Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by प्रमोद काळे on गुरुवार, 03/25/2010 - 23:47
  • Log in or register to post comments
  • 22687 views

प्रतिक्रिया

Submitted by समीर गोखले on Mon, 04/05/2010 - 20:01

Permalink

छानच !

प्रमोद, एक छान नाटक बसवल्याबद्दल आणि अनेक अडचणीन्ना तोन्ड देउन एक नवीन विषय हाताळल्याबद्दल आपले अभिनन्दन !! एक गे मनुष्य म्हणुन, एक कलाकार म्हणुन, एक वेगळ्या गोष्टीची आवड असणारा चाहता म्हणुन मला हे नाटक पहायला खुप आवडेल. पण मी अमेरीकेत असल्याने माझी ती इछा पूर्न होउ शकणार नाही. परन्तु मी माझ्या पुण्यात असलेल्या आई-बाबा ना आणि इतर मित्रान्ना नक्की पहायाला सान्गेन. मला तुम्हाला एक विचारायचे आहे की नाटकाचा शेवट काय आहे? गे असणे, स्वताला स्वीकारणे, समाजाची ह्या सगळ्यात असलेली भुमिका हे सगळे प्रश्न आहेतच, परन्तु मला जाणुन घ्यायचे आहे कि नाटकाचा शेवट हा positive note वर सम्पतो का? कारण तसे जर नसेल आणि नाटक फक्त ह्या विषयाचि ओळख करुन देणारे असेल आणी गे लोकान्चे आयुष्य म्हणजे कशी कसरत आणि अनेक अनुत्तरीत प्रश्न असे सान्गणारे असेल, तर मात्र मी आई-बाबान्ना सान्गणार नाही ह्या नाटकाबद्दल. एक गे मुलगा म्हणुन मला तरी असे वाटते की आम्हाला अशा कलाक्रुती पहायाला आवडतील ज्या आम्ही जसे आहोत तशा आम्हाला स्वीकारायला मदत करतील आणी तसेच आमच्या आई-वडिलान्ना, मित्रान्ना, नातेवाइकान्ना आणी समाजाला विचार करायला शिकवतील. तुमच्या नाटकाच्या नावावरुन मला positive note न येता थोडेसे dark side ला कल असणारे नाटक वाटले. We want some positive reinforcing forms of art where being gay is accepted, embraced and celebrated - because that's what we are doing and telling our parents to do. तुमचे नाटक असेच असेल अशी मी आशा करतो. अर्थात, तुम्ही ह्या विषयावर नाटक करायचे ठरवले ह्यातच तुमचा ह्या विषयाकडे बघण्याचा प्रगल्भ द्रुष्टिकोन दिसुन येतो, त्याबद्दल तुमचे अभिनन्दन. तुमचा अभिप्रायाची वाट पहात आहे. समीर
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद काळे on Mon, 04/05/2010 - 23:38

In reply to छानच ! by समीर गोखले

Permalink

न येतीचा शेवट

समीर, तू अमेरिकेत किती वर्षे आहेस मला माहीत नाही, पण साधारण १९७० नंतर (नक्की सांगायचे तर स्टोन वॉल नंतर) आजपर्यंत हा विषय अमेरिकेत आणि कॅनडात तसेच काही युरोपियन देशात खूपच समजूतीने घेतला जात आहे. त्यासाठी लढाही द्यावा लागला आहे, पण आज बुश वगैरेंची मते दुर्लक्षित करून हे वास्तव लोकांनी स्वीकारले आहे. इथे परिस्थिती खूपच वेगळी आहे. मला प्रत्येक शोनंतर तरूण गे मुले (लेस्बियन्स नाहीत!) भेटतात. त्यांचे खूप सामाजिक, नैतिक आणि वैयक्तिक प्रश्न सांगतात. त्यांना आपले बोलणे कोणीतरी कंपॅशनेटली ऐकून घेत आहे, हेच खूप महत्त्वाचे वाटते. त्यांना खरोखर त्यांना पडत असलेले प्रश्न नाटकात भेटतात. ते स्वतःला माझ्या दोन्ही कॅरेक्टर्सशी आयडेंटिफाय करू शकतात. कारण प्रश्न खरच खूप आहेत. त्यांना सोपी, रोझी उत्तरं नाहीत. ती लढ्यातून कदाचित मिळवावी लागतील, पण जगण्याचे इतर प्रश्न इथे इतके मूलभूत आहेत की समाजाच्या दृष्टीने या सेक्चुअल मायनॉरिटीच्या प्रश्नांना काही किंमत नाही. माझ्या नाटकाच्या शेवटी एक मुलगा स्वतःची काहीही खूण मागे न ठेवता मरून जाण्याच्या कल्पनेने डेस्परेट झाल्याने एका मुलीबरोबर सेक्सचा प्रयत्न करतो, आणि अयशस्वी होतो. हे जेव्हा त्याच्या पार्टनरला कळते, तेव्हा आधी तो अर्थातच चिडतो, पण त्या मागचे कारण आणि पार्टनरची एका कॉलगर्लने केलेली अवहेलना कळाल्यावर शांत होतो, आणि विचारतो," आपण आपापले भूतकाळ विसरून इथपर्यंत आलो आहोत. आज मी आहे, तू आहेस, आपण आहोत. पण रणजीत, can we also forget our future?" यानंतर दोघेही एकमेकांना जवळ घेतात, आणि नाटक संपते. भूतकाळ विसरणे जितके कठीण, तितकेच भविष्यकाळ विसरणेही कठीण असे मला वाटते. 'आज', 'या क्षणात' जगणे ही गोष्ट खूप अवघड आहे. पण आजतरी त्या दोघांना ते करावे लागणार आहे...... प्रश्न संपत नाहीत.... तर असा विचार आहे या मागे. प्रत्येक प्रयोगानंतर आम्ही प्रेक्षकांशी खुली चर्चा करतो. एका अशा चर्चेत नाव नकारात्मक आहे असे एकजण म्हणाला, पण त्याला एका प्रेक्षकानेच "पण ते खरे आहे.' असे उत्तर दिले. लिहिल्याबद्दल धन्यवाद. तू कधी इकडे आलास, किंवा आम्हाला तिकडे येता आले (!?!) तर ये नाटकाला. तोवर असे बोलू. -प्रमोद.
  • Log in or register to post comments

Submitted by समीर गोखले on Wed, 04/07/2010 - 20:26

In reply to न येतीचा शेवट by प्रमोद काळे

Permalink

धन्यवाद प्रमोद !

प्रमोद, मी गेले १० वर्ष आहे अमेरिकेत. भारतात असताना मला गे हा शब्द पण माहित नव्हता, जरी त्या भावना अगदी वयाच्या १३-१४ व्या वर्षापासुन परिचीत होत्या तरी. तेव्हा internet चा येव्हडा प्रसार नसल्याने आणी ही एक phase आहे आणी आपण ह्यामधुन बाहेर येउ अशी भावना असल्याने मी पण फार स्वताच्या sexual orientation बद्दल विचार केला नाही. तसेही तेव्हा करिअर, नोकरी हेच विचार डोक्यात जास्त असतात. आता भारतात ह्या विषयावर निदान चर्चा तरी होत आहे, हे सुद्धा नसे थोडके. मी ५ वर्षापुर्वी माझ्या आई-बाबान्ना सान्गितले. सान्गणे सोपे नव्हतेच, परन्तु आवश्यक होते, नाहितर आज त्यान्च्या आणी समाजाच्या दबावाला बळी पडुन एका मुलिचे आयुष्य बरबाद करण्याचे पाप मला लागले असते. आता बाबान्ना माझे आयुष्य, माझा जोडिदार, माझी विचारसरणी हे हळुहळु पटत आहे. आई ला मात्र हे स्वीकारायला खुप त्रास होत आहे. Pshychologists झाले, साधु-बाबा, देव्-देव सगळे तिने करुन पाहिले. काही Pshychologists ने तिला योग्य सल्ला दिला पण काहिन्नी मात्र shock treatment सारखी अघोरी उपाय सुचवला. अर्थात आई ला माझ्यावर तेव्हढा विश्वास असल्याने मला त्या सगळ्या प्रकारातुन नाही जावे लागले. परन्तु ह्या सगळ्या प्रकारातुन जाताना एक जाणवले की आपल्या समाजात खुप awareness ची गरज आहे ह्या विषयावर योग्य, शास्त्रीय आणी मनमोकळेपणे माहीती देण्याची. तुमचे नाटक, काहि मराठी पुस्तके, काहि gay friendly psychologists हे तर resources आहेतच, परन्तु असे अजुन खुप काही व्हायला पाहीजे. तसेच ह्या सगळ्यातुन एक positive lifestyle चा सुर बाहेर येणे खुप आवश्यक आहे. गे असणे म्हणजे तुमचे जीवन अन्धारमय, खुप गुन्तागुन्तिचे असेच काहि नाही. प्रश्न तर सगळ्यान्नच असतात पण आपण ते कसे सोडवतो ते महत्त्वाचे. मी आणी माझा जोडीदार खुप आनन्दाने आमचे आयुष्य जगत आहोत, आमच्या career मधे यशस्वी होत आहोत, जग अनुभवत आहोत, जमेल तशी दुसर्‍याना मदत करत आहोत, आमच्या आई-वडिलान्ना शक्य तेव्हढ्या प्रकारे मानसीक, भावनीक आधार देत आहोत, एक जबाबदार नागरीक म्हणुन आमची सामाजीक कर्तव्ये पार पाडत आहोत - ह्या पेक्षा अजुन वेगळे काय असते आयुष्य म्हणजे, नाही का? anyway, आपली चर्चा चालुच ठेवु. मराठी मधे ह्या विषयावर एव्हढी मनमोकळी चर्चा होत आहे हे पाहुन खुप छान वाटते. समीर
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Mon, 04/05/2010 - 20:28

Permalink

लेख आणि चर्चा

लेख आणि चर्चा वाचतो आहे!
  • Log in or register to post comments

Submitted by अनामिक on Mon, 04/05/2010 - 20:33

Permalink

वाचतोय...

वाचतोय... पुढला भाग लवकर येऊ द्या! -अनामिक
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर१३७ on Wed, 04/07/2010 - 21:00

Permalink

न येती उत्तरे ....

मला लेख वाचायला मिळाला नाही. फक्त प्रतिक्रिया दिसतात. असे का होते ? मूळ लेख गायब कसा झाला ? काही समजेल का ?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद काळे on Fri, 04/09/2010 - 23:20

In reply to न येती उत्तरे .... by सुधीर१३७

Permalink

लेख गायब...

मिपाच्या काही तांत्रिक कारणांमुळे लेख गायब झाला होता. आता तो परत आला आहे. वाचून प्रतिक्रिया जरूर कळवा. -प्रमोद काळे.
  • Log in or register to post comments

Submitted by उपाशी बोका on Sat, 04/10/2010 - 03:38

Permalink

समलैंगिकता

मी हा लेख आणि त्यावरील प्रतिक्रिया वाचल्या. मला पडलेले काही प्रश्न: १. समलैंगिक लोकांचा हा लढा/चळवळ/खटपट (नक्की काय ते मला माहीत नाही) म्हणजे काळे विरुद्ध गोरे अश्या प्रकारचा संघर्ष आहे काय? काळ्या लोकांना बसमध्ये वेगळे बसावे लागायचे, हॉटेलात मज्जाव होता अशी तर काही परिस्थिती नाही ना, मग मूळ मुद्दा काय आहे? २. समलैंगिक लोकांना नेमके काय पाहिजे आहे? समाजात मान्यता म्हणजे नेमके काय? की आम्ही किती आणि कसे वेगळे आहोत अथवा आम्ही वेगळे असूनही सर्वसामान्य लोकांसारखे आहोत ते सांगायचा अट्टाहास आहे? उ.दा. मी १ बोका असूनही एक माणूस पाळला आहे (त्याचे नाव "बंडया") अशी काही परिस्थिती आहे काय? ३. समलैंगिक लोकांना कायदेशीररित्या लग्नाची सोय हवी आहे का, पार्टनरच्या प्रोपर्टीमध्ये हिस्सा हवा आहे का, डायवोर्सची सोय हवी आहे का, डायवोर्स झाला की पोटगी हवी आहे का? ४. व्यक्तिचे लैंगिक आकर्षण हा खासगी प्रश्न नाही का? एखादी व्यक्ती समलैंगिक आहे की नाही याने काय फरक पडतो? त्यासाठी समलैंगिक लोकांनी टाहो फोडण्याची गरज काय? Do you think that "Don't ask-Don't tell" is not good enough? 5. समलैंगिक लोकांना समाजात आता जगणेही अशक्य झाले आहे का? की हा मुद्दा काढण्यामागे राजकारण आहे? लहान मुलांबद्दल आकर्षण वाटते असं कोणी म्हणाले तर child pornography कायदेशीर करावी का? उद्या जर एखाद्या "माणसाने" म्हटले की माझे माझ्या कुत्र्यावर आणि माझ्या कुत्र्याचे माझ्यावर अतोनात प्रेम आहे, आणि आम्हाला दोघांना लग्न करायचे आहे, तर त्याला समाजात मान्यता मिळावी की नाही? कदाचित माझे विचार आधुनिक नसतील, म्हणून दुसरी बाजू ऐकून घेण्याचा प्रयत्न. -- उपाशी बोका
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद काळे on Sat, 04/10/2010 - 14:11

In reply to समलैंगिकता by उपाशी बोका

Permalink

हा कोणत्या स्वरूपाचा लढा....

मा. उपाशी बोका, आपल्या सर्व शंका वाचल्या. या लोकांना नक्की काय हवे अहे ? समाज मान्यता हवी आहे. मी गे आहे असे मोकळेपणाने सांगता यायला हवे आहे. केवळ लैंगिकता भिन्न आहे म्हणून दिवाभितासारखे किंवा वाळीत टाकल्यासारखे आयुष्य नको आहे. आपण म्हटल्याप्रमाणे हा संपूर्णपणे खाजगी मामला असायला हवा आहे. या मुद्द्याचा लहान मुलांविषयी आकर्षणाशी काहीही संबंध नाही. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे खरेच काय फरक पडतो? पण आज असे दिसते की फरक पडतो. उघडपणे समलैंगिकता मान्यच करता येत नाही, कारण तसे केल्यास घरी दारी मानसिक कोंडमारा होतो. मुळात हा रोग नाही, हे एक नैसर्गिक वास्तव अहे. त्याच्यावर उपचार नाहीत. हे मान्य व्हायला हवे आहे. ३७७ कलमानुसार समलैंगिक संबंध ठेवणे हा गुन्हा आहआधीएकशेसाठ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी केलेला हा कायदा आहे. आज ब्रिटनमध्येही हा कायदा अस्तित्त्वात नाही, पण आपल्याकडे आहे. हा बदलल्याशिवाय पुढील लग्नाचे हक्क,वगैरे प्रश्नच आजतरी उद्भवत नाहीत. पण हो. समलैंगिकांना ते सर्व हक्क हवे आहेत. आणि हे सगळे घडायला आधुनिक (म्हणजे नक्की काय?) असायची गरज नाही. थोडे सहृदय असण्याची आणि शास्त्रीय विचारसरणी मान्य करायची गरज आहे. इतक्या निरुपद्रवी वेबसाइटवरही लोक आपल्या खर्‍या नावाने सामोरे येत नाहीत, तर अशा लैंगिक अल्पसंख्यांकांनी काय करावे हे कोणी कोणाला सांगावे!!!
  • Log in or register to post comments

Submitted by उपाशी बोका on Tue, 04/13/2010 - 02:20

In reply to हा कोणत्या स्वरूपाचा लढा.... by प्रमोद काळे

Permalink

समाज मान्यता

श्री. प्रमोद काळे, आपल्या खुलाश्याबद्दल आभारी आहे. >> आधुनिक (म्हणजे नक्की काय?) मला liberal हा शब्द वापरायचा होता, पण योग्य शब्द सुचला नाही. त्याबद्दल क्षमस्व. (कोणी योग्य मराठी शब्द सांगू शकेल का?) >> इतक्या निरुपद्रवी वेबसाइटवरही लोक आपल्या खर्‍या नावाने सामोरे येत नाहीत, तर अशा लैंगिक अल्पसंख्यांकांनी काय करावे हे कोणी कोणाला सांगावे. आपण माझा सदस्य क्रमांक (७) बघितला तर आपल्याला कळेल की मी जुना सभासद आहे आणि मी नेहमी या नावाने लिखाण केले आहे. त्यात लपवण्यासारखे काही नाही. >> समाज मान्यता हवी आहे. मी गे आहे असे मोकळेपणाने सांगता यायला हवे आहे. आपल्या प्रतिसादावरून तरी असे वाटले नाही की समलैंगिक लोकांचा कोणी तिरस्कार करतो, जसा हिजडे, वेश्या यांचा होतो. मग समाज मान्यता म्हणजे नक्की काय? "गर्व से कहो हम गे है" असं म्हणत प्रभातफेरी काढायची आहे की "I am gay. Are you?" असं लिहिलेले टी-शर्ट घालून हिंडायचं आहे? लैंगिकता हा प्रत्येक व्यक्तीचा खाजगी प्रश्न नाही का? मी वाचलेल्या माहितीनुसार समलैंगिक हे इतर सर्वसामान्य लोकांसारखेच दिसतात, वागतात, जगतात. मग जर अशी परिस्थिती असेल तर स्वतःहून स्वतःच्या लैंगिक preference बद्दल अशी का जाहिरात करायची ते मला कळले नाही. -- उपाशी बोका
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतातुर जंतू on Tue, 04/13/2010 - 11:10

In reply to समाज मान्यता by उपाशी बोका

Permalink

गोंधळ

>> आधुनिक (म्हणजे नक्की काय?) मला liberal हा शब्द वापरायचा होता, पण योग्य शब्द सुचला नाही. त्याबद्दल क्षमस्व. (कोणी योग्य मराठी शब्द सांगू शकेल का?)
उदारमतवादी हा शब्द या अर्थाने मराठीत वापरला जातो.
आपल्या प्रतिसादावरून तरी असे वाटले नाही की समलैंगिक लोकांचा कोणी तिरस्कार करतो, जसा हिजडे, वेश्या यांचा होतो. मग समाज मान्यता म्हणजे नक्की काय? "गर्व से कहो हम गे है" असं म्हणत प्रभातफेरी काढायची आहे की "I am gay. Are you?" असं लिहिलेले टी-शर्ट घालून हिंडायचं आहे? लैंगिकता हा प्रत्येक व्यक्तीचा खाजगी प्रश्न नाही का? मी वाचलेल्या माहितीनुसार समलैंगिक हे इतर सर्वसामान्य लोकांसारखेच दिसतात, वागतात, जगतात. मग जर अशी परिस्थिती असेल तर स्वतःहून स्वतःच्या लैंगिक preference बद्दल अशी का जाहिरात करायची ते मला कळले नाही.
कळण्यासाठी थोडे मागच्या काळात जाऊन थोडे वेगळे संदर्भ लावून पाहू. एकेकाळी समाजात बायकांचे स्थान दुय्यम होते. म्हणजे काय? तर बाई म्हणून जन्माला आल्यास सारखे मन मारून जगावे लागे. लहान वयात आवड न विचारता लग्न होई. उभा जन्म स्वयंपाकघरात, सासरच्या माण्सांची उस्तवार करत, मुलांना जन्म देण्यात आणि त्यांची काळजी घेण्यात जाई. नवरा आधी मेला तर मग पाहायलाच नको. सतीच जावे लागे, नाहीतर केशवपन करून सर्व वासना मारून उरलेले आयुष्य कंठावे लागे. थोडक्यात काय, तर उभा जन्म नरकात. आणि हे नॉर्मल जिणे बरं का! यात कुठेही देवदासी, बलात्कारित, परित्यक्ता वगैरे नाहीत. त्या काळातल्या बहुसंख्य पुरुषांना 'यात काय विशेष?' असेच वाटे. आपले वरील प्रश्न आता त्या काळातल्या स्त्रियांविषयीच्या त्याच काळातल्या पुरुषांच्या मतांशी ताडून पाहू.
असे वाटले नाही की समलैंगिक लोकांचा कोणी तिरस्कार करतो, जसा हिजडे, वेश्या यांचा होतो.
असे वाटले नाही की घरंदाज स्त्रियांचा कुणी तिरस्कार करतो, जसा देवदासी, वेश्या यांचा होतो.
मग समाज मान्यता म्हणजे नक्की काय? "गर्व से कहो हम गे है" असं म्हणत प्रभातफेरी काढायची आहे की "I am gay. Are you?" असं लिहिलेले टी-शर्ट घालून हिंडायचं आहे?
मग समाजमान्यता म्हणजे नक्की काय? 'गर्व से कहो हम स्त्री है' असं म्हणत प्रभातफेरी काढायची आहे की 'मी स्त्री आहे. तुझं काय?' असं विचारत रस्त्यातून हिंडायचं आहे? उत्तरः नको त्या पुरुषाच्या आणि त्याच्या नातेवाईकांच्या खस्ता खात जन्म वाया घालवण्यापेक्षा स्वतःच्या मर्जीनुसार लग्न करण्याचा (किंवा न करण्याचा) हक्क मिळण्यासाठी स्त्रियांना मोर्चे काढून जर मदत होणार असेल, तर का नको? अन्यायाला वाचा फोडण्याचा तो एक अहिंसक, लोकशाही मार्ग आहे.
लैंगिकता हा प्रत्येक व्यक्तीचा खाजगी प्रश्न नाही का?
स्त्रीत्व हा प्रत्येक स्त्रीचा व्यक्तिगत प्रश्न नाही का?
मी वाचलेल्या माहितीनुसार समलैंगिक हे इतर सर्वसामान्य लोकांसारखेच दिसतात, वागतात, जगतात. मग जर अशी परिस्थिती असेल तर स्वतःहून स्वतःच्या लैंगिक preference बद्दल अशी का जाहिरात करायची ते मला कळले नाही.
स्त्रिया या सर्वसामान्यांसारख्याच जगतात. मग त्यांनी स्वतःच्या स्त्रीत्वाची अशी जाहिरात करून त्याचं भांडवल का करायचं ते मला कळलं नाही. उत्तरः स्त्रीत्व हा प्रत्येक स्त्रीचा व्यक्तिगत प्रश्न अर्थात आहे. पण तो तसाच राहावा, यासाठी प्रथम तिला हवे तसे जगण्याची मोकळीक मिळू शकेल अशी परिस्थिती निर्माण झाली पाहिजे. जोपर्यंत ती होत नाही, तोपर्यंत स्त्रिया आपल्या स्त्रीत्वापोटी आपल्याला काय सहन करावं लागतं, हे इतरांपर्यंत पोचवण्यासाठी आपली 'स्त्री' ही ओळख जगाला ओरडून सांगणारच. आधी तिला माणूस म्हणून जगण्याचा हक्क द्या, मग ती स्वतःस 'माणूस' म्हणेल आणि स्वतःचं स्त्रीत्व व्यक्तिगत ठेवेल. आता आपणास काही प्रश्नांची उत्तरे मिळणे सोपे जाईल, असे वाटते. नाहीतर स्त्रियांऐवजी 'दलित' घालून पाहा (आणि अर्थात दीडशे वर्षे मागे जाऊन स्वतःस एक ब्राह्मण पुरुष कल्पा). समलिंगी लोकांची आजची परिस्थिती कशी आहे, आणि त्यांना मन मारून कसं आणि का जगावं लागतं याचा अंदाज येण्यासाठी आजची ही बातमीही वाचा. एक मध्यमवयीन, उच्चशिक्षित प्राध्यापक जर अशा गोष्टींना सामोरा जाऊ शकत नाही, तर मग सर्वसामान्यांचे काय? - चिंतातुर जंतू :S "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त | भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद काळे on Sat, 04/17/2010 - 22:33

In reply to गोंधळ by चिंतातुर जंतू

Permalink

धन्यवाद

मा. चिंतातूर जंतू, माझ्या वतीने उत्तर लिहिल्याबद्दल धन्यवाद. आपण दिलेले दाखले अत्यंत चपखल आहेत. अशा व्यक्तिंचे वैयक्तिक जीवन खरोखर तोंड दाबून बुक्क्यांचा मार असे होते. त्यांना खुलेपणाने मोकळा श्वास घेता यावा यासाठी कायद्यातच मूलभूत बदल व्हायला हवा. आणि यासाठी सर्वप्रथम एकूण सामाजिक मानसिकता बदलणे आवश्यक आहे. नाटक लिहिताना, बसवताना हे सग़ळे मनात नव्हते हे खरे, पण आज जे प्रत्येक प्रयोगानंतर घडते आहे ते पाहता खूप काही कळू लागले आहे. शिक्षण कधीच संपत नाही हेच खरे. -प्रमोद काळे.
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Sun, 04/11/2010 - 03:12

In reply to समलैंगिकता by उपाशी बोका

Permalink

>> लहान

>> लहान मुलांबद्दल आकर्षण वाटते असं कोणी म्हणाले तर child pornography कायदेशीर करावी का? >> जेथे दोन्ही पार्टीज इच्छुक आहेत तेथेच "निरोगी" लैंगीक संबंध होऊ शकतात. त्यामुळे लहान मुलांचा मुद्दा मोडीत निघतो. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर काळे on Sat, 04/10/2010 - 08:22

Permalink

शक्यतो टाळावे असेही वाटते

लेखाबद्दल थोडे प्रतिसाद आले. त्यात एका 'गे'चा प्रतिसाद खूपच सांगून गेला. पण बरेचसे प्रतिसाद वाद-विवादातच गेले. हे इथे बर्‍याचदा झालेले पाहिले आहे व (लेखनस्वातंत्र्याची असले तरी व त्याचा सन्मान राखूनच) शक्यतो टाळावे असेही वाटते. सुधीर काळे, जकार्ता ------------------------ हा दुवा उघडा: http://72.78.249.107/esakal/20100309/5306183452989196847.htm
  • Log in or register to post comments

Submitted by अमोल केळकर on Sat, 04/10/2010 - 10:42

Permalink

नाटकाबद्द

नाटकाबद्दल सुंदर माहिती दिली आहे. चर्चा ही छान चालू आहे. वाशीत हे नाटक लागले की नक्की पहायला जाईन अमोल केळकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद काळे on Sat, 04/10/2010 - 14:05

In reply to नाटकाबद्द by अमोल केळकर

Permalink

वाशीत ? हा! हा!!

मा. अमोल, धन्यवाद. आम्ही व्यावसायिक नाटकवाले नाही. समांतरवाले आहोत. असे विविध गावी जाऊन प्रयोग करायला आम्हाला नक्की आवडेल. पण परवडत नाही हो. आपल्यासारख्यांच्या शुभेच्छांमुळे तसे जमो हीच इच्छा.
  • Log in or register to post comments

Submitted by जयंत कुलकर्णी on Sat, 04/10/2010 - 15:16

Permalink

हं कठीण आहे खरे !

मी लिहले होते पण जरा शास्त्रीय अभ्यास केला पाहिजे. जेनेटीक्सच्या दृष्टीकोनातून. अर्थात हा फार वैयक्तीक प्रश्न आहे या बद्दल मी ठाम आहे. जयंत कुलकर्णी.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद काळे on Sun, 04/11/2010 - 00:27

Permalink

Drop Box" width="12cm"

Image removed.Image removed.Drop Box" width="12cm" height="8cm" alt="na yetee uttare ek drushya" />
  • Log in or register to post comments

Submitted by झुम्बर on Mon, 04/19/2010 - 14:15

Permalink

हा विशय

हे सगळ जे मन्ड्लय ते सुन्दर आहे पन हे सर्व अनैसर्गिक नहि का? त्यल कहि शास्त्रिय आधार आहे का? आणी यात स्त्री सन्ख्या किति? कारण आत्तापर्यन्त या विशयवर जे पाहिल त्यात मुलन्चेच प्रश्न दिसले अर्थत फायर चा अपवाद ...... तेन्डूलकरन्चि एक कथहि वचल्यच आठवत आहे..... गे असन हे केवल त्यन्च लैन्गिक द्रुश्त्य वेगल असन असत कि ते सर्वच बब्तित वेगले असतात?????
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Mon, 04/19/2010 - 15:26

In reply to हा विशय by झुम्बर

Permalink

उत्तम चर्चा

अतिशय उत्तम चर्चा! झुंबर, माझ्या माहितीच्या काही मुली समलैंगिक आहेत. अर्थात निसर्गात सगळ्याच गोष्टीत सिमेट्री असते, याही बाबतीत असायला काहीच हरकत नाही. अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद काळे on Sun, 04/25/2010 - 11:19

In reply to हा विशय by झुम्बर

Permalink

हा विषय

व्यर्थ नव्हे का ओंजळ जेथे शरीर सारे म्हणते पाज! झुम्बर, हे अनैसर्गिक नाही. अर्थात पूर्वी ते तसे मानले जात असे. पण संशोधनान्ती मानसतज्ज्ञांनी आता या गोष्टीचा नैसर्गिकपणा मान्य केला आहे. हे जन्मतःच येते.कुणामुळे वा कशामुळे होते असे नाही. आपण सेक्सचा संबंध फक्त पुनरुत्पादनाशी लावतो, (हा भारतीय संस्कृतीतला अजून उरलेला दांभिकपणाचा नमुना आहे!) म्हणून हे कदाचित अनैसर्गिक वाटत असेल, कारण अशा संबंधांमध्ये पुनरुत्पादन शक्य नाही. पण म्हणजे वात्सल्याची भावना नसते असे मात्र नाही. अनेक गे किंवा लेस्बियन्स मुले दत्तक घेऊन ही वात्सल्याची भूक भागवतात. अर्थात आपल्याकडे एकट्या व्यक्तीला (अविवाहित) मूल दत्तक देण्यालाही आत्ता आत्ताच परवानगी मिळाली आहे. त्यामुळे त्यात अनेक अटी, नियम वगैरे आहेतच. एकूण लोकसंख्येच्या साधारण ३.५% गे (मुले) आणि १.५% लेस्बियन्स (मुली), तसेच सुमारे ३०% बायसेक्चुअल्स (उभयलिंगी आकर्षण असलेले) असतात असा अंदाज आहे. विजय तेंडुलकरांच्या 'मित्राची गोष्ट' या नाटकात लेस्बियन मुलगी नायिका आहे. रोहिणी हत्तंगडींनी ते काम फार सुंदर केल्याचे मी पाहिले आहे. पण एकूणच या बाबतीत कमी लिहिले, बोलले जाते कारण अशा मुला-मुलींना मोकळेपणाने समाजात ही गोष्ट सांगणे आजतरी शक्य नाही. पुढे काय होईल काय माहीत. पण आज तरी अशा नाटकांतून हा प्रश्न लोकांपुढे मांडता येतोय, आणि त्याला प्रतिसादही मिळतोय हे काय कमी आहे !
  • Log in or register to post comments

Submitted by सुबक ठेंगणी on Sun, 04/25/2010 - 13:49

In reply to हा विशय by झुम्बर

Permalink

सुंदर चर्चा

पुढचे लिखाण आणि चर्चा यांची वाट मीही बघते आहे. समलैंगिकतेचा विषय निघाला की मला इस्मत चुगताईची १९४१ साली लिहिलेली लिहाफ नावाची गोष्ट इथे नमूद केल्याशिवाय रहावत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on Mon, 07/16/2012 - 18:30

Permalink

अनवट

अनवट वाट.
  • Log in or register to post comments

Submitted by एमी on Mon, 07/16/2012 - 19:44

Permalink

हम्म्म... चिँजं ची

हम्म्म... चिँजं ची www.misalpav.com/node/11623#comment-187741 प्रतिक्रिया गुवाहाटी आणि बागपत किँवा अस्पृश्यता, आरक्षण आणि पुणे करार या धाग्यांवर चालुन जाईल...
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com