Skip to main content

आशा

लेखक sneharani यांनी सोमवार, 16/07/2012 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
नावच कशाला हवं एखाद्या नात्याला ऋणानुबंध समज हवं तर..... हिर्‍याच्या तेजासम असणारा जिव्हाळा - त्याला नात्याच्या नावाचं कोंदण हवच कशाला? हिराही चमकतो की मग तो सोन्याचांदीच्या कोंदणात असला काय किंवा नसला काय.... अशा जिव्हाळ्याच्या हिर्‍यामधून आशेची किरणं परिवर्तित होतात... अन् मग रंगबेरंगी स्वप्नं आकार घेतात स्वप्नं सत्यात उतरताना आशेची किरणं सदोदीत साथ देत राहतील ही कदाचित पण नशिबाची साथ मिळायला लागतेच की... म्हणतात की लाख शिंपले उघडले की एखादा अनमोल मोती सापडेल इतके प्रयत्न करूनही नाही सापडला तर "नशीब" खोटं ठरत पण शिंपली उघडण्याची आस अन् त्या प्रत्येक क्षणात असणारी आशा सत्य होतीच ना? अगदी तसचं तुझ्या-माझ्या बंधात असणारी माझी प्रत्येक आशा अगदी सत्याच्या क्षणातून पण त्या तुला इतकं प्रयत्न करूनही नाही कळल्या तर नशीब खोटं असे क्षण तुझ्या आयुष्यात आले असतील तर समानुभुती अनुभवशील नाहीतर मग मलाच सहानुभूतीचे चार शब्द ऐकवशील आताशा मीही म्हणतेय देवाला डोळेझाक करून जगता यायला हवं अगदी त्याच्यासारखं पण जन्मतःच भावनांचं अन् शिकल्यानंतर विचार करण्याचं आंदण न मागताही मिळालयं ते का कुठल्या शापाची पुर्तता व्हायला...? आशा लवकर सुटत नाही तीही जिंवत राहील कदाचित अगदी मृत्युची कवाडं उघडेपर्यंत! तेव्हा होणारी तगमग नक्कीच आयुष्यात केव्हातरी अनुभवशील पण त्यासाठी जिव्हाळ्याच्या धरतीवर ओढीचं एखादं रोपटं उगवायला हवचं.....!
काव्यरस

वाचने 1651
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

आवडल्या गेले आहे.

सावकाशीने वाचेन म्हणून बाजूला ठेवली होती ही कविता, त्याचं सार्थक झालं.

खूप छान...