतिसाद (92)

प्रतिक्रिया

बिरुटे सर,

पैसा
Sat, 08/04/2012 - 19:04 नवीन
विरोधी बॉक्सरचा निदान पाय तरी मोडू दे अशा शुभेच्छा द्या. कारण विकास कृष्णन अमेरिकन बॉक्सरबरोबर जिंकला आणि ५ तासांनी काहीतरी खुसपट काढून प्रतिस्पर्ध्याला ४ अंक बहाल करण्यात आले. परिणामी विकास जिंकूनही हरला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जिंकला बॉक्सर.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 08/04/2012 - 19:09 नवीन
>>>>> विरोधी बॉक्सरचा निदान पाय तरी मोडू दे अशा शुभेच्छा द्या. हाहाहा. अहो, अशानं आपल्या गुणवत्तेवर प्रश्न निर्माण होतील. बाकी, देवेंद्र जिंकला. उप उपात्य फेरीत पोहचला. बाकी, त्या विकासला विजयी घोषित करुनही नंतर पराभूत घोषित केलं. मला तर कै कळलं नै. अजुन आहे का कोणाचा म्याच आज. आज माझ्या शुभेच्छांनी सुवर्णपदकी मिळु शकतं. आज लै फॉर्मात आहोत आम्ही. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अहो,

पैसा
Sat, 08/04/2012 - 19:16 नवीन
विकास १३-११ असा जिंकला होता. अमेरिकन्सनी काहीतरी कारणं सांगत तक्रार केली. मग निर्णय लावणार्‍यानी एकमताने प्रतिस्पर्ध्याला आणखी ४ पॉइंट्स दिले आणि विकास १५-१३ असा हरल्याचं घोषित केलं. हाकानाका!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विकासने मार खाता खाता

श्रीरंग
Sat, 08/04/2012 - 20:43 नवीन
विकासने मार खाता खाता जाणीवपूर्वक तोंडातील गार्ड बाहेर थुंकून पंचांना काही क्षण सामना थांबवायला लावला. त्याबद्दल त्याला काही गुणांचा दंड व्हायला हवा होता जो झाला नाही. म्हणून अमेरिकन संघाने हरकत नोंदवल्यावर ते गुण अमेरिकन बॉक्सरला देण्यात आले, आणी सामन्याचा निकाल फिरला. आपल्या मीडीयाने कितीही बोंब मारली, तरी नंतर फिरवलेला निर्णय योग्यच होता असं मला वाटतं. कदाचित सामना पाहणार्या सर्वांना असंच वाटेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हायला!

पैसा
Sat, 08/04/2012 - 23:13 नवीन
आपले लोक नको ते बरे लवकर शिकतात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग

त्यांनी तक्रार

इरसाल
Sat, 08/04/2012 - 19:55 नवीन
केल्यावर व्हिडिओ पुन्हा पाहिले तर त्यात ९ फाउल आढळुन आल्याने दुसर्‍याला विजयी ठरवला.
  • Log in or register to post comments

SFI नी जलतरणात लाज आणली!!

श्रीरंग
Sat, 08/04/2012 - 20:55 नवीन
जलतरणात भारताला एकच वाईल्ड कार्ड स्पर्धक पाठवण्याची मुभा असताना, पात्रता निकष पूर्ण करणार्या ४ गुणवान जलतरणपटूंना डावलून वशिल्याचा तट्टू पाठवण्याच्या SFI (स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया) च्या निर्णयामुळे नाचक्की होणार हे तर निश्चितच होतं. पण गगन उल्ललमठ या भारतीय स्पर्धकाने अपेक्षेपेक्षा खूपच लाजिरवाणी कामगिरी करून भारताची मान खाली घालवली. १५०० मीटर फ्रीस्टाईल मध्ये गगन ३२ पैकी ३२वा आलाच, पण ३१व्या स्पर्धकापेक्षा तब्बल १०० मीटर (२ फेर्या) मागे राहण्याचा पराक्रम दाखवून पुरतं हसं करून घेतलं. वीरधवल खाडे, सौरभ सांगवेकर (ज्याची १५०० ची सर्वोत्तम वेळ गगन पेक्षा दीड मिनिटापेक्षा सरस आहे), अ‍ॅरॉन डिसूझा, संदीप शेजवळ, यांना स्पर्धेसाठी पात्र असूनही टीव्हीवर गगनला पहावं लागलं. यापुढे कोणतेही पदक जिंकण्याच्या जिद्दीने / उमेदीने ते सराव करतील असं वाटत नाही. त्यांनी करूही नये.
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

पैसा
Sat, 08/04/2012 - 23:28 नवीन
फक्त २० वर्षांचा देवेन्द्रो सिन्ग १६-११ असा जिंकून क्वार्टर फायनलमधे पोचला. बिरुटेसर अभिनंदन! ;)
  • Log in or register to post comments

मेरी कोमचा म्याच कधी आहे ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 08/05/2012 - 18:19 नवीन
>>>> बिरुटेसर अभिनंदन! :) धन्यवाद धन्यवाद. बाय द वे, मेरी कोम ही महिला बॉक्सर आज झुंजणार होती तिचा म्याच कधी आहे, कोणास ठाऊक ? तिलाही शुभेच्छा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

मेरी कोम जिंकली.

विलासराव
Sun, 08/05/2012 - 20:02 नवीन
मेरी कोम जिंकली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सेरेना विल्यम्स

पैसा
Sun, 08/05/2012 - 18:24 नवीन
एका सेरेना विल्यम्सने दोन सुवर्णपदकं जिंकली. आणि अख्ख्या भारत देशाला मिळून किती पदकं असा हिशेब लावत बसलोय आम्ही!
  • Log in or register to post comments

मायकेल फेल्फ

कुंदन
Sun, 08/05/2012 - 18:34 नवीन
मायकेल फेल्प्सने आतापर्यंत तीन ऑलिम्पिकमध्ये २२ पदकांचा स्वीकार केला. http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=242312:2012-08-05-11-54-24&catid=28:2009-07-09-02-01-56&Itemid=5
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

त्याला सोडूनच दे रे!

पैसा
Sun, 08/05/2012 - 18:40 नवीन
त्याला सोडूनच दे रे! तो या जगातला नव्हेच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

चालायचंच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 08/05/2012 - 18:39 नवीन
आणि अख्ख्या भारत देशाला मिळून किती पदकं असा हिशेब लावत बसलोय आम्ही! चालायचंच, भारतामागं काय एक काम आहे, म्हणुन पदकांसाठी मेहनत करतील. आज पेप्रात वाचलं ऑलिंपिक तयारीसाठी भारतीय हॉकी संघावर १८ कोटी ९० लाख रुपये खर्च झाले. (इति. दै. लोकमत) डोळे पांढरेफटक पडायची वेळ आली. बाकी, हॉकीचा परफॉर्मन्स आपण सर्वांनी याचि देहि याचि डोळा पाहिलाच आहे. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अँडी मरे विजेता

प्रचेतस
Sun, 08/05/2012 - 22:36 नवीन
विंबल्डनच्या सेंटर कोर्टवर झालेल्या टेनिसच्या अंतिम सामन्यात अँडी मरेने रॉजर फेडररचा ६-२, ६-१, ६-४ असा सरळ सेटमध्ये पराभव करून ब्रिटनसाठी सुवर्णपदक जिंकलं त्याचबरोबर मागच्या महिन्यात ह्याच कोर्टवर झालेल्या पराभवाची परतफेडही. मरेच्या जोरदार खेळापुढे फेडररचा अजिबात टिकाव लागला नाही. ताकदवान फोरहँड वापरून मरेने मारलेले तिरकस फटके फेडररला चुका करण्यास भाग पाडत होते. फेडरला नेटजवळ यायची फारशी संधीच मिळाली नाही. त्यातच कदाचित एकाग्रतेच्या अभावामुळेही मिळालेल्या ब्रेकपाँट्सचे विजयी गुणांत रूपांतर करण्यात फेडरर अपयशी ठरला परिणामतः त्याला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. अर्जेटीनाच्या जुआन मार्टीन डेल पोर्ट्रोने सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचचा ७-५, ६-४ असा पराभव करत कांस्यपदक जिंकले.
  • Log in or register to post comments

अँडी मरे

पैसा
Sun, 08/05/2012 - 22:48 नवीन
आज दुसरं सुवर्णपदक जिंकणार अशी चिन्हं दिसतायत! फारच पेटलाय तो. फेडरर ची पहिली सर्व्हिस नीट पडत नव्हती सुरुवातीला, शिवाय ब्रेक पॉइंट्स घेता आले नाहीत. ते भारी पडलं. अमेरिकेच्या विल्यम्स भगिनींनी गेल्या वर्षातल्या दुखापती आणि आजारपणांवर मात करून दोन सुवर्णपदकं घेतली त्यांच्या जिद्दीला सलाम! मेरी कोमने पोलंडच्या प्रतिस्पर्ध्याचा धुव्वा उडवला. तिची आगेकूच अशीच चालू राहू दे. तिच्या नावावर ५ जागतिक विजेतेपदं आहेत. तिच्याकडून एका पदकाची अपेक्षा आहेच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मेरी कोम

ऑलिंपिक २०१२
Mon, 08/06/2012 - 18:44 नवीन
मेरी कोमचा सामना चालु आहे. तीस-या फेरीत मेरीने चांगले पंच दिले आहे. बघुया, पंचांना हे पंच किती मान्य होताते ते
  • Log in or register to post comments

उपांत्य फेरीत

ऑलिंपिक २०१२
Mon, 08/06/2012 - 18:53 नवीन
मेरी कोम उपांत्य फेरीत पोहचली. ट्युनिशियाच्या मॅरो रहालीला १५/६ असे सहज पराभूत केले. मेरीचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऑलिंपिक २०१२

१५-६ म्हणजे तसा एकतर्फीच विजय

प्रचेतस
Mon, 08/06/2012 - 19:07 नवीन
१५-६ म्हणजे तसा एकतर्फीच विजय म्हणायचा. मेरी कोमचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऑलिंपिक २०१२

वल्ल्या,

पैसा
Mon, 08/06/2012 - 21:07 नवीन
ती जागतिक विजेती आहे बाबा! आणि दोन मुलांची आई आहे हे सगळीकडे परत परत सांगत होते. असल्या खेळात खेळत राहण्याची जिद्द भारीच म्हणायची!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

खरंच. कौतुक करावे तितके कमीच

प्रचेतस
Tue, 08/07/2012 - 20:43 नवीन
खरंच. कौतुक करावे तितके कमीच आहे. शिवाय ५ वेळा जगज्जेतेपद म्हणजे साधी गोष्ट नाहीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

विजयी.

प्रभाकर पेठकर
Mon, 08/06/2012 - 18:49 नवीन
मेरी कॉम विजयी. सेमीफायनल मध्ये दाखल.
  • Log in or register to post comments

मेरी कोम सेमीफायनल मध्ये

अप्रतिम
Mon, 08/06/2012 - 21:13 नवीन
मेरी कोम सेमीफायनल मध्ये जाऊनही १ पदक निश्चित केले असे म्हणतात....हा फंडा कोणी समजावून सांगेल काय?
  • Log in or register to post comments

बॉक्सिंग

पैसा
Mon, 08/06/2012 - 21:15 नवीन
बॉक्सिंगमधे हरणार्‍या दोन्ही सेमी फायनलिस्टना ब्राँझ पदक देतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्रतिम

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 08/06/2012 - 21:27 नवीन
सेम टु सेम प्रश्न मलाही पडला होता. वाहिन्यांवर महिला बॉक्सिंगचे पदक निश्चित, बॉक्सिंगचे पदक निश्चित, असं सांगत होते. अजून सेमी फायनल व्हायची आहे, आणि हे पदक निश्चित कसे म्हणत आहेत, कै भानगडच कळेना. असो, धन्स टू पैसा. च्यायला, अजबच नियम आहेत बॉक्सिंगचे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्रतिम

मेरी कोमला शुभेच्छा.

ऑलिंपिक २०१२
Wed, 08/08/2012 - 18:16 नवीन
मेरी कोमचा उपांत्यफेरीचा सामना सुरु होत आहे.
  • Log in or register to post comments

ब्रिटीश बॉक्सर निकोलोचे ठोसे

ऑलिंपिक २०१२
Wed, 08/08/2012 - 18:27 नवीन
ब्रिटीश बॉक्सर निकोलोचे ठोसे बसल्यामुळे मेरी कोम तिसर्‍या फेरीअखेर मागे आहे. शेवटच्या फेरीत मेरी कोमचे ठोसे निकॉलसला बसले तरच सुवर्णपदकाचे स्वप्न पाहता येईल.
  • Log in or register to post comments

पराभव

ऑलिंपिक २०१२
Wed, 08/08/2012 - 18:35 नवीन
६/११ असा मेरीचा कोमचा पराभव. मेरी कोमपेक्षा ब्रिटनच्या निकोला अ‍ॅडम्सचे ठोसे अगदी अचुक होते. तुलनेत मेरीकोम निकोलाला डोक्याच्या मागील बाजुस ठोसे मारतांना दिसत होती. महिला बॉक्सिंगमधे एकुणच कास्य पदक का होईना भारता मिळणार आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऑलिंपिक २०१२

यंदा सुवर्णपदक काही भारताच्या

अप्रतिम
Wed, 08/08/2012 - 19:08 नवीन
यंदा सुवर्णपदक काही भारताच्या नशिबी दिसत नाही :(
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

खेडूत
Sun, 08/12/2012 - 00:08 नवीन
भारताचा चॅम्पियन कुस्तीपटू योगेश्वर दत्तने लंडन ऑलिम्पिकमध्ये 60 किलो फ्रीस्टाइलमध्ये कांस्य पदक प्राप्त केले आहे. लंडन ऑलिम्पिकचे भारताचे हे पाचवे पदक आहे.
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

प्रभाकर पेठकर
Sun, 08/12/2012 - 00:43 नवीन
माहितीबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

सुशीलकुमारचा कुस्तीचा सामना

ऑलिंपिक २०१२
Sun, 08/12/2012 - 13:25 नवीन
सुशीलकुमारचा कुस्तीचा सामना सुरु आहे. पहिली फेरीत सुशीलकुमार मागे आहे. http://www.newtvworld.com/India-Live-Tv-Channels/dd-sports-live-streaming.html (दुव्यावरील जाहीराती क्लोज कराव्यात)
  • Log in or register to post comments

अभिनंदन.

ऑलिंपिक २०१२
Sun, 08/12/2012 - 13:34 नवीन
तुर्कीच्या पहिलवानाला पराभूत करुन सुशीलकुमार उपउपात्यं फेरीत पोहचला. २/१ अशा फरकाने तुर्कीच्या मागील ऑलिंपिक विजेत्या पहिलवानास पराभूत केले. अतिशय रोमहर्षक ही लढत झाली. आजच बाकीच्या लढती होणार आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऑलिंपिक २०१२

पुन्हा एकदा अभिनंदन.

ऑलिंपिक २०१२
Sun, 08/12/2012 - 14:47 नवीन
आत्ता आज दुसर्‍या सामन्यात सुशीलकुमार उपांत्य फेरीत पोहचला. उझबेकिस्तानच्या नवरुझॉव्हला त्याने उपउपांत्य सामन्यात धुळ चारली. सुशीलकुमारचा प्रवास सुवर्णपदकाच्या दिशेने सुरु झाला आहे. आत्तापर्यंत एकुण पाच पदकं भारताच्या वाट्याला आली आहेत. आपण दोनहजारवीसला पंचवीस पदकं आणु अशी तयारी सुरु झाली . [बातमी]
  • Log in or register to post comments

फायनल मध्ये पोहोचला.....

