Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by योगप्रभू on Fri, 07/13/2012 - 13:32
माझे नाव स्थिरबुद्धी. मी जंबूकाचार्यांचा शिष्य. अनाथ सापडलेल्या माझे संगोपन व शिक्षण जंबूकाचार्यांनी केले. अध्ययन संपल्यावर गृहस्थाश्रमात जाण्याची अनुज्ञा देताना आचार्य मला म्हणाले, 'स्थिरबुद्धी. तुला स्वतःचे कुणी नाही. मलाही मेधा या एकुलत्या एक मुलीखेरीज कुणी नाही. तू मेधाशी परिणय करुन हे गुरुकुल चालवावेस असे मला वाटते.' त्यावर मी म्हणालो, 'गुरुदेव! आपण मेधाचाही विचार घ्यावात. मला येथे राहून गुरुकुल चालवणे आवडेल, पण मेधाशी विवाह मात्र अडचणीचा वाटतो. आपण माझे संगोपन केलेत त्याअर्थी आपणच माझे पिता. दुसर्‍या अर्थाने गुरु हा पित्यासमान असतो. त्यामुळे भगिनीसम मेधाशी विवाह अनुचित नाही का ठरणार?' आचार्यांनी मेधाला बोलवून विचारले. मेधा ही अत्यंत बुद्धिमान, पण खोडकर होती. ती म्हणाली, ' मी आजवर स्थिरबुद्धीकडे बंधू या नात्याने कधीच पाहिलेले नाही. त्यामुळे मला तो पती म्हणून चालेल. पण 'कन्या हे परधन' असे आपली नीती सांगते. स्थिरबुद्धी इथेच राहिला तर माझी सासरी पाठवणी होणार नाही आणि परधन स्वतःकडे ठेऊन घेतल्याचा दोष तुम्हाला लागेल. अर्थात स्थिरबुद्धीने अन्यत्र गुरुकुल चालवले तर मी त्याची सहचरी बनायला तयार आहे. मात्र त्याने येथे गुरुकुल चालवण्यात मला अडचण वाटते.' आम्ही उपस्थित केलेल्या या पेचावर आचार्यांनी काय केले असावे? या कहाणीचा शेवट काय झाला असावा, असे तुम्हाला वाटते?
  • Log in or register to post comments
  • 7958 views

प्रतिक्रिया

Submitted by चिखलू on Sat, 07/14/2012 - 14:16

Permalink

कंदमुळे..

चालतील ना.... आणि, "शिष्या ही पुत्रीसमान असते असे आपल्या हिमालयासम उत्तुंग संस्कृतीने म्हटले तर??" अहो हे लग्न न करण्याचे कारण म्हणून देतात, करण्यासाठी नाही. आपली हिमालयापेक्षाही उत्तुंग संस्कृती असेही म्हणते की "स्त्री ही क्षण कालाची पत्नी आणि अनंत कालाची माता असते"
  • Log in or register to post comments

Submitted by पक पक पक on Sat, 07/14/2012 - 16:05

In reply to कंदमुळे.. by चिखलू

Permalink

"स्त्री ही क्षण कालाची पत्नी

"स्त्री ही क्षण कालाची पत्नी आणि अनंत कालाची माता असते" या व्याक्यात बहिणीचा उल्लेख नाही... :sad:
  • Log in or register to post comments

Submitted by चैतन्य दीक्षित on Mon, 07/16/2012 - 09:48

In reply to कंदमुळे.. by चिखलू

Permalink

स्त्री ही

स्त्री ही क्षणकालाची पत्नी असते (स्वतःची) आणि अनंतकालाची माता असते (आपल्या मुलाची) त्यामुळे त्या वाक्यात स्वतःचाही (कोड्याच्या संदर्भात- स्थिरबुद्धीचा)विचार व्हायला हवा असे वाटून गेले इतकेच :)
  • Log in or register to post comments

Submitted by योगप्रभू on Sun, 07/15/2012 - 02:51

Permalink

सर्वांचे आभार...

विचारपूर्वक आणि गंमतीने प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे आभार... (विशेषतः दोन-तीन प्रतिसादक उत्तराच्या जवळपास पोचले त्यांचे अभिनंदन) जंबूकाचार्यांनी दोघांचेही म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. प्रथम त्यांनी स्थिरबुद्धीचे समाधान केले. ते म्हणाले, ' मी तुझा पिता होऊ शकत नाही कारण १) तू माझा रक्ताचा मुलगा नाहीस २) मी तुला दत्तक घेतलेले नाही अथवा मुलगा मानलेले नाही. ३) तुझा जन्मदाता पिता अद्यापही अज्ञात असला तरी कदाचित या भूतलावर कुठेतरी जिवंतही असू शकेल/किंवा नसेलही. पण समान शक्यता असताना तुला अनाथ मानता येत नाही. जर मी तुझे पितृत्व स्वीकारले नाही तर मी कशा प्रकारचे पालकत्व स्वीकारावे? मी स्वतःला तुझा मामा (मातुल) मानले तर तुला 'मातुलकन्यापरिणय' प्रथेनुसार मेधाशी विवाह करण्यास समाजाचीही हरकत नसेल. पितृकुळाकडे जाणारा संबंध नसल्याने, तसेच सगोत्र विवाह नसल्याने त्याचाही दोष नसेल. आता तुझा दुसरा मुद्दा. विद्या शिकवून संपल्यावर, शिष्य ज्ञानात बरोबरीचा झाल्यावर आणि ब्रह्मचर्याश्रमातून गृहस्थाश्रमात गेल्यावर गुरुचा त्याच्यावरील अधिकार संपुष्टात येतो. तू आता स्वतंत्र झाला असल्याने माझे गुरुत्वही संपुष्टात आले आहे. तरीही तुला हा विवाह अडचणीचा वाटत असेल तर तू गोंधळशील अशी उदाहरणे मी देतो. महाभारत काळात दुर्योधन हा बलरामाचा शिष्य आणि अर्जुन हा श्रीकृष्णाचा शिष्य. दोघांनाही आपली सख्खी भगिनी सुभद्रा हिचा परिणय आपल्या शिष्यांशी व्हावा, असे वाटत होते. गुरु हा पित्यासमान असेल तर त्याच्या भगिनीशी परिणय हा आत्याशी विवाहासम ठरला पाहिजे. पण तरी तो सर्वांनी कसा मानला? दुसरे उदाहरण - एखाद्याला केवळ कन्या हेच अपत्य असेल तर तिच्या विवाहानंतर जामाताचे श्वशुराशी नाते मुलासम ठरते. पण मग म्हणून कन्या आणि जामात परस्परांना बंधू-भगिनीसम ठरावेत का? मेधाच्या शंकेचे समाधान तुलनेने सोपे होते. जंबूकाचार्य तिला म्हणाले, ' तुला अडचण केवळ तुम्ही दोघांनी माझ्या घरी राहण्याची वाटते. स्थिरबुद्धीने स्वतःचे गुरुकुल काढले तर हा प्रश्न संपतो. स्थिरबुद्धीला घर नसल्याने विश्व हेच त्याचे घर. अर्थात तो जिथे नेईल तेच तुझे सासर. त्यामुळे मी असा निर्णय घेतो, की सर्वप्रथम मी माझ्या गुरुकुलातील निम्मा हिस्सा स्थिरबुद्धीला वरदक्षिणा म्हणून देतो. तेथे त्याने स्वतःचे गुरुकुल सुरु करावे. उर्वरित निम्मा हिस्सा माझा असेल. मेधा स्थिरबुद्धीच्या हिश्श्यात म्हणजे माहेरुन सासरी राहायला गेल्याने परधन स्वतःच्या घरी ठेऊन घेतल्याचा दोष मला लागणार नाही. पुन्हा माझ्या वाट्याच्या हिश्शात मी महिलांसाठी नवे गुरुकुल सुरु करेन. तेथे मेधाने महिलांना विद्यादान करावे. अशा रीतीने मेधा व स्थिरबुद्धीचा परिणय झाला. स्थिरबुद्धीने नवे गुरुकुल काढले. मेधाला स्वतःचे सासर मिळाले. जंबूकाचार्यांचा वृद्धापकाळचा निवारा कायम राहिला व त्यांना व मेधाला उत्पन्नाचे नवे साधन मिळाले. सगळे एकत्र गुण्यागोविंदाने राहू लागले. बालमित्रांनो! आवडली का ही गोष्ट तुम्हाला? :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Sun, 07/15/2012 - 07:23

In reply to सर्वांचे आभार... by योगप्रभू

Permalink

_/\_

_/\_
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on Sun, 07/15/2012 - 11:45

In reply to सर्वांचे आभार... by योगप्रभू

Permalink

जबरा. _/\_

स्थिरबुध्दीच्या स्थिरबुध्दीला व त्याला कन्या देणार्‍या गुरुला मनापासुन प्रणाम. हो इतक्या वर्षात आपल्यावर लाइन* मारणारी मुलगी त्याची बहीणसम आहे की मैत्रीणसम की आणखी काही समव्यस्त आहे याचा पत्ता लागला नाही म्हणजे गुरु व शिष्याची तयारी जबराच असली पाहीजे. ;)
महाभारत काळात दुर्योधन हा बलरामाचा शिष्य आणि अर्जुन हा श्रीकृष्णाचा शिष्य. दोघांनाही आपली सख्खी भगिनी सुभद्रा हिचा परिणय आपल्या शिष्यांशी व्हावा, असे वाटत होते. गुरु हा पित्यासमान असेल तर त्याच्या भगिनीशी परिणय हा आत्याशी विवाहासम ठरला पाहिजे. पण तरी तो सर्वांनी कसा मानला ?
ओह! म्हणुनच तर लोकांनी प्राध्यापकांना त्यांच्या स्टुडंटशी शरीसंबध ठेवण्यास सपोर्ट करावे (किमान विरोध करु नये) असे माझा मित्रही म्हणतो( तो कुठे नोकरी करतो हे विचारु नका).
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Sun, 07/15/2012 - 19:54

In reply to सर्वांचे आभार... by योगप्रभू

Permalink

बालमित्रांना गोष्ट आवडली.

बालमित्रांना गोष्ट आवडली. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by जेनी... on Sun, 07/15/2012 - 09:57

Permalink

आयला लग्न पण झालं .. भारीये

आयला लग्न पण झालं .. भारीये राव ...बोलावलं बी नाय :(
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Sun, 07/15/2012 - 13:19

In reply to आयला लग्न पण झालं .. भारीये by जेनी...

Permalink

तु पण???

तु पण??? :P
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com