Skip to main content

रिंद जन्नत मे जा चुके

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 25/07/2012 या दिवशी प्रकाशित केले.
एक शेर आठवला. कधी ऐकला ते ठाउक नाही. बहुधा नववीच्या धड्यात होता कोणाचा आहे ठौक नाही "रिंद जन्नत मे जा चुके वाअजे मोहतरम रह गये" अर्थः चांगले लोक स्वर्गात गेले आहेत इथे जे काही राहिले आहेत ते सर्वसामान्य लोक आहेत. चांगले लोक लवकर जातात, काहीच न करता केवळ प्रेक्षक असणारे सर्वसामान्य मात्र उगाचच बरेच जगतात. ज्या शायराला हा शेर सुचला असेल त्याने विमनस्क मनस्थितीत हे शब्द लिहीले असतील पण बर्‍याचदा असे दिसते की सुस्वभावी, हसतमुख नेहमी दुसर्‍याच्या मदतीला धावणारे,आयुश्यीतील मिळालेला प्रत्येक क्षण भरभरून जगणारे मित्र /आप्त हे अल्पायुशी असतात्.ते अचानक आजाराने/अपघाताने मृत्यू पावतात. ( आनंद चित्रपटातील राजेशखन्ना ची व्यक्तीरेखा ) या उलट जीवनाला आलेले भोग मानणाने किरकीर करत कण्हत जगणारे खितपत दीर्घायूषी असतात. हे असे का असते ते कोणी सांगु शकेल का?

वाचने 8448
प्रतिक्रिया 51

प्रतिक्रिया

In reply to by बिपिन कार्यकर्ते

तुम्हाला नववीमधे हे असे ऊर्दू शेर वैग्रे असायचे का? कम्माले! मेलो मेलो\ =)) =)) खपलो.... --मागून काडीसार्ते

In reply to by स्पा

तो शेर नववी इयत्तेच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात एका धड्यात होता. बहुधा ग ल ठोकळ / इनामदार असे कोणीतरी लेखक होते. त्यांच्या धडा म्हणजे त्यांचे भाषणच होते त्या भाषणात तो शेर आलेला होता.

In reply to by अत्रुप्त आत्मा

असे काहीही नसते असेच म्हणतो. जो सुस्वभावी, हसतमुख नेहमी दुसर्‍याच्या मदतीला धावणारे,आयुष्यातील मिळालेला प्रत्येक क्षण भरभरून जगणारा वगैरे मित्र आप्त असतो त्याचं जाणं, तो नसणं , त्याच्या ह्याच गुणांमुळं आपल्याला जास्त लक्षात राहत असावं. बाकी जाणारांमध्ये आपला ठसा उमटवण्याची क्षमता नसते म्हणून त्यांचं जाणं आपल्या लक्षात राहत नाही इतकंच. अवांतर : आभासी जगतातले देखील किती अक्रिय/ कोमातले / मृत आयडी लक्षात आहेत? किती आले, किती गेले? पटकन लक्षात येतात ते फार थोडे आहेत. नि लक्षात येणारे बघा कसे असतात ते! :) (उदा. आपापल्या 'हिशेबा'ने लावून घ्यावीत)

In reply to by प्यारे१

जो सुस्वभावी, हसतमुख नेहमी दुसर्‍याच्या मदतीला धावणारे,आयुष्यातील मिळालेला प्रत्येक क्षण भरभरून जगणारा वगैरे मित्र आप्त असतो त्याचं जाणं, तो नसणं , त्याच्या ह्याच गुणांमुळं आपल्याला जास्त लक्षात राहत असावं. बाकी जाणारांमध्ये आपला ठसा उमटवण्याची क्षमता नसते म्हणून त्यांचं जाणं आपल्या लक्षात राहत नाही इतकंच.
टंकनश्रम वाचवल्याबद्दल धन्यवाद...

In reply to by प्यारे१

रिंद जन्नत मे जा चुके रिंद म्हणजे मद्यपी! त्यांना स्वर्गसुख मिळालं, पण (वाइजे मोहतरम रह गये.. असं नाहीये ते), वाइजे महदरम रह गये वाइज म्हणजे धर्मोपदेशक, आणि महदरम म्हणजे अनेकांच्या सह्या असलेलं प्रमाणपत्र! धर्मोपदेशकांना फक्त लोकांच प्रमाणपत्र मिळालं!

In reply to by संजय क्षीरसागर

, शेर पुरता गंडलाय! शक्य आहे. इयत्ता नववीच्या त्या पाठ्यपुस्तकातल्या धड्यात लेखकाने असाच अर्थ दिलेला होता. ( नववीत असताना शाळेत दारू/दारुडे जन्नत मधे कसे जातात ही शंका कुणी विचारेल अशी धास्ती असावी बहुतेक) माझा मुद्दा आहे तो मला समजलेल्या आशयाशी. चाम्गले लोक लौकर वर जातात. किरकिरे लोक भरपूर जगतात

In reply to by विजुभाऊ

शेरोशायरीत लिहिणार्‍या माणसाला जिंदादिली हवी असं मला तरी वाटतं > `शक्य आहे .... माझा मुद्दा आहे तो मला समजलेल्या आशयाशी', असं कसं म्हणता येईल? तुम्ही रागावणार नसाल तर सांगतो, हा शेर एक तर नववीच्या पुस्तकात नसेल किंवा लेखकाला तो कळला नसताना त्यानं वापरला असेल कारण अर्थ तर मी दिलाय तोच आहे अर्थ आशयाशी विसंगत आहे, थोडक्यात पिणारे स्वर्गात जातात आणि पिऊ नका म्हणून सांगणारे नुसते उपदेशक राहतात! बाकी तुमच्या अर्थाशी सुसंगत आणि भावना लक्षात घेऊन प्रतिसाद आधी दिलेला आहेच

In reply to by संजय क्षीरसागर

लेखकाला नव्हे मराठी पाठ्यपुस्तक मंडळाच्या संपादकाला..... ;-)

In reply to by संजय क्षीरसागर

"रिंद जन्नत मे जा चुके वाअजे मोहतरम रह गये"
रिंद म्हणजे मद्यपी आणि ते स्वर्गात गेले आणि ब्लाह ब्लाह वगैरे वाक्ये वाचून मला तर संजय क्षिरसागर रजनीशच्या नावाला बट्टा लावणार की काय असं वाटू लागलंय. रिंद म्हणजे 'पिणारा' असेल - पण 'पिणारा' स्वर्गात जात नाही, तो जास्तीत जास्त यकृत फुटून मरेल. जन्नत मध्ये जाणारे रिंद म्हणजे - ब्रह्मानंद पिणारे - ब्रह्मानंदम् परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तीं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादि लक्ष्यम् !! एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षि भूतम् ! भावातीतं त्रिगुण रहितं वगैरे वगैरे ज्यांचं वर्णन केलंय ते रिंद. शंकराचार्य हे रिंद - रजनीश हे रिंद - असो. "रिंद जन्नत मे जा चुके वाअजे मोहतरम रह गये" प्रतिसाद संपादित

In reply to by यकु

ब्रह्मानंदम् परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तीं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादि लक्ष्यम् !! एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षि भूतम् ! भावातीतं त्रिगुण रहितं सद्गुरुं तं नमामि वाह यकू तोडलंस मिर्ता

In reply to by स्पा

नम: तुभ्यं किंवा त्वाम नमामी. नम: या क्रियापदाला नेहमी चतुर्थी विभक्तिची आवश्यकता असते हे विसरलात का?

>>>एक शेर आठवला. अरे वा ! स्मॄती आली म्हणायची ;) >>>कधी ऐकला ते ठाउक नाही. बहुधा नववीच्या धड्यात होता काय सांगता? तुम्ही उर्दू शाळेत होता? वाटत नाही हं... लब्बाड >>>कोणाचा आहे ठौक नाही तुम्हाला बर्‍याच गोष्टी ठाउक नाहीत असे दिसते >>"रिंद जन्नत मे जा चुके वाअजे मोहतरम रह गये" अर्थः चांगले लोक स्वर्गात गेले आहेत इथे जे काही राहिले आहेत ते सर्वसामान्य लोक आहेत. चांगले लोक लवकर जातात, काहीच न करता केवळ प्रेक्षक असणारे सर्वसामान्य मात्र उगाचच बरेच जगतात. मस्त ! >>ज्या शायराला हा शेर सुचला असेल त्याने विमनस्क मनस्थितीत हे शब्द लिहीले असतील शक्य आहे. >>>पण बर्‍याचदा असे दिसते की सुस्वभावी, हसतमुख नेहमी दुसर्‍याच्या मदतीला धावणारे,आयुश्यीतील मिळालेला प्रत्येक क्षण भरभरून जगणारे मित्र /आप्त हे अल्पायुशी असतात्.ते अचानक आजाराने/अपघाताने मृत्यू पावतात. हं.... >>>( आनंद चित्रपटातील राजेशखन्ना ची व्यक्तीरेखा ) ती व्यक्तीरेखा आहे हो... वास्तव नाही. >>>या उलट जीवनाला आलेले भोग मानणाने किरकीर करत कण्हत जगणारे खितपत दीर्घायूषी असतात. हं... >>>हे असे का असते ते कोणी सांगु शकेल का? कसं असतं विजुभौ... एखादी व्यक्ती अचानक, कमी वयात, आपला अल्प परिचय असतांना गेली तर तिच्याविषयी आपल्या मनात अनुकंपा असते, मनात भिती असते की असेच आपणही गचकणार नाही ना? मग अशा मनस्थितीत त्या व्यक्तीचे केवळ चांगले गुणच आपल्याला सतत आठवत रहातात आणि त्याच्या विषयीच्या इतर मतांना आपण आपल्या मनात खोल गाडून टाकतो. जी व्यक्ती लहान वयात जाते, कदाचित ती अजून काही काळ जगली असती तर जीवनाच्या संघर्षात तिचे सुद्धा हास्य लोप पावले असते, किंवा अतिपरीचयात तिच्या स्वभावातले टोकदार कंगोरे आपल्याला कळले असते. मग आपले मत सुद्धा कदाचित भिन्न झाले असते. तरुण वयात असलेला दुर्दम्य आशावाद आणि बेफिकीर वृत्ती आयुष्याच्या सरत्या कालात कमी होत जाते, आर्थिक, शारीरीक अडचणी मनाला वेढून टाकतात आणि मग तो मनुष्य किरकिरा होतो. हा केवळ काळाचा महिमा असतो. म्हणून प्रत्येक क्षण भरभरून जगणारे अल्पायुषी असतात, आणि किरकिरी मंडळीच दिर्घायुषी होतात असा निष्कर्ष काढणे योग्य नाही. कुणाला आयुष्य किती असावे आणि आयुष्याचा अंत कसा व्हावा हे सांगणे कठीण असते. तुम्हाला फक्त ते मान्य करावे लागते आणि मान्य करण्याशिवाय दुसरा पर्याय सुद्धा नसतो. असो.

In reply to by नाना चेंगट

>>>कुणाला आयुष्य किती असावे आणि आयुष्याचा अंत कसा व्हावा हे सांगणे कठीण असते. तुम्हाला फक्त ते मान्य करावे लागते आणि मान्य करण्याशिवाय दुसरा पर्याय सुद्धा नसतो. आज प्रकर्षानं जाणवतंय. :(

In reply to by नाना चेंगट

बुधवार रात्र जवळ जवळ यायला लागली, की मिपावरचे धुरिणी** एका वेगळ्याच जगात जायला लागतात. बरोबर ना हो श्रामो ?* **बिका,विजुभौ,नाना,प्रभुगुर्जी, डान्या इ. इ. *आंतरजालावरती कुठलीही गोष्ट पटवून द्यायची असेल तर श्रामोंची साक्ष काढतात असे कुठेसे वाचले होते.

गर तेरे इंतजार मे एक अर्सा बीत जाता मुझे वक्त का अहसास न होता मै वही होता जो अर्से के पहले था बस वही एक लम्हा मै जीये जा रहा हुं जब तुम्हारी आखोने वादा ए वस्ल किया था .......... विजुभाऊ सातारवी.

धाग्याच्या निमितानं विजूभाउ पुन्हा लिहिते झालेले पाहून बरे वाटले.(अन पुन्हा न संपणार्‍या ढगातल्या, स्वप्नांच्या धाग्यांची मालिका सुरु करतात की काय म्हणून धास्तीही ;) ) प्यारे१, नाना ह्यांचे प्रतिसाद धाग्याला worth reading बनवतात. शंका एकच, एरव्ही बर्‍यापैकी हसतमुख, खेळकर म्हणून दिसणारं विजूभाउ हे व्यक्तिमत्व असा धागा का टाकू लागलं? नेमकं कशानं ट्रिगर होउन त्यांना हे असं वाटलं? वय सांगतानाही २५ वर्षे आणि १६० महिने असं धमाल उत्तर देणारे तुम्हीच ना?

तुला वाटतय तसं काहीच नाही. राहमे चोट खाकर कदम कुछ डगमगाये वो हमे हमपियाला समझ बैठे ..........विजुभाऊ सातारवी

वरील प्रतिक्रियांवरुन असा अर्थ लावता येईल की, मद्यपी लोक हे चांगले असतात आणि त्यांना मद्य घेतल्यामुळे किरकिर वगैरे करायची जरुरच भासत नाही. उलट मद्य न पिणारे हे सामान्य असतात आणि कधीच चव न घेतल्याने ते कंबख्त पण असतात. मग ते किरकिरीशिवाय दुसरं काय करणार ? आणि किरकिर करुन काही यकृत खराब होत नाही त्यामुळे ते जास्त जगतात.

विजुभाऊ सातारवी
सातारवी हे उगाचच सारवासारवी असे वाचले गेले.... उगाचच.... - (जमीं को जन्नत समझनेवाला रिंद) सोकजी

In reply to by शिल्पा ब

सिनेमातला आनंद खर्‍या आयुष्यात रिंद होता आणि सिनेमातला बाबू मोशाय पुढे शराबी झाला, तो इतका मदहोश झाला की त्याला प्रत्येक जण मयपरस्त (कमालीचा मद्यपी) दिसायला लागला नशेमे कौन नही है मुझे बताओ जरा, किसे है होश मेरे सामने तो लाओ जरा, नशा है सबपे मगर रंग नशेका है जुदा, खिलीखिली हुई सुबहापे है शबनम का नशा (प्रत्येक सकाळ दवाच्या नशेनं न्हाउन येते) हवापे खुशबूका बादलपे है रिमझिमका नशा (वारा सुगंधाच्या आणि ढग पावसाच्या नशेत आहे) कहीं सुरुर है खुशियोंका कहीं गमका नशा (कुणाला यशाची धुंदी तर कुणी दु:खाच्या नशेत आहे) नशा है सबपे मगर रंग नशेका है जुदा, (नशेत तर प्रत्येक जण आहे फक्त नशेचा रंग वेगळा आहे) नशा शराबमे होता तो नाचती बोतल (नशा दारुत असती तर बोतल नृत्यांगना झाली असती) मयकदे झूमते पैमानोंमे होती हलचल (मद्यालयं डोलली असती आणि प्याले हलले असते) मुझे आखोंसे पिलादे रे ओ सजनी दिवानी (तुझ्या नयनांची मदिरा सजणे मला पिऊ दे) आता प्यायची का नाही ते ठरवा

In reply to by संजय क्षीरसागर

मूळ शेर आणि मर्‍हाटी वाहाग दोन्ही मस्तच. पण दारूच्या प्रत्येक घोटानंतर कडक कॉफीचा एक एक घोट पाजून दारूची मजा किरकिरी केलीत की राव!

In reply to by विजुभाऊ

परा, शिल्पाला विचारतोय! पुरुषानं वाईन पिणं म्हणजे रेनकोट घालून अंघोळ करणं आहे.

विजुभौ तुम्ही कार्बन हायड्रोजन आणि ओएच बॉन्डेड आहात का? असलात तर तुमचे वय काय?

या प्रतिसादाच्या निमीतानं एक सांगावंस वाटतं की मला कुणाविरुद्ध काही लिहिण्यात स्वारस्य नाही. इथे एकालाही मी ओळखत नाही. जे विरोधी लेखन आहे ते धारणा प्रश्नांकित झाल्यामुळे आहे. स्वत:ची मतं असणं आणि ती स्पष्टपणे मांडणं म्हणजे अहंकार नाही. उगीच कुणीही उठावं आणि काहीही लिहावं असं वारंवार होऊ नये म्हणून हा प्रतिसाद द्यावा लागतोय, अत्यंत अनिच्छेनं आणि पुन्हा अशी वेळ येणार नाही या आशेनं तर आता प्रतिसादाला उत्तर : पहिली गोष्ट, संस्कृतमधे लिहिलं की लोकांवर प्रभाव पडतो पण त्याचा अर्थ श्लोक पाठ आहे इतकाच होतो स्वत:ला उलगडा झाला आहे असा होत नाही >ब्रह्मानंदम् परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तीं...(ब्लाह ब्लाह) .... भावातीतं त्रिगुण रहितं वगैरे वगैरे ज्यांचं वर्णन केलंय ते रिंद. शंकराचार्य हे रिंद - रजनीश हे रिंद - = क्या बात है! साला, हे आम्हाला माहितीच नाही, सत्याला भाषा नाही हे कळल्या क्षणी सरळच उलगडा झाला! उगीच अतिरेकी साधना, एकदा हा गुरु मग तो गुरु, मग भंकसगिरी वगैरे करावी लागली नाही... तर असो, ब्रह्मानंदम् परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तीं.... वगैरे फेकाफेकी नंतर बघू, तुम्ही म्हटलय "रजनीश हे रिंद -?" आणि "संजय क्षिरसागर रजनीशच्या नावाला बट्टा लावणार की काय असं वाटू लागलंय." = ओशोंबद्दल आपण कायकाय लिहिलय किंवा कुणाची कायकाय वाक्य इथे प्रकाशित केली आहेत , ते पाहा: http://www.misalpav.com/node/18579 http://www.misalpav.com/node/18555 http://www.misalpav.com/node/18536 Because that bastard hadn't and you want me to confirm how really it is to be enlightened? You read him, watch him for years and ultimately you realize whatever he did or preached at a great length was nothing but garbage. This comes to your head, this has to be so because whatever he spoke was nothing but mixture of schoolboy logic and emotional promotion towards filthy goal of enlightenment. Ultimately you cannot make head or tail of his garbage when it comes to your own condition, as you are and stay always..." http://www.misalpav.com/node/21119 या सर्वाचा विसर पडला आणि आज "शंकराचार्य हे रिंद - रजनीश हे रिंद -?" रजनीश एकदम शंकराचार्यां शेजारी? पुरता लोच्या झालेला दिसतोय, एक काही तरी स्टॅंड घ्या हो; का उगीच माझ्याविरुद्ध लिहायच म्हटलं की त्या आवेशात स्वत: काय लिहिलय याचा सुद्धा विसर पडतो? >रिंद म्हणजे मद्यपी आणि ते स्वर्गात गेले आणि ब्लाह ब्लाह वगैरे वाक्ये वाचून = आता "ब्रह्मानंदम् परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तीं" वगैरे ब्लाह ब्लाह कोण करतय हे लक्षात येईल >रिंद म्हणजे 'पिणारा' असेल - पण 'पिणारा' स्वर्गात जात नाही, तो जास्तीत जास्त यकृत फुटून मरेल. = प्रत्येक गोष्ट किती प्रमाणात करायची याचं तारतम्य असेल तर असं होत नाही आणि मागे झीलकरी कितीही असले तरी उगीच फेकंफेक करुणार्‍या किर्तनकाराला उलगडा झालाय असा अर्थ होत नाही

संजय जी उगाच त्रागा करताय. रजनीशांची आणि शंकराचार्‍यांची तुलना का केली गेलीय कोण जाणे. दोघेही आपापल्या जागी आहेत. त्यांच्यात उजवे डावे ज्येष्ठ कनीष्ठ असे काही नाही अशी तुलना म्हणजे न्यूटन आणि जेन्नर यांच्यात मोठे कोण असा वाद घालण्यासारखे आहे रिंद याचा अर्थ झिंगलेला असा असेल तर कोणाला ज्ञानाची झिंग असते कोणाला पैशाची

In reply to by विजुभाऊ

मी शेरचा सरळ अर्थ सांगितला होता आणि चर्चा तिथेच संपन्न झाली होती. यांनी उगीच "संजय क्षिरसागर रजनीशच्या नावाला बट्टा लावणार की काय असं वाटू लागलंय. " - वगैरे सुरु केलं म्हणून उत्तर दिलं.

रिंद वरुन इक्बाल बानो ने गायलेल्या "मैं नजर से पी रहा हूं: मधल्या खालील ओळी आठवल्या.. कोणी लिहिल्या आहेत कल्पना नाही..पण गाणं आज दिवसभर मनाच्या बॅकग्राउंडला राहणार... अभी रात कुछ है बाकी, न उठा नकाब साकी तेरा रिंद गिरते गिरते, कहीं फिर संभल न जाए.

In reply to by गवि

प्रेम भटीदा पियाला पिलायके दिवानी कर दिनी रे मोसे नैना मिलाइके छाप छलक सब छिनली रे मोसे नैना मिलाइके हा गुरु-शिष्यातला अध्यात्मिक अँगल झाला जिथे शिष्य, गुरुच्या नजरेनं, त्याच्या नुसत्या पाहण्यानं देहभान विसरला तू म्हणतोयस तो "मैं नजर से पी रहा हूं ये समा बदल न जाए" प्रियकर-प्रेयसीच्या संबंधातला नजारा झाला "ब्रह्मानंदम् परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ती" हा निराकाराची शराब प्यालेल्या सिद्धाचा अँगल झाला, आणि रिंद जन्नत मे जा चुके वाइजे महदरम रह गये हा धर्मोपदेशकांचा (नैतिकता सांगणार्‍यांचा), ज्यांनी कधी प्यायली नाही त्यांचा केलेला उपहास झाला

हुच्च मनोरंजन होत आहे काही प्रतिसादांनी. विजुभौंना थँक्स.