मोदक
Sun, 08/12/2012 - 15:22 नवीन
फायनल मध्ये पोहोचला..... :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऑलिंपिक २०१२

सुवर्णपदकापासून एक पाऊल दुर.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 08/12/2012 - 15:40 नवीन
कझाकिस्तानच्या पहिलवानास हरवल्यानंतर आता उत्सुकता आहे, सुवर्णपदकाची. अर्थात, जापानी पहिलवानाशी सुशीलकुमारची लढत सोपी असणार नाही. रौप्य पदक तर नक्कीच झाले आहे. आता सुवर्णपदकाची अपेक्षा फक्त सुशीलकुमारकडुनच आहे. सुशीलकुमारला सुवर्णपदकासाठी शुभेच्छा. भारतीय प्रमाण वेळेला आज रविवार सायंकाळी ६:३० वाजता अंतिम सामना होणार आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

सुशीलकुमार चांगलाच

राघव
Sun, 08/12/2012 - 17:53 नवीन
सुशीलकुमार चांगलाच खेळला..कझाकच्या तांतारोवला उचलून सरळ पछाड घातली..उपांत्य ल्ढतीत असे करणे म्हणजे खरेच जबरा..पण या लढतीत त्यानं एक फाऊलही केलेला दिसतोय. तांतारोवच्या उजव्या कानाला तो चावलाय.. असो. आपल्या ध्वजधारकाला सुवर्णासाठी शुभेच्छा! राघव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभिनंदन.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 08/12/2012 - 18:37 नवीन
जापानी पहिलवानानं सुशील कुमारला जिंकण्याची कोणतीही संधी दिली नाही. चपळ अशा जापानी पहिलवानानं सुशीलकुमार आणि आस लावून बसलेल्या भारतीयांच्या सुवर्णपदकाचं स्वप्नं मोडलं. रौप्य पदक मिळाल्याचा आनंद आहेच. सुशीलकुमारचं अभिनंदन. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव

आवडत्या Quotes पैकी एक Quote आणखी एकदा पटला..

मोदक
Sun, 08/12/2012 - 19:26 नवीन
आवडत्या Quotes पैकी एक Quote आणखी एकदा पटला.. :-( You Never WIN Silver... You LOSE Gold....!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जेव्हा जापानी पहिलवानानं

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 08/12/2012 - 22:44 नवीन
जेव्हा जापानी पहिलवानानं दुसर्‍या फेरीत सुशीलकुमारला उचलुन टाकल तेव्हाच सालं सुशीलकुमारचं अवसान गेलं. आणि म्याच न लढता आपण हरलो. असो, एकाच दिवशी उप उपांत्य, उपांत्य, आणि अंतिम फेरीत खेळायचं ही जरा आपल्या सुशीलकुमारच्या मानसिक आणि शारिरिक अशा परिस्थितीची परिक्षाच होती. आणि जापानी पहिलवानाचा उजवा खेळ ही गोष्ट ही तशी नाकारता येत नाही. असो, सालं आपलं नशीबच फुटकं आहे, दोष तरी कोणाल द्यायचा. असो, चालायचंच. -दिलीप बिरुटे (नर्व्हस)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

हो राव...

मोदक
Sun, 08/12/2012 - 23:39 नवीन
>>>जापानी पहिलवानाचा उजवा खेळ ही गोष्ट ही तशी नाकारता येत नाही. हो राव... आपलं मिडीया सुशीलकुमारच्या '३ उलट्या' ग्लोरीफाय करत बसलंय. :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ब्बाय ब्बाय लंडन ऑलिंपिक २०१२

ऑलिंपिक २०१२
Wed, 08/15/2012 - 11:04 नवीन
चार कास्य आणि दोन रौप्य पदकं ही आपली आत्तापर्यंतच्या ऑलिंपिक स्पर्धेतील ऑलिंपिक २०१२ लंडन येथील उत्तम कामगिरी. ब्राझील येथे होणार्‍या स्पर्धेत भारतातील खेळाडु अदिक दैदिप्यमान कामगिरी करतील अशी अपेक्षा. मिपावरील सदस्यांनी आणि वाचकांनी स्पर्धेच्या निमित्ताने ऑलिंपिक २०१२ मधे सहभागी होऊन या स्पर्धेचा आनंद लुटला. आपापली मतं मांडली , आपले सर्वांचे आभार. स्पर्धेतील समारोपाची काही क्षणचित्र. ऑलिंपिक २०१२ [मिपा टीम]
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा