Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by प्रमोद काळे on गुरुवार, 03/25/2010 - 23:47
  • Log in or register to post comments
  • 22687 views

प्रतिक्रिया

Submitted by शुचि on Fri, 03/26/2010 - 00:05

Permalink

जरा जास्त

जरा जास्त मोठा लेख लिहीला तर फार बरं होइल हो. या विषयाबद्दल विशेषतः भारताच्या पार्श्वभूमीवर, खूप उत्सुकता आहे. मुंबईला आमच्या कॉलनीत एक समलिंगी पुरुष रहात होता. त्याला अ म्हणू. अचं त्याच्या आई-अडीलांनी मारून मुटकून लग्न लावलं. लगेच काही काळात घटस्फोट झाला. माझे जे पुरुष सहकारी आणि बॉस मी पाहीले अमेरीकेत जे "गे" होते ते मला चक्क १०१% स्त्री-द्वेष्टे = जेलस वाटले. या लोकांचं जग त्यांच्या सेक्शुअल आयडेंटिटी भोवतीच फिरताना मला दिसलं. त्यांना दुसरं जग नव्हतं. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला, जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।
  • Log in or register to post comments

Submitted by अक्षय पुर्णपात्रे on Fri, 03/26/2010 - 00:21

In reply to जरा जास्त by शुचि

Permalink

चुकीचे सामान्यीकरण

या लोकांचं जग त्यांच्या सेक्शुअल आयडेंटिटी भोवतीच फिरताना मला दिसलं. त्यांना दुसरं जग नव्हतं.
हे अतिशय चुकीचे व पूर्वग्रहदुषित विधान आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Fri, 03/26/2010 - 00:22

In reply to चुकीचे सामान्यीकरण by अक्षय पुर्णपात्रे

Permalink

आहेच मुळी

आहेच मुळी पूर्वग्रहदूषीत. तसेच अनुभव आलेत. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला, जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।
  • Log in or register to post comments

Submitted by अक्षय पुर्णपात्रे on Fri, 03/26/2010 - 00:32

In reply to आहेच मुळी by शुचि

Permalink

सँपल स्पेस

शुचितै, तुम्ही एकूण किती समलिंगी पुरूषांना पाहीले आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Fri, 03/26/2010 - 00:34

In reply to सँपल स्पेस by अक्षय पुर्णपात्रे

Permalink

एकूण ४ जण

एकूण ४ जण माहीत होते 'गे" आहेत. २ जवळून. कारण - १ बॉस आणि १ सहकारी. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला, जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।
  • Log in or register to post comments

Submitted by शेखर on Fri, 03/26/2010 - 00:45

In reply to एकूण ४ जण by शुचि

Permalink

त्यांना

त्यांना जेलसी वाटणे साहजिकच आहे म्हणा.. कारण त्यांच्या वाट्याला येऊ शकणार्‍या पुरुषांना स्त्रिया पळवतात ;)
  • Log in or register to post comments

Submitted by अक्षय पुर्णपात्रे on Fri, 03/26/2010 - 00:53

In reply to एकूण ४ जण by शुचि

Permalink

म्हणजे काहीच नाही

एका अंदाजानुसार अमेरिकेत एकूण ८८ लक्ष लोक समलिंगी आहेत. ढोबळमानाने त्यातील ५०% समलिंगी पुरूष मानू. म्हणजे ४४ लक्ष लोकांपैकी तुम्ही ४ लोकांना पाहीले आणि त्यावर आपले मत बनवून टाकले. मी त्यापेक्षा जास्त (कमीत कमी पाच-सहा) समलिंगी पुरूष कमी-अधिक जवळून (म्हणजे त्यांची स्त्रियांविषयी वागणूक व लैंगिक ओळखीभोवतीची घुटमळ एवढे ठरवता येईल इतपत) पाहीले आहेत. एकही आपण म्हणता त्याप्रमाणे आढळला नाही. जवळजवळ सर्वच कुठल्यातरी विषयात संशोधक आहेत. म्हणजे सगळे समलिंगी पुरुष संशोधक असतात असे म्हणावे का?
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Fri, 03/26/2010 - 00:53

In reply to म्हणजे काहीच नाही by अक्षय पुर्णपात्रे

Permalink

फार माहिती

फार माहिती नाही... पण श्री. पुर्णपात्रे यांच्याशी सहमती वाटते आहे. शुचिताईंचाच नियम लावायचा तर मला एकच समलिंगी पुरूष माहिती आहे आणि माझ्या तरी माहितीप्रमाणे त्याचे वागणे लैंगिकतेभोवती घुटमळणारे नाहीये. तस्मात, माझ्यापुरते मी असे म्हणतो की सगळेच समलिंगी पुरूष लैंगिकतेभोवती घुटमळणारे नसतात. उलट ती व्यक्ती एवढी चतुरस्त्र आणि म्हणूनच आदरणिय आहे की बोलायची सोय नाही. त्यामुळे सगळेच समलिंगी पुरूषही नक्कीच तसेच चतुरस्त्र असणार. त्यामुळे मला मी समलैंगिक नाही याचा खेद वाटू शकतो. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Fri, 03/26/2010 - 00:55

In reply to म्हणजे काहीच नाही by अक्षय पुर्णपात्रे

Permalink

अहो पण हा

अहो पण हा धागा स्वानुभावाशी निष्ठा राखाण्याचा प्रयत्न आहे असं मला तरी वाटलं होतं. मी म्हणून माझा अनुभव सांगीतला. पण स्वतःच्या सेक्शुअल आयडेंटिटीबद्दल पॅशनेट मत असणं यात गैर काहीच नाही, मी तर म्हणेन छानच. मी फक्त मत मांडलं. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला, जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Fri, 03/26/2010 - 01:00

In reply to अहो पण हा by शुचि

Permalink

शुचि,

शुचि, आक्षेप मत मांडण्याला नाहीये... शीतावरून भाताची परिक्षा करण्याला आहे. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by अक्षय पुर्णपात्रे on Fri, 03/26/2010 - 01:01

In reply to अहो पण हा by शुचि

Permalink

अजिबात गैर नाही

शुचितै, स्वत:च्या सेक्शुअल आयडेंटिटीबद्दल पॅशनेट मत असणं यात काहीही गैर नाही. दुसर्‍यांच्या सेक्शुअल आयडेंटिटीवरून त्यांच्याबद्दल पूर्वग्रह बाळगणे मात्र गैर असावे.
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Fri, 03/26/2010 - 01:13

In reply to अजिबात गैर नाही by अक्षय पुर्णपात्रे

Permalink

माझ्या

माझ्या नाही म्हणते .... गे लोकां नी स्वतःच्या जेंडर आयडेंटीटी बद्दल पॅशनेट असणं यात काही गैर नाही पण त्याची चर्चा कुठे करावी याचा ताळतंत्र ते २ पुरुष ठेवत नव्हते. That gay boss was literaly veering around work harrassment with me. Anyways ..... I have bad experience with gay people & that's about it. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला, जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।
  • Log in or register to post comments

Submitted by गोगोल on Fri, 03/26/2010 - 03:19

In reply to माझ्या by शुचि

Permalink

एकदम

defensive mode हा :)
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Fri, 03/26/2010 - 03:40

In reply to एकदम by गोगोल

Permalink

तुम्ही आता

तुम्ही आता चावी मारू नका. जरा शांत झालय . शांत राहू द्या. : ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ हंसः श्वेतो बकःश्वेतो को भेदो बकहंसयो:| नीरक्षीरविवेके तु हंसः हंसो बको बकः||
  • Log in or register to post comments

Submitted by कानडाऊ योगेशु on Fri, 03/26/2010 - 12:30

In reply to म्हणजे काहीच नाही by अक्षय पुर्णपात्रे

Permalink

म्हणजे

म्हणजे सगळे समलिंगी पुरुष संशोधक असतात असे म्हणावे का? बाप रे.मी उलटा विचार केला.त्यानुसार सगळे संशोधक गे असु शकतात. :O (सुलटा) योगेशु. टार्झनं प्रथमं वंदे खेचरं तदनंतरं | लत्ता प्रहारं पूर्वे मुष्टीप्रहारमं यथा|| --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on Fri, 03/26/2010 - 00:19

In reply to जरा जास्त by शुचि

Permalink

रोचक विधान

या लोकांचं जग त्यांच्या सेक्शुअल आयडेंटिटी भोवतीच फिरताना मला दिसलं. त्यांना दुसरं जग नव्हतं. रोचक विधान :-)
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Fri, 03/26/2010 - 01:10

Permalink

श्री. काळे,

श्री. काळे, पुढे वाचायला उत्सुक आहे. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by अक्षय पुर्णपात्रे on Fri, 03/26/2010 - 03:47

Permalink

वाचनोत्सुक

श्री काळे, पुढील भाग वाचण्यास उत्सुक आहे. जनमानसात समलिंगी संबंधांविषयी अनेक गैरसमज आहेत. ते दूर करण्याचे काम हाती घेतल्याबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

Submitted by समीर गोखले on Fri, 03/26/2010 - 04:33

Permalink

Dear Pramod, First congrats

Dear Pramod, First congrats on handling this sensitive topic. I am a gay maharashtrian person and would love to provide you with any info. you need. It's a shame that our society still has so many stereotypes against gays. People need to realize we are just like everyone else except our sexual, emotional and psychological attraction for same sex. Let's first try to understand gay people before making a judgement on their community. समीर
  • Log in or register to post comments

