✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

दाराज कट्टा...लाईव्ह..

ग
गवि यांनी
Sun, 07/22/2012 - 18:25  ·  लेख
लेख
मी आणि रामदासकाका वेळेतच दाराज च्या दिशेने निघालो.. वेटिंगमधे गप्पा सुरु.. तेरा जण जमा झालेत.. नीलकांत मालक,ररामदासकाका,निदे,मकी,योगी९००,प्रास्,पन्नासराव्,मोदक्,मनोज,पंकज आणि गणपा द ग्रेट.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वावर
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
24482 वाचन

💬 प्रतिसाद (106)

प्रतिक्रिया

धन्यवाद

पैसा
Sun, 07/22/2012 - 18:27 नवीन
आणि शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

कृपा करुन ...

कुंदन
Sun, 07/22/2012 - 21:25 नवीन
अन कृपा करुन ... १०० री नंतर नवा धागा टाका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

शुभेच्छा.

प्रभाकर पेठकर
Sun, 07/22/2012 - 18:31 नवीन
अरेरे! माझ्या घराजवळ कट्टा आणि मी इतक्या दूSSSSSर. कट्ट्याला शुभेच्छा...!
  • Log in or register to post comments

कट्ट्याला शुभेच्छा !!

सानिकास्वप्निल
Sun, 07/22/2012 - 18:40 नवीन
माझ्या ही घराजवळ आणी मी ही दूर :( असो कट्ट्याला शुभेच्छा आणी लाईव्ह वृतांत वाचत आहे :) मजा करा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

(No subject)

गवि
Sun, 07/22/2012 - 18:33 नवीन
Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

गवि,

पैसा
Sun, 07/22/2012 - 18:36 नवीन
यावेळेला बॅटरीची काळजी घ्या! नाहीतर स्पेअर लॅपटॉप/टॅब असेल ना कोणाचा तरी? शिवाय बाकी खादाड मंडळी प्रतिसाद देऊ शकतातच. आताच मोदक आणि गणपाजवळ बोलले. मजा चालू द्या!
  • Log in or register to post comments

सकाळपासून एका वैयक्तिक कामात

विश्वनाथ मेहेंदळे
Mon, 07/23/2012 - 20:53 नवीन
सकाळपासून एका वैयक्तिक कामात अडकल्याने कट्ट्याला अंमळ उशिरा दाखल झालो. किसन आणि माशँ सोबत होते. बस मध्ये असतानाच किसन ने कुणी कुणी नुसते बोलबच्चन दिले आहेत याची यादी दिली होती आणि १५ जण आले तरी चांगला प्रतिसाद मिळाला म्हणायचा असा ठराव आमच्या त्रिसदस्यीय समितीने आधीच पास केला होता. जाऊन बघतो तर काय आम्ही एकूण १६ जण. साधारण १२-१३ जण तिथे असली तरी नेहमीची लोकं तशी कमी होती अनेक आधी न आलेले चेहरे होते. कोण कोण आले आहेत याची पक्की यादी फोन वरून मिळाली होतीच. एक एक ओळख करून घेत टोकाच्या व्यक्ती कडे गेलो तर तो म्हणे, मी गणपा. च्यामारी, याला ओळखलेच नव्हते. त्याने प्रोफाईल मध्ये चक्क १० वी च्या हॉल तिकिटचा फोटो लावला असावा. प्रत्यक्षात गडी थोडा बाळसेदार आहे. मालकांची तब्येत पण अंमळ सुधारलेली दिसली, मागच्या जून कट्ट्यापेक्षा (त्या कट्ट्याचे फोटो आजवर कुणालाही दिसते नाही आहेत हा भाग वेगळा, फोटो नाही मिळाले म्हणून वृतांत पण टाकायचा राहून गेला होता. असो.) थोड्या वेळातच पदार्थ येऊ लागले. ते पाहिले आणि प्रासभाऊंचे कुटील कारस्थान लगेच लक्षात आले. सगळे पदार्थ निरामिष. मी लगेच बसल्या बसल्या आजूबाजूला तंगडी तोडणारे कोण आहेत याचा अंदाज घेतला. तेव्हा लक्षात आले की चांगले ६-७ लोकं आहेत सामिष कंपूत. मग निरामिष कंपूचे घातक बेत सफल होऊ नये म्हणून मेन्यू कार्ड मागवून १-२ कोंबड्यांना सद्गती दिली. इतका वेळ प्रासच्या बाजूला बसलेल्या गविंनी आपले हित ओळखले आणि चाणाक्षपणे किसन ला तिथे बसवून ते आमच्या गोटात सामील झाले. मग अजून एका कोंबडीला आम्ही तिच्या योग्य जागी पोहोचते केले. कालीमिरी मुर्ग हा तंदूर सारखाच पण मिरीच्या स्वादाचा आयटेम होता. शिवाय पहाडी कबाब, आणि एक काहीतरी आणि बेवडा चिकन. हे रम मध्ये भाजलेले चिकन होते. चार प्रकारापैकी २ चांगले आणि २ ठीकठाक होते. मग मेन कोर्स पूर्वी थोडी पांगापांग झाली. एकमेकांशी बोलून घेतले. मी वेज कंपूत जाऊन बसलो आणि थोडीशी बोलणी खाऊन घेतली. समस्त महिला आयडींच्या (खऱ्या आणि खोट्या) वतीने उपस्थित मकी मावशीने आपण व्हेज आहोत हे मला माहित नाही म्हणून बोल लावून घेतले. त्यावर सगळे कट्टे नेहमी व्हेज ठिकाणी असतात असा बिनतोड मुद्दा मी काढला. पेशाने शिक्षक असून सुद्धा तिने माझा मुद्दा मान्य करून मला कृतकृत्य केले. मग प्रमाण बोली आणि वऱ्हाडी बोली यावर एक छोटा परिसंवाद घडला. एव्हाना कट्ट्याचे दोन भाग पडले होते. आमच्या बाजूला धिंगाणा चालू होता आणि दुसऱ्या बाजूला व्यसनाची वर्गीकरणे यावर एक धीरगंभीर परिसंवाद. यात रामदासकाका, गवि, गणपा, नीलकांत, प्रभो, मनोज जोशी, पंकज यांनी भाग घेतला होता. त्या वर्गीकरणात मिपाचे व्यसन कुठेसे बसते या प्रश्नाचे उत्तर मात्र सफाईने टाळले गेले. धिंगाणा ग्रुप मध्ये नवनवीन विषय काढले जात होते. एका महत्त्वाच्या विषयाला तोंड फुटते न फुटते तोवर मेन कोर्स आला. मग त्या विषयाला योग्य जागा दाखवून आम्ही शिताफीने आमच्या ताटाकडे कूच केली. इथे चिकन गावठी हंडी नावाचा तिखट प्रकार (करवीरकर मोदकाला पण तिखट लागला म्हणजे बघा) आणि चिकन आफताबी असा एक मस्त प्रकार होता. तो खाता खाता आम्ही आफताब म्हणजे चंद्र की सूर्य यावर चर्चा केली. त्यामुळे त्या प्रकारची चव आणखीन चांगली लागली (असे माझे वैयक्तिक मत आहे). गार्लिक नान मागवले होते. त्यात इतकी लसूण होती की आपण साधारण एका आठवड्याला मिळून तेवढी लसूण खात असू. पण चवीला बरा होता. हे सगळे झाल्यावर पोट भरले असले तरी लस्सी ना मागवण्याचे पातक करायचे नव्हते. लस्सी शेअर करायला मला एक भिडू हवा होता. प्रास भाऊ असताना काळजी कसली. मग आम्ही एक मोठ्ठी पंजाबी लस्सी मागवली. ती चांगली आहे हे ऐकून अजून ८ जणांनी मागवली. कुणीतरी ५ जण त्या लस्सीला मुकले. एकूण कट्टा जरा हाय प्रोफाईल होता. दोन संपादक, एक सल्लागार आणि खुद्द मालक. त्यातून मालकांनी लोकांना धपाटे किंवा छडीचा प्रसाद द्यावा अशी लाडिक मागणी इलिनॉय मधून झाली होती. त्यांनी ती मनावर घेतली नाही हे नशीब. कारण एकतर धपाटे किंवा छडी मारायला ते काहीं प्राथमिक शाळेतले मास्तर नाहीत. त्यांनी त्यांच्या पेशाप्रमाणे जड तळाचा बूट आणि सत्यवचन पट्टा (हा गिरणीच्या पट्ट्याच्या मट्रेयलचा आणि त्याच जाडीचा असतो म्हणे) आणला असता तर कठीण प्रसंग उद्भवला असता. त्याच भीतीने काहीं आयडीन्नी आपापली तोंडे काळी केली होती असा आमचा वहीम आहे. असो, तर कट्टा एकदम दणक्यात झाला. या कट्ट्याला पार पुण्याहून आलेल्या हर्षद, मोदक आणि पंकज चे खास कौतुक वाटले. पुढील कट्ट्याला पण त्यांनी आणि इतरांनी यावे ही विनंती. एका तहात पुढील युद्धाची बीजे असतात तशीच एका कट्ट्याच्या शेवटील गप्पांत पुढील कट्ट्याची बीजे असतात. त्याप्रमाणे एक अफ्तारी कट्टा करायचा खंग्री बेत झाला आहे. त्याला मूर्त रूप कधी द्यायचे ते बघावे लागेल. पण अर्थात ३० दिवसांच्या आत ते कार्य पार पडावे लागेल. रमजान काहीं आपल्या सोयीसाठी थांबणार नाही :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

कट्टा जायच की नाही हे नक्की ,

माझीही शॅम्पेन
Mon, 07/23/2012 - 23:26 नवीन
कट्टा जायच की नाही हे नक्की , सकाळीच कट्टा जीवन गौरवंचा फोन (किसन) आल्या नंतर ठरवून टाकल काहीतरी करून जमवायाला पाहिजे .. ठाण्याला बस मधे बसल्या किस्णाच्या बाजूची सीट वर सुंदर , ठेन्गनी आणि मजबूत व्यक्ती येईल ह्या आशेवर विमे होते पण तस काही झाल नाही :) प्रवासात बर्‍याच गप्पा झाल्या ठरवून सुद्धा विषय आय-टी वर आला की किस्णा कडे बघून पुन्हा बदलला .. धाग्यात सांगितल्या प्रमाणे धाब्याच्या पुढे एक स्टॉप बस थांबल्या नंतर विमे आणि किस्णा जवळ जवळ पळत सुटले (चांगली(?) जागा मिळवण्यासाठी ) .. कट्टा जोरदार झाला , खतरनाक खादडी झाली ,बाकी सर्व वेग-वेगळ्या विषयावर गप्पा मारत असताना मी रामदास काका , नील-कांत , मनोज , पंकज आणि उशिराने गवी आम्ही एका अतिशय रोमांचक विषयावर गप्पा मारल्या.. :) .. मेन-कोर्स आल्या नंतर अस्मदिकनि एकट्याने भाजितले पनीर संपवाल्याने बारीक चिमटे सुधा साइड डिश म्हणून खावे लागले.. शेवटची पंजाबी हाफ (हाफ मध्येच गार) लास्सी एकदम भारी होती. .. येताना मकि आणि निदे ह्यांच्या नवीन होंडा ब्राइयो मध्ये बरोबर येताना परत गप्पांचा फड रंगला आणि एवढ लिहून मी माझे १६६ शब्द संपावतो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

आणि एक राहिलच प.पु प्रास भौ

माझीही शॅम्पेन
Mon, 07/23/2012 - 23:36 नवीन
आणि एक राहिलच प.पु प्रास भौ यानी तडफेने शाकाहारी खिंड - वेजप्रभू देशपांडे म्हणया सारखी लढवली ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन

जे ब्बात !!

सूड
Sun, 07/22/2012 - 18:41 नवीन
जे ब्बात !!
  • Log in or register to post comments

(No subject)

गवि
Sun, 07/22/2012 - 18:53 नवीन
Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

अरे वा..

स्वाती दिनेश
Sun, 07/22/2012 - 18:56 नवीन
कट्ट्याला रंगत चढू दे.. स्वाती
  • Log in or register to post comments

(No subject)

गवि
Sun, 07/22/2012 - 19:02 नवीन
Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

मला

पैसा
Sun, 07/22/2012 - 19:05 नवीन
फोटो दिसत नाहीत! ;)
  • Log in or register to post comments

(No subject)

गवि
Sun, 07/22/2012 - 19:09 नवीन
Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

अरेच्चा.

चिंतामणी
Sun, 07/22/2012 - 23:01 नवीन
निलकांतचे डावीकडे रामदासकाका आहे. आणि उजवीकडे ५० फक्त :o
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

आणि सर्वात वरच्या छायाचित्रात

गवि
Mon, 07/23/2012 - 09:53 नवीन
आणि सर्वात वरच्या छायाचित्रात मनसोक्त प्रसन्न हास्य फुलवणारे ज्यु. योगी९००. .. इतकं शांत आणि हसतमुख पोरगं मी तरी पाहिलेलं नव्हतं या आधी. त्याला आमच्या मोठ्या लोकांच्या कट्ट्यामधे अजिबात कुरकुर किंवा परत चलण्याची घाई करायची नव्हती. अट फक्त एकच.. मी जिथे हुंदडीन तिथे मला मुक्तपणे हुंदडू द्या. मग काय.. बाबा पळताहेत मागे मागे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

आभारी आहे..

योगी९००
Tue, 07/24/2012 - 10:30 नवीन
गवि..आभारी आहे... इतकं शांत आणि हसतमुख पोरगं मी तरी पाहिलेलं नव्हतं या आधी. त्याला आमच्या मोठ्या लोकांच्या कट्ट्यामधे अजिबात कुरकुर किंवा परत चलण्याची घाई करायची नव्हती. अट फक्त एकच.. मी जिथे हुंदडीन तिथे मला मुक्तपणे हुंदडू द्या. मग काय.. बाबा पळताहेत मागे मागे.. बाळासाहेबांना अजून थांबण्याची इच्छा होती...पण नंतर नंतर सांभाळण्यासाठी सर्वांचीच दमछाक झाली असती म्हणून मी लवकर घरी निघालो. वाटेतच साहेबांनी मस्तपैकी झोप घेतली आणि घरी पोचल्यावर उठून दंगा सुरू केला.. थोडी उशिराच प्रतिक्रिया देत आहे...सर्वप्रथम सर्वांचे आभार... मी पहिल्यांदाच कट्टयाला आलो, ते ही लहान मुलाला घेऊन. पण सर्वांनी मला आणि त्याला सांभाळून घेतले. गवि, रामदास काका, निदे,मकि,गणपा,निलकांत्,५०फक्त,विमे,किसन्,प्रास आणि बर्‍याच जणांशी थोडाफार संवाद साधता आला. जास्त वेळ धांबता नाही आले पण खुप मजा आली. गवि यांचे live update मस्तच आणि विमे यांचा वृतांत ही छानच... पुढील कट्ट्याच्या प्रतिक्षेत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

विमे,प्रभो,माशँ,किसन ,ही आणखी

गवि
Sun, 07/22/2012 - 19:14 नवीन
विमे,प्रभो,माशँ,किसन ,ही आणखी उपस्थितांची यादी..
  • Log in or register to post comments

मिपा धर्म वाढवावा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 07/22/2012 - 19:15 नवीन
छान. वाचतोय. फक्त, फोटो काढायच्या वेळी जरा लायटीखाली या हो. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

इनो बाजूलाच ठेवून बसलोय.

प्रचेतस
Sun, 07/22/2012 - 19:29 नवीन
इनो बाजूलाच ठेवून बसलोय.
  • Log in or register to post comments

थोडं इकडे पण पास कर राव.

सूड
Sun, 07/22/2012 - 19:35 नवीन
थोडं इकडे पण पास कर राव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

आयला, गणपा भारतात आलाय हे

सोत्रि
Sun, 07/22/2012 - 19:32 नवीन
आयला, गणपा भारतात आलाय हे माहितीच नव्हते! त्याचा फोटो बघून एकदम चकितच झालो. किसनरावांच्या फोनवर फोन केला तर ते फोन घरी ठेवून आले आहेत असे कळले. मग पन्नासरावांच्या फोनवरून गणपाशी गफ्फा हाणल्या जरा! मजा आली. रामदास काकांशी बोलून घेतले लगे हाथ! मज्जा करा लेको! - (हळहळ वाटणारा) सोकाजी
  • Log in or register to post comments

नरमदिल कबाब, हरा भरा कबाब,

गवि
Sun, 07/22/2012 - 19:35 नवीन
नरमदिल कबाब, हरा भरा कबाब, मांचुरियन,चिकन ब्लॅक पेपर आणि बेवडा चिकन हे आत्तापर्यंतचे स्टार्टर्स.
बेवडा चिकनचं परीक्षण मा. गणपा करत आहेत. गप्पांचा रंग भरत चालला आहे..
  • Log in or register to post comments

परीक्षण मा. गणपा करत आहेत

कुंदन
Sun, 07/22/2012 - 19:43 नवीन
त्याने क्रेडिटकार्ड आणलय ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

खिक!

पैसा
Sun, 07/22/2012 - 19:48 नवीन
गणपाभाऊ लवकर पळायच्या विचारात आहे त्यामुळे गविंनी त्याला बाजूला बसवून घेतलंय अशी बातमी आताच हाती आलीय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

मिसळपावच्या पावसाळी सम्मेलनात

किसन शिंदे
Sun, 07/22/2012 - 19:46 नवीन
मिसळपावच्या पावसाळी सम्मेलनात पावसानेही जोरदार हजेरी लावली आहे. :) अरे.. सुझेचं आगमन झालंय.
  • Log in or register to post comments

चायला आजच ऑफिसच्या कामात

टवाळ कार्टा
Sun, 07/22/2012 - 19:47 नवीन
चायला आजच ऑफिसच्या कामात अडकलो...यायचे मनात असुनपण जमले नाही ठाण्यातच कट्टा असता तर एक चक्कर तरी टाकता आली असती पटकन
  • Log in or register to post comments

कट्टेकर्‍यानी श्रावण पाळल्याचे दिसत नाही

वेताळ
Sun, 07/22/2012 - 19:50 नवीन
चंगळच आहे.....
  • Log in or register to post comments

(No subject)

गवि
Sun, 07/22/2012 - 19:57 नवीन
Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

एनो घेतल्या गेल्या आहे.

आत्मशून्य
Sun, 07/22/2012 - 19:57 नवीन
दंगा करा लेको....
  • Log in or register to post comments

अरे

सुमीत भातखंडे
Sun, 07/22/2012 - 20:05 नवीन
अरे वा! लगे रहो...
  • Log in or register to post comments

सुहास झेले...

गवि
Sun, 07/22/2012 - 20:06 नवीन
सुहास झेले... Image removed.
  • Log in or register to post comments

गणपा चा

कुंदन
Sun, 07/22/2012 - 21:18 नवीन
गणपा चा प्रकाश पडलेला दिसतोय या फोटोत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

अरे वा अजुन डिश संपली नाही वाटते....

वेताळ
Sun, 07/22/2012 - 20:06 नवीन
फोटो आला नाही अजुन......
  • Log in or register to post comments

शुभेच्छा!!

कौशी
Sun, 07/22/2012 - 20:29 नवीन
जोरदार कट्टा...खुप फोटो येउ द्या...
  • Log in or register to post comments

फोटो टाका.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 07/22/2012 - 20:31 नवीन
फोटो टाका लवकर लवकर. बाकी, कट्ट्याला चर्चाविषय भर्पूर असतीलच. अण्णा टीमने नवनिर्वाचित राष्ट्रपती महोदय भ्रष्टाचारी आहेत, असा आरोप करुन खळबळ उडवुन दिली आहे. प्रशांत भुषण आणि अरविंद केजरीवाल असे बोलले आहेत. करिता माहितीस्तव सादर. फोटो टाका लवकर नै तर मी टीव्हीवरच्या बातम्या डकवीत राहीन. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

फार अंधार झाला. आता काही

गवि
Sun, 07/22/2012 - 20:31 नवीन
Image removed. Image removed. फार अंधार झाला. आता काही दिसेना. बाकी भर उपस्थितांनी घालावी. सर्वजण धागा अन प्रतिसाद वाचत आहेत इथे..
  • Log in or register to post comments

फोटो शॉपचे धागे शिरियसली

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 07/22/2012 - 20:50 नवीन
Image removed. फोटो शॉपचे धागे शिरियसली वाचुन प्रतिक्रिया दिल्या असत्या तर फोटोत अजुन ब्राइटनेस आणता आला असता. ;) श्री रामदास काकांच्या अलिकडे मिपाचे मालक श्री नीलकांत इतके ओळखता आले. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

अंधार आहे.

चिंतामणी
Sun, 07/22/2012 - 21:08 नवीन
जरा प्रकाश टाका की. आणि फटु खाली नावे दिली तर जास्त बरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

मुळातच फार अंधार आहे.. आ णि

गवि
Sun, 07/22/2012 - 21:24 नवीन
मुळातच फार अंधार आहे.. आ णि मोबाईलवर चाललंय सगळं अपलोड अन टंकन. तस्मात म र्यादित लेखन शक्य.. स्वारी... बाकी इतरजन यथावकाश लिहीतीलच..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

गवि, यावेळी लॅपी नव्हता.

चिंतामणी
Sun, 07/22/2012 - 23:04 नवीन
कम से कम टॅब. मालकांनी याची दखल घ्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

गविंना वृत्तांताची थोडी मदत

पैसा
Sun, 07/22/2012 - 20:45 नवीन
थोडी मदत मी करते. मोदक भाऊंकडून सकाळीच कट्ट्याला जाणार असल्याचं कळलं होतं. गविंनी धागा टाकताच मुद्दाम मी मोदकाला फोन केला, "अरे, तुझं नाव नाहीये, पोचलास की नाही?" :D त्याने लगेच गविंना विचारायला सुरुवात केली, तोपर्यंत मी गणपाशी थोड्या गप्पा मारून घेतल्या. नंतर मी केवळ जळजळीमुळे "फोटो दिसत नाहीत" अशी प्रतिक्रिया दिली, तेवढ्यात लाईट गेले आणि खरोखरच काहीही दिसायचं बंद झालें. :D थोड्या वेळाने मकीला फोन करत होते, तेवढ्यात कुंदनशेटचा गबोल्यावरून निरोप आला, "गणपाला चांगला कापा म्हणावं". मकी म्हणाली ३ टेबलं जोडून फुल्लटू दंगा चालू आहे. मग प्रासनी फोन घेतला. आमच्या नावाने थोडं थोडं अन्न बाजूला काढून ठेवून मगच आम्ही खातो आहोत असं आश्वासन त्यांनी दिलं. बरोबरच गणपा लवकर पळून जायच्या विचारात असल्याने गविंनी त्याला शेजारी बसवलाय ही माहिती दिली. त्याशिवाय गणपाच्या दुसर्‍या बाजूला प्रभो आहे, पण गणपा उठायला लागला तर मी त्याच्या दुसर्‍या बाजूला जाऊन बसेन अशी हमी प्रासने दिली. आता गणपा आहे की पळाला, ते मात्र तिथले कोणीतरी सांगू शकतील!
  • Log in or register to post comments

चिकन हंडी.. इथलीसस्पेशल..

गवि
Sun, 07/22/2012 - 21:05 नवीन
Image removed. चिकन हंडी.. इथलीसस्पेशल..
  • Log in or register to post comments

चिकन आफताब. ही पण

गवि
Sun, 07/22/2012 - 21:18 नवीन
चिकन आफताब. ही पण पेश्शालिटी.. सर्वात टेस्टी.. Image removed.
  • Log in or register to post comments

थोडा उजेड

पैसा
Sun, 07/22/2012 - 21:34 नवीन
पिकासामधे काही फोटो एडिट केलेत. फोटो शॉपवाल्यांनी नंतर जास्त चांगले करा! Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 07/22/2012 - 21:36 नवीन
:) पहिल्या फोटोत कोण आहेत. दुसर्‍या फोटोत...तिसर्‍या......कै नावं-बिवं माहिती असतील तर डकवा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

लस्सी जबरी अस्सल आहे.. एकदम

गवि
Sun, 07/22/2012 - 21:44 नवीन
लस्सी जबरी अस्सल आहे.. एकदम पटियाला ग्लास.. ़ खंबा.. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

लस्सी... अंतिम अड्डा

गवि
Sun, 07/22/2012 - 22:13 नवीन
लस्सी... Image removed. अंतिम अड्डा पानाच्या ठेल्यावर.. Image removed.
  • Log in or register to post comments

हे काय ....

कौशी
Sun, 07/22/2012 - 22:56 नवीन
लवकर संपवला कट्टा...
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा