मी आणि रामदासकाका वेळेतच दाराज च्या दिशेने निघालो..
वेटिंगमधे गप्पा सुरु..
तेरा जण जमा झालेत..
नीलकांत मालक,ररामदासकाका,निदे,मकी,योगी९००,प्रास्,पन्नासराव्,मोदक्,मनोज,पंकज आणि गणपा द ग्रेट.
यावेळेला बॅटरीची काळजी घ्या! नाहीतर स्पेअर लॅपटॉप/टॅब असेल ना कोणाचा तरी? शिवाय बाकी खादाड मंडळी प्रतिसाद देऊ शकतातच. आताच मोदक आणि गणपाजवळ बोलले. मजा चालू द्या!
सकाळपासून एका वैयक्तिक कामात अडकल्याने कट्ट्याला अंमळ उशिरा दाखल झालो. किसन आणि माशँ सोबत होते. बस मध्ये असतानाच किसन ने कुणी कुणी नुसते बोलबच्चन दिले आहेत याची यादी दिली होती आणि १५ जण आले तरी चांगला प्रतिसाद मिळाला म्हणायचा असा ठराव आमच्या त्रिसदस्यीय समितीने आधीच पास केला होता. जाऊन बघतो तर काय आम्ही एकूण १६ जण. साधारण १२-१३ जण तिथे असली तरी नेहमीची लोकं तशी कमी होती अनेक आधी न आलेले चेहरे होते. कोण कोण आले आहेत याची पक्की यादी फोन वरून मिळाली होतीच. एक एक ओळख करून घेत टोकाच्या व्यक्ती कडे गेलो तर तो म्हणे, मी गणपा. च्यामारी, याला ओळखलेच नव्हते. त्याने प्रोफाईल मध्ये चक्क १० वी च्या हॉल तिकिटचा फोटो लावला असावा. प्रत्यक्षात गडी थोडा बाळसेदार आहे. मालकांची तब्येत पण अंमळ सुधारलेली दिसली, मागच्या जून कट्ट्यापेक्षा (त्या कट्ट्याचे फोटो आजवर कुणालाही दिसते नाही आहेत हा भाग वेगळा, फोटो नाही मिळाले म्हणून वृतांत पण टाकायचा राहून गेला होता. असो.)
थोड्या वेळातच पदार्थ येऊ लागले. ते पाहिले आणि प्रासभाऊंचे कुटील कारस्थान लगेच लक्षात आले. सगळे पदार्थ निरामिष. मी लगेच बसल्या बसल्या आजूबाजूला तंगडी तोडणारे कोण आहेत याचा अंदाज घेतला. तेव्हा लक्षात आले की चांगले ६-७ लोकं आहेत सामिष कंपूत. मग निरामिष कंपूचे घातक बेत सफल होऊ नये म्हणून मेन्यू कार्ड मागवून १-२ कोंबड्यांना सद्गती दिली. इतका वेळ प्रासच्या बाजूला बसलेल्या गविंनी आपले हित ओळखले आणि चाणाक्षपणे किसन ला तिथे बसवून ते आमच्या गोटात सामील झाले. मग अजून एका कोंबडीला आम्ही तिच्या योग्य जागी पोहोचते केले. कालीमिरी मुर्ग हा तंदूर सारखाच पण मिरीच्या स्वादाचा आयटेम होता. शिवाय पहाडी कबाब, आणि एक काहीतरी आणि बेवडा चिकन. हे रम मध्ये भाजलेले चिकन होते. चार प्रकारापैकी २ चांगले आणि २ ठीकठाक होते.
मग मेन कोर्स पूर्वी थोडी पांगापांग झाली. एकमेकांशी बोलून घेतले. मी वेज कंपूत जाऊन बसलो आणि थोडीशी बोलणी खाऊन घेतली. समस्त महिला आयडींच्या (खऱ्या आणि खोट्या) वतीने उपस्थित मकी मावशीने आपण व्हेज आहोत हे मला माहित नाही म्हणून बोल लावून घेतले. त्यावर सगळे कट्टे नेहमी व्हेज ठिकाणी असतात असा बिनतोड मुद्दा मी काढला. पेशाने शिक्षक असून सुद्धा तिने माझा मुद्दा मान्य करून मला कृतकृत्य केले. मग प्रमाण बोली आणि वऱ्हाडी बोली यावर एक छोटा परिसंवाद घडला. एव्हाना कट्ट्याचे दोन भाग पडले होते. आमच्या बाजूला धिंगाणा चालू होता आणि दुसऱ्या बाजूला व्यसनाची वर्गीकरणे यावर एक धीरगंभीर परिसंवाद. यात रामदासकाका, गवि, गणपा, नीलकांत, प्रभो, मनोज जोशी, पंकज
यांनी भाग घेतला होता. त्या वर्गीकरणात मिपाचे व्यसन कुठेसे बसते या प्रश्नाचे उत्तर मात्र सफाईने टाळले गेले.
धिंगाणा ग्रुप मध्ये नवनवीन विषय काढले जात होते. एका महत्त्वाच्या विषयाला तोंड फुटते न फुटते तोवर मेन कोर्स आला. मग त्या विषयाला योग्य जागा दाखवून आम्ही शिताफीने आमच्या ताटाकडे कूच केली. इथे चिकन गावठी हंडी नावाचा तिखट प्रकार (करवीरकर मोदकाला पण तिखट लागला म्हणजे बघा) आणि चिकन आफताबी असा एक मस्त प्रकार होता. तो खाता खाता आम्ही आफताब म्हणजे चंद्र की सूर्य यावर चर्चा केली. त्यामुळे त्या प्रकारची चव आणखीन चांगली लागली (असे माझे वैयक्तिक मत आहे). गार्लिक नान मागवले होते. त्यात इतकी लसूण होती की आपण साधारण एका आठवड्याला मिळून तेवढी लसूण खात असू. पण चवीला बरा होता. हे सगळे झाल्यावर पोट भरले असले तरी लस्सी ना मागवण्याचे पातक करायचे नव्हते. लस्सी शेअर करायला मला एक भिडू हवा होता. प्रास भाऊ असताना काळजी कसली. मग आम्ही एक मोठ्ठी पंजाबी लस्सी मागवली. ती चांगली आहे हे ऐकून अजून ८ जणांनी मागवली. कुणीतरी ५ जण त्या लस्सीला मुकले.
एकूण कट्टा जरा हाय प्रोफाईल होता. दोन संपादक, एक सल्लागार आणि खुद्द मालक. त्यातून मालकांनी लोकांना धपाटे किंवा छडीचा प्रसाद द्यावा अशी लाडिक मागणी इलिनॉय मधून झाली होती. त्यांनी ती मनावर घेतली नाही हे नशीब. कारण एकतर धपाटे किंवा छडी मारायला ते काहीं प्राथमिक शाळेतले मास्तर नाहीत. त्यांनी त्यांच्या पेशाप्रमाणे जड तळाचा बूट आणि सत्यवचन पट्टा (हा गिरणीच्या पट्ट्याच्या मट्रेयलचा आणि त्याच जाडीचा असतो म्हणे) आणला असता तर कठीण प्रसंग उद्भवला असता. त्याच भीतीने काहीं आयडीन्नी आपापली तोंडे काळी केली होती असा आमचा वहीम आहे.
असो, तर कट्टा एकदम दणक्यात झाला. या कट्ट्याला पार पुण्याहून आलेल्या हर्षद, मोदक आणि पंकज चे खास कौतुक वाटले. पुढील कट्ट्याला पण त्यांनी आणि इतरांनी यावे ही विनंती. एका तहात पुढील युद्धाची बीजे असतात तशीच एका कट्ट्याच्या शेवटील गप्पांत पुढील कट्ट्याची बीजे असतात. त्याप्रमाणे एक अफ्तारी कट्टा करायचा खंग्री बेत झाला आहे. त्याला मूर्त रूप कधी द्यायचे ते बघावे लागेल. पण अर्थात ३० दिवसांच्या आत ते कार्य पार पडावे लागेल. रमजान काहीं आपल्या सोयीसाठी थांबणार नाही :-)
कट्टा जायच की नाही हे नक्की , सकाळीच कट्टा जीवन गौरवंचा फोन (किसन) आल्या नंतर ठरवून टाकल काहीतरी करून जमवायाला पाहिजे ..
ठाण्याला बस मधे बसल्या किस्णाच्या बाजूची सीट वर सुंदर , ठेन्गनी आणि मजबूत व्यक्ती येईल ह्या आशेवर विमे होते पण तस काही झाल नाही :)
प्रवासात बर्याच गप्पा झाल्या ठरवून सुद्धा विषय आय-टी वर आला की किस्णा कडे बघून पुन्हा बदलला
..
धाग्यात सांगितल्या प्रमाणे धाब्याच्या पुढे एक स्टॉप बस थांबल्या नंतर विमे आणि किस्णा जवळ जवळ पळत सुटले (चांगली(?) जागा मिळवण्यासाठी )
..
कट्टा जोरदार झाला , खतरनाक खादडी झाली ,बाकी सर्व वेग-वेगळ्या विषयावर गप्पा मारत असताना मी रामदास काका , नील-कांत , मनोज , पंकज आणि उशिराने गवी आम्ही एका अतिशय रोमांचक विषयावर गप्पा मारल्या.. :)
..
मेन-कोर्स आल्या नंतर अस्मदिकनि एकट्याने भाजितले पनीर संपवाल्याने बारीक चिमटे सुधा साइड डिश म्हणून खावे लागले..
शेवटची पंजाबी हाफ (हाफ मध्येच गार) लास्सी एकदम भारी होती.
..
येताना मकि आणि निदे ह्यांच्या नवीन होंडा ब्राइयो मध्ये बरोबर येताना परत गप्पांचा फड रंगला आणि एवढ लिहून मी माझे १६६ शब्द संपावतो :)
आणि सर्वात वरच्या छायाचित्रात मनसोक्त प्रसन्न हास्य फुलवणारे ज्यु. योगी९००.
.. इतकं शांत आणि हसतमुख पोरगं मी तरी पाहिलेलं नव्हतं या आधी. त्याला आमच्या मोठ्या लोकांच्या कट्ट्यामधे अजिबात कुरकुर किंवा परत चलण्याची घाई करायची नव्हती. अट फक्त एकच.. मी जिथे हुंदडीन तिथे मला मुक्तपणे हुंदडू द्या. मग काय.. बाबा पळताहेत मागे मागे..
गवि..आभारी आहे...
इतकं शांत आणि हसतमुख पोरगं मी तरी पाहिलेलं नव्हतं या आधी. त्याला आमच्या मोठ्या लोकांच्या कट्ट्यामधे अजिबात कुरकुर किंवा परत चलण्याची घाई करायची नव्हती. अट फक्त एकच.. मी जिथे हुंदडीन तिथे मला मुक्तपणे हुंदडू द्या. मग काय.. बाबा पळताहेत मागे मागे..
बाळासाहेबांना अजून थांबण्याची इच्छा होती...पण नंतर नंतर सांभाळण्यासाठी सर्वांचीच दमछाक झाली असती म्हणून मी लवकर घरी निघालो. वाटेतच साहेबांनी मस्तपैकी झोप घेतली आणि घरी पोचल्यावर उठून दंगा सुरू केला..
थोडी उशिराच प्रतिक्रिया देत आहे...सर्वप्रथम सर्वांचे आभार...
मी पहिल्यांदाच कट्टयाला आलो, ते ही लहान मुलाला घेऊन. पण सर्वांनी मला आणि त्याला सांभाळून घेतले. गवि, रामदास काका, निदे,मकि,गणपा,निलकांत्,५०फक्त,विमे,किसन्,प्रास आणि बर्याच जणांशी थोडाफार संवाद साधता आला. जास्त वेळ धांबता नाही आले पण खुप मजा आली.
गवि यांचे live update मस्तच आणि विमे यांचा वृतांत ही छानच...
पुढील कट्ट्याच्या प्रतिक्षेत...
आयला, गणपा भारतात आलाय हे माहितीच नव्हते!
त्याचा फोटो बघून एकदम चकितच झालो. किसनरावांच्या फोनवर फोन केला तर ते फोन घरी ठेवून आले आहेत असे कळले. मग पन्नासरावांच्या फोनवरून गणपाशी गफ्फा हाणल्या जरा! मजा आली. रामदास काकांशी बोलून घेतले लगे हाथ!
मज्जा करा लेको!
- (हळहळ वाटणारा) सोकाजी
नरमदिल कबाब, हरा भरा कबाब, मांचुरियन,चिकन ब्लॅक पेपर आणि बेवडा चिकन हे आत्तापर्यंतचे स्टार्टर्स. बेवडा चिकनचं परीक्षण मा. गणपा करत आहेत. गप्पांचा रंग भरत चालला आहे..
फोटो टाका लवकर लवकर. बाकी, कट्ट्याला चर्चाविषय भर्पूर असतीलच.
अण्णा टीमने नवनिर्वाचित राष्ट्रपती महोदय भ्रष्टाचारी आहेत, असा आरोप करुन खळबळ उडवुन दिली आहे. प्रशांत भुषण आणि अरविंद केजरीवाल असे बोलले आहेत. करिता माहितीस्तव सादर.
फोटो टाका लवकर नै तर मी टीव्हीवरच्या बातम्या डकवीत राहीन.
-दिलीप बिरुटे
फोटो शॉपचे धागे शिरियसली वाचुन प्रतिक्रिया दिल्या असत्या तर फोटोत अजुन ब्राइटनेस आणता आला असता. ;)
श्री रामदास काकांच्या अलिकडे मिपाचे मालक श्री नीलकांत इतके ओळखता आले.
-दिलीप बिरुटे
थोडी मदत मी करते. मोदक भाऊंकडून सकाळीच कट्ट्याला जाणार असल्याचं कळलं होतं. गविंनी धागा टाकताच मुद्दाम मी मोदकाला फोन केला, "अरे, तुझं नाव नाहीये, पोचलास की नाही?" :D त्याने लगेच गविंना विचारायला सुरुवात केली, तोपर्यंत मी गणपाशी थोड्या गप्पा मारून घेतल्या.
नंतर मी केवळ जळजळीमुळे "फोटो दिसत नाहीत" अशी प्रतिक्रिया दिली, तेवढ्यात लाईट गेले आणि खरोखरच काहीही दिसायचं बंद झालें. :D थोड्या वेळाने मकीला फोन करत होते, तेवढ्यात कुंदनशेटचा गबोल्यावरून निरोप आला, "गणपाला चांगला कापा म्हणावं". मकी म्हणाली ३ टेबलं जोडून फुल्लटू दंगा चालू आहे. मग प्रासनी फोन घेतला.
आमच्या नावाने थोडं थोडं अन्न बाजूला काढून ठेवून मगच आम्ही खातो आहोत असं आश्वासन त्यांनी दिलं. बरोबरच गणपा लवकर पळून जायच्या विचारात असल्याने गविंनी त्याला शेजारी बसवलाय ही माहिती दिली. त्याशिवाय गणपाच्या दुसर्या बाजूला प्रभो आहे, पण गणपा उठायला लागला तर मी त्याच्या दुसर्या बाजूला जाऊन बसेन अशी हमी प्रासने दिली. आता गणपा आहे की पळाला, ते मात्र तिथले कोणीतरी सांगू शकतील!
प्रतिक्रिया
धन्यवाद
कृपा करुन ...
शुभेच्छा.
कट्ट्याला शुभेच्छा !!
(No subject)
गवि,
सकाळपासून एका वैयक्तिक कामात
कट्टा जायच की नाही हे नक्की ,
आणि एक राहिलच प.पु प्रास भौ
जे ब्बात !!
(No subject)
अरे वा..
(No subject)
मला
(No subject)
अरेच्चा.
आणि सर्वात वरच्या छायाचित्रात
आभारी आहे..
विमे,प्रभो,माशँ,किसन ,ही आणखी
मिपा धर्म वाढवावा.
इनो बाजूलाच ठेवून बसलोय.
थोडं इकडे पण पास कर राव.
आयला, गणपा भारतात आलाय हे
नरमदिल कबाब, हरा भरा कबाब,
परीक्षण मा. गणपा करत आहेत
खिक!
मिसळपावच्या पावसाळी सम्मेलनात
चायला आजच ऑफिसच्या कामात
कट्टेकर्यानी श्रावण पाळल्याचे दिसत नाही
(No subject)
एनो घेतल्या गेल्या आहे.
अरे
सुहास झेले...
गणपा चा
अरे वा अजुन डिश संपली नाही वाटते....
शुभेच्छा!!
फोटो टाका.
फार अंधार झाला. आता काही
फोटो शॉपचे धागे शिरियसली
अंधार आहे.
मुळातच फार अंधार आहे.. आ णि
गवि, यावेळी लॅपी नव्हता.
गविंना वृत्तांताची थोडी मदत
चिकन हंडी.. इथलीसस्पेशल..
चिकन आफताब. ही पण
थोडा उजेड
धन्यवाद.
लस्सी जबरी अस्सल आहे.. एकदम
लस्सी... अंतिम अड्डा
हे काय ....