तुम्हाला आठवते
तुम्ही शेवटचे लपाछपी कधी खेळला होतात??
मला आठवतेय
हे आत्ताच काही क्षणापूर्वी चालू होती माझी लपाछपी
माझे सारे सवंगडी माझ्यावर राज्य देऊन पसार झाले
आणि मी या राज्याचा राजा
एकाकी, शोधतोय
माझे सैन्य, सेनापती, आणि हो प्रजेला देखील
.
आत्ता इथे एक सैनिक ओझरता दिसला होता मला
पण जणू काय मी इथे नाहीच असा निघून गेला
आपल्या राजाकडे न पाहताच
.
मी खूप ओरडलो, अगदी घसा खरवडून
पण विरून गेली माझी हाक
आभाळापर्यंत जाऊन परत आली
.
कोपरा नसलेल्या चौकोनी आंगणात
माझे सारे सवंगडी कुठे लपले आहेत कोण जाणे
कोणीच कसं दिसत नाही
.
का आता अंधार झाला म्हणून गेले सगळे आपापल्या घरी??
नाही पण
या आधी डाव असा अर्ध्यावर टाकून
कोणी गेले नव्हते
.
मी खरंच लपाछपी खेळतोय ना??
का मी एकटाच आहे
.
मग ते माझे राज्य, तो सैनिक, माझा सेनापती, माझी प्रजा
माझे सारे सवंगडी
कुठे लपले आहेत कोण जाणे
कोणीच कसं दिसत नाही
.
तुम्हाला आठवते
तुम्ही शेवटचे लपाछपी कधी खेळला होतात??
मला आठवतेय
.
हे आत्ताच काही क्षणापूर्वी
कोपरा नसलेल्या चौकोनी आंगणात
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(१६\०७\२०१२)
मिसळपाव
प्रतिक्रिया
भीतीदायक आहे रे बाबा..
भीतीदायक आहे रे बाबा.. कसंतरीच झालं...
लपाछपी शीर्षकावरुन मतकरीँची
लपाछपी शीर्षकावरुन मतकरीँची गूढकथा आठवली
लपाछपी शीर्षकावरुन मतकरीँची
In reply to लपाछपी शीर्षकावरुन मतकरीँची by जाई.
लपाछपी शीर्षकावरुन मतकरीँची गूढकथा आठवली
अगदी , मला देखिल तसच वाट्ल....
येस. तीन विल्कूंची ती कथा
In reply to लपाछपी शीर्षकावरुन मतकरीँची by पक पक पक
येस.
तीन विल्कूंची ती कथा फॅन्टास्टिक होती एकदम.
आईला.. मिका... घाबरलो ना
आईला.. मिका...
घाबरलो ना
+१
In reply to आईला.. मिका... घाबरलो ना by स्पा
आवडली
आवडली....
आवडली