Submitted by समीर गोखले on Fri, 03/26/2010 - 05:26

Permalink

http://www.youtube.com/watch?

http://www.youtube.com/watch?v=ICijm8VpsTE नुकताच एक छान कार्याक्रम झआला ह्या विशयावर ...अवश्य पहा...खुप छान गप्पा मारल्या आहेत रेणुका शहाने ने... समीर
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Fri, 03/26/2010 - 06:05

In reply to http://www.youtube.com/watch? by समीर गोखले

Permalink

कार्यक्रम

कार्यक्रम छानच आहे. वादच नाही. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ हंसः श्वेतो बकःश्वेतो को भेदो बकहंसयो:| नीरक्षीरविवेके तु हंसः हंसो बको बकः||
  • Log in or register to post comments

Submitted by समीर गोखले on Fri, 03/26/2010 - 06:40

Permalink

शुचि,

शुचि, तुम्हाला काहिहि शन्का असतिल तर मला अगदी नक्कि विचारा. शेवटी आपण बोलल्या शिवाय आपल्य्याला नवीन गोष्टी कळनार नाही. माझे गे असणे हा माझ्ह्या व्यक्तिमत्वाचा फच्त एक भाग आहे. आपली सेक्शुअलीटी म्हनजे आपले पूर्ण व्यक्तिमत्व थोडेच असते. तुमच्याशि बोलायला नक्किच आवडेल. समीर
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Fri, 03/26/2010 - 06:47

In reply to शुचि, by समीर गोखले

Permalink

धन्यवाद

धन्यवाद गोखलेसाहेब. माझं तसं नव्हतं हो म्हणणं. मला खूप वाईट वाटलं जेव्हा हे सर्व गैरसमज झाले. अहो माझा बॉस एक तर कॅनेडीअन रेशीस्ट माणूस होता शिवाय त्याचा ध्यास होता की जो येईल समोर त्याला "प्रो-गे" करून सोडायचा. पण त्याचा अर्थ सर्व गे लोक तसे असतात असं नाही. एक लेस्बिअन प्रेमळ बाई सुद्धा होती जी माझी मैत्रीण होती. इन फॅक्ट तुम्हा लोकांनी बरेच लोखंडाचे घण सोसलेले असतात which makes a good spiritual progress on your part . I do admire your choice & individuality. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ हंसः श्वेतो बकःश्वेतो को भेदो बकहंसयो:| नीरक्षीरविवेके तु हंसः हंसो बको बकः||
  • Log in or register to post comments

Submitted by समीर गोखले on Fri, 03/26/2010 - 06:53

Permalink

Good to hear that Shuchi.

Good to hear that Shuchi. Yes, things have not been easy at all for us but with more and more open minded people like you I am sure one day things will change for good. Working in US definitely gave me my identity,self esteem and confidence to live life happily. For last 6 years I am in a loving relationship with another guy (he is maharashtrian as well) and we are planning to have commitment ceremony this year sometime. Let's keep in touch..I am loving this site (especially all the recipes and "sahitya" section) Sameer
  • Log in or register to post comments

Submitted by वाहीदा on Sat, 03/27/2010 - 13:17

In reply to Good to hear that Shuchi. by समीर गोखले

Permalink

!!!! शुभं भवतू !!!!

Let's keep in touch..I am loving this site (especially all the recipes and "sahitya" section हे बाकी आवडले !! !!!! शुभं भवतू !!!! :-) ~ वाहीदा
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Sat, 04/10/2010 - 01:54

In reply to Good to hear that Shuchi. by समीर गोखले

Permalink

For last 6 years I am in a

For last 6 years I am in a loving relationship with another guy हे बाकी आवडले !! !!!! तथास्तु !!!! ~ मिल्कशेक
  • Log in or register to post comments

Submitted by अप्पा जोगळेकर on Fri, 03/26/2010 - 08:28

Permalink

अहो गोखले,

अहो गोखले, मराठी भाषेत लिहा की. संपादक, हे असंच जर चालणार असेल तर मी माझे इंग्रजी लेख जसेच्या तसे मिपावर टाकतो. ते उडवू नका. ( मला कारण नसताना त्याचे दुवे द्यावे लागतात. ) नाहीतर इथे इंग्रजीत लिहिणार्‍यांना समज तरी द्या. गोखले, तुम्ही असं लिहिलं आहे की - I am a gay maharashtrian person. Working in US definitely gave me my identity,self esteem and confidence to live life happily. - तसं जर असेल तर तुम्ही स्वतःला महाराष्ट्रीय म्हणू नका. या वाक्याचा पुर्वार्ध तुम्ही लिहिला आहे. पण उत्तरार्ध तुमच्या मनात आहे आणि तो असा आहे की Working in India definitely won't give me my identity,self esteem and confidence to live life happily.
  • Log in or register to post comments

Submitted by वाहीदा on Sat, 03/27/2010 - 13:13

In reply to अहो गोखले, by अप्पा जोगळेकर

Permalink

अप्पा असे का बोलता तुम्ही ?

तसं जर असेल तर तुम्ही स्वतःला महाराष्ट्रीय म्हणू नका अप्पा , गे लोकांना अजूनही भारतात सामाजिक वागणूक हास्यास्पद च मिळते हे निर्विवाद सत्य आहे . त्यांची आएडेंटीटी, आत्मविश्वास हा अन सेल्फ ईस्टीम आपल्या चारचौघांसारखा नसतो त्याला आपली सामाजिक कारणे जबाबदार नाहीत का?? कोर्टाने निर्णय दिला तरीही गे लोकांना आनंदी रहाण्यासारखे आपल्या देशाचे मानसिक वातावरण नाही हे वाटत नाही तुम्हाला ? ~ वाहीदा
  • Log in or register to post comments

Submitted by समीर गोखले on Sun, 03/28/2010 - 09:26

In reply to अप्पा असे का बोलता तुम्ही ? by वाहीदा

Permalink

वाहीदा,

वाहीदा, धन्यवाद. निदान थोडे तरी लोक असे आहेत ज्यान्ना गे लोकान्ची सद्य परीस्थिती माहित आहे. अप्पा, मी अगदी पक्का महाराष्त्रिअन आहे, परन्तु मला किव्वा माझ्ह्या जोडीदाराला समजणारा आणि स्विकार्णारा आप्ला समाज नाहिये हो. आम्हि २-३ आठवड्यासठि पुण्याला येतो आणि आम्हाला त्या काळात आमच्या अगदी जवळच्या लोकान्कडुन काय काय आइकायला मिळते हे मी तुम्हाला सान्गु पण शकत नाहि. आपल्या भारतातिल अशा वातावरणामुळे मी ९ -१० वर्षापूवी आत्महत्या करायचा प्रयत्न केला होता. अशा वातावरणात कसा तुमचा आत्मविश्वास आणि सेल्फ एस्टीम राहणार? आज मी अमेरीकेत खुल्या मनाने आणि खुल्या दिलाने माझ्या जोडीदाराबरोबर रहातो आणि अतिशय आनन्दाने आयुष्य जगत आहे. मला सान्गा असे आपल्या भारतात कधि शक्य होइल? माझ्यात भारतिय, महाराष्ट्रीय सन्स्कार आणि शिकवण अगदि ठासुन भरली आहे, पण जिथे मला आणि माझ्या अस्मितेला काहिच किन्म्त नाहि, तिथे मी कसा आत्मविश्वासाने आनि सन्मानाने राहु शकेन? आणि अशा वातावरणात मी कसा यशस्वी होइल? तुमच्या मतान्चा मी आदर करतो, परन्तु तुम्ही मला समजुन घेउ शकाल अशी आशा आहे. पत्रोतर अवश्य द्यावे. समीर
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Sun, 03/28/2010 - 09:53

In reply to वाहीदा, by समीर गोखले

Permalink

खर आहे.

समीर उत्तम मांडणी. अप्पांना वाक्याचा मनात असलेला उत्तरार्ध आता तपासुन पहावा. सुरवातीला इंग्रजीत लिहिणारे नवीन सदस्य लिहितील मराठीत हळू हळू. त्यांच्या उत्साहावर पाणी पडू देउ नये. मराठीत लिहिण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. सहकार्य करावे. जास्तीत जास्त लोकांनी मराठीत लिहुन जालावरील मराठीतील मजकुर वाढवावा. वाहिदा, योग्य हस्तक्षेप केल्याबद्दल अभिनंदन व धन्यवाद प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

Submitted by अप्पा जोगळेकर on Sun, 03/28/2010 - 12:38

In reply to वाहीदा, by समीर गोखले

Permalink

तुम्ही गे

तुम्ही गे असा अथवा नसा. माझा आक्षेप त्या गोष्टीला नाही. माझे म्हणणे असे की भारतात जर गे लोकांना वाईट वागणूक मिळते तर ती परिस्थिती बदलण्यासाठी तुम्ही स्वतः काय प्रयत्न केले? त्याऐवजी तुम्ही अमेरिकेत जाऊन स्थायिक होणे हा पलायनवाद स्वीकारला. आज मी अमेरीकेत खुल्या मनाने आणि खुल्या दिलाने माझ्या जोडीदाराबरोबर रहातो आणि अतिशय आनन्दाने आयुष्य जगत आहे. मला सान्गा असे आपल्या भारतात कधि शक्य होइल? माझ्यात भारतिय, महाराष्ट्रीय सन्स्कार आणि शिकवण अगदि ठासुन भरली आहे असं जर का असेल तर तुम्ही अमेरिकेशीसुद्धा एकनिष्ट नाही. अहो, तुम्ही अमेरिकेत राहता तिथे तुम्हाला तुमचं अस्तित्व सापडलं असं म्हणता तर मग पूर्णपणे अमेरिकेशी एकनिष्ठ राहा. स्वतःला भारतीय, महाराष्ट्रीय म्हणवू नका. तुम्ही अमेरिकेशीदेखील गद्दारी करता आहात. तुम्ही तिथलं जीवनमान, चालीरिती पूर्णपणे स्वीकारलं पाहिजे. आज मी भारतात राहतो, नोकरी करतो. पण माझ्या आजूबाजूची परिस्थिती बदलण्यासाठी काहीएक प्रयत्न करत नाही. फारतर मिपावर लेख टाकत असतो. यासाठी मला कुणी नालायक म्हणू शकेल पण माझ्या भारतीयत्वावर कुणी शंका घेऊ शकणार नाही. पण तुमचे तसे नाही तुम्ही अमेरिकनसुद्धा नाही आणि भारतीयसुद्धा नाही. विचार करुन पहा. मी नेहमी असंच कोरडंठाक, निर्मम लिखाण करतो.
  • Log in or register to post comments

Submitted by अक्षय पुर्णपात्रे on Sun, 03/28/2010 - 21:39

In reply to तुम्ही गे by अप्पा जोगळेकर

Permalink

पलायनवादी नाही तर धैर्यशील

माझे म्हणणे असे की भारतात जर गे लोकांना वाईट वागणूक मिळते तर ती परिस्थिती बदलण्यासाठी तुम्ही स्वतः काय प्रयत्न केले? त्याऐवजी तुम्ही अमेरिकेत जाऊन स्थायिक होणे हा पलायनवाद स्वीकारला.
श्री जोहळेकर, तुलनेने स्वत:स जेथे शांततेने आणि मानाने जगता येईल अशा ठिकाणी स्थायिक होणे म्हणजे पलायनवाद नव्हे. तुमच्या-माझ्या पूर्वजांनी अनेक वेळा असे निर्णय घेतलेले आहेत - जड अंत:करणाने, नाइलाजाने किंवा स्वखुशीने. तो त्यांचा पलायनवाद होता काय? तुमचा निकष वापरल्यास जगात सर्वच लोक पलायनवादी झालेले दाखवता येईल. आता श्री गोखले यांच्या बाबतीत काय पलायनवाद असू शकला असता याबद्दल माझे मत सांगतो. जर श्री गोखले यांनी आपल्या समलिंगी आकर्षणास लपवून कुटूंबियांच्या/ समाजाच्या दबावास बळी पडून एखाद्या स्त्रीशी विवाह केला असता तर ती पलायनवादी वर्तणुक ठरू शकली असती. याउलट त्यांनी अत्यंत धैर्याने व नेटाने आपल्या प्रश्नास सोडवले असे मला वाटते. त्यांचे वागणे अतिशय कौतुकस्पद आहे.
असं जर का असेल तर तुम्ही अमेरिकेशीसुद्धा एकनिष्ट नाही. अहो, तुम्ही अमेरिकेत राहता तिथे तुम्हाला तुमचं अस्तित्व सापडलं असं म्हणता तर मग पूर्णपणे अमेरिकेशी एकनिष्ठ राहा. स्वतःला भारतीय, महाराष्ट्रीय म्हणवू नका. तुम्ही अमेरिकेशीदेखील गद्दारी करता आहात. तुम्ही तिथलं जीवनमान, चालीरिती पूर्णपणे स्वीकारलं पाहिजे.
अमेरिकन कायद्यानुसार जोपर्यंत कायदा न मोडता स्वत:च्या संस्कृतीस (मग ती कुठली का असेना) धरून वागणे यास मान्यता आहे. मॉलमध्ये साडी किंवा धोतर घालून गेल्यास तुम्हाला कोणीही हटकणार नाही. श्री गोखले यांना आपल्या संस्कृतीशी नाळ टिकवून ठेवण्याची पुरेपूर मुभा आहे. प्रत्येक व्यक्तिने समाजात राहूनच समाज सुधारण्याचा प्रयत्न करावा हा अट्टाहास अवास्तव आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात बाहेरच्या समाजात वावरतांना भारतीय समाजास प्रगल्भ बनवणार्‍या प्रयत्नांची अनेक उदाहरणे सापडतील. अमेरिकेत राहून श्री गोखले समलिंगी लोकांचे जीवन सुसह्य व्हावे यासाठी प्रयत्नशील असू शकतील. मिपावरील त्यांचे प्रतिसाद या प्रयत्नांचाच एक भाग समजून त्यास उत्तेजन द्यावे. अनाठायी निर्ममत्व दाखवून अशा सत्कार्यास अडचणी आणू नयेत.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Sun, 03/28/2010 - 21:44

In reply to पलायनवादी नाही तर धैर्यशील by अक्षय पुर्णपात्रे

Permalink

पुर्णतः

पुर्णतः सहमत. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Mon, 03/29/2010 - 00:11

In reply to पलायनवादी नाही तर धैर्यशील by अक्षय पुर्णपात्रे

Permalink

सहमत...

धन्यवाद श्री. पुर्णपात्रे, आपण माझे टंकनकष्ट वाचवले. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by अप्पा जोगळेकर on Mon, 03/29/2010 - 09:12

In reply to पलायनवादी नाही तर धैर्यशील by अक्षय पुर्णपात्रे

Permalink

गोखले, मी

गोखले, मी ही टीका कोणत्याही आकसापोटी करत नाही इतकेच नमूद करतो. अक्षय पूर्णपात्रे, तुलनेने स्वत:स जेथे शांततेने आणि मानाने जगता येईल अशा ठिकाणी स्थायिक होणे म्हणजे पलायनवाद नव्हे. तुमच्या-माझ्या पूर्वजांनी अनेक वेळा असे निर्णय घेतलेले आहेत - जड अंत:करणाने, नाइलाजाने किंवा स्वखुशीने. तो त्यांचा पलायनवाद होता काय? तुमचा निकष वापरल्यास जगात सर्वच लोक पलायनवादी झालेले दाखवता येईल. - मी ज्या गोष्टीस पलायनवाद असे म्हणालो तीच गोष्ट एखाद्या माणसाला स्वतःची प्रगती करुन घेण्यासाठी उचललेले धडाडीचे पाऊल (वगैरे वगैरे) वाटू शकेल. जे पूर्वजांनी केले ते योग्यच असते किंवा अयोग्यच असते असे मानणे अतार्किक आहे. त्यापेक्षा तुम्ही एखाद्या पुर्वजाने केलेल्या योग्य अथवा अयोग्य कृत्याचा दाखला दिला असता तर बरे झाले असते. - I am a gay maharashtrian person असा स्पष्ट उल्लेख केला आहे. ते जर अजूनही भारतीय नागरिक असतील तर मी माझे शब्द मागे घेतो. त्यांची माफी मागतो. ते जर अमेरिकन नागरिक असतील आणि भारतातली यासंदर्भातली परिस्थिती सुधारावी यासाठी प्रयत्न करत असतील तरीदेखील मी माझे शब्द मागे घेतो. त्यांची माफी मागतो. आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता बाळगेन अशीही खात्री देतो. ते जर अमेरिकन नागरिक असतील आणि भारतातली परिस्थिती सुधारावी यासाठी प्रयत्न करत नसतील तरीदेखील मला त्यांचा राग येणार नाही. पण मग त्यांनी भारत असा आहे किंवा तसा आहे याबाबत उपदेश करु नये. माझा आक्षेप या संदर्भात आहे. आणि हा आक्षेप फक्त गोखल्यांबाबत नाही. Analogus Situation जिथे जिथे लागू होईल त्या सगळ्या व्यक्तींबाबत आहे. (हॅ हॅ हॅ. मी आक्षेप घेतला काय किंवा न घेतला काय काहीच फरक पडत नाही हे मला माहीती आहे.) (आम्ही वाजंत्री.कृतीपेक्षा तोंड वाजवणे अधिक योग्य समजतो.)
  • Log in or register to post comments

Submitted by वाहीदा on Mon, 03/29/2010 - 13:45

In reply to गोखले, मी by अप्पा जोगळेकर

Permalink

हाथ छूटे भी तो रिश्ते नहीं छोडा करते ...

हाथ छूटे भी तो रिश्ते नहीं छोडा करते , वक़्त की शाख से लम्हें नहीं तोडा करते ... जिस की आवाज़ में सिल्वट हो निगाहों में शिकन , ऐसी तस्वीर के टुकड़े नही जोडा करते ... शहद जीने का मिला करता है थोडा थोडा , जाने वालों के दिल नहीं तोडा करते ... लग के साहिल से जो बहता है उसे बहने दो , ऐसी दरिया का कभी रुख्ह नहीं मोडा करते ... अप्पा, प्रश्न माफी चा नाही आहे... आपल्याच लोकांना समजून घेण्याचा आहे :-) असो ! ~ वाहीदा
  • Log in or register to post comments

Submitted by अप्पा जोगळेकर on Mon, 03/29/2010 - 13:58

In reply to हाथ छूटे भी तो रिश्ते नहीं छोडा करते ... by वाहीदा

Permalink

प्रश्न

प्रश्न माफी चा नाही आहे... आपल्याच लोकांना समजून घेण्याचा आहे असो ! अर्थातच. मला भारतीय माणसांबद्दल आपलेपणा वाटतोच. भारतीय नाहीत अशा माणसांबद्दल आपलेपणा वाटण्याची मला गरज वाटत नाही.(भारतीय मूळ असणे आणि भारतीय असणे यात फरक आहे.) आपलेपणा न वाटणे याचा अर्थ वैर असणे असा काढू नये. म्हणूनच तर मी कंडिशनल माफी मागितली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by समीर गोखले on Tue, 03/30/2010 - 08:45

In reply to प्रश्न by अप्पा जोगळेकर

Permalink

धन्यवाद !

अप्पा आणि सर्व, मी थोड्या निवान्त्पणे उत्तर लिहीन, परन्तु मला तुम्हाला येवढेच सान्गायचे होते कि मी सगळे प्रतिसाद वाचत आहे आणि तुम्हा सगळ्यान्नी खुप छान लिहिले आहे. एक महाराष्त्रिअन, एक भारतीय, एक माणुस, एक जागतिक नागरिक, एक सन्वेदनाशील मन, एक मुलगा, एक प्रियकर, एक मित्र,एक भाऊ - अशी अनेक नाती आपण सगळे एकाच्वेळी बाळगत असतो, आणि ह्यातले काही वेगळे करायचे म्हणले तर ते कसे शक्य होइल? मी आज कैरीची डाळ केली आणि खाल्ली, माझ्या जोडीदाराला त्याच्या वाढ्दिवसानिमि त्त नविन कपडे आणले, भारतात आई - बाबान्ना फोन केला आणि खुशाली विचारली, माझ्या सहकार्याच्या मुलीला इस्टर चे गिफ्ट आणले, गे-मराठी ह्या याहु ग्रुप ची काहि ई-मेल तपासली, उद्या san-fransisco ला जाणार आहे त्याची bag भरली, सकाळी एका global telecon वर ७ वेगवेगळ्या देशाती ल माझ्या सहकार्याना guide केले. आजच्या जगातिल आजच्या विचारान्चा मी नागरीक आहे असे मला वाटते. ह्या सगळ्या गोष्टी माझ्या जीवनाचा अविभाज्य अन्ग आहेत आणि मी त्यातच समाधानी आहे असे मला वाटते. समीर
  • Log in or register to post comments

Submitted by अप्पा जोगळेकर on Tue, 03/30/2010 - 08:55

In reply to धन्यवाद ! by समीर गोखले

Permalink

कुराणामध्

कुराणामध्ये सूरे काफरून नावाचा एक सूर आहे ज्याबद्दल नुकतीच माहिती वाचली. 'लकूम दिनुकम वलीये दिन' म्हणजे तुझे विचार मला पटणार नाहीत. माझे विचार तुला पटणार नाहीत. पण म्हणून काय झाले ? तुझा धर्म तुला असो. माझा धर्म मला असो.
  • Log in or register to post comments

Submitted by वाहीदा on Tue, 03/30/2010 - 12:00

In reply to कुराणामध् by अप्पा जोगळेकर

Permalink

हम्म्म ...

लकूम दिनुकुम वलिये दीन (Your religion is yours, mine is mine) ला एकरा फि-दीन (No compulsion in religion). - सुरे अल - काफिरून समीर, ईतरांना त्रास न देता तु सुखी अन समाधानी आहेस हे महत्वाचे !! :-) ~ वाहीदा
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Fri, 03/26/2010 - 08:59

Permalink

स्वागत

प्रमोदजी मिपावर आपले स्वागत! एक चांगला विषय हाताळल्याबद्दल धन्यवाद. मी न येती उत्तरे ची ओळख सर्वसामान्य प्रेक्षकाच्या भुमिकेतुन करुन दिली होती. आता प्रत्यक्ष लेखक दिग्दर्शकच इथे आल्यामुळे मिपाकरांना थेट संपर्क साधता येईल, नवीन वाचकांसाठी धनंजयचा कोणार्कच्या मंदिरातील शिल्पे हा अप्रतिम लेख वाचावा. मिपावर उत्तम उत्तम धागे प्रचंड वेगाने काळाच्या पडद्या आड जातात म्हणुन हे जाणीवपुर्वक उत्खनन. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप चित्रे on Fri, 03/26/2010 - 19:16

In reply to स्वागत by प्रकाश घाटपांडे

Permalink

मिपावर स्वागत

सर, प्रकाशकाकांनी तुमच्या नाटकाची एक प्रेक्षक म्हणून ओळख करून दिली होतीच. त्यावर मी अभिप्रायही दिला होता. नाटकासंदर्भातील आणि एकूणच गेल्या कित्येक वर्षांतील तुमचे नाट्य-लेखन, दिग्दर्शन इ. अनुभव वाचायला नक्की आवडेल. --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments

Submitted by अस्मी on Sat, 03/27/2010 - 12:50

Permalink

कार्यक्रम

कार्यक्रम स्थळ आणि दिनांक: रविवार दि. 28 मार्च, सायंकाळी 7 वाजता सु-दर्शन रंगमंच, अहिल्यादेवी प्रशालेजवळ, शनिवार पेठ, पुणे. - अस्मिता
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sun, 03/28/2010 - 10:35

Permalink

काळे

काळे साहेब, नाटकाविषयी आपले अजून काही अनुभव वाचायला आवडतील. मिपावर आपले स्वागत आहे...!!! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद काळे on Wed, 03/31/2010 - 00:52

Permalink

धन्यवाद!

१/१०एकदशांश लेखही लिहून नाही झाला तर एवढी चर्चा! क्या बात है! मला खूप थोड वेळ मिळतो, म्हणून हप्त्या हप्त्याने लिहायचे ठरवले होते. पण आता वेग वाढवायला हवा असे दिसते.... आणि खरे म्हणजे हा एकदा लिहून संपणारा लेख नाही. आता कुठे आठ प्रयोग झालेत माझ्या नाटकाचे.... जसजसे प्रयोग होतील तसतसे अनुभव आणि हा लेख वाढत जाईल. इथे लेखनाच्या लांबीवर काही बंधन आहे का हो ? मी नवीन आहे म्हणून एक शंका. आज पुढे लिहीत आहे...... मझी विनंती आहे की आपण सर्वांनी, अर्थात पुण्यात असाल तर, प्रयोगाला जरूर या. पुढचे प्रयोग ४ एप्रिल सकाळी ११ वाजता, १४ व १८ एप्रिल सायंकाळी ७ वाजता असे सादर होतील. स्थळ अर्थातच सु-दर्शन रंगमंच, अहिल्यादेवी प्रशालेजवळ, शनिवार पेठ.
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Tue, 03/30/2010 - 22:55

Permalink

पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत

नाटकाबद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. लेखाच्या पुढील भागाच्या प्रतीक्षेत आहे. (लेखाचा प्रत्येक भाग थोडा लांब लिहावा अशी विनंती.)
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on Tue, 03/30/2010 - 23:44

Permalink

स्वागत आहे

श्री. काळे , उशीराच प्रतिसाद देतो आहे. इथे आल्याबद्दल आणि तुमच्या या नाटकाबद्दल आवर्जून लिहिल्याबद्दल एक सामान्य सभासद म्हणून आभारी आहे. श्री. काळे स्वतः तसा उल्लेख कधी करणार नाहीत, परंतु मला हे नमूद करावेसे वाटते की श्री. काळे यांनी गेली अनेक वर्षे चालवलेली "सुदर्शन रंगमंच" ही संस्था म्हणजे तरुण नाटककार , नट, दिग्दर्शक यांच्याकरता नवनवीन प्रयोगांची संधी उपलब्ध करून देणारे पुण्यातले एक उत्तम व्यासपीठ आहे. गेल्या काही वर्षांत गाजलेली अनेक नाटके , नव्याने पुढे आलेले नाटककार-रंगकर्मी यांना सुदर्शनची पार्श्वभूमी आहे. पुन्हा एकदा , आभार.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद काळे on Wed, 03/31/2010 - 00:57

In reply to स्वागत आहे by मुक्तसुनीत

Permalink

अर्धसत्य...

हो. मी सु-दर्शनशी संबंधित आहेच. अगदी ही कल्पना जन्माला आल्यापासून. पण मी एकटा नाही. आम्ही अनेकजण आहोत, त्यामुळेच एक छोटेसे समीप नाट्यगृह चळवळ म्हणून पुढे येऊ शकले. आम्हा सगळ्यांनाच याचा खूप अभिमान आहे, आणि आनंदही. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by वाहीदा on Wed, 03/31/2010 - 11:19

In reply to अर्धसत्य... by प्रमोद काळे

Permalink

अरे व्वा !!

हि तर झाली आता.. अजब मिपा की गजब कहानी ;-) तुम्ही सु-दर्शनश संबधित आहात हे वाचून आनंद झाला.. आम्ही या संस्थे संबधीत खुप काही ऐकून आहोत आता छान काही त्या बाबतित वाचायला ही मिळणार (खुद के संग बाता : अरे व्वा व्व्वा .... अरे व्वा व्व्वा :-) ~वाहीदा
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देव on Wed, 03/31/2010 - 09:56

Permalink

नाटकामागचे नाटक..

आणि त्याची कहाणी छान उलगडून सांगितलेय.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com