हिंदुस्थानचे स्वातंत्र्य लक्ष्मीच्या पावलांनी आले असे म्हटले तर ते वावगे ठरु नये. १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्य समरातील पाउल होते राणी लक्ष्मीचे आणि १९४३ मध्ये आजाद हिंद ने केलेल्या इंग्रजी साम्राज्यावरील लत्ताप्रहारात पाउल होते ते झाशी राणी पलटणीच्या प्रमुख कॅप्टन लक्ष्मी यांचे.
हिंदुस्थानातील स्त्रीचे तेजस्वी रुप जगाला दाखविणारी आजाद हिंद सेनेची रणरागिणी कॅप्टन लक्ष्मी आज हरपल्या. २४ ऑक्टोबर १९१४ मध्ये मद्रास येथे जन्मलेल्या प्रख्यात वकील श्री एस स्वामिनाथन व समाजसेविका अम्मु कुट्टी यांच्या या कन्येने १९३८ साली वैद्यकिय पदवी मिळवली आणि १९४० डॉ. लक्ष्मी सिंगापुरात दाखल झाल्या. त्या सिंगापुरातुन चालविण्यात येत असलेल्या स्वातंत्र्य लढ्याकडे आकर्षित झाल्या. १९४३ मध्ये नेताजी सिंगापुरात येताच त्यांना असे समजले की नेताजींना स्वातंत्र्य संग्रामार्थ आपल्या सेनेत महिलांची पलटणही स्थापन करायची आहे तेव्हा त्यांनी नेताजींची भेट घेतली आणि डॉ लक्ष्मी या आजाद हिंद सेनेतील झाशी राणी पलटणीच्या प्रमुख कॅप्टन लक्ष्मी झाल्या
झाशी राणी पलटणही आजाद हिंद सेनेबरोबर ब्रह्मदेश मार्गे भारतिय सीमेकडे गेली.
नेताजींचे महिला सेनेचे स्वप्न साकार करणार्या कॅप्टन लक्ष्मी आजाद हिंद सेनेच्या हंगामी सरकारात सदस्या होत्या
१९४५ साली आजाद हिंदच्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीत इंफाळ सीमेकडून माघार घेताना त्यांना इंग्रजांनी कैद केले व हिंदुस्थानात आणले. १९४६ च्या सुप्रसिद्ध 'सेहगल, धिल्लाँ, शाहनवाज म्हणजेच आजाद हिंद विरुद्ध ईंग्रज सरकार या लाल किल्ला अभियोगात त्या मुक्त झाल्या. मार्च १९४७ मध्ये त्या कॅप्टन प्रेम सेहगल यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. स्वातंत्र्यानंतरच्या काळात त्यांनी समाजसेवेला वाहुन घेतले.
आज वयाच्या ९७ व्या वर्षी त्यांचे कानपूर येथे हृदय विकाराने निधन झाले. हिंदुस्थानच्या या विरांगनेला विनम्र मानवंदना.
(चित्रसौजन्य - क्र. १ द हिंदु, क्र. २/३/४ - द फरगॉटन आर्मी)
वाचने
4944
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
__/\__
हिंदुस्थानच्या शुर विरांगनेला
श्रद्धांजली !! आपल्या
स्त्री शक्तीचे मूर्त रूप असणार्या
रंगाकाका,
In reply to स्त्री शक्तीचे मूर्त रूप असणार्या by चतुरंग
रणरागिणीस विनम्र अभिवादन!
:(
श्रद्धांजली
खरच ग्रेट माणसे ही
--^--^--^--
सर्वसाक्षी, एका विस्मृत योद्धीच्या आयुष्याची ओळख घडवल्याबद्दल
विनम्र श्रद्धांजली, अशा
अभिवादन !!!
श्रध्दाजंली !!
_/\_
आदरांजली __/\__
नि:शब्द
श्रध्दांजली
आदरांजली
श्रद्धांजली
श्रद्धांजली !
श्रद्धांजली कॅप्टन लक्ष्मी
श्रद्धांजली
_/\_ विनम्र श्रद्धांजली...
श्रद्धांजली !
इंग्रजी राज्यात, स्वकीयांचा
रणरागिणी
+१
In reply to रणरागिणी by मन१
श्रद्धांजली