Skip to main content

प्रतिभाताईंचा नवा प्रताप !

लेखक हुप्प्या यांनी शनिवार, 04/08/2012 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या सुमार (आणि मुख्यतः वाईट कारणानेच प्रसिद्धी मिळालेल्या) कारकीर्दीकरता प्रसिद्ध असणार्‍या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचा नवा पराक्रम. राष्ट्रपतीपदावर असताना मिळालेल्या अनेक बहुमोल भेटवस्तू त्यांनी निघताना बरोबर नेल्या आणि त्या आता अमरावतीला आहेत. हे शिष्टाचाराला धरुन नाही असे तज्ञांचे मत आहे. राष्ट्रपती असताना मिळालेल्या भेटवस्तू ह्या राष्ट्रपती भवनात ठेवायचा संकेत आहे. अर्थात तो इथे धाब्यावर बसवला गेला आहे. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/15339481.cms राष्ट्रपती हे एक अत्यंत अनावश्यक पद आहे. काम नगण्य, अमाप खर्च, खोटा भपका, अती मानसन्मान अशा प्रकारे तो एक पांढरा हत्ती बनलेला आहे. ह्या बाईंच्या चार वर्षाच्या कारकीर्दीमुळे ही गोष्ट तरी अधोरेखित व्हायला हरकत नाही. जडजंबाल सांविधानिक भाषेत राष्ट्रपती अमुक करतो आणि तमुक करतो हे लिहिलेले असले तरी जितके काम तितकेच दाम ह्या मूलभूत तत्त्वाविरुद्ध असे ह्या पदाचे आचरण होताना दिसते आहे. कधीतरी ह्यात बदल होईल ही आशा.

वाचने 9479
प्रतिक्रिया 44

प्रतिक्रिया

कूंकु लावून डोक्यावरून पदर घेणार्‍या स्त्रिया सरळ स्वभावाच्या असतात असा माझाही गैरसमज होता. असो. बातमीत हे पण आहे-
संविधानाच्या जाणकारांच्या मते हे असे वागणे परंपरेच्या विरोधात आहे
या सर्व भेटवस्तूंना आमरावतीमधील विद्याभारती महाविद्यालयाच्या संग्रहालयात ठेवण्यात येणार आहे या प्रकरणी बोलताना या सर्व भेटवस्तू राष्ट्रपती इस्टेटकडून लोनवर घेतल्या असून हवे तेव्हा इस्टेट या वस्तू परत घेऊ शकते असे स्पष्टीकरण राष्ट्रपतींच्या विशेष अधिका - यांनी दिले प्रतिभाताईंच्या आधी ह्या विशेषाधिकार्‍यांना विचारायला हवे.पाहिजे तर संविधानाच्या जाणकार आणि विशेषाधिकार्‍यांना टी.व्ही.वर समोरासमोर बसवा.(निखिल वागळ्यांच्या उपस्थितीत).

राश्ट्रपतीपद रद्द करायचे असेल तर नव्या घटनासमितीसाठी निवडणुका घेऊन, नवी घटनासमिती बनवून, नवी घटना लिहूनच हे करावे लागेल. अवांतर : नवी घटना लिहिण्याविषयी घटनेत तरतूद नाही त्यामुळे क्रांतीसदृश काही झाले तरच हे होऊ शकेल.

In reply to by नितिन थत्ते

राश्ट्रपतीपद रद्द करायचे असेल तर नव्या घटनासमितीसाठी निवडणुका घेऊन, नवी घटनासमिती बनवून, नवी घटना लिहूनच हे करावे लागेल.
आणि मुळात हे सर्व करण्याकरता संसदेमध्ये तसा ठराव बहुमताने मंजूर व्हावा लागेल..

In reply to by नितिन थत्ते

राष्ट्रपतीपद काढून टाकण्यासाठी नवीन घटना समिती तयार करण्याची गरज नाही. घटनेत असलेल्या घटनादुरुस्तीच्या कलमानुसार भारताची संसद आवश्यक ते बिल आणून राष्ट्रपतीपद खालसा करू शकते. (भारताला राष्ट्रपती असणे हे भारतीय संविधानाच्या "Basic Structure" मध्ये नाही.)

In reply to by अपूर्व कात्रे

राष्ट्रपती हे हेड ऑफ स्टेट आहेत. त्यांचे पद हे घटनेच्या बेसिक स्ट्रक्चरमध्ये यायलाच हवे.

In reply to by नितिन थत्ते

'आमच्या घटनेला हात तर लावून पहा'. जे एकदा लिहिले आहे ती काळ्या दगडावरची रेघ आहे, हे सर्व्या भारतीयांनी समजून घ्यावे.

In reply to by तिमा

लै भारी... जय शहाबानो... जय राजीव...

आपला कार्यकाल यशस्वीरित्या पार पाडुन निवृत्त जीवन जगणार्या माजी राष्ट्रपतीना त्रास देणार्‍या हुप्प्या यांचा निशेध.

हुप्या ह्यांचा निषेध ! एक मराठी (बाई) माणूस राष्ट्रपती (!) झाला त्याचे काही कौतुक नाही. आता माहेरी परत असताना चार गोष्टी आणल्या पदरात लपवून तर काय बिघडले ? महाराष्ट्राची शान मंत्रालय आगी , कुत्रे पुतळे , ह्यांनी अटकेपार पोहोचली आहेच ती आणखी वाढली. किरीट सोमय्या सारखे परभाषिक मराठी माणसावर भुजबळ आणि मंडळी आरोप करतात व आपण ते खपवून घेतो हा दैव दुर्विलास !

In reply to by तर्री

एक मराठी (बाई) माणूस राष्ट्रपती (!) झाला त्याचे काही कौतुक नाही. आता माहेरी परत असताना चार गोष्टी आणल्या पदरात लपवून तर काय बिघडले ? नाय तर काय! काय पिर्पिर लावलीय... येवढा पुण्यातला बंगला सोडला आणि तुम्हाला त्या २-४ वस्तूंच पडलय.... त्यातल्या १-२ वस्तू बाळासाहेबांना रक्षाबंधनानिमित्त तैंनी द्याव्यात असे वाटते... येवढं मर्‍हाटी मर्‍हाटी करत शिवसेनेची मतं बाळासाहेबांनी तैंच्या पदरात टाकली होती....

In reply to by आंबोळी

>>येवढं मर्‍हाटी मर्‍हाटी करत शिवसेनेची मतं बाळासाहेबांनी तैंच्या पदरात टाकली होती.... परत फेड करणे आवश्यकच आहे.

राष्ट्रपती हे एक अत्यंत अनावश्यक पद आहे. काम नगण्य, अमाप खर्च, खोटा भपका, अती मानसन्मान अशा प्रकारे तो एक पांढरा हत्ती बनलेला आहे.
असहमत आहे. धन्यवाद..

In reply to by पक पक पक

मिपावर ज्यांच्या नावे इतके धागे निघाले त्यांची माहिती नसल्याचे पाहून एक **** म्हणून *** वाटली.

In reply to by नितिन थत्ते

हॅ हॅ हॅ ..आम्ही त्यांच्या राष्ट्र्पती म्हणून असलेल्या योगदाना बद्द्ल विचारणा केली.. ;) बाकी तुम्हाला *** वाट्ली हे पाहुन आम्हाला देखील आश्चर्य वाट्ले :bigsmile: :bigsmile:

त्या भेटवस्तूंचा नाही तिथे दिल्लीत उपयोग... ना अमरावतीमधे.. कुठं का असेनात. एम.जी.

हा धागा अजून चालू आहे ?

अपडेट आणि अधिकची माहिती. प्रतिभा पाटील यांनी या भेटवस्तू मे महिन्यात परत केल्या आहेत. सदर बातमीत पुढे एपीजे अब्दुल कलाम हे राष्ट्रपती असताना त्यांनी ३६ कलावस्तू या संरक्षण संशोधन व विकास संस्था म्हणजे डीआरडीओला नवी दिल्लीतील ब्राह्मोस केंद्रात प्रदर्शनार्थ ठेवण्यास दिल्या होत्या. त्या सर्व वस्तू ३ ऑक्टोबर २०१२ रोजी राष्ट्रपती भवनला परत मिळाल्या आहेत. असे म्हटले आहे. म्हणजे अशा वस्तू राष्ट्रपती भवनातून नेणार्‍या त्या एकमेव राष्ट्रपती नव्हेत हे ही इथे स्पष्ट होते. राष्ट्रपती कलाम केवळ दोन सूटकेस घेऊन राष्ट्रपती भवनातून बाहेर गेले अशा बातमीची पार्श्वभूमी देऊन प्रतिभा पाटील यांच्यावर अनावश्यक (आणि बरीचशी जहरी टीका) झाली होती.

In reply to by विकास

:) मी "तो" प्रतिसाद दिला तेव्हा काही अपडेट येत नव्हते. एक अपडेट आला तेवढा दिला.

In reply to by नितिन थत्ते

ही पूर्ण बातमी- राष्ट्रपती असताना मिळालेल्या व काही काळपर्यंत महाराष्ट्रातील त्यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या शाळेत ठेवण्यात आलेल्या भेटवस्तू माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी राष्ट्रपती भवनला परत केल्या आहेत. राष्ट्रपती भवनातून माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार प्रतिभा पाटील यांना त्या राष्ट्रपती असताना १५५ भेटवस्तू मिळाल्या होत्या. त्या तात्पुरत्या स्वरूपात त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या असलेल्या अमरावती येथील विद्याभारती शैक्षणिक मंडळ या संस्थेस प्रदर्शनार्थ देण्यात आल्या होत्या. सुभाष अग्रवाल यांनी माहिती अधिकारात मागवलेल्या माहितीनुसार या भेटवस्तूत ब्रिटिश पंतप्रधानांनी दिलेला मेणबत्ती संच, नेल्सन मंडेला यांनी दिलेली सुवर्ण व रजत पदके, चीनकडून मिळालेली भेट पेटी यांचा समावेश आहे. या सर्व वस्तू २२ मे रोजी राष्ट्रपती भवनला परत करण्यात आल्या आहेत. या सर्व वस्तू परत मिळाल्याचे राष्ट्रपती भवनच्या कला उपसंचालकांनी म्हटले असून, या भेटवस्तूंच्या वाहतुकीचा खर्च नोंदीत उपलब्ध नाही असे म्हटले आहे. या भेटवस्तू अमरावती येथील विद्याभारती शैक्षणिक मंडळास राष्ट्रपती भवन व ती संस्था यांच्यातील एका करारानुसार तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आल्या होत्या. एपीजे अब्दुल कलाम हे राष्ट्रपती असताना त्यांनी ३६ कलावस्तू या संरक्षण संशोधन व विकास संस्था म्हणजे डीआरडीओला नवी दिल्लीतील ब्राह्मोस केंद्रात प्रदर्शनार्थ ठेवण्यास दिल्या होत्या. त्या सर्व वस्तू ३ ऑक्टोबर २०१२ रोजी राष्ट्रपती भवनला परत मिळाल्या आहेत.

In reply to by यशोधरा

१. हा धागा काढणार्‍याने ज्या बातम्यांच्या आधारे धागा काढला त्यावरून प्रतिभा पाटील यांनी त्या वस्तू "पळवून"- स्वतःच्या "कायम" वापरासाठी नेल्या असे सुचविले जात होते (त्यामुळे) या धाग्यातही तसेच सुचविले गेले आहे. २. तसे नसून त्या लोन म्हणून तात्पुरत्या दिल्या होत्या हे कुठेच समोर येत नव्हते. ३. प्रतिभा पाटील यांनी नेलेल्या वस्तू सार्वजनिक प्रदर्शनासाठीच ठेवल्या होत्या हे सांगितले गेले नाही. ४. अब्दुल कलाम फक्त पुस्तकांच्या दोन सूटकेस घेऊन गेले अशी बातमी या बातमीशी जक्स्टापोज करून पाटील यांनी या वस्तू नेणे म्हणजे "लाजिरवाणे वर्तन" केले होते अशी चौफेर समजूत (या धाग्यात देखील) करण्यात आली. प्रत्यक्षात अब्दुल कलाम यांनीसुद्धा अशा प्रकारे वस्तू तात्पुरत्या नेल्या (पाठवल्या) हे तर कोणी सांगतच नव्हते (कारण तसे जाणून घ्यायचा प्रयत्न माध्यमांनी केला नाही). ५. त्या वस्तू कलाम यांनी डी आर डी ओ मध्ये ठेवल्या आणि पाटील यांनी त्यांच्या कुटुंबियांच्या मालकीच्या शाळेत ठेवल्या. यात गुणात्मक फरक काय आहे ते मला कळत नाही. त्या दोन्ही केसेस मध्ये कलाम आणि पाटील यांच्या खाजगी वापरासाठी त्या वस्तू नेलेल्या नव्हत्या. डी आर डी ओ मध्ये फक्त तेथे प्रवेश असणार्‍या कर्मचार्‍यांना त्या पहायला मिळाल्या, अमरावतीत त्या शाळेत प्रवेश असणार्‍या विद्यार्थी शिक्षक आणि कर्मचार्‍यांना (आणि कदाचित मुलांच्या पालकांना) पहायला मिळाल्या. डझन्ट रिअली मेक इट बॅड. ५. या भेटवस्तूंच्या वाहतुकीच्या खर्चाच्या नोंदी उपलब्ध नाहीत याचा अर्थ त्या वाहतुकीचा खर्च राष्ट्रपती भवनाने केला नाही असा असू शकतो. [किंवा प्रचंड खर्च राष्ट्रपती भवनाने केला पण तो लपवला जात आहे असा कॉन्स्पिरसी थिअरी छाप असू शकतो]

In reply to by नितिन थत्ते

त्या वस्तू कलाम यांनी डी आर डी ओ मध्ये ठेवल्या आणि पाटील यांनी त्यांच्या कुटुंबियांच्या मालकीच्या शाळेत ठेवल्या. यात गुणात्मक फरक काय आहे ते मला कळत नाही.
अपेक्षित होतेच. :)
प्रतिभा पाटील यांनी नेलेल्या वस्तू सार्वजनिक प्रदर्शनासाठीच ठेवल्या होत्या हे सांगितले गेले नाही.
सार्वजनिक प्रदर्शन ही आता बाईंची मखलाशी असू शकते. शक्यता आहे ना? ह्याला खरं तर गिरे तो भी टांग उप्पर असं म्ह्णू शकू जर ही पश्चात बुद्धी असेल तर. कारण जेव्हा अख्खी मिडिया ह्या प्रकरणावरुन ठणाणा करत होती तेह्वा बाई काय कानात कापूस घालून बसल्या होत्या? तेह्वाच योग्य काय ते सांगून सगळ्यांना गप्प बसवायचे ना. कळेलच कालांतराने.

In reply to by यशोधरा

>>सार्वजनिक प्रदर्शन ही आता बाईंची मखलाशी असू शकते. हुप्प्या यांनी धाग्यात जी मूळ बातमीची लिंक दिली आहे त्यातच या वस्तू संग्रहालयासाठी आहेत आणि त्या राष्ट्रपती भवन परत घेऊ शकते असा खुलासा आहे. पण आपणच सर्व कानात कापूस घालून बसल्याने त्या आपल्याला दिसल्या नाहीत. आणि आपण सारे त्या वस्तू त्यांनी चोरल्या असल्याचा आविर्भावात ओरडत राहिलो. (हां आता त्या लिंकमधील बातमी मटाने रेट्रोस्पेक्टिव्हली बदलली असेल तर ठाऊक नाही. शेवटी सगळी माध्यमे विकली गेलेलीच आहेत ना? ;) )

In reply to by नितिन थत्ते

म्हणजे त्या जन्तेला प्रदर्शन म्हणून पहायला मिळण्यात नक्की काय फरक पडतो ते सांगा.

In reply to by नितिन थत्ते

खर्र? :D हायला! तेही खरंच म्ह्णा, काँ मध्ये पद्धतच नाही ना? सगळेच बहुतांशी हपापाचा गपापावाले. दुसरे म्हणजे डीआरडीओ सार्वजनिक, जनतेच्या मालकीचे ठिकाण आहे ना? वा देशाचे म्हणू. म्हणजे तिथे ठेवलेल्या वस्तू ह्या कोणाच्या खाजगी मालमत्तेचा भाग होत नाहीत, नाही का? पण एखाद्याच्या खाजगी मालमत्तेत काही वस्तू तात्पुरत्या जरी ठेवल्या आणि समजा, उद्या समाजमन त्याबद्दल विसरुन गेले तर त्या गपापा करणे सोपे पडेल का हो?

In reply to by नितिन थत्ते

त्याचं काय आहे नितिनराव, मथळा जो होता तो: "प्रतिभाताई भेटवस्तूही घेऊन गेल्या" असा होता त्यावरून जो अर्थ निघतो तेव्हढाच आंतर्जालाच्या काळातील वाचनात समजू शकतो कारण बर्‍याचदा सगळे वाचले जात नाही. ते बरोबर आहे असे माझे म्हणणे नाही. किंबहूना कुणावरही (पब्लीक फिगर/संघटना) टिका करायची असल्यास अथवा भलावण करायची असल्यास प्रथम नीट वाचून खात्री करावी आणि मगच ती करावी अशा मताचा मी आहे आणि ते शक्यतितके पाळायचा प्रयत्न देखील करतो आणि दिशाभूल करून घेत नाही आणि कुणाची करत नाही. म्हणूनच अगदी आत्ता, सोनीयाजींच्या संपत्तीच्या धाग्यावर मी आधी शोधून मग खुलाचा केला. (आधी केले, आता सांगतो. ;) ) पण या निमित्ताने या बातमीपेक्षाही एक मोठा प्रश्न उपस्थित होतो ज्यामुळे आपल्या देशात धर्मांधतेपेक्षाही गंभीर ठरू शक्णारी वैचारीक दुही पडली आहे. कारण आहे ते असले मथळे देणारी माध्यमे आणि दिशाभूल करणारे विचारवंत. या बातमीचे मा. प्रतिभा पाटलांना पण काही पडले नसेल इतका त्रास तुम्हाला झाला कारण त्यात दिशाभूल होती. आजही जेंव्हा एका संघटनेला "गांधींचे मारेकरी" आणि अजून बरेच काही म्हणले जाते तेंव्हा त्या त्या वेळेस जन्माला देखील न आलेल्यांना देखील आपण कशी वागणूक देत असतो याचा पण विचार होणे महत्वाचे आहे. तीच गोष्ट सिलेक्टीव्ह पध्दतीने भ्रष्टाचार आणि स्टींग ऑपरेशन करणार्‍या तेजपाल/तेहेलका भाडोत्री पत्रकारगुंडाची आहे. पण आपल्याला ते चालते कारण का तर त्यात आपल्याला नको असलेल्या पक्षाचा आणि तत्वज्ञानाला त्रास होऊ शकतो, बदनाम होऊ शकते. थोडक्यात प्रतिभा पाटलांच्या बातमीतील मथळा हे हिमनगाच्या टोकाचे टोक आहे. असो,

In reply to by नितिन थत्ते

आता खर विचारु का थत्ते साहेब? कुणाची तुलना करताय? ए पी जे कलाम आणि प्रतिभा पाटिल यांची? ए पी जे काहीतरी विचार करु ह्सकणारे व्यक्तीमत्व आहे. उर्वरित न बोललेलच बरं.

In reply to by नितिन थत्ते

ओक्के. म्हणजे खाजगी मालकीच्या वास्तुत आणि सार्वजनिक वास्तुत प्रदर्शनार्थ भेटवस्तु ठेवणे यात काहीच गुणात्मक फरक नाही असे तुमचे म्हणणे आहे. गुड. समजा जर प्रतिभातैंनी त्या वस्तु घरातच ठेवल्या असत्या तर तुम्ही म्हणाला असता "डी आर डी ओ मध्ये फक्त तेथे प्रवेश असणार्‍या कर्मचार्‍यांना त्या पहायला मिळाल्या, प्रतिभातैंच्या घरी त्यांच्या घरच्या नौकरांना, भेटीस येणार्‍या समाजसेवकांना आणि तैंच्या काही नातेवाइकांना पहायला मिळाल्या. डझन्ट रिअली मेक इट बॅड." ;) आगे बढो. हम तुम्हारे साथ है.

In reply to by नितिन थत्ते

त्या वस्तू कलाम यांनी डी आर डी ओ मध्ये ठेवल्या आणि पाटील यांनी त्यांच्या कुटुंबियांच्या मालकीच्या शाळेत ठेवल्या. यात गुणात्मक फरक काय आहे ते मला कळत नाही. खरंच ? हम्म !! गुणात्मक पडताळा करायची खास फूटपट्टी (परत) दिसली. अर्थात (दुर्दैवाने) अशी फूटपट्टी वापरणे पट्टीचे भारतीय राजकारणी बनायला आवश्यक गोष्ट झाली आहे म्हणा ! हम्म !! हम्म !! शिवाय ही फूटपट्टी अब्दुल कलाम आणि प्रतिभा पाटील यांच्या कृतीची तुलना करण्यासाठी ??? हम्म !! हम्म !! हम्म !! भारतीय राजकारण सगळ्या सीमा तोडून मंगळयानापेक्षा जास्त वेगाने अमंगळाकडे चालले आहे !

विद्याभारती महाविद्यालय हे एक आघाडीच्या महाविद्यालयांपैकी एक आहे. ते पूर्णपणे एका कुटूंबाच्या खाजगी मालकीचे नक्कीच नाही. तेथे भरणारे प्रदर्शन सर्वांनाच खुले असणार मग त्यासाठी राष्ट्रपती भवनातील वस्तु भाड्याने आणल्या यात गैर ते काय? पांढर्‍या हत्तीच्या हट्टापाई आणखी पांढरा हत्ती! या धाग्यावरील माझ्या प्रतिसादाचा काही भाग इथे डकवतो आहे. भेटवस्तू पळवून नेणे - वर्तमानपत्रांत आलेल्या बातमीनुसार त्या वस्तू काही काळापुरत्या उसन्या देण्यात आल्या आहेत. नेहमीसाठी नव्हे. आपल्या देशातील अनेक लोक नवी दिल्ली येथे जाऊ शकत नाहीत राष्ट्रपती भवनाला भेट द्यायला. त्यामुळे तिथे असणार्‍या काही वस्तू काही काळासाठी इतर कुठल्या प्रदर्शनात ठेवल्यास हरकत काय? आंतरराष्ट्रीय प्रवास - भारत देशाच्या राष्ट्रपतिपदी बसणार्‍या व्यक्तीने इतर राष्ट्रांना भेट देऊन त्यांच्याबरोबरचे संबंध वृद्धींगत करणे हे कर्तव्यच आहे. या अगोदरच्या सर्वच राष्ट्रपतींनी याचे पालन केले आहे. माहिती म्हणून सांगतो या अगोदरचे राष्ट्रपती निवृत्त होवून ५ वर्षे झालीत तरी भारत सरकारच्या पैशाने जगभर प्रवास करून व्याख्याने देत असतात? पंतप्रधान, परराष्ट्रमंत्री व इतर मंत्री व अधिकारी देखील आंतरराष्ट्रीय प्रवास करतच असतात त्यावरही सरकारच्या तिजोरीतूनच खर्च केला जातो.