महत्वाची सूचना

नमस्कार,
मिसळपाव.कॉमवर सदस्य नोंदणी केल्यावर ईमेल आला नसल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.

झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये - ३

Primary tabs

यकु's picture
यकु in जनातलं, मनातलं
22 Jul 2011 - 6:46 am

Christopher Calder
Rajneesh spoke on a high level of intelligence and his spiritual presence emanated from his body ike a soft light that healed all wounds. While sitting close during a small gathering of friends, Rajneesh took me on a rapidly vertical inner journey that almost seemed to push me out of my physical body. His vast presence lifted everyone around him higher without the slightest effort on their part. The days I spent at his Bombay apartment were like days spent in heaven. He had it all and he was giving it away for free!
Rajneesh possessed the astounding powers of telepathy and astral projection, which he used nobly to bring comfort and inspiration to his disciples. Many phony gurus have claimed to have these mysterious abilities, but Rajneesh had them for real. The Acharya never bragged about his powers. Those who came near soon learned of them through direct contact with the miraculous.

क्रिस्तोफर काल्डर रजनीश मुंबईच्या Woodland अपार्टमेंटमध्ये रहात असताना त्यांना भेटला होता. त्याचे संन्यासाचे नाव स्वामी कृष्णख्रिस्त होते. त्याने रजनीशांचे सुरुवातीचे दि सायलेंट एक्स्प्लोजन लिहिले असाही तो दावा करतो. पण ओशो फौंडेशनने तो फक्त त्या पुस्तकाचा संपादक असल्याचा खुलासा केला आहे. काल्डरवर इथे लेखणी झिजवण्याचे कारण म्हणजे तो रजनीशांचा माजी संन्यासी व नंतरचा विरोधक आहे. काल्डरचे आरोप व त्यावरील ओशो फौंडेशनचे खुलासे या आंतर्जालीय मारामारीतून प्रचंड आंतर्जालीय कचरा निर्माण झाला आहे. अर्थातच तो उपसण्याचे कारण नाही. रजनीशांचा विरोधक झाल्यानंतरही काल्डरच्या वर दिलेल्या मतप्रदर्शनाला वेगळे महत्व आहे. कारण त्यातून अनेक प्रश्न उभे रहातात. रजनीशांकडे तथाकथित दिव्यदृष्टी होती व त्यांच्या उपस्थितीत भारून टाकल्याचा अनुभव येत असे तो म्हणतो त्यात तथ्य वाटते.
आचार्य अत्र्यांच्या कन्यका व रजनीशांच्या भक्त शिरीष पै (इथे आचार्य अत्र्यांनी लिहिलेल्या “तो मी नव्हेच” नाटकातील लखोबा लोखंडे आठवावा. शिरीष पै रजनीशांच्या भक्त झाल्या असताना आचार्य अत्रे हयात होते. शिरीष पै यांच्या विनंतीवरून मराठा प्रेसच्या कर्मचारी/वाचकांसाठी आचार्य अत्र्यांच्या उपस्थितीत रजनीशांनी एक व्याख्यानही दिले होते.पुढे रजनीश बंगळुरुला गेले असताना ते ज्या यजमानाकडे उतरले होते त्याने रजनीशांच्या शिष्येला रजनीशांच्या खोलीत झोपू देण्यास नकार दिला व रजनीशांना त्याने घराबाहेर काढल्याची बातमी आली तेव्हा आचार्य अत्रे अत्यंत नाराजीने "शेवटी सगळे सारखेच " म्हणाल्याची नोंद ही प्रतिभावंत ध्यानयोगी मध्ये आहे) यांनी रजनीशांवर लिहिलेल्या “प्रतिभावंत ध्यानयोगी” या पुस्तकातही शिरीष पै नी याच अर्थाची विधाने केली आहेत. बाकी विदेशी संन्यासिनी येऊ लागल्यानंतर रजनीश या त्यांच्या गुरुदेवांनी आपल्याकडे कसे दुर्लक्ष केले आणि त्यांच्या जवळ गेलेल्या इतर भवान्यानी आपल्याला कसे पाण्यात पाहिले यावर शिरीष पैनी आधीच छोट्या असलेल्या या पुस्तकाची बरीच पाने खर्ची घातलेली आहेत. असो.

तर काल्डर व शिरीष पै यांची रजनीशांकडे तथाकथित दिव्यदृष्टी असल्याची विधाने. मग प्रश्न असा निर्माण होतो की, दिव्यदृष्टी तसेच स्वत:च्या उपस्थितीने लोकांना भारून टाकण्याची जादू असणारा रजनीश संपत्तीच्या मागे का लागतो? जागृत होऊनही तो समाधानी राहू शकत नाही? तो या तथाकथित शक्तींचा वापर स्वत:चे साम्राज्य उभे करण्यासाठी का करतो? विदेशात उपचार करून घेण्याचा बहाणा करून, वास्तविक कर चुकवण्यासाठी भारतातून स्वत:चे तोंड काळे का करतो? आणि तिथेही तेच धंदे केल्याने विदेशी शासनाने जबर दंड वसूल करण्यासह पार्श्वभागी लत्ताप्रहार केल्यावर इकडे परत येऊन पुन्हा पहिले पाढे पंचावन करून त्याची प्रेयसीही आत्महत्या करते, तो ही व्यसनी होतो आणि शेवटी “माझे शरीर हे माझ्यासाठी नरक बनला आहे” हे विधान करून इहलोक सोडतो?

या सगळ्या गोंधळात एकच सत्य, नव्हे शोकांतिका अधोरेखित होते की तथाकथित जागृत पुरुष देखील कुठल्याही सामान्य माणसासारखे लोभी, अहंकारी, पतनशील व अज्ञानी असतात. त्यांच्या कुठल्याही करिष्म्याला भुलून जीवन समर्पित करणारे निष्ठावान अनुयायी असा जागृत पुरुष किंवा स्त्री गेल्यानंतर त्याच्या नावे रडण्या भेकण्याशिवाय व तक्रारींशिवाय काहीही करू शकत नाहीत.
ओरेगोनियन या अमेरिकन वृत्तपत्राने रजनीश प्रकरणावर त्याकाळी चालवलेले कव्हरेज आंतर्जालावर उपलब्ध आहे. जिज्ञासूंसाठी दिलेली लिंक मोठाच खजिना ठरेल. भारतात व त्यातल्या त्यात मराठी साहित्यात ओशो फौंडेशनच्या कृपेने रजनीश या भामट्याबद्दलची तपशीलवार सत्यता प्रकाशात आजवर प्रकाशात येऊ शकलेली नाही. आजही या भामट्याच्या पुस्तकांचा हजारोंनी खप होत असताना कुणी प्रकाशक ती छापण्याची शक्यता नाही.
झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये!

मला तुरुंग आणि बाहेरचे जगही सारखेच आहे. यामुळे मला तुरुंगाचा अनुभव मिळाला - रजनीश

खरा चेहरा - अगदी कुठल्याही गुन्हेगारासारखेच भाव. नेहमी प्रसारासाठी काढल्या जाणाऱ्या फोटोतील दैवी तेज, प्रसाद आणि हसू शेरीफच्या ऑफिसमध्ये टिकू शकले नाही

लेखमाला संपवलेली नाही- पण लिहीण्यासाठी उत्साह वाटत नाहीय. जे लिहायचं योजलं होत ते शब्दात उतरत नाहीय; कारण तेवढा निवांतपणा नाहीय.
वाचकांनाही कंटाळा आला असेल तर थांबवू.
कसं म्हणता ?

विचारधर्म

प्रतिक्रिया

अर्धवटराव's picture

22 Jul 2011 - 7:26 am | अर्धवटराव

>>तथाकथित जागृत पुरुष देखील कुठल्याही सामान्य माणसासारखे लोभी, अहंकारी, पतनशील व अज्ञानी असतात.
-- या वरुन विवेकानंदांचा एक किस्सा आठवला. (संदर्भ आठवत नाहि). रामकृष्णांनी विवेकानंदांना अश्या अद्भूत शक्तींबद्दल जेंव्हा माहिती दिली तेंव्हा विवेकानंदांनी विचारले कि या सगळ्यांचा मला परमेश्वराचे स्वरुप कळण्यास उपयोग होईल काय... परमहंसांनी "नाहि" असे उत्तर दिले. त्यावर विवेकानंदांचे म्हणणे कि मग त्या शक्तींचा काय उपयोग..

बाकि ओशोंबद्दल अगदी विरुद्ध टोकाचे विचार ऐकायला मिळतात. कोणि त्यांना खरच सिद्ध वगैरे मानतात तर कोणि त्यांना पाखंडी म्हणतात. खरं खोटं कोणास ठाऊक, पण हा माणुस दुनिया झुकानेवाला होता हे निर्विवाद.

(पाखंडी) अर्धवटराव

आपण कोणत्याही बाबामहाराजाच्या नादी लागलो नाही हे सुख केवढे मोठे आहे. आपणच आपले गुरू आहोत. आपल्या लेखांद्वारे सार्‍या बाबा महाराजांची अशीच फाडा.

सहज's picture

22 Jul 2011 - 9:36 am | सहज

तेही खरेच की कोण्या एका बुवाबाबाच्या नादी न लागणे चांगले.

पण कमी आधीक प्रमाणात कोण्या नाडीपट्टीवर, कोण्या ग्रहगोल युतीवर, कोण्या पद्धतशीर पणे इतिहास, संस्कृती, धर्माची, समाजकार्याची महती यांची सरमिसळ करत राजकीय विचारसरणीला नेउन बांधणार्‍या, कोण्या जपानी गादीच्या तर कोण्या मंतरलेल्या रुद्राक्षाच्या, लक्ष्मी यंत्राच्या, कोणी टुकार सिरीयल, चॅनेलच्या, कोणी बॉलीवूड / हॉलीवूडच्या, कोणी शेयरबाजाराच्या झटपट योजनेच्या, कोणी अतिखाण्यापिण्याच्या,..

सगळ्यात राहूनही कशात न अडकण्याचा सराव सगळ्यांनी वाढवला पाहीजे.

रणजित चितळे's picture

22 Jul 2011 - 8:53 am | रणजित चितळे

ह्या विषयावरचे आपले लेख खुप आवडले

प्रचेतस's picture

22 Jul 2011 - 9:12 am | प्रचेतस

लेखमाला छान चालू आहे.

जयंत कुलकर्णी's picture

22 Jul 2011 - 9:50 am | जयंत कुलकर्णी

मुर्खांचे मालक !
आपल्या आयुष्यात आपल्याला कितीतरी गोष्टींचा सामना करावा लागतो. सगळ्यात मोठा सामना करवा लागतो तो स्वत:च्या मनाशी. आपण मनाशी किती खेळत असतो याचा विचार केलात तर चक्रावून जाल. त्यातल्याच काही भावनांपैकी एक आहे खंत आणि आपण केलेल्या चुकांची कारणे. यानी मन अस्वस्थ झाले की ते शांत करायचे अनेक मार्ग लोकांनी शोधून काढले आहेत. काहींनी तर शास्त्रे लिहीली आहेत. उदा. भविष्य इ.इ. खय्याम म्हणतो सोड ते सगळे. पण या आयुष्यात तुझ्या हातून अनेक चुका होतील. कारण तू मनुष्यप्राणी आहेस, आणि चुका करणे हा त्याचा स्थायीभाव आहे. त्यासाठी तुला जबरदस्त शिक्षाही होतील. त्यांची कारणे शोधून कुठल्याही शास्त्रात बसवायला जाऊ नकोस ! ह्या संसारात मन रमव, काम कर आणि त्या चूका परत न करण्याची शपथ घे.
खय्याम म्हणतो,

शास्त्रांचा अभ्यास सोड, तेच बरं आहे
ते हात मुलायम केसातून फिरव, तेच बरं आहे.
चुकलास तर नशीब करेल रक्तबंबाळ
पण काळजी नको ती रक्तवर्णी पेल्यात ओत,
(तेच बरं आहे)

आपल्या चुकांची उत्तरे शास्त्रात बसवायला गेले की काय होते ? आपल्या प्रश्नांनी लोकांची पोटे भरतात. आपले प्रश्न सुटतच नाहीत. परत, शास्त्र सांगणारे, त्यांची ती लायकी आहे का, हा ही एक संशोधनाचा विषय आहे. मला एक नाथ माहीती आहेत. यांचे वडील नाथ/महाराज होते. हे स्वत: एका बॅंकेत कारकून होते. वडील गेल्यावर यांनी बॅंकेतली नोकरी सोडली आणी वडिलांची जागा घेतली. जणू काही यांना त्या शास्त्रांमधले वडील गेल्यावर एकदम कळायला लागले. पण बॅंकेतल्या कारकूनीत काय ठेवले आहे ? येथे एक दोन वर्षात दोन तीन फ्लॅट होतात. बरं यांच्या शिष्यगणात एकही शिष्य त्यांची गादी चालवायला समर्थ नव्ह्ता ? थोडक्यात काय त्यांनी एक कारखाना टाकला आहे, अध्यात्माचा, लोकांना मुर्ख बनवायचा. त्यांच्या नंतर त्यांचा मुलगा मालक. या धंद्याचे अजून एक वैशिष्ट्य आहे बरका मित्रांनो ! मालकांचा मुलगा मालक आणि गिर्‍हाईकाचाच मुलगा गिर्हा्ईक. कारण आपण आपल्या मुलांना लहानपणापासूनच त्यांच्या फोटोसमोर येता जाता वाकवतो !! मला आश्चर्य वाटते, त्यांचे जाउ देत. ते लोकांना लुटायलाच बसले आहेत. पण यांच्या वडिलांच्या शिष्यगणात सुबूध्द माणसे असतील, तर एकाच्या तरी मनात वरील विचार का नाही आला? का आपण आपली बुध्दी या महाराजांच्या पायाशी गहाण टाकली आहे ?

sagarparadkar's picture

22 Jul 2011 - 11:16 am | sagarparadkar

हीच प्रथा बर्‍याच प्रमाणात कीर्तनकारांमधेदेखील प्रचलित आहे ....

कारण इतर कुठे काही डोके चालवून फारसं काही हाती लागत नसावं. पण एकदा थोडीशी पोपटपंची आणि घोकंपट्टी जमली आणि कीर्तन करायला उभं राहिलं की अगदी वयोवृद्ध लोक देखील चटकन तुमच्या पाया पडू लागतात. शिवाय स्वतः काहीही न करता इतरांवर 'नैतिक अधःपतित' झाल्याची टीका (हरीदासाच्या त्या गादीवरूनच) करायला एकप्रकारे लोकमान्यता मिळते ती वेगळीच.

असे अनेक अतिशहाणे अगदी जवळून पाहिले आहेत तेव्हाच हे मतप्रदर्शन करत आहे, तेव्हा "सगळेच काही असे नसतात" हा सामान्य प्रतिवाद करण्यात काही अर्थ नाही, कारण मला त्याची जाणीव आहेच.

विलासराव's picture

22 Jul 2011 - 9:53 am | विलासराव

>>>>>> रजनीशांकडे तथाकथित दिव्यदृष्टी होती व त्यांच्या उपस्थितीत भारून टाकल्याचा अनुभव येत असे तो म्हणतो त्यात तथ्य वाटते.

दादा कोंड्केंनी त्यांच्या कुठल्याशा चित्रपटात ओशोंच्या आश्रमातील काही गोष्टींवर उपहासात्मक चित्रीकरण केले होते. दादांचा येतील जनमानसावर असलेला प्रभाव लक्षात घेउन ओशोंनी दादांना आश्रमात भेटायला बोलावले.
दादा गेले, वेटींग रुममधे दादा असतानाच रजनीश आले. दादांना त्यांनी विचारले की तुम्ही असे का केले? मला शब्दशः सर्व आठवत नाही. पण मुद्दा तो नाही.
दादांनी स्वतः आपल्या आत्मचरीत्रात सांगीतलय की रजनिशांनी जेंव्हा त्यांच्याशी हस्तांदोलन केले त्यावेळी एक वेगळीच उर्जा शरीरभर पसरत गेली. ते भारावुन गेले.
असाच एक वाचलेला अनुभव सांगीतला.
बाकी मस्त लिहीताय.

यक्कू..

जबराट बुर्खेफाडी सुरु आहे , लिहिण्याची शैली जाम आवडली ....

शेवटचा फोटो, आणि खरा चेहरा - अगदी कुठल्याही गुन्हेगारासारखेच भाव. नेहमी प्रसारासाठी काढल्या जाणाऱ्या फोटोतील दैवी तेज, प्रसाद आणि हसू शेरीफच्या ऑफिसमध्ये टिकू शकले नाही
हे वाक्य

__/\__

मान गये उस्ताद

आदिजोशी's picture

22 Jul 2011 - 10:23 am | आदिजोशी

१ नंबर भावा.

किसन शिंदे's picture

22 Jul 2011 - 10:39 am | किसन शिंदे

भगवान(?) रजनीश ओशो नावाच्या तथाकथित योग्याचा अंगरखा तुम्ही जो फेडलाय ते खुप उत्तमचं केलंत फक्त तो अजुन थोडा जास्त फेडायला हवा होता.

या सगळ्या पेक्शा आपल किचन च्या नादि लागलेल बर !

मुलूखावेगळी's picture

22 Jul 2011 - 11:03 am | मुलूखावेगळी

प्रकाटाआ

मुलूखावेगळी's picture

22 Jul 2011 - 11:02 am | मुलूखावेगळी

छान माहिती कळत आहे.
वाचतेय.
त्यांच्याकडे असे काहीतरी असतेच ज्यामुळे २रे झुकतात ही न ते २र्याला झुकवतात.

जमल्यास रविशंकर बद्दल ही लिहावेस

sagarparadkar's picture

22 Jul 2011 - 11:08 am | sagarparadkar

>>आणि तिथेही तेच धंदे केल्याने विदेशी शासनाने जबर दंड वसूल करण्यासह पार्श्वभागी लत्ताप्रहार केल्यावर इकडे परत येऊन पुन्हा पहिले पाढे पंचावन करून त्याची प्रेयसीही आत्महत्या करते, तो ही व्यसनी होतो आणि शेवटी “माझे शरीर हे माझ्यासाठी नरक बनला आहे” हे विधान करून इहलोक सोडतो?

परत आल्यावर ह्या महाशयांनी "Jesus Chrit Murdered Again - This Time In Ronald Reagan's Regime" असे पुस्तक स्वतःच्याच हकालपट्टीवर लिहिले होते. आता बोला :)

यशवंतराव, आपल्या कम्यूनमधील वास्तव्यात आपण ओशोंचे Accounts चे काम पाहत होतात का? नसाल तर ओशोंच्या गुप्तपणे केलेल्या परदेशगमनाच्यावेळी काय काय उद्योग केले गेले होते ते त्यावेळच्या मराठी भाषिक Accountant ने वर्तमान्पत्रांत वर्णन केले होते ते पण पहावे.

यकु's picture

22 Jul 2011 - 12:13 pm | यकु

आपल्या कम्यूनमधील वास्तव्यात आपण ओशोंचे Accounts चे काम पाहत होतात का?

मी कुठल्याच कम्यूनमध्ये कधीही राहिलेलो नाही... फक्त ते पाहिले आहे.
माझा जन्म ८५ चा आहे.
मी त्यांचा अकाऊंटंट कसा असेन?

नसाल तर ओशोंच्या गुप्तपणे केलेल्या परदेशगमनाच्यावेळी काय काय उद्योग केले गेले होते ते त्यावेळच्या मराठी भाषिक Accountant ने वर्तमान्पत्रांत वर्णन केले होते ते पण पहावे.

आपल्याकडे त्याकाळची वर्तमानपत्रे असतील तर हे नेक काम आपणच केले तर बरे होईल..
मराठी अंतर्जाल त्याकाळी जन्मले नसल्याने मला बसल्याबसल्या ते उपलब्ध होणार नाही.. नाहीतर तोही उद्योग केला असता.

:)

sagarparadkar's picture

22 Jul 2011 - 11:53 am | sagarparadkar

>> आपल्याकडे त्याकाळची वर्तमानपत्रे असतील तर हे नेक काम आपणच केले तर बरे होईल..

मी ज्या वर्णनाबद्दल लिहिले, तो लेख प्रत्यक्षात ई.स. २००० च्या सुमारास वर्तमान पत्रात आला होता. योगायोग असा की त्या लेखाकाचे नाव देखील 'यशवंत'च होते, पण नक्की आठवत नाही. पण ते मराठी भाषिक होते एव्ह्ढे मात्र नक्की.

असो ... आपली लेखमाला आवडली. अश्याच स्वरूपाचे अनेक बुवा आणि बाबांचे पितळ उघडे पाडणारे एक पुस्तक श्री. अनिल अवचट ह्यांनी लिहिले होते. त्यात ह्या रजनीश आणि कंपू ने पुण्यातील नवा पूल परिसरात बहुतेक 'संघवी फॅक्टरी' च्या आवारात केलेल्या कार्यक्रमाचं वर्णन वाचलं होतं

मी ऋचा's picture

22 Jul 2011 - 11:57 am | मी ऋचा

मालिका अतिशय आवडते आहे..निवांतपणा मिळाला की लगेच लिहा. आम्ही वाट पाहतोय..:)

भारी समर्थ's picture

22 Jul 2011 - 12:02 pm | भारी समर्थ

अभिनंदन!

अशा तथाकथित बाबांचे ढोंगीपणाचे बुरखे वेळेत फाडले नाही तर त्यांना ’देवपण’ लाभते. त्याची सगळ्यात मोठी उदाहरणं म्हणजे कृष्ण आणि राम. म्हणजे माणूस म्हणून त्यांच्या कृत्याबद्दल आपलं काहीच म्हणणं नाहीये पण ज्यांना देवपद मिळालय त्यांनी सदैव आदर्श वर्तनच करायला हवं की. मग, काही महिन्यांचा असताना राक्षसांचा वध करणारा, स्वत:च्या मामाची खांडोळी करणारा मथुरेचा स्त्रीलंपट, वीर आणि चतुर योद्धा गुजरातेत का बरं पळून जातो? बरं एवढं करूनही तो तिकडे उत्तरेत दुसर्‍यांच्या राज्यात रडीचे डाव खेळायला जातच होता. मर्यादा पुरूषोत्तम राम हा बायकोचे स्त्रीसुलभ हट्ट पुरवताना आणि कालांतराने तिच्याच चारित्र्यावर संशय घेताना आपल्या वागण्यातील मर्यादा विसरला होता काय? युद्धात स्वत:चा भाऊ जखमी अवस्थेत पडला असताना ज्याला औषधाची गरज भासली, तो कसला देव? ते मारूतीचं पर्वत वगैरे उचलून आणणं म्हणजे त्याकाळी भारतात फिक्शन रायटर्सची वाणवा नसल्याचेच उदाहरण (आणि आपण उगाच हॅरी पॉटर आणि नार्नियाला उचलून धरतो.)

माणसाला माणूस राहून दिलेत ना तर त्याच्या गुणदोषांसकट त्याचे मोठेपण मान्य करण्यात आम्हाला काही अडचण वाटत नाही.

कोणाच्याही भावना दुखावल्यास क्षमस्व बिलकूल नाही.

असे अजून लेख येऊ द्यात.

--
भारी समर्थ

आदिजोशी's picture

22 Jul 2011 - 1:11 pm | आदिजोशी

फारच विनोदी प्रतिसाद. रोफ्ल...

(उपप्रतिसाद खेचायची कल्पना आवडली तुमची.)

भारी समर्थ's picture

22 Jul 2011 - 1:27 pm | भारी समर्थ

बरंय, हसू का मीपण मग?

(उपप्रतिसाद म्हंजे काय हो काका?)

भारी समर्थ

परिकथेतील राजकुमार's picture

22 Jul 2011 - 2:12 pm | परिकथेतील राजकुमार

ऑ ? असे मधेच थांबून कसे चालेल ?

लेखमाला उत्तम सुरु आहे आणि तशीच पुढे चालु दे.

थांबू नको. ओशोंचा कंटाळा आला असेल तर इतर कोणीतरी काचपट्टीवर घे.

तुझी लेखनशैली जबरी आहे तेव्हा बंदबिंद करण्याचा विचारही नको.

लेखनमाला बंद करण्याचा विचार तरी तुर्तास सोडून द्या हो. इतकी चांगली माहिती मिळत असताना मध्येच लिखाण बंद करणे प्रशस्त वाटत नाही.

- पिंगू

स्मिता.'s picture

22 Jul 2011 - 4:29 pm | स्मिता.

लेखमाला वाचत होते. थांबू नका... रजनीश संपले असतील तर इतर कोणावर लिहा. असल्या बुवा, बाबा, अण्णा, अम्मा, इ.ची कमतरता नाहिये.

आत्मशून्य's picture

23 Jul 2011 - 11:33 pm | आत्मशून्य

लेखनमाला बंद करण्याचा विचार खरोखर सोडून द्यावा, मजा येते ओशोबद्दल निगेटीव पॉजीटीव दोन्हीही वाचायला. ओशोचा तसा विषेश अभ्यास नाय पण माणूस अर्ग्युमेंटचा बाप होता हे मात्र खरं. कोणालाच आवरला नाय. तो कोणताच धर्म मानत नाय म्हटल्यावर त्याला अमेरिकन कोर्टात जबानीपूर्वी त्यानेच लिहलेल्या रजनिशीझम ग्रंथावर हात ठेऊन शपथ घ्यायला लावली होती तो प्रसंग तर जबराच.. जजला म्हणाला तूम्हाला जे मि प्रत्यक्ष सांगेन त्यावर विश्वास नाही, पण मीच जो ग्रंथ लिहला आहे त्यावर मीच हात ठेऊन बोललो की ते मात्र तूमचा कायदा सत्य आहे असं मानन्याचं नाटक करणार ? यापेक्षा आणखी मोठा विनोद कोणता ? पण ठिक आहे तूमचं नाटक चालावं म्हणून मी सूध्दा मीच लिहलेल्या ग्रंथावर हात ठेऊन शपथ घ्यायचं नाटक करायला तयार आहे :)

ओशोंचे विचार विचारप्रवर्तक होते. त्यानी ज्या शंका उपश्तित केल्या त्यामुळे बर्‍याच प्रस्थापित समजाना धक्के बसले हे मात्र खरे.
बर्‍याचदा आपण मनात एखादा विचार करत असतो मात्र तो मान्य करायला / मांडायला आपणच तयार नसतो. ओशोनी असे बरेच विचार मांडले. ते बंडखोर होते.
त्यानी जाणतेअजाणतेपणी चार्वाक विचारपरंपरा पुढे नेली.
व्यक्ती आणि विचार यात व्यक्ती स्खलनशील असू शकते त्यांचा परीणाम विचारांवर होतो.
ओशोनी बर्‍याच विषयांवर सुम्दर प्रवचने दिलेली आहेत. पटत असले तरी त्यातील विचारांचे खंडन करण्याची तसेच ते विचार अ‍ॅक्सेप्ट करण्याची पंचाइत व्हायची