✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आर्सेलर मित्तल मर्जर.. (भाग - २)

म
मोदक यांनी
Fri, 07/13/2012 - 04:26  ·  लेख
लेख
आर्सेलर मित्तल मर्जर.. (भाग - १) >>>अचानकपणे मित्तल स्टीलने आर्सेलर विरूध्द 'होस्टाईल बीड' ची घोषणा केली व सारा युरोप ढवळून निघाला... २२.८ बिलीयन डॉलर्स. इतकी प्रचंड किंमत मोजायची तयारी दाखवून मित्तल नी आपले हेतू स्पष्ट केले. स्टील उद्योगाचा चेहरामोहरा बदलणार याची सर्वांना जाणीव झाली. पण सगळे इतके सोपे नव्हते; सोपे असणारही नव्हते, आणि याचीही सर्वांना कल्पना होती. सगळ्यात मोठा अडसर होता आर्सेलर मॅनेजमेंटचा. फ्रेंडली डीलला नकार देणारी ही मॅनेजमेंट टीम 'होस्टाईल बीड' ला सर्वशक्तीनीशी; सर्व मार्गाने तोंड देणार हे उघड होते. आर्सेलरचे घर - लक्झंबर्ग, फ्रान्स, बेल्जीयम, स्पेन आणि खुद्द लंडन मध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. सर्वांनाच हे अविश्वसनीय वाटत होते. आर्सेलर, लेबर युनीयन्स, या सर्व देशातले मंत्री, लक्झंबर्गचे राष्ट्रपती, कॉम्पीटीशन कमीशनर्स सगळे जण एकत्र येवून मित्तल स्टीलच्या विरोधात उभे राहिले. प्रत्येकाचे वेगवेगळे हितसंबंध गुंतले होते. आर्सेलरला 'स्वत्व' जपायचे होते. मित्तल स्टील बरोबर मर्ज होवून आपली 'ओळख' पूर्णपणे मिटून द्यायची नव्हती. लेबर युनीयन्स ना व प्लँट बंद होण्याची व कामगारांच्या नोकर्‍यांची चिंता होती. लक्झंबर्ग, फ्रान्स, बेल्जीयम, स्पेन ला आर्सेलरने त्यांच्या देशात केलेल्या गुंतवणुकीची व भविष्यकालीन धोरणांची काळजी होती. कॉम्पीटीशन कमीशनर्स ना स्वच्छ व्यवहारांची आणि एकाधिकारशाहीची शंका होती. लक्झंबर्गचे राष्ट्रपती व मंत्रीमंडळ नवीन कंपनीचे मुख्य कार्यालय लक्झंबर्ग बाहेर जावू नये याच्या विवंचनेत गुंतले होते. या सगळ्यांमध्ये एकच समान दुवा होता की मित्तलना रोखायचे. कोणत्याही देशाला, सरकारला, कुणा पदाधिकार्‍याला न कळवता अचानकपणे केलेली घोषणा पचवणे सर्वांनाच जड गेले. कारण..? "युरोप मध्ये अशा गोष्टी या पध्दतीने केल्या जात नाहीत" युरोपीयन कमीशन, देशांतर्गत सरकार, वाणिज्य मंत्री, कॉम्पीटीशन ऑथॉरीटीज यांना आधी संपूर्णपणे कल्पना देवून, विश्वासात घेवून भविष्यकालीन धोरणे / बदल वगैरे कळवून मगच पुढच्या हालचाली करायच्या ही सर्वमान्य पध्दत. याला उघडपणे छेद देत मित्तलनी अत्यंत धाडसी पाऊल टाकले होते. पांच वेगवेगळे देश, त्यांचे वेगवेगळे नियम, वेगवेगळे कायदे या सर्वांवर असणारा युरोपीय संघटनेचा अंकुश आणि या सर्वांचे डील बाबतचे प्रतिकूल मत याला तोंड द्यावे लागणार हे मित्तलना माहिती होते. वेगवेगळ्या क्षेत्रातील ३०० तज्ञ लोक यासाठी अहोरात्र झटत होते. मित्तल स्टीलच्या बाजूने इन्व्हेस्टमेंट बँकर्स ची फौज उभी केली गेली होती. अशीच फौज आर्सेलरने ही उभी केली. मित्तल स्टीलच्या बाजूने, Goldman Sachs Credit Suisse HSBC Citi Group Societe Generale आर्सेलरच्या बाजूने Merrill Lynch Morgan Stanley Deutsche Bank AG BNP Paribhas SA and UBS AG. तर लक्झंबर्गला सरकारचे सल्लागार होते, JP Morgan Chase and Co. ही फक्त इन्व्हेस्टमेंट बँकर्स ची यादी. लॉ फर्म, PR फर्म, अकाऊंटन्ट्स, कम्युनीकेशन एक्स्पर्ट्स या व अशा अनेक टीम्स एकाच वेळी मैदानात उतरल्या होत्या. जगभरातले Who's Who एकतर या डीलमध्ये या ना त्या कारणाने गुंतले होते नाहीतर खूप बारकाईने लक्ष ठेवून होते. (अवांतर - या डीलनंतर वरील सगळ्या फर्म्सना मिळालेली अ‍ॅडवायझरी फी होती तब्बल ३०० मिलीयन डॉलर्स) पुढे काय होणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. कोणतीही चर्चा न करता, डील मधले मुद्दे विचारान न घेता आर्सेलर मॅनेजमेंटने तिसर्‍याच दिवशी मित्तल स्टीलची ऑफर नाकारली. पुढचे पांच महिने मित्तल पितापुत्र वेगवेगळ्या देशांना भेटी देत होते. राज्यकर्ते, मंत्री, युरोपीयन कमीशनचे अधिकारी, देशांतर्गत सरकारचे पदाधिकारी, कॉम्पीटीशन कमीशनर्स, शेअरहोल्डर्स ना भेटत होते. ऑफर मागची कल्पना. स्टील उद्योगाचे भवितव्य. जागतीक स्टील उद्योगातील युरोपचे स्थान, महत्त्व अशा गोष्टी पटवून दिल्या जात होत्या. या पांच महिन्यांच्या दरम्यान मित्तल पितापुत्रांनी ७५० तासांपेक्षाही जास्त विमान प्रवास केला (साधारणपणे २५ वेळा जगप्रदक्षिणा होईल इतके) बाकीच्या लोकांसाठी मित्तल स्टीलने जेट विमाने भाड्याने घेतली होती. या दरम्यान आर्सेलर CEO गाय डॉले वेगळ्याच कारणासाठी चर्चेत राहिला.. मित्तल स्टीलला "कंपनी ऑफ इंडीयन्स", मित्तल स्टीलने कमावलेल्या पैशाला 'monnaie de singe' म्हणजेच 'monkey money' लक्ष्मी मित्तलना 'खोटे बोलणारा / खरे लपवणारा माणूस' आर्सेलर म्हणजे 'खरे अत्तर' आणि मित्तल स्टील म्हणजे 'यु-डी-कलोन' अशी विशेषणे वापरून स्वत:साठी आणि स्वत:च्या कंपनीसाठी परिस्थीती आणखी बिकट करून घेतली. १९ मे २००६ ला मित्तलनी आपली ऑफर ३४ % ने वाढवली. कंपनी स्ट्रक्चर बदलायचे मान्य केले व नवीन कंपनी मधला फॅमीली स्टेक ५०% च्या खाली न्यायचीही तयारी ठेवली. लक्ष्मी मित्तल चर्चेसाठी अजूनही वाट बघत होते. त्यांच्या प्रयत्नांना आर्सेलर मधून कोणीच दाद देत नव्हते. दरम्यान आर्सेलरने एक व्हाईट नाईट शोधून काढला. "सेव्हरस्टाल" रशीयन स्टील कंपनी. २६ मे २००६ ला आर्सेलरने "सेव्हरस्टाल" बरोबर मर्जर ची घोषणा केली. मित्तल स्टील साठी हा मोठा धक्का होता. इतके सारे प्रयत्न वाया गेल्यामुळे सगळेच जण सुन्न झाले. मित्तल स्टील ला पुढे अंधार दिसत होता. चार महिने सर्व शक्तीनीशी लढलेल्या लढाईत त्यांच्या समोर दुसरेच कोणीतरी जिंकत होते... (क्रमश:)

Book traversal links for आर्सेलर मित्तल मर्जर.. (भाग - २)

  • ‹ आर्सेलर मित्तल मर्जर..
  • Up
  • आर्सेलर मित्तल मर्जर.. (भाग - ३) (समाप्त) ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
अर्थकारण
राजकारण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
9348 वाचन

💬 प्रतिसाद (45)

प्रतिक्रिया

अपेक्षेसुनार...

अर्धवटराव
Fri, 07/13/2012 - 04:41 नवीन
फारच गुंतागुंतीचा मामला. पुढे काय झालं सर जी? अवांतरः इतके देशोदेशीचे सरकारे यात इन्व्होल्व्ह होते. मग याला आंतरराष्ट्रीय राजकारणाचे मोठे परिमाणं असणार. या बाजुवर देखील प्रकाश पडला तर दुधात साखर :) अर्धवटराव
  • Log in or register to post comments

भक्कम लिहिलयस वाचतेय ....

जेनी...
Fri, 07/13/2012 - 05:01 नवीन
भक्कम लिहिलयस वाचतेय ....
  • Log in or register to post comments

शब्दप्रयोग आवडला. विशेषतः

प्यारे१
Fri, 07/13/2012 - 10:18 नवीन
शब्दप्रयोग आवडला. विशेषतः 'इस्पात' कंपनी च्या लेखाबाबत केल्यामुळे जास्तच. वाचतोय. :) @ मोदक- द लेखक : अधिक सविस्तर लिहील्यास आणखी आवडेल. कायद्याचा भंग न करता अनुवाद/ स्वैर भाषांतर करता येईल असं काही बघून एक सुंदर लेखमाला बनवता येऊ शकेल. अर्थात मागे म्हटल्याप्रमाणं जर एकच पुस्तक न वापरता बाकी 'सोर्सेस' देखील वापरत असाल तर कायदा उल्लंघनाचा फारसा प्रॉब्लेम यायला नको. संदर्भ सूची देऊन त्यामध्ये हे सगळे टाकता येऊ शकेल असं वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

धन्स रे...

मोदक
Fri, 07/13/2012 - 12:32 नवीन
धन्स रे. :-) विचार करायला हरकत नाही पण ते पुस्तक म्हणजे डेटाबेस आहे. शक्य ते सगळे मुद्दे त्यांनी पुस्तकात घेतले आहेत. त्यामुळे आणखी काही नवीन माहिती कोणत्याही सोर्स ने मिळेल असे वाटत नाही. :-( त्या लेखकांनी लक्ष्मी मित्तल व आदित्य मित्तलच्या खाजगी विमानाच्या 'फ्लाईट लॉग' सारखी कागदपत्रे मिळवून.. व्यवस्थीत अभ्यास करून पुस्तक लिहिले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

वा वा

स्पा
Fri, 07/13/2012 - 12:41 नवीन
मोदक - प्यारे काका वा वा डोळे पाणावले आज
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

तुमचे डोळे नेहमीच पाणावतात

प्रचेतस
Fri, 07/13/2012 - 12:44 नवीन
तुमचे डोळे नेहमीच पाणावतात ब्वॉ, तरी डोंबिवली कायम तहानलेलंच. बाकी लेखमाला १ नंबर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

+१. भक्कम एकदम!!

बॅटमॅन
Fri, 07/13/2012 - 10:32 नवीन
+१. भक्कम एकदम!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

+१ जबर्याच! मस्त लिहिलंय रे

एमी
Fri, 07/13/2012 - 11:23 नवीन
+१ जबर्याच! मस्त लिहिलंय रे मोदका! मानलं बॉ तुला _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

खुपच ईंटरेस्टींग झालाय हा भाग

मराठमोळा
Fri, 07/13/2012 - 05:55 नवीन
खुपच ईंटरेस्टींग झालाय हा भाग पण.. पुढच्या भागाची आतुरतेने वाट पहात आहे.. यासंबंधीत पुस्तकासाठीदेखील लायब्रेरीत नंबर लावलाय :)
  • Log in or register to post comments

वेनवान लेखन शैली आवडली ...लगे

जोशी 'ले'
Fri, 07/13/2012 - 07:35 नवीन
वेनवान लेखन शैली आवडली ...लगे रहो, पुलेशु :-)
  • Log in or register to post comments

'वेनवान' ?

सस्नेह
Tue, 07/17/2012 - 14:07 नवीन
'वेनवान' ? मला तरी 'वेगवान' वाटली... अन इंटरेस्टिंग !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जोशी 'ले'

(No subject)

जोशी 'ले'
Tue, 07/17/2012 - 18:49 नवीन
:-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

वेनवान लेखन शैली आवडली ...लगे

जोशी 'ले'
Fri, 07/13/2012 - 07:38 नवीन
वेनवान लेखन शैली आवडली ...लगे रहो, पुलेशु :-)
  • Log in or register to post comments

वाचतोय!

सुधीर
Fri, 07/13/2012 - 07:45 नवीन
कथा पकड घेतेय. पुढे काय याची उत्सुकता आहे.
  • Log in or register to post comments

छान लिहिलंय रे,..

५० फक्त
Fri, 07/13/2012 - 07:56 नवीन
छान लिहिलंय रे,..
  • Log in or register to post comments

एकदम दणका विषय घेतलायेस

स्पा
Fri, 07/13/2012 - 08:02 नवीन
एकदम दणका विषय घेतलायेस रे.... भारिच लिहिल आहेस. पु.भा.प्र
  • Log in or register to post comments

मस्त...

सुमीत भातखंडे
Fri, 07/13/2012 - 09:38 नवीन
वाचतोय
  • Log in or register to post comments

भारी आहे. मन लावून वाचतोय..

पिंगू
Fri, 07/13/2012 - 10:23 नवीन
भारी आहे. मन लावून वाचतोय..
  • Log in or register to post comments

जबरद्स्त वेगवान घडामोडी

झकासराव
Fri, 07/13/2012 - 10:41 नवीन
जबरद्स्त वेगवान घडामोडी :)
  • Log in or register to post comments

मस्त भाग

मी_आहे_ना
Fri, 07/13/2012 - 10:54 नवीन
आजच सकाळी विचार करत होतो, पुढचा भाग कधी वाचायला मिळतोय ह्याचा..धन्यवाद. पु.भा.प्र.
  • Log in or register to post comments

परफेक्ट !

छोटा डॉन
Fri, 07/13/2012 - 10:54 नवीन
मालक, कथा ( रियल स्टुरी) एकदम पकड घेत आहे, जास्त फाफटपसारा न लिहता नेमक्या आणि प्रभावी शब्दात तुम्ही जे वर्णन करत आहात त्याचे कौतुक करावेसे वाटते. पुढचा भाग पटाकन येऊद्यात, उत्कंठा वाढत चालली आहे. लेखमालेसाठी आभार ... - छोटा डॉन
  • Log in or register to post comments

+१

किसन शिंदे
Fri, 07/13/2012 - 11:22 नवीन
जास्त फाफटपसारा न लिहता नेमक्या आणि प्रभावी शब्दात तुम्ही जे वर्णन करत आहात त्याचे कौतुक करावेसे वाटते.
हेच म्हणतो. जास्त पसारा न वाढवता अगदी नेमक्या शब्दात अनुवाद साधलाय. :) लगे रहो मोदकराव! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

+१

जे.पी.मॉर्गन
Fri, 07/13/2012 - 11:33 नवीन
>>जास्त फाफटपसारा न लिहता नेमक्या आणि प्रभावी शब्दात तुम्ही जे वर्णन करत आहात<< सहमत. वाचतो आहोत. जे पी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

असेच म्हणते

स्मिता.
Fri, 07/13/2012 - 13:24 नवीन
डॉनरावांच्या प्रत्येक शब्दाशी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

भारीच!

sagarpdy
Fri, 07/13/2012 - 11:04 नवीन
भारीच!
  • Log in or register to post comments

लै भारी

वेताळ
Fri, 07/13/2012 - 11:14 नवीन
पुढचा भाग येवु दे भावा.
  • Log in or register to post comments

इंटरेस्टिंग :)

अक्षया
Fri, 07/13/2012 - 11:22 नवीन
खुप इंटरेस्टिंग झालाय हा सुद्धा भाग..:) पुढचा भागाचा प्रतिक्षेत..
  • Log in or register to post comments

विंटरेस्टींग...

सोत्रि
Fri, 07/13/2012 - 11:34 नवीन
एकदम विंटरेस्टींग... मजा येतेय! - (मर्ज्ड) सोकाजी
  • Log in or register to post comments

वा छानच लिहीतो आहेस..

सायली ब्रह्मे
Fri, 07/13/2012 - 12:26 नवीन
वा छानच लिहीतो आहेस..खुप आवडला हा भाग सुद्धा..:)
  • Log in or register to post comments

उत्तम लिहित आहात..

मुक्त विहारि
Fri, 07/13/2012 - 12:30 नवीन
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत..
  • Log in or register to post comments

धुमश्चक्री...

मन१
Fri, 07/13/2012 - 12:47 नवीन
मग काय झालं ह्या धुमश्चक्रिचं?
  • Log in or register to post comments

सुसाट..

चिगो
Fri, 07/13/2012 - 14:12 नवीन
मस्त वेगवान कथानक आहे.. पकड घेणारं लिखाण / अनुवाद. लगे रहो, मोदक..
  • Log in or register to post comments

मोदका भारी चाललीये रे

गणपा
Fri, 07/13/2012 - 14:17 नवीन
मोदका भारी चाललीये रे मालिका. उत्कंठा भागागणीक वाढत चालली आहे.
  • Log in or register to post comments

छान लिहिलयस... पुढच्या भागाची

मी कस्तुरी
Fri, 07/13/2012 - 14:42 नवीन
छान लिहिलयस... पुढच्या भागाची वाट पाहतेय :)
  • Log in or register to post comments

जे काही लिहिले आहे ते खुप

गणेशा
Fri, 07/13/2012 - 14:45 नवीन
जे काही लिहिले आहे ते खुप भारी लिहिले आहे. संपुच नये वाचताना असे वाटत आहे.. लिहित रहा... वाचत आहे
  • Log in or register to post comments

मस्त विषय

आत्मशून्य
Fri, 07/13/2012 - 16:56 नवीन
पण हा भाग अतिशय त्रोटक...
  • Log in or register to post comments

मस्त लेखनमाला.. पु भा प्र.

मोहनराव
Fri, 07/13/2012 - 17:06 नवीन
मस्त लेखनमाला.. पु भा प्र.
  • Log in or register to post comments

मस्त... भाग जरा मोठा हवा

मदनबाण
Fri, 07/13/2012 - 19:20 नवीन
मस्त... :) भाग जरा मोठा हवा होता... पुढच्या भागाची वाट पाहतो.
  • Log in or register to post comments

मस्त!

पैसा
Fri, 07/13/2012 - 19:37 नवीन
पुढे काय झालं?
  • Log in or register to post comments

सगळं अचाट वाटतं.

रेवती
Fri, 07/13/2012 - 19:43 नवीन
सगळं अचाट वाटतं.
  • Log in or register to post comments

वाचतोय...

सुनील
Fri, 07/13/2012 - 21:08 नवीन
हाही भाग उत्तम!
  • Log in or register to post comments

वाचनानंदाबद्दल धन्यवाद !

हारुन शेख
Fri, 07/13/2012 - 22:32 नवीन
खूप मजा येते आहे. लवकर लवकर लिहा पुढचे भाग . Arthur Hailey ची strong Medicine आठवली हे सगळं वाचून.
  • Log in or register to post comments

छान रंगवले आहे.

अपूर्व कात्रे
Sat, 07/14/2012 - 00:26 नवीन
पण जरा जास्त लिहा की राव... सिरीअलची कथा नका लिहू.... मोक्याच्या क्षणी "उर्वरित भाग उद्या" असे म्हणणारी....
  • Log in or register to post comments

धन्स...

मोदक
Sat, 07/14/2012 - 15:43 नवीन
पुढचा भाग शेवटचा. बादवे - वरील वाक्य असे आहे - You never win Silver, you lose Gold.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अपूर्व कात्रे

एकदम इंटरेस्टिंग...

प्रेरणा पित्रे
Mon, 07/16/2012 - 11:20 नवीन
पुढचा भाग लवकर टाक रे.... वाचतेय....
